सरकारं
खरे ख्रिस्ती कोणत्या सरकारला एकनिष्ठ राहतात आणि त्याला पूर्ण पाठिंबा देतात?
हेसुद्धा पाहा: दान ७:१३, १४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
स्तो ८९:१८-२९—इथे मसीही राज्याच्या राजाचं वर्णन करण्यात आलंय, आणि यहोवा त्याला संपूर्ण पृथ्वीवर राजा नेमतो
-
प्रक १२:७-१२—शेवटच्या दिवसांच्या सुरुवातीला येशूने देवाच्या राज्याचा राजा म्हणून शासन सुरू केलं आणि सैतानाला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं
-
देवाच्या राज्यात अभिषिक्त ख्रिश्चनांची काय भूमिका आहे?
खरे ख्रिस्ती मानवी अधिकाऱ्यांचा आदर करतात
आपण सरकारचे नियम का पाळतो आणि कर का भरतो?
रोम १३:१-७; तीत ३:१; १पेत्र २:१३, १४
हेसुद्धा पाहा: प्रेका २५:८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त २२:१५-२२—आपल्या शिष्यांनी कर भरावा की नाही, या प्रश्नाचं येशूने खूप सुज्ञपणे उत्तर दिलं
-
आपला छळ केला जातो तेव्हासुद्धा आपण बदला का घेत नाही?
हेसुद्धा पाहा: “छळ”
ख्रिस्ती निष्पक्ष राहतात
आपण सरकारी अधिकाऱ्यांचा आदर करतो. पण जर त्यांनी आपल्याला यहोवाची आज्ञा मोडायला लावली, तर मात्र आपण त्यांचं का ऐकत नाही?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
दान ३:१, ४-१८—तीन इब्री तरुणांनी बाबेलच्या राजाच्या एका आज्ञेचं पालन केलं नाही, कारण त्यामुळे देवाच्या नियमाचं उल्लंघन होणार होतं
-
दान ६:६-१०—सरकारने जेव्हा राजाला सोडून इतर कोणालाही प्रार्थना करायची बंदी घातली, तेव्हा दानीएलने त्या नियमाचं पालन केलं नाही
-
ख्रिश्चनांनी राजकारणात भाग घेऊ नये हे येशूने कसं दाखवलं?
मूर्तिपूजेबद्दल असलेल्या देवाच्या नियमावर विचार केल्यामुळे ख्रिश्चनांना निष्पक्ष राहायला कशी मदत होऊ शकते?
सरकारने ख्रिश्चनांना युद्धात भाग घ्यायचा किंवा त्याला पाठिंबा द्यायचा आदेश दिला, तर अशा वेळी योग्य निर्णय घ्यायला कोणत्या बायबल तत्त्वांमुळे ख्रिश्चनांना मदत होईल?
हेसुद्धा पाहा: स्तो ११:५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त २६:५०-५२—येशूने स्पष्ट केलं की त्याचे शिष्य युद्धात भाग घेणार नाहीत
-
योह १३:३४, ३५—आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी जर युद्धात भाग घेतला आणि दुसऱ्या देशातल्या लोकांना, अगदी तिथल्या साक्षीदारांनाही मारलं, तर येशूने दिलेल्या या आज्ञेचं मी पालन करत असेन का?’
-
खरे ख्रिस्ती सरकारविरुद्ध होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाग का घेत नाहीत?
ख्रिश्चनांवर सरकारच्या विरोधात काम करण्याचा किंवा देशातली शांती भंग करण्याचा खोटा आरोप लावला जातो, तेव्हा त्यांना आश्चर्य का वाटत नाही?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका १६:१९-२३—प्रचारकार्य केल्यामुळे प्रेषित पौल आणि सीला यांना खूप काही सहन करावं लागलं
-