मानाच्या पदव्या
ख्रिश्चनांनी मोठमोठ्या पदव्या वापरून माणसांचा गौरव करावा का?
उपयोगी बायबल अहवाल:
लूक १८:१८, १९—येशू चांगला असला तरी त्याने “उत्तम गुरू” ही पदवी स्वीकारली नाही. कारण त्याने म्हटलं की यहोवाशिवाय कोणी उत्तम नाही
खरे ख्रिस्ती “पाळक” किंवा “गुरू” अशा धार्मिक पदव्या का वापरत नाहीत?
उपयोगी बायबल अहवाल:
मत्त २३:९-१२—येशूने म्हटलं की आपण “पिता” किंवा “प्रमुख” अशा पदव्या वापरू नयेत
१कर ४:१४-१७—प्रेषित पौल बऱ्याच जणांसाठी वडलांसारखा होता. पण त्यांनी त्याला ‘पाळक पौल,’ ‘फादर पौल’ किंवा यांसारखं दुसरं काही म्हटलेलं बायबलमध्ये सांगितलेलं नाही
ख्रिश्चनांनी एकमेकांना भाऊबहीण म्हणणं आणि एकमेकांशी तसं वागणं का योग्य आहे?
हेसुद्धा पाहा: प्रेका १२:१७; १८:१८; रोम १६:१
उपयोगी बायबल अहवाल:
मत्त १२:४६-५०—येशूने स्पष्ट केलं की यहोवावर विश्वास ठेवणारे त्याचे आध्यात्मिक भाऊबहीण आहेत
ख्रिश्चनांनी सरकारी आणि राजकीय अधिकाऱ्यांसाठी, तसंच न्यायाधीश आणि इतर अधिकाऱ्यांसाठी मानाच्या पदव्या वापरणं योग्य का आहे?
उपयोगी बायबल अहवाल:
प्रेका २६:१, २, २५—प्रेषित पौलने अग्रिप्पा आणि फेस्त या अधिकाऱ्यांशी बोलताना मानाच्या पदव्या वापरल्या