व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“त्यांनी दखल घेतली नाही”

“त्यांनी दखल घेतली नाही”

“त्यांनी दखल घेतली नाही”

इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष केल्याने संकट ओढवू शकते.

ऑस्ट्रेलियातील डार्विन शहरात, १९७४ साली, सणांची जोरदार तयार चालली असताना अचानक चक्रीवादळाच्या सूचना देणारे भोंगे वाजू लागले. परंतु, जवळजवळ ३० वर्षांमध्ये डार्विनमध्ये चक्रीवादळामुळे हानी झाली नव्हती. मग आता चिंता करायची काय गरज होती? जेव्हा जोरदार वाऱ्‍याने घरांची छप्परे हवेत उडू लागली आणि ज्या घरांत लोक सुरक्षेसाठी जमले होते त्या घरांच्या भिंती कोलमडून पडू लागल्या तेव्हा लोकांना धोक्याच्या सूचनांचे गांभीर्य जाणवू लागले. परंतु, दुसऱ्‍या दिवशी सकाळपर्यंत चक्रीवादळाने संपूर्ण शहर उद्ध्‌वस्त झाले होते.

नोव्हेंबर १९८५ मध्ये, कोलंबियात एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आरमेरोच्या शहरातील २०,००० पेक्षा अधिक लोक, हिम व बर्फ वितळून तयार झालेल्या चिखलाच्या नदीत जिवंत गाडले गेले. या लोकांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती का? ज्याचा उद्रेक झाला त्या पर्वताला कित्येक महिन्यांपर्यंत हादरे बसत होते. परंतु, ज्वालामुखीशेजारी राहण्याची सवय झालेल्या आरमेरोतील बहुतेक लोकांनी याकडे दुर्लक्ष केले. पर्वताचा लवकरच उद्रेक होणार आहे अशा धोक्याच्या सूचना अधिकाऱ्‍यांना मिळाल्या होत्या पण त्यांनी जनतेला याचा इशारा दिला नाही. उलट, लोकांना घाबरण्याचे काही कारण नाही असे आश्‍वासन रेडिओवरून दिले जात होते. चर्चच्या लाऊडस्पीकरवरून लोकांना शांत राहण्यास आर्जवण्यात येऊ लागले. आणि एके दिवशी संध्याकाळी दोन भयंकर स्फोट झाले. तुम्ही तेथे असता तर तुम्ही तुमची मालमत्ता सोडून पळाला असता का? खूप कमी लोकांनी असे केले; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

बहुतेकदा भूवैज्ञानिक, भूकंप कोठे होणार आहेत याचे बऱ्‍याचप्रमाणात अचूक भाकीत करतात. परंतु तो नक्की केव्हा होईल हे त्यांना फार कमी वेळा सांगता येते. संपूर्ण जगभरात १९९९ साली आलेल्या भूकंपांमुळे सुमारे २०,००० लोक मृत्युमूखी पडले. मरण पावलेल्या पुष्कळ लोकांना वाटत होते, की आपल्यावर भूकंपाचा परिणाम होणार नाही.

स्वतः देवाकडून येणाऱ्‍या इशाऱ्‍यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता?

शेवटल्या दिवसांची ओळख करून देणाऱ्‍या घटनांचे सचित्र वर्णन बायबलमध्ये फार पूर्वी देण्यात आले आहे. या वर्णनाच्या संबंधाने ते आपल्याला ‘नोहाच्या दिवसांची’ दखल घेण्यास आर्जवते. ‘जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांतील’ लोकांना, वाढलेल्या हिंसाचाराची काळजी होती यात काही संशय नसला तरी, ते दररोजच्या जीवनात पार गढून गेले होते. आपला सेवक नोहा याच्याद्वारे देवाने त्यांना इशारा दिला तरी “त्यांनी दखल घेतली नाही आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून घेऊन गेला.” (मत्तय २४:३७-३९, NW) तुम्ही त्यांच्या जागी असता तर तुम्ही इशाऱ्‍याकडे लक्ष दिले असते का? आता तुम्ही लक्ष देत आहात का?

तुम्ही, अब्राहामाचा पुतण्या लोट याच्या दिवसांत मृत समुद्राजवळील सदोम येथे राहणारे असता तर? सदोमच्या आसपासचा भाग परादीससारखा होता. हे समृद्ध शहर होते. इथल्या लोकांना कसली काळजी नव्हती. लोटाच्या दिवसांतील लोक “खातपीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधीत होते.” या समाजाचे लोक अतिशय अनैतिक चालीचे होते. लोटाने जेव्हा लोकांच्या वाईट चालींचा निषेध करून त्यांना इशारा दिला तेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष दिले असते का? देवाने सदोमचा नाश करण्याचे ठरवले आहे असे जेव्हा त्याने तुम्हाला सांगितले असते तेव्हा तुम्ही ऐकले असते का? की तुम्ही देखील लोटाच्या भावी जावयांप्रमाणे त्याची थट्टा केली असती? तुम्ही कदाचित पळून जाण्यासाठी निघाला देखील असता परंतु मग लोटाच्या बायकोप्रमाणे मागे वळाला असता का? लोकांनी लोटाच्या इशाऱ्‍याची दखल घेतली नाही पण ज्या दिवशी लोटाने सदोमच्या बाहेर पाय ठेवला त्या दिवशी “आकाशातून अग्नि व गंधक ह्‍यांची वृष्टि होऊन सर्वांचा नाश झाला.”—लूक १७:२८, २९.

आपल्या दिवसांतील बहुतेक लोक इशाऱ्‍याची दखल घेत नाहीत. पण, आपल्याला ताकीद देण्यासाठी, जागृत राहण्याचे उत्तेजन देण्यासाठी ही उदाहरणे देवाच्या वचनात लिहून ठेवण्यात आली आहेत!

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

जलप्रलय खरोखरच आला होता का?

नाही, असे पुष्कळ टीकाकार म्हणतात. पण बायबल म्हणते, की एक जलप्रलय आला होता.

स्वतः येशू ख्रिस्त त्याविषयी बोलला होता आणि प्रलय होत असताना तो जिवंत होता अर्थात स्वर्गातून पाहत होता.

[२३ पानांवरील चौकट/चित्र]

सदोम व गमोराचा खरोखरच नाश करण्यात आला होता का?

पुरातत्त्वशास्त्र याचा पुरावा देते.

लौकिक इतिहासातही त्याचा उल्लेख आहे.

येशूने या घटनेचा उल्लेख केला आणि नाशाच्या वेळी काय घडले त्याचा बायबलच्या १४ वेगवेगळ्या पुस्तकांत उल्लेख आहे.