व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रोत्साहन

प्रोत्साहन

देवाच्या सेवकांनी एकमेकांना प्रोत्साहन देणं का महत्त्वाचंय?

यश ३५:३, ४; कल ३:१६; १थेस ५:११; इब्री ३:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत ३२:२-८—आपल्या प्रजेवर एक मोठं संकट येणार होतं तेव्हा हिज्कीया राजाने त्यांची हिंमत वाढवली

    • दान १०:२, ८-११, १८, १९—दानीएल वृद्ध आणि कमजोर झाला होता तेव्हा एका स्वर्गदूताने त्याला बळ दिलं

यहोवाने ज्यांना अधिकार दिलाय त्यांनी इतरांना प्रोत्साहन द्यावं अशी तो अपेक्षा का करतो?

यश ३२:१, २; १पेत्र ५:१-३

हेसुद्धा पाहा: मत्त ११:२८-३०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • अनु ३:२८; ३१:७, ८—यहोवाने सांगितल्याप्रमाणे मोशे संदेष्ट्याने पुढे इस्राएली लोकांचं नेतृत्व करणाऱ्‍या यहोशवाला प्रोत्साहन देऊन त्याची हिंमत वाढवली

    • प्रेका ११:२२-२६; १४:२२—छळाचा सामना करत असलेल्या अंत्युखियातल्या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौल आणि बर्णबा यांनी प्रोत्साहन दिलं

इतरांना प्रोत्साहन देताना त्यांची मनापासून प्रशंसा करणंही का महत्त्वाचंय?

नीत ३१:२८, २९; १कर ११:२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • शास ११:३७-४०—न्यायाधीश इफ्ताहच्या मुलीने केलेल्या त्यागाबद्दल तिची प्रशंसा करण्यासाठी इस्राएलमधल्या मुली दरवर्षी तिला भेटायला जायच्या

    • प्रक २:१-४—इफिसमधल्या ख्रिश्‍चनांनी कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे हे येशूने सांगितलं, पण त्याआधी ते करत असलेल्या चांगल्या कामांसाठी त्याने त्यांची प्रशंसाही केली

देवाचे विश्‍वासू सेवक एकमेकांना प्रोत्साहन कसं देऊ शकतात?

नीत १५:२३; इफि ४:२९; फिलि १:१३, १४; कल ४:६; १थेस ५:१४

हेसुद्धा पाहा: २कर ७:१३, १५, १६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु २३:१६-१८—आपल्या मित्राला, दावीदला प्रोत्साहनाची गरज आहे हे योनाथानला माहीत होतं, म्हणून तो त्याला जाऊन भेटला

    • योह १६:३३—येशूने शिष्यांना प्रोत्साहन दिलं, की त्यांनी जर त्याचं अनुकरण केलं तर तेसुद्धा त्याच्यासारखंच जगाला जिंकू शकतात

    • प्रेका २८:१४-१६—प्रेषित पौलला सुनावणीसाठी रोमला नेलं जात असताना काही बांधव त्याला भेटायला आणि प्रोत्साहन द्यायला प्रवास करून आले. त्यांना पाहून पौलला धीर मिळाला

आपण नकारात्मक आणि कुरकूर करायची मनोवृत्ती टाळणं का गरजेचंय?

फिलि २:१४-१६; यहू १६-१९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • गण ११:१०-१५—लोक नकारात्मक आणि बंडखोरपणे वागतायेत हे पाहून मोशेला फार दुःख झालं

    • गण १३:३१, ३२; १४:२-६—दहा अविश्‍वासू हेर नकारात्मक बोलले तेव्हा लोकांचा धीर खचला आणि त्यामुळे लोकांनी बंड केलं

भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन कसं मिळू शकतं?

नीत २७:१७; रोम १:११, १२; इब्री १०:२४, २५; १२:१२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत २०:१-१९—एक मोठं सैन्य यहोशाफाट राजाशी लढायला आलं तेव्हा त्याने सगळ्या लोकांना एकत्र जमवलं आणि यहोवाला प्रार्थना केली

    • प्रेका १२:१-५, १२-१७—प्रेषित याकोबची हत्या झाल्यानंतर आणि प्रेषित पेत्रला तुरुंगात टाकण्यात आल्यानंतर यरुशलेममधले भाऊबहीण प्रार्थनेसाठी एकत्र आले

परीक्षांचा सामना करताना आपल्या आशेबद्दल विचार केल्याने आपल्याला टिकून राहायचं प्रोत्साहन कसं मिळू शकतं?

प्रेका ५:४०, ४१; रोम ८:३५-३९; १कर ४:११-१३; २कर ४:१६-१८; १पेत्र १:६, ७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३९:१९-२३; ४०:१-८—योसेफवर खोटा आरोप लावून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं, तरी तो यहोवाला विश्‍वासू राहिला आणि त्याने इतरांना मदत केली

    • २रा ६:१५-१७—एक मोठं सैन्य समोर असतानाही अलीशा संदेष्टा घाबरला नाही आणि त्याच्या सेवकानेही घाबरू नये म्हणून त्याने प्रार्थना केली

बायबल आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतं

यहोवा आपल्याला प्रेमळपणे कोणती खातरी देतो?

यहोवा किती दयाळू आणि सहनशील आहे यावर विचार केल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन कसं मिळतं?

थकलेल्या आणि खचलेल्या लोकांसाठी यहोवा काय करू शकतो?

स्तो ४६:१; यश १२:२; ४०:२९-३१; फिलि ४:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १:१०, ११, १७, १८—हन्‍ना खूप दुःखी आणि निराश झाली तेव्हा यहोवाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला मनाची शांती दिली

    • १रा १९:१-१९—एलीया संदेष्टा खूप निराश झाला तेव्हा यहोवाने त्याला व्यावहारिक मार्गाने मदत केली. भविष्याची चांगली आशा देऊन त्याने एलीयाचं सांत्वन केलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं

बायबलमधल्या भविष्याच्या आशेमुळे आपल्याला धैर्य कसं मिळतं?

२इत १५:७; स्तो २७:१३, १४; इब्री ६:१७-१९; १२:२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ईयो १४:१, २, ७-९, १३-१५—ईयोब खूपच निराश झाला होता, पण यहोवा त्याचं पुनरुत्थान करेल हे माहीत असल्यामुळे त्याला सांत्वन मिळालं

    • दान १२:१३—दानीएल संदेष्टा जवळपास १०० वर्षांचा होता, तेव्हा एका स्वर्गदूताने भविष्यात मिळणाऱ्‍या सुंदर प्रतिफळाबद्दल त्याला सांगितलं. त्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळालं

यहोवाला प्रार्थना केल्यामुळे आणि त्याने केलेल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे आपल्याला बळ कसं मिळू शकतं?

स्तो १८:६; ५६:४, ११; इब्री १३:६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु ३०:१-९—दावीदला समस्यांचा सामना करावा लागला तेव्हा यहोवाला प्रार्थना केल्यामुळे त्याला बळ मिळालं

    • लूक २२:३९-४३—सगळ्यात कठीण परीक्षेचा सामना करताना येशूने कळकळून यहोवाला प्रार्थना केली आणि त्याला धीर देण्यासाठी यहोवाने एका स्वर्गदूताला पाठवलं

चांगली बातमी ऐकल्यामुळे आणि ती इतरांनाही सांगितल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन कसं मिळू शकतं?

नीत १५:३०; २५:२५; यश ५२:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका १५:२-४—प्रेषित पौल आणि बर्णबा यांनी ज्या मंडळ्यांना भेट दिली तिथल्या भाऊबहिणींना त्यांनी प्रोत्साहन दिलं

    • ३यो १-४—आपण ज्यांना आनंदाचा संदेश सांगितला होता ते अजूनही विश्‍वासू आहेत, हे कळल्यावर वृद्ध झालेल्या प्रेषित योहानला खूप प्रोत्साहन मिळालं