पैसा
पैशावर प्रेम करणं धोक्याचं का आहे?
पाहा: “धनसंपत्तीबद्दल प्रेम”
कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी पैसा कमवणं चुकीचं नाही हे बायबलमधून कसं कळतं?
उप ७:१२; १०:१९; इफि ४:२८; २थेस ३:१०; १ती ५:८, १८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३१:३८-४२—लाबानने याकोबची मजुरी बऱ्याचदा बदलली तरी याकोब मेहनत करत राहिला. आपल्या कुटुंबासाठी तो जी मेहनत घेत होता त्यावर यहोवाने आशीर्वाद दिला
-
लूक १९:१२, १३, १५-२३—येशूने सांगितलेल्या एका उदाहरणातून आपल्याला कळतं, की जास्त पैसा कमवण्यासाठी तो गुंतवणं ही त्या काळात एक सर्वसामान्य गोष्ट होती
-
पैसे उसने घेण्याबद्दल आणि देण्याबद्दल बायबल काय सांगतं?
आपण गरज नसताना कर्ज घेणं का टाळलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नहे ५:२-८—नहेम्याच्या दिवसांत, आपल्या भाऊबंदाना कर्ज देणारे काही इस्राएली लोक त्यांच्याशी खूप निर्दयीपणे वागले
-
मत्त १८:२३-२५—येशूच्या उदाहरणावरून कळतं, की कर्जाची परतफेड न करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते
-
सत्यात नसलेल्यांसोबत, भाऊबहिणींसोबत किंवा नातेवाइकांसोबत पैशाचा व्यवहार करण्याआधी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प २३:१४-२०—पुढे कोणताही गैरसमज किंवा वाद होऊ नये म्हणून अब्राहामने साराला पुरण्यासाठी काही साक्षीदारांसमोर एक शेत आणि त्यातली गुहा पैसे देऊन विकत घेतली
-
यिर्म ३२:९-१२—यिर्मयाने आपल्या चुलत भावाकडून शेत विकत घेतलं तेव्हा त्याने खरेदीखत तयार केलं, त्याची एक प्रत बनवली आणि काही साक्षीदारांसमोर सगळा व्यवहार पूर्ण केला
-
पैशाचं नियोजन चांगल्या प्रकारे करणं का सुज्ञपणाचंय?
ख्रिश्चनांनी पैशाच्या वादावरून मंडळीत फूट का पडू देऊ नये?
हेसुद्धा पाहा: रोम १२:१८; २ती २:२४
खरा आनंद मिळेल अशा प्रकारे आपण पैशाचा वापर कसा करू शकतो?