समर्पण
यहोवाला आपलं जीवन समर्पण करण्यामागचा आपला हेतू काय असला पाहिजे?
अनु ६:५; लूक १०:२५-२८; प्रक ४:११
हेसुद्धा पाहा: निर्ग २०:५
देवाची सेवा करायची असेल तर बायबलबद्दल आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?
स्तो ११९:१०५; १थेस २:१३; २ती ३:१६
हेसुद्धा पाहा: योह १७:१७; इब्री ४:१२
पापापासून मुक्त होण्यासाठी देवाने कोणती व्यवस्था केली आहे? आणि ती प्रत्येकासाठी महत्त्वाची का आहे?
आधी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल पश्चात्ताप करण्यात काय सामील आहे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लूक १९:१-१०—लोकांना लुबाडणारा प्रमुख जकातदार, जक्कय याने पश्चात्ताप केला आणि लुबाडलेले पैसे परत केले
-
१ती १:१२-१६—प्रेषित पौलने सांगितलं की त्याने देवाच्या नरजेत चुकीच्या गोष्टी करायचं सोडून दिलं, आणि देवाच्या व ख्रिस्ताच्या दयेमुळे त्याला क्षमा मिळाली
-
चुकीचं वागणं सोडून देण्यासोबतच आपण आणखी काय केलं पाहिजे?
यहोवाला आवडेल अशा पद्धतीने त्याची सेवा करण्यासाठी आपण कोणत्या नैतिक स्तरांचं पालन केलं पाहिजे?
१कर ६:९-११; कल ३:५-९; १पेत्र १:१४, १५; ४:३, ४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१कर ५:१-१३—प्रेषित पौलने करिंथ मंडळीतल्या घोर अनैतिक काम करणाऱ्या एका माणसाला मंडळीतून काढून टाकण्याचा सल्ला दिला
-
२ती २:१६-१९—प्रेषित पौलने तीमथ्यला धर्मत्यागी लोकांच्या शिकवणींपासून दूर राहायला सांगितलं, कारण त्यांची शिकवण शरीराला सडवत जाणाऱ्या जखमेप्रमाणे पसरत होती
-
जगातल्या घडामोडींच्या बाबतीत यहोवाच्या सेवकांची भूमिका काय असली पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
योह ६:१०-१५—येशूने चमत्कार करून हजारो लोकांना जेवू घातलं. त्यानंतर लोकांनी त्याला राजा बनवायचा प्रयत्न केला, पण तो तिथून निघून गेला
-
योह १८:३३-३६—येशूने सांगितलं की त्याच्या राज्याचा या जगाच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही
-
पवित्र शक्ती आपल्याला देवाची सेवा करायला कशी मदत करते?
हेसुद्धा पाहा: प्रेका २०:२८; इफि ५:१८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका १५:२८, २९—सुंतेबद्दलचा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी पवित्र शक्तीने यरुशलेममधल्या नियमन मंडळाला मार्गदर्शन दिलं
-
येशूने ज्या प्रकारे देवाची सेवा केली त्याचं आपण अनुकरण कसं करू शकतो?
समर्पण केलेल्या ख्रिश्चनांनी बाप्तिस्मा का घेतला पाहिजे?
मत्त २८:१९, २०; प्रेका २:४०, ४१; ८:१२; १पेत्र ३:२१
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त ३:१३-१७—येशू त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला आणि ही गोष्ट त्याने बाप्तिस्मा घेऊन जाहीर केली
-
प्रेका ८:२६-३९—यहोवाची उपासना करणाऱ्या इथियोपियाच्या एका अधिकाऱ्याने येशूबद्दलचा आनंदाचा संदेश ऐकला तेव्हा त्याने बाप्तिस्मा घ्यायची इच्छा व्यक्त केली
-