व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लहान मुलं; तरुण

लहान मुलं; तरुण

मुलांबद्दल देवाला काय वाटतं?

लहान मुलं आणि तरुण देवाच्या नजरेत मौल्यवान आहेत हे यहोवा कसं दाखवून देतो?

अनु ६:६, ७; १४:२८, २९; स्तो ११०:३; १२७:३-५; १२८:३, ४; याक १:२७

हेसुद्धा पाहा: ईयो २९:१२; स्तो २७:१०; नीत १७:६

हेसुद्धा पाहा: “कुटुंब

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १:२७, २८—मानवांनी मुलांना जन्म द्यावा आणि पृथ्वी भरून टाकावी हा यहोवाचा मूळ उद्देश होता

    • उत्प ९:१—जलप्रलयानंतर यहोवाने नोहाला आणि त्याच्या मुलांना सांगितलं, की त्यांनी मुलांना जन्म द्यावा आणि पृथ्वी भरून टाकावी

    • उत्प ३३:५—मुलं ही देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे असं विश्‍वासू कुलप्रमुख याकोबने मानलं

    • मार्क १०:१३-१६—आपल्या पित्याप्रमाणेच येशूचंसुद्धा मुलांवर प्रेम आहे

लहान मुलांचं शोषण करणाऱ्‍यांबद्दल आणि त्यांना चुकीची वागणूक देणाऱ्‍यांबद्दल यहोवाला काय वाटतं?

लहान मुलांनी मोठ्यांसारखं वागावं आणि मोठ्यांसारखी कामं करावीत अशी आपण अपेक्षा करू नये, हे बायबलच्या कोणत्या तत्त्वांवरून दिसून येतं?

गण १:३; १कर १३:११

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३३:१२-१४—मुलांना प्रवास करणं जास्त कठीण जाऊ नये म्हणून याकोबने सावकाश प्रवास केला

आज मुलांना जे काही सोसावं लागतं त्यासाठी देव जबाबदार आहे का?

ईयो ३४:१०; याक १:१३; १यो ५:१९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक ५:१८, २०, २३-२५—येशूने समजावून सांगितलं की पापामुळे आपण आजारी पडतो

    • रोम ५:१२—आपण का मरतो याचं कारण प्रेषित पौलने समजावून सांगितलं

लहान-मोठ्या सगळ्यांचीच दुःखं काढून टाकली जातील याबद्दल यहोवा काय अभिवचन देतो?

आईवडिलांनी जर काही गंभीर चुका केल्या असतील, तर पुढे मुलंही त्याच चुका करतील किंवा मुलांना चांगली वागणूक मिळाली नसेल तर त्यांची काहीच किंमत नाही असा याचा अर्थ होतो का?

अनु २४:१६; यहे १८:१-३, १४-१८

हेसुद्धा पाहा: अनु ३०:१५, १६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २रा १८:१-७; २इत २८:१-४—हिज्कीयाचे वडील फार दुष्ट होते; त्यांनी त्यांच्या स्वतःच्या काही मुलांना मारून टाकलं. पण तरी हिज्कीयाने यहोवाच्या आज्ञा पाळल्या आणि तो एक चांगला राजा बनला

    • २रा २१:१९-२६; २२:१, २—योशीयाचे वडील आमोन फार वाईट होते, पण योशीया मात्र खूप चांगला राजा बनला

    • १कर १०:११, १२—प्रेषित पौलने समजावून सांगितलं की आपण इतरांच्या चुकांपासून शिकू शकतो आणि त्या चुका करायचं टाळू शकतो

    • फिलि २:१२, १३—प्रेषित पौलने सांगितलं की आपण जर विश्‍वासू राहिलो तर आपलं तारण होऊ शकतं

लहान मुलं आणि तरुणांच्या जबाबदाऱ्‍या

सत्यात असलेल्या आईवडिलांसोबत राहत असलेल्या लहान मुलांबद्दल यहोवाला कसं वाटतं?

१कर ७:१४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १९:१२, १५—स्वर्गदूतांनी लोटच्या मुलींचं संरक्षण केलं याचं एक कारण म्हणजे, लोट नीतिमान होता

आईवडिलांचं देवासोबत चांगलं नातं आहे तर मुलांचंही देवासोबत आपोआपच एक चांगलं नातं असेल असा याचा अर्थ होतो का?

नीत २०:११; यहे १८:५, १०-१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लेवी १०:१-३, ८, ९—महायाजक अहरोनच्या मुलांनी अतिप्रमाणात दारू प्यायल्यामुळे कदाचित त्यांना मारून टाकण्यात आलं

    • १शमु ८:१-५—शमुवेल नीतिमान संदेष्टा होता, पण त्याची मुलं प्रामाणिक नव्हती

देवाचं मन आनंदित करण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे?

लहान मुलांना सभांना का नेलं पाहिजे?

अनु ३१:१२, १३; इब्री १०:२४, २५

  • उपयोगी बायबल अहवाल:

मुलांनी यहोवाची उपासना का केली पाहिजे?

स्तो ८:२; १४८:१२, १३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १७:४, ८-१०, ४१, ४२, ४५-५१—आपल्या नावाची निंदा करणाऱ्‍या उंच-धिप्पाड गल्याथला मारून टाकण्यासाठी यहोवाने तरुण असलेल्या दावीदचा उपयोग केला

    • २रा ५:१-१५—एका गैर-इस्राएली सेनापतीला आपल्याबद्दल जाणून घेता यावं म्हणून यहोवाने एका लहान इस्राएली मुलीचा उपयोग केला

    • मत्त २१:१५, १६—मसीहा म्हणून आपला आदर करणाऱ्‍या लहान मुलांना येशूने मौल्यवान समजलं

ज्यांचे आईवडील सत्यात नाहीत अशा मुलांबद्दल यहोवाला काय वाटतं?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • गण १६:२५, २६, ३२, ३३—मोशे आणि अहरोनविरुद्ध काही माणसांनी बंड केलं तेव्हा यहोवाने त्यांना आणि त्यांची साथ देणाऱ्‍या त्यांच्या कुटुंबांनाही शिक्षा केली

    • गण २६:१०, ११—कोरहने बंड केल्यामुळे त्याला शिक्षा करण्यात आली; पण त्याची मुलं देवाला विश्‍वासू असल्यामुळे वाचली

मुलांनी चांगले मित्र निवडणं का गरजेचंय?

ख्रिस्ती तरुणांनी कशा प्रकारचे मित्र निवडले पाहिजेत?

२ती २:२२

हेसुद्धा पाहा: “मित्र