मन
बायबलमधून कसं कळतं, की ‘मन’ किंवा ‘हृदय’ हे सहसा आपले विचार, हेतू, गुण आणि भावना यांना सूचित करतं?
स्तो ४९:३; नीत १६:९; लूक ५:२२; प्रेका २:२६
हेसुद्धा पाहा: अनु १५:७; स्तो १९:८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लूक ९:४६-४८—आपल्या प्रेषितांच्या मनात श्रेष्ठ होण्याची भावना आहे हे ओळखून येशूने त्यांना सुधारण्यासाठी सल्ला दिला
-
आपल्या हृदयाचं रक्षण करणं महत्त्वाचं का आहे?
१इत २८:९; नीत ४:२३; यिर्म १७:९
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ६:५-७—माणसांच्या मनातल्या दृष्टपणामुळे हिंसा वाढली होती आणि म्हणून देवाने संपूर्ण पृथ्वीवर जलप्रलय आणला
-
१रा ११:१-१०—शलमोन राजाने आपल्या मनाचं रक्षण केलं नाही. त्याने विदेशी स्त्रियांशी लग्न केलं आणि त्यांनी त्याचं मन यहोवापासून बहकवलं
-
मार्क ७:१८-२३—येशूने म्हटलं, की सगळे दुष्ट विचार माणसाच्या हृदयातून निघतात आणि देवाला घृणा वाटेल अशा गोष्ट करायला त्याला लावू शकतात
-
आपण आपल्या मनाचं रक्षण कसं करू शकतो?
स्तो १९:१४; नीत ३:३-६; लूक २१:३४; फिलि ४:८
हेसुद्धा पाहा: एज ७:८-१०; स्तो ११९:११
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
इफि ६:१४-१८; १थेस ५:८—आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचं वर्णन करताना प्रेषित पौलने म्हटलं, की कवच जसं हृदयाचं संरक्षण करतं अगदी तसंच नीतिमत्त्व, विश्वास आणि प्रेम आपल्या लाक्षणिक हृदयाचं रक्षण करू शकतात
-
आपलं लाक्षणिक हृदय चांगल्या स्थितीत नाही हे आपल्याला कसं समजू शकतं?
हेसुद्धा पाहा: नीत ६:१२-१४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२इत २५:१, २, १७-२७—अमस्या राजा काही काळासाठी यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला, पण पूर्ण मनाने नाही; नंतर मात्र तो गर्विष्ठ आणि अविश्वासू बनला आणि याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागले
-
मत्त ७:१७-२०—येशूने म्हटलं, की कीड लागलेल्या झाडाला जसं खराब फळ येतं. तसंच मनात वाईट विचार असतील, तर आपल्या हातून वाईटच घडेल
-
आपण चांगलं मन का विकसित केलं पाहिजे, आणि आपण ते कसं करू शकतो?
हेसुद्धा पाहा: स्तो ११९:९७, १०४; रोम १२:९-१६; १ती १:५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२रा २०:१-६—हिज्कीया राजा विश्वासू होता आणि त्याने पूर्ण मनाने यहोवाची सेवा केली होती; म्हणून जेव्हा आजारपणामुळे तो मरायला टेकला तेव्हा त्याने मदतीसाठी यहोवाकडे कळकळून विनंती केली
-
मत्त २१:२८-३२—येशूने उदाहरण देऊन समजवलं की माणूस जे बोलतो त्यापेक्षा तो जे करतो, त्यावरून त्याच्या मनाची स्थिती कशी आहे हे कळतं
-
आपल्या मनात काय आहे हे यहोवा पाहू शकतो हे दिलासा देणारं का आहे?
हेसुद्धा पाहा: १शमु २:३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु १६:१-१३—शमुवेल संदेष्ट्याला हे शिकायला मिळालं, की यहोवा बाहेरचं रूप पाहून प्रभावित होत नाही, तर तो माणसाचं हृदय पाहतो
-
२इत ६:२८-३१—शलमोन राजाने यहोवाच्या मंदिराच्या समर्पणाच्या वेळी केलेल्या प्रार्थनेवरून दिसून आलं, की आपल्या मनात काय आहे हे यहोवा खऱ्या अर्थाने ओळखू शकतो. आणि त्याप्रमाणे तो आपल्याशी दयाळूपणे आणि प्रेमळपणे वागतो
-