नम्रता
यहोवा नम्र लोकांबद्दल आणि गर्विष्ठ लोकांबद्दल काय विचार करतो?
स्तो १३८:६; नीत १५:२५; १६:१८, १९; २२:४; १पेत्र ५:५
हेसुद्धा पाहा: नीत २९:२३; यश २:११, १२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२इत २६:३-५, १६-२१—उज्जीया राजा गर्विष्ठ बनला; त्याने देवाचा नियम मोडला आणि सल्ला दिल्यावर त्याला राग आला. त्यामुळे यहोवाने त्याला कुष्ठरोग देऊन शिक्षा केली
-
लूक १८:९-१४—गर्विष्ठ लोकांच्या आणि नम्र लोकांच्या प्रार्थनांबद्दल यहोवाला कसं वाटतं हे सांगण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं
-
जे नम्र असतात आणि मनापासून पश्चात्ताप करतात त्यांच्याशी यहोवा कसा वागतो?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२इत १२:५-७—रहबाम राजा आणि यहूदाचे अधिकारी यहोवापुढे नम्र झाल्यामुळे एक मोठं संकट टळलं
-
२इत ३२:२४-२६—हिज्कीया राजाचं मन गर्विष्ठ झालं होतं. पण नंतर तो नम्र झाल्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं
-
नम्र असल्यामुळे इतरांसोबतचं आपलं नातं चांगलं कसं होऊ शकतं?
इफि ४:१, २; फिलि २:३; कल ३:१२, १३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३३:३, ४—एसाव याकोबवर रागावला होता, पण त्याला भेटल्यावर याकोबने खूप नम्रता दाखवली आणि म्हणून त्यांच्यात पुन्हा शांतीचं नातं तयार झालं
-
शास ८:१-३—न्यायाधीश गिदोन नम्रपणे एफ्राईमच्या माणसांना म्हणाला, की ते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत; यामुळे त्यांचा राग शांत होतो आणि ते त्याच्याशी भांडायचं सोडून देतात
-
नम्र असणं महत्त्वाचंय हे येशू ख्रिस्ताने कसं शिकवलं?
मत्त १८:१-५; २३:११, १२; मार्क १०:४१-४५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
यश ५३:७; फिलि २:७, ८—भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे येशू नम्र होता. तो पृथ्वीवर यायला तसंच वेदनादायक आणि लज्जास्पद मृत्यू सहन करायलाही तयार होता
-
लूक १४:७-११—गर्विष्ठ असण्यापेक्षा नम्र असणं किती महत्त्वाचंय आणि त्यामुळे कसा फायदा होतो, हे शिकवण्यासाठी येशूने मेजवानीत सगळ्यात महत्त्वाच्या जागा निवडणाऱ्यांचं उदाहरण दिलं
-
योह १३:३-१७—येशूने शिष्यांचे पाय धुऊन एका दासासारखं काम केलं. असं करून त्याने शिष्यांपुढे नम्रतेचं एक चांगलं उदाहरण घालून दिलं
-
आपण स्वतःकडे आणि इतरांकडे यहोवाच्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न केला तर नम्र राहायला आपल्याला कशी मदत होईल?
नम्रतेचं ढोंग करणं काहीही उपयोगाचं नाही असं का म्हणता येईल?