व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सल्ला

सल्ला

सल्ला मिळणं

आपण बायबलमधून सल्ला का मिळवला पाहिजे?

आपण केलेल्या चुकीसाठी कारणं देण्यापेक्षा सल्ला ऐकलेला का बरा?

नीत १२:१५; २९:१

हेसुद्धा पाहा: नीत १:२३-३१; १५:३१

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १५:३, ९-२३—शमुवेलने शौल राजाची चूक सुधारली तेव्हा शौलने कारणं दिली आणि सल्ला स्वीकारला नाही; त्यामुळे यहोवाने त्याला नाकारलं

    • २इत २५:१४-१६, २७—अमस्या राजाने केलेलं पाप सुधारण्यासाठी यहोवाच्या संदेष्ट्याने त्याला सल्ला दिला, तेव्हा राजाने तो ऐकला नाही; त्यामुळे तो यहोवाची मर्जी गमावून बसला आणि यहोवाने त्याचं संरक्षण केलं नाही

नेतृत्व करणारे आपल्याला सल्ला देतात तेव्हा आपण त्यांचा आदर का केला पाहिजे?

१थेस ५:१२; १ती ५:१७; इब्री १३:७, १७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ३यो ९, १०—मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांशी दियत्रफेस आदराने वागत नसल्यामुळे, वयस्क प्रेषित योहानने त्याचं ते वागणं किती चुकीचंय हे स्पष्टपणे सांगितलं

आपण वयस्कर लोकांचं का ऐकलं पाहिजे?

लेवी १९:३२; नीत १६:३१

हेसुद्धा पाहा: ईयो १२:१२; ३२:७; तीत २:३-५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु २३:१६-१८—दावीद राजाने आपल्यापेक्षा जवळपास ३० वर्षांनी मोठ्या असलेल्या योनाथानचा सल्ला ऐकला आणि त्यामुळे त्याला खूप धीर मिळाला

    • १रा १२:१-१७—रहबाम राजाने वडीलधाऱ्‍यांनी दिलेला चांगला सल्ला सोडून, तरुण सेवकांचा कठोर सल्ला ऐकल्यामुळे त्याला भयंकर परिणामांना तोंड द्यावं लागलं

विश्‍वासू बहिणी आणि यहोवाचे तरुण सेवकही मौल्यवान सल्ला देऊ शकतात हे कशावरून कळतं?

ईयो ३२:६, ९, १०; नीत ३१:१, १०, २६; उप ४:१३

हेसुद्धा पाहा: स्तो ११९:१००

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु २५:१४-३५—अबीगईलने दावीदला सल्ला दिल्यामुळे बऱ्‍याच जणांचा जीव वाचला आणि त्याच्यावर रक्‍तदोष लागला नाही

    • २शमु २०:१५-२२—आबेल शहरातल्या एका सुज्ञ स्त्रीच्या सल्ल्यामुळे संपूर्ण शहर वाचलं

    • २रा ५:१-१४—एका पराक्रमी योद्ध्याचा कुष्ठरोग कसा बरा होऊ शकतो, हे एका लहान इस्राएली मुलीने त्याला सांगितलं

यहोवाचा आणि त्याच्या वचनाचा अनादर करणाऱ्‍या लोकांचं आपण का ऐकू नये?

स्तो १:१; नीत ४:१४

हेसुद्धा पाहा: लूक ६:३९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १इत १०:१३, १४—शौल राजाने यहोवाचा सल्ला घेण्याऐवजी, भूतविद्या करणाऱ्‍या स्त्रीचा सल्ला घेऊन अविश्‍वासूपणा दाखवला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला

    • २इत २२:२-५,—अहज्या राजाने चुकीचे सल्लागार निवडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला

    • ईयो २१:७, १४-१६—ईयोबने यहोवाचा अनादर करणाऱ्‍या लोकांसारखा विचार करायचं टाळलं

सल्ला देणं

सल्ला देण्याआधी लक्ष देऊन ऐकणं, परिस्थिती पूर्णपणे माहीत करून घेणं आणि दोन्ही बाजूच्या लोकांचं मत जाणून घेणं का महत्त्वाचंय?

नीत १८:१३, १७

हेसुद्धा पाहा: नीत २५:८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १:९-१६—महायाजक एलीने हन्‍नाची संपूर्ण परिस्थिती समजून घेण्याआधीच असा अंदाज बांधला, की ती दारूच्या नशेत आहे आणि तिला कठोर शब्दांत सल्ला दिला

    • मत्त १६:२१-२३—प्रेषित पेत्रला सगळी माहिती नसल्यामुळे, त्याने यहोवाऐवजी सैतानाला जी गोष्ट हवी होती ती येशूला करायला सांगितली

सल्ला देण्याआधी आपण यहोवाकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना का केली पाहिजे?

स्तो ३२:८; ७३:२३, २४; नीत ३:५, ६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • निर्ग ३:१३-१८—इस्राएली लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरं चांगल्या प्रकारे कशी देता येतील यासाठी मोशे संदेष्ट्याने यहोवाकडे मदत मागितली

    • १रा ३:५-१२—तरुण राजा शलमोनने स्वतःवर भरवसा ठेवण्याऐवजी यहोवाकडे बुद्धी मागितली, म्हणून यहोवाने त्याला आशीर्वाद दिले

आपण नेहमी बायबलमधूनच सल्ला का दिला पाहिजे?

स्तो ११९:२४, १०५; नीत १९:२१; २ती ३:१६, १७

हेसुद्धा पाहा: अनु १७:१८-२०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त ४:१-११—सैतानाने आणलेल्या परीक्षांना तोंड देताना येशू स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला नाही, तर त्याने देवाच्या वचनातून सैतानाला उत्तर दिलं

    • योह १२:४९, ५०—यहोवाने शिकवलेल्या गोष्टीच येशूने लोकांना शिकवल्या; आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे

आपण सल्ला देताना तो सौम्यपणे देण्याचा आणि शक्य असेल तेव्हा समोरच्याचं मनापासून कौतुक करायचा प्रयत्न का केला पाहिजे?

गल ६:१; कल ३:१२

हेसुद्धा पाहा: यश ९:६; ४२:१-३; मत्त ११:२८, २९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत १९:२, ३—यहोवाने यहोशाफाट राजाला एका संदेष्ट्याद्वारे सुधारलं, पण त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्याचं कौतुकही केलं

    • प्रक २:१-४, ८, ९, १२-१४, १८-२०—येशूने बऱ्‍याच मंडळ्यांना सल्ला देण्याआधी त्यांची प्रशंसा केली

एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती तक्रार करते की एक भाऊ किंवा बहीण तिच्याशी चुकीचं वागली, (जसं की, तिला फसवलंय किंवा तिला बदनाम केलंय) तेव्हा आपण त्या ख्रिस्ती व्यक्‍तीला त्या भावाशी किंवा बहिणीशी एकट्यात बोलायचं प्रोत्साहन का दिलं पाहिजे?

आपल्याला वाईट वागणूक मिळालीये असं एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला वाटतं तेव्हा आपण तिला दयाळूपणे वागायचं, धीर धरायचं आणि क्षमा करायचं प्रोत्साहन कसं देऊ शकतो?

मत्त १८:२१, २२; मार्क ११:२५; लूक ६:३६; इफि ४:३२; कल ३:१३

हेसुद्धा पाहा: मत्त ६:१४; १कर ६:१-८; १पेत्र ३:८, ९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त १८:२३-३५—इतरांना क्षमा करणं का इतकं महत्त्वाचंय हे समजवण्यासाठी येशूने एक जबरदस्त उदाहरण दिलं

सल्ला देताना आपण यहोवाच्या स्तरांशी जडून राहणं का गरजेचंय?

स्तो १४१:५; नीत १७:१०; २कर ७:८-११

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १५:२३-२९—शमुवेल संदेष्ट्याने न घाबरता शौल राजाला सल्ला दिला

    • १रा २२:१९-२८—मीखाया संदेष्ट्याने अहाब राजाला कडक शब्दांत सल्ला दिल्यावर राजाने त्याला धमकावलं आणि तो त्याच्याशी क्रूरपणे वागला. पण मीखायाने घाबरून आपल्या संदेशात फेरबदल केला नाही

एखादा यहोवापासून दूर जाणार नाही अशा प्रकारे आपण त्याला सल्ला कसा देऊ शकतो?

इब्री १२:११-१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक २२:३१-३४—प्रेषित पेत्रने गंभीर चुका केल्या असल्या तरी तो त्या सुधारेल आणि इतरांना यहोवाची सेवा करायला मदत करेल असा भरवसा येशूला होता

    • फिले २१—प्रेषित पौलला खातरी होती की फिलेमोन देवाच्या इच्छेप्रमाणे दिलेल्या सल्ल्यानुसार वागेल

निराश झालेल्यांना किंवा चिंतेत असलेल्यांना आपण प्रेमळपणे सल्ला कसा देऊ शकतो?

पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करायची आणि यहोवासोबत तिचं नातं पुन्हा मजबूत करायची आपली इच्छा आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

आपण सल्ला देताना समोरच्याशी आदराने कसं वागू शकतो; मग तो भाऊ असो किंवा बहीण, लहान असो किंवा मोठा?

बायबलचा सल्ला वारंवार सांगूनही एखादा ऐकत नसेल तर वडिलांनी त्याला कडक शब्दांत सल्ला का दिला पाहिजे?