व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सामाजिक असमानता

सामाजिक असमानता

देव एखाद्याला त्याचा वंश, जात, कूळ आणि पैसा यांच्या आधारावर श्रेष्ठ समजतो का?

प्रेका १७:२६, २७; रोम ३:२३-२७; गल २:६; ३:२८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योह ८:३१-४०—आपण अब्राहामचे वंशज आहोत या गोष्टीचा काही यहुद्यांना फार गर्व होता. पण ते अब्राहामसारखं मुळीच वागत नसल्यामुळे येशूने त्यांना सुधारलं

आपण इतर वंशाच्या, जातीच्या आणि देशाच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा विचार करणं योग्य आहे का?

योह ३:१६; रोम २:११

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योन ४:१-११—निनवेचे लोक विदेशी होते. पण तरीसुद्धा यहोवाने खूप धीराने योना संदेष्ट्याला त्यांना दया दाखवायला शिकवलं

    • प्रेका १०:१-८, २४-२९, ३४, ३५—यहोवाने प्रेषित पेत्रला शिकवलं की त्याने विदेश्‍यांना अशुद्ध समजू नये. यामुळे पेत्रने कर्नेल्य आणि त्याच्या घराण्याला सुंता न झालेले, पहिले विदेशी ख्रिस्ती बनायला मदत केली

एखादा ख्रिस्ती श्रीमंत असेल तर त्याने स्वतःला श्रेष्ठ समजावं का? किंवा इतरांनी आपल्याला खास वागणूक द्यावी अशी अपेक्षा करावी का?

एखाद्याकडे जबाबदारी असेल तर तो कोणीतरी विशेष आहे आणि इतरांशी कसंही वागू शकतो असा त्याचा अर्थ होतो का?

२कर १:२४; १पेत्र ५:२, ३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • अनु १७:१८-२०—यहोवाने इस्राएली राजांना चेतावणी दिली होती, की त्यांनी स्वतःला इस्राएली लोकांपेक्षा वरचढ समजू नये. कारण ते त्यांचे भाऊबंदच होते

    • मार्क १०:३५-४५—येशूने त्याच्या प्रेषितांना सुधारलं, कारण त्यांना अधिकाराच्या पदाची खूप हाव होती. (हेसुद्धा पाहा: हिंदी नयी दुनिया अनुवाद  यात मार्क १०:४२ साठी असलेली, “लोगों पर हुक्म चलाते हैं” अध्ययन नोट पाहा)

देवाला कोणत्या प्रकारची व्यक्‍ती आवडते?

सरकारच्या एखाद्या कायद्यामुळे लोकांवर अन्याय होतोय असं वाटत असेल, तर ख्रिश्‍चनांनी सामाजिक चळवळींमध्ये भाग घेऊन ते बदलायचा प्रयत्न केला पाहिजे का?

इफि ६:५-९; १ती ६:१, २

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योह ६:१४, १५—बऱ्‍याच लोकांना वाटत होतं, की येशूने पुढाकार घेऊन आपल्या राष्ट्राच्या समस्या सोडवाव्यात. पण येशूने त्यांचा राजा व्हायला नकार दिला