पश्चात्ताप
सर्व मानवांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप का केला पाहिजे आणि यहोवाकडे क्षमा का मागितली पाहिजे?
हेसुद्धा पाहा: प्रेका २६:२०
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लूक १८:९-१४—आपण आपले पाप कबूल करून मदतीसाठी देवाला प्रार्थना केली पाहिजे यावर जोर देण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं
-
रोम ७:१५-२५—पौल एक प्रेषित होता आणि त्याचा विश्वास भक्कम होता; पण तरी पापी इच्छांविरुद्ध आपल्याला संघर्ष करावा लागतोय याचं त्याला खूप वाईट वाटायचं
-
पश्चात्ताप करणाऱ्यांबद्दल यहोवाला कसं वाटतं याविषयी बायबल काय सांगतं?
यहे ३३:११; रोम २:४; २पेत्र ३:९
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लूक १५:१-१०—एक पापी व्यक्ती पश्चात्ताप करते तेव्हा यहोवाला आणि स्वर्गदूतांना आनंद होतो हे येशूने उदाहरणं देऊन सांगितलं
-
लूक १९:१-१०—प्रमुख जकातदार असलेला जक्कय लोकांना लुबाडायचा. पण त्याने पश्चात्ताप करून जीवनात बदल केले तेव्हा येशूने त्याला माफ केलं
-
आपण मनापासून पश्चात्ताप केलाय हे आपण कसं दाखवू शकतो?
यहे १८:२१-२३; प्रेका ३:१९; इफि ४:१७, २२-२४; कल ३:५-१०
हेसुद्धा पाहा: १पेत्र ४:१-३
मनापासून पश्चात्ताप करणाऱ्याला ‘सत्याचं अचूक ज्ञान’ कसं मदत करू शकतं?
रोम १२:२; कल ३:९, १०; २ती २:२५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका १७:२९-३१—प्रेषित पौलने अथेन्सच्या लोकांना समजावून सांगितलं, की मूर्तिपूजा अज्ञानामुळे केली जाते; आणि म्हणून त्याने त्यांना पश्चात्ताप करायला सांगितलं
-
१ती १:१२-१५—येशू ख्रिस्ताबद्दल अचूक ज्ञान मिळण्याआधी प्रेषित पौलने नकळत गंभीर पापं केली होती
-
पश्चात्ताप करणं किती महत्त्वाचंय?
आपण अशी खातरी का ठेवू शकतो, की आपण जर पश्चात्ताप केला तर यहोवा आपल्याला माफ करेल; मग आपल्या हातून बऱ्याचदा पाप घडलं तरी?
जे आपली पापं कबूल करून जीवनात बदल करतात त्यांच्याशी यहोवा कसा वागतो?
हेसुद्धा पाहा: “दया”
पश्चात्ताप करण्यात वाईट वाटणं किंवा ‘माझं चुकलं’ इतकंच म्हणणं पुरेसं नाही हे आपल्याला कशावरून कळतं?
२इत ७:१४; नीत २८:१३; यहे १८:३०, ३१; ३३:१४-१६; मत्त ३:८; प्रेका ३:१९; २६:२०
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२इत ३३:१-६, १०-१६—मनश्शे राजाने बऱ्याच काळापर्यंत दुष्ट कामं केली; पण तो नम्र झाला, त्याने सतत प्रार्थना केली, आपल्या जीवनात बदल केले आणि असं करून त्याने मनापासून पश्चात्ताप झाल्याचं दाखवलं
-
स्तो ३२:१-६; ५१:१-४, १७—आपण यहोवाविरुद्ध पाप केलंय याचं दावीद राजाला खूप वाईट वाटलं. त्याने आपली पापं कबूल करून क्षमेसाठी प्रार्थना केली. असं करून त्याने दाखवलं, की त्याने मनापासून पश्चात्ताप केलाय
-
आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्या व्यक्तीने जर पश्चात्ताप केला तर आपण तिला माफ का केलं पाहिजे?
मत्त ६:१४, १५; १८:२१, २२; लूक १७:३, ४
हेसुद्धा पाहा: “क्षमा”