पाप
पाप म्हणजे काय आणि त्याचा आपल्या सगळ्यांवरच परिणाम कसा झालाय?
आपण आपल्या पापी प्रवृत्तीशी लढू शकतो याची खातरी बायबल आपल्याला कसं देतं?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२शमु ११:२-५, १४, १५, २६, २७; १२:१-१३—दावीद राजाने गंभीर पापं केल्यामुळे त्याला ताडन मिळालं आणि त्याने स्वतःला सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले
-
रोम ७:१५-२४—प्रेषित पौलचा देवावर पक्का भरवसा होता आणि तो मनापासून देवाची सेवा करायचा. पण चुकीच्या इच्छांवर आणि विचारांवर ताबा मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली
-
बरेच लोक पाप का करतात?
प्रेका ३:१७; १७:२९, ३०; १ती १:१३; १पेत्र १:१४
हेसुद्धा पाहा: गण १५:२७-२९
जाणूनबुजून पाप करत राहणं गंभीर का आहे?
इब्री १०:२६, २७; १यो ३:४, ८, ९
हेसुद्धा पाहा: गण १५:३०; रोम १:२८-३२; १ती ५:२०
देवाच्या सेवकांना पापात पाडण्यासाठी सैतान कदाचित कशाचा वापर करेल?
नीत १:१०, ११, १५; मत्त ५:२८; याक १:१४, १५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३:१-६—सैतानाने सापाचा उपयोग करून हव्वाला तिच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्याच्या मोहात पाडलं आणि यामुळे तिचा यहोवावरचा भरवसा कमी झाला
-
नीत ७:६-१०, २१-२३—शलमोन राजाने अशा एका भोळ्या तरुणाबद्दल सांगितलं जो एका अनैतिक स्त्रीच्या मोहात पडतो
-
सैतानाच्या प्रलोभनांचा आपण कसा विरोध करू शकतो?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नीत ५:१-१४—एका प्रेमळ वडिलांप्रमाणे शलमोन राजाने देवाच्या प्रेरणेने सल्ला दिला, की अनैतिक लैंगिक कामांपासून आपण का आणि कसं दूर राहू शकतो
-
मत्त ४:१-११—येशूने देवाच्या वचनाचा वापर करून सैतानाच्या प्रलोभनांचा विरोध केला
-
ख्रिश्चनांनी कोणत्या गंभीर पापांपासून दूर राहिलं पाहिजे?
पाहा: “चुकीची कामं”
पापांची कबुली
आपण आपली पापं लपवायचा प्रयत्न का करू नये?
आपण कोणाजवळ आपली पापं कबूल केली पाहिजेत?
आपल्या वतीने यहोवाकडे विनंती करून “सहायक” म्हणून कोण काम करतं?
एखाद्याने आपल्या पापांसाठी पश्चात्ताप केलाय हे तो कसं दाखवू शकतो?
हेसुद्धा पाहा: “पश्चात्ताप”
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
निर्ग २२:१-१२—मोशेच्या नियमशास्त्रात असं सांगितलं होतं, की चोरी करणाऱ्याने चोरलेल्या वस्तूची भरपाई करावी
-
लूक १९:८, ९—प्रमुख जकातदार जक्कयने स्वतःमध्ये बदल करून आणि लुबाडलेल्या गोष्टींची भरपाई करून पश्चात्ताप केला
-
यहोवा आपल्याला माफ करेल असा भरवसा आपण का ठेवू शकतो?
पाहा: “क्षमा”
एखाद्याने जर गंभीर पाप केलं तर त्याला मदत करण्यासाठी आणि मंडळीला सुरक्षित ठेवण्यासाठी यहोवाने कोणती व्यवस्था केली आहे?
हेसुद्धा पाहा: प्रेका २०:२८; गल ६:१
गंभीर पापाचा कुटुंबावर किंवा मंडळीवर कसा परिणाम होऊ शकतो?
हेसुद्धा पाहा: अनु २९:१८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
यहो ७:१-१३, २०-२६—आखानने एक गंभीर पाप केलं आणि ते लपवायचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण इस्राएलवरच मोठं संकट आलं
-
योन १:१-१६—योना यहोवाच्या विरुद्ध वागला आणि त्यामुळे त्याने स्वतःचा आणि जहाजात असलेल्या इतरांचाही जीव धोक्यात घातला
-
१कर ५:१-७—प्रेषित पौलने करिंथ मंडळीत असलेलं गंभीर पापाचं एक प्रकरण उघड केलं. कारण संपूर्ण मंडळीवर त्याचा वाईट परिणाम होत होता
-
आपल्याला ताडन दिलं जाईल अशी भीती वाटत असली तरी आपण मंडळीतल्या वडिलांची मदत का घेतली पाहिजे?
पूर्वी केलेल्या एखाद्या पापाबद्दल दुःख करत बसण्याऐवजी यहोवाने आपल्याला माफ केलंय असा भरवसा आपण का ठेवला पाहिजे?
पाहा: “क्षमा”
आपल्याला जर माहीत असेल की एखाद्याने गंभीर पाप केलंय, तर त्याबद्दल तो मंडळीतल्या वडिलांना जाऊन सांगतो की नाही याची खातरी आपण का केली पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
अनु १३:६-९; २१:१८-२०—मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलं होतं, की कुटुंबातल्या किंवा जवळच्या व्यक्तीने जरी गंभीर पाप केलं असलं तरी त्याबद्दल वडीलजनांना सांगणं गरजेचं होतं
-