वाईट वागणूक
इतर जण आपल्याशी वाईट वागतात तेव्हा आपल्याला कसं वाटू शकतं?
स्तो ६९:२०; नीत १८:१४; उप ४:१-३; मला २:१३-१६; कल ३:२१
उपयोगी बायबल अहवाल:
२शमु १०:१-५—शत्रूंनी दावीद राजाच्या सैन्यातल्या काही माणसांना मारहाण जरी केली नसली, तरी त्यांनी त्यांचा खूप वाईट प्रकारे अपमान केला. अशा वेळी दावीद आपल्या माणसांशी खूप विचारपूर्वक आणि दयेने वागला
२शमु १३:६-१९—अम्नोनने तामारचा बलात्कार केला आणि तिचा अपमान केला तेव्हा ती खूप मोठमोठ्याने रडली आणि तिने आपल्या अंगावरचा खास झगा फाडला
एखाद्याला वाईट वागणूक मिळते तेव्हा यहोवाला संपूर्ण परिस्थिती माहीत असते हे कशावरून कळतं, आणि त्याबद्दल तो काय करेल?
ईयो ३४:२१, २२; स्तो ३७:८, ९; यश २९:१५, १९-२१; रोम १२:१७-२१
हेसुद्धा पाहा: स्तो ६३:६, ७
उपयोगी बायबल अहवाल:
१शमु २५:३, १४-१७, २१, ३२-३८—नाबाल दावीद राजाशी खूप दुष्टपणे वागला आणि असं करून त्याने आपल्या संपूर्ण घराण्याचा जीव धोक्यात घातला. त्यामुळे नंतर यहोवाने नाबालला शिक्षा केली आणि तो मेला
यिर्म २०:१-६, ९, ११-१३—पशहूर याजकाने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि त्याला खोड्यांत अडकवून ठेवलं, तेव्हा सुरुवातीला यिर्मया खूप निराश झाला; पण यहोवाने त्याला धीर दिला आणि त्याला वाचवलं