विवाह
विवाहाची सुरुवात कशी झाली?
एका ख्रिश्चनाने विवाहसोबती म्हणून कोणाला निवडलं पाहिजे?
एका ख्रिश्चनाने यहोवाला सर्मपित नसलेल्या आणि बाप्तिस्मा न घेतलेल्या व्यक्तीशी आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न का लावू नये किंवा त्या गोष्टीला मान्यता असल्याचं का दाखवू नये?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प २४:१-४, ७—वयस्क अब्राहामने ठरवलं होतं की तो आपल्या मुलाचं, इसहाकचं लग्न इतर दैवतांची उपासना करणाऱ्या कनानमधल्या मुलीशी नाही, तर यहोवाची उपासना करणाऱ्या मुलीशी लावून देईल
-
उत्प २८:१-४—इसहाकने आपल्या मुलाला, याकोबला सांगितलं की त्याने कनानी मुलीशी नाही तर यहोवाची उपासना करणाऱ्या मुलीशीच लग्न करावं
-
यहोवाची उपासना न करणाऱ्या व्यक्तीशी एका ख्रिश्चनाने लग्न केलं तर यहोवाला कसं वाटेल?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१रा ११:१-६, ९-११—शलमोन राजाने देवाचं ऐकलं नाही आणि विदेशी स्त्रियांशी लग्न करून आपलं मन भ्रष्ट होऊ दिलं, म्हणून यहोवाला खूप राग आला
-
नहे १३:२३-२७—इस्राएली माणसांनी विदेशी स्त्रियांशी लग्न केलं, तेव्हा यहोवाप्रमाणेच नहेम्यालाही त्यांचा खूप राग आला आणि त्याने त्यांना ताडन देऊन सुधारलं
-
यहोवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्या आणि मंडळीत चांगलं नाव असलेल्या व्यक्तीशी लग्न करणं का सुज्ञपणाचं आहे?
हेसुद्धा पाहा: इफि ५:२८-३१, ३३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु २५:२, ३, १४-१७—नाबाल श्रीमंत असला तरी तो कठोर आणि दुष्ट होता. त्यामुळे तो एक चांगला पती नव्हता असं म्हणता येईल
-
नीत २१:९—आपण जर सुज्ञपणे जोडीदार निवडला नाही, तर पुढे आपण आनंदी राहणार नाही आणि आपली शांती गमावून बसू
-
रोम ७:२—प्रेषित पौलने समजवलं की लग्नानंतर एक स्त्री काही प्रमाणात आपल्या अपरिपूर्ण पतीच्या अधीन असते; त्यामुळे कोणाशी लग्न करायचं हे एक सुज्ञ स्त्री खूप विचार करून ठरवेल
-
विवाहासाठी तयारी
एका ख्रिस्ती भावाने लग्नाआधीच आपल्या बायको-मुलांना तो कसं सांभाळेल याचा विचार का केला पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नीत २४:२७—लग्नाआधी आणि मुलं होण्याआधीच एका ख्रिस्ती भावाने मेहनतीने काम केलं पाहिजे, त्यामुळे पुढे त्याला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करता येईल
-
लग्नाआधी भेटीगाठी करणाऱ्या मुलामुलीने इतरांचा सल्ला का घेतला पाहिजे, आणि फक्त रंगरूप पाहण्याऐवजी एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न का केला पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
रूथ २:४-७, १०-१२—रूथ किती मेहनती आहे, नामीशी कसं वागते आणि यहोवावर तिचं किती प्रेम आहे हे बवाजने पाहिलं. तसंच त्याने भरवशालायक लोकांकडून तिच्याबद्दल चांगल्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्याला कळलं की ती किती चांगली स्त्री आहे
-
रूथ २:८, ९, २०—बवाज किती दयाळू आणि उदार आहे, तसंच त्याचं यहोवावर किती प्रेम आहे हे रूथने पाहिलं
-
लग्नाआधी एकमेकांना भेटताना आणि लग्न ठरल्यानंतरही (एन्गेजमेंटनंतरही) मुलामुलीने नैतिक रित्या शुद्ध का राहिलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नीत ५:१८, १९—फक्त लग्न झालेली जोडपीच शारीरिक रितीने त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करू शकतात
-
गीत १:२; २:६—मेंढपाळ आणि शुलेमची मुलगी यांनी एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त केल्या आणि आपलं आचरण शुद्ध ठेवलं
-
गीत ४:१२; ८:८-१०—शुलेमच्या मुलीने आत्मसंयम दाखवून आपलं आचरण शुद्ध ठेवलं; ती जणू काही एका बंदिस्त बागेसारखी होती
-
एका जोडप्याने कायदेशीर पद्धतीने लग्न करणं का महत्त्वाचंय?
पतीची भूमिका
यहोवा पतीकडून काय अपेक्षा करतो?
ख्रिस्ती पतीने मस्तकपदाच्या बाबतीत कोणाचं अनुकरण केलं पाहिजे?
पतीने आपल्या पत्नीशी प्रेमाने वागणं आणि तिच्या भावना व गरजा समजून घेणं का महत्त्वाचंय?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प २१:८-१२—साराने सुचवलेली गोष्ट अब्राहामला आवडली नसली तरी यहोवाने त्याला तिचं ऐकायला सांगितलं
-
नीत ३१:१०, ११, १६, २८—एक सुज्ञ पती आपल्या सद्गुणी पत्नीवर हुकूमशाही करत नाही किंवा तिच्या चुका काढत नाही, तर तो तिच्यावर भरवसा ठेवतो आणि तिची प्रशंसा करतो
-
इफि ५:३३—प्रेषित पौलने सांगितलं की पत्नीची एक खास गरज असते, ती म्हणजे आपल्या पतीचं आपल्यावर प्रेम आहे हे तिला जाणवलं पाहिजे
-
पत्नीची भूमिका
यहोवा पत्नीकडून काय अपेक्षा करतो?
पत्नीची भूमिका कमी महत्त्वाची आहे का?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नीत १:८; १कर ७:४—देवाने पत्नीला आणि आईला कुटुंबामध्ये काही प्रमाणात अधिकार दिलाय
-
१कर ११:३—प्रेषित पौलने सांगितलं की सर्वशक्तिशाली देवाला सोडून, प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या मस्तकपदाच्या अधिकाराखाली आहे
-
इब्री १३:७, १७—भाऊ असो किंवा बहीण, मंडळीतल्या सगळ्यांनीच नेतृत्व करणाऱ्यांच्या अधीन राहिलं पाहिजे आणि त्यांचं ऐकलं पाहिजे
-
एखाद्या ख्रिस्ती पत्नीचा पती सत्यात नसला तरी ती यहोवाला कसं आनंदित करू शकते?
ख्रिस्ती पत्नीने आपल्या पतीचा आदर का केला पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प १८:१२; १पेत्र ३:५, ६—साराला आपल्या पतीबद्दल गाढ आदर होता आणि ती त्याला अगदी मनातसुद्धा “प्रभू” मानायची
-
बायबलमध्ये कोणत्या प्रकारच्या पत्नीची प्रशंसा केली आहे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प २४:६२-६७—आपल्या आईच्या मृत्यूमुळे इसहाक खूप दुःखी होता, तेव्हा रिबकाने त्याचं सांत्वन केलं
-
१शमु २५:१४-२४, ३२-३८—अबीगईलने नम्रपणे दावीदला दयेची विनंती करून आपल्या मूर्ख पतीला आणि संपूर्ण घराण्याला मृत्यूच्या संकटापासून वाचवलं
-
एस्ते ४:६-१७; ५:१-८; ७:१-६; ८:३-६—देवाच्या लोकांना वाचवण्यासाठी एस्तेर आपला जीव धोक्यात घालून, तिला बोलवलं नसतानाही दोनदा आपल्या पतीसमोर गेली
-
समस्या सोडवणं
विवाहात समस्या येतात तेव्हा बायबलची कोणती तत्त्वं एका जोडप्याला त्या सोडवायला मदत करू शकतात?
पैशाबद्दल चांगले निर्णय घेण्यासाठी बायबलची कोणती तत्त्वं एका जोडप्याला मदत करू शकतात?
लूक १२:१५; फिलि ४:५; १ती ६:९, १०; इब्री १३:५
हेसुद्धा पाहा: “पैसा”
नातेवाईक आणि सासरचे लोक यांच्यासोबतच्या समस्या सोडवायला बायबलची कोणती तत्त्वं एका जोडप्याला मदत करू शकतात?
लैंगिक संबंध ठेवण्याबद्दल एका विवाहित जोडप्याला बायबलची कोणती तत्त्वं मदत करू शकतात?
आपल्या जोडीदाराच्या कमतरांवर लक्ष देण्याऐवजी त्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष देणं का महत्त्वाचंय?
समस्या निर्माण झाल्यावर चिडण्याऐवजी किंवा मनात राग धरून ठेवण्याऐवजी, त्या प्रेमाने आणि लगेच सोडवणं का चांगलंय?
रागाने भडकणं, ओरडणं, शिवीगाळ करणं आणि हात उचलणं अशा कोणत्याच गोष्टी ख्रिश्चनांनी कधीच का करू नये?
मतभेद सोडवताना पतीपत्नीचा उद्देश काय असला पाहिजे?
विवाहात यहोवाला सगळ्यात जास्त महत्त्व असेल तर पतीपत्नीला कोणते आशीर्वाद मिळतील?
विवाहासाठी असलेले स्तर
लैंगिक संबंध आणि विवाह यांबद्दल यहोवाचे स्तर काय आहेत?
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचे एकाच वेळी बरेच जोडीदार असावेत का?
लग्न हे फक्त एका स्त्री आणि पुरुषामध्येच झालं पाहिजे हे कसं कळतं?
विवाहित जोडप्याने एकत्र का राहिलं पाहिजे?
शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे कोणत्या एकाच आधारावर एका ख्रिस्ती व्यक्तीचा घटस्फोट होऊ शकतो?
योग्य आधाराशिवाय घेतलेल्या घटस्फोटाबद्दल यहोवाला कसं वाटतं?
पतीचा किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यावर तिचा जोडीदार पुन्हा लग्न करू शकतो का?