व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने वचन दिलेले नवे जग

देवाने वचन दिलेले नवे जग

देवाने वचन दिलेले नवे जग

बायबल, देवाचे लिखित वचन आपल्याला आशा देऊन म्हणते: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”—२ पेत्र ३:१३.

“नवे आकाश” काय आहे? बायबल, आकाशाची तुलना शासनाशी करते. (प्रेषितांची कृत्ये ७:४९) “नवे आकाश” एक नवे सरकार आहे जे पृथ्वीवर राज्य करेल. याला नवे म्हटले आहे कारण ते सध्याच्या शासन व्यवस्थेला काढून टाकणार आहे; शिवाय, ते देवाचा उद्देश पूर्ण होण्यातील एक नवे पाऊल आहे. येशूने ज्यासाठी प्रार्थना करावयास शिकवले होते ते हेच राज्य आहे. (मत्तय ६:१०) देवाने या राज्याची सुरवात केली असल्यामुळे व तो स्वर्गात वस्ती करत असल्यामुळे या राज्याला ‘स्वर्गाचे राज्य’ म्हटले आहे.—मत्तय ७:२१.

“नवी पृथ्वी” काय आहे? हा नवीन पृथ्वी ग्रह नाही कारण, पृथ्वीवर नेहमी लोकवस्ती असेल असे बायबलमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. “नवी पृथ्वी” एक नवा मानवी समाज आहे. नवा समाज यासाठी कारण सर्व दुष्टांचा नाश केला जाईल. (नीतिसूत्रे २:२१, २२) जे जिवंत राहतील ते निर्माणकर्त्याचा आदर करतील, त्याच्या आज्ञेत राहतील आणि त्याच्या अपेक्षांनुसार जीवन व्यतीत करतील. (स्तोत्र २२:२७) सर्व राष्ट्रांतील लोकांना या अपेक्षांविषयी शिकण्याचे व आपले जीवन त्या अपेक्षांच्या सामंजस्यात आणण्याचे आज आमंत्रण दिले जात आहे. तुम्ही हे करत आहात का?

देवाच्या नव्या जगात, सर्व जण त्याच्या शासनाचा आदर करतील. देवाबद्दलचे प्रेम तुम्हाला त्याच्या आज्ञा पाळण्यास प्रवृत्त करते का? (१ योहान ५:३) घरात असताना, कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत तुम्ही ज्याप्रकारे जीवन व्यतीत करता त्यावरून हे दिसून येते का?

त्या नव्या जगात, सर्व मानव ऐक्याने खऱ्‍या देवाची उपासना करतील. तुम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याची उपासना करत आहात का? तुमची उपासना, सर्व राष्ट्रांतील, जातींतील, भाषांतील तुमच्या सहउपासकांमध्ये ऐक्य आणते का?—स्तोत्र ८६:९, १०; यशया २:२-४; सफन्या ३:९.

[१७ पानांवरील चौकट]

या गोष्टींचे वचन देणारा देव

तो स्वर्ग आणि पृथ्वीग्रहाचा निर्माणकर्ता आहे. त्याचीच ओळख येशू ख्रिस्ताने “एकच खरा देव” अशी करून दिली.—योहान १७:३.

बहुतांश लोक, त्यांनी स्वतः बनवलेल्या देवतांची पूजा करतात. लाखो लोक निर्जीव मूर्तींपुढे माथा टेकतात. इतर जण मानवी संस्थांना, भौतिक तत्त्वज्ञानाला किंवा स्वतःच्या इच्छांना देवाचे स्थान देतात. बायबलचा वापर करण्याचा दावा करणारे देखील, बायबल ज्याची ओळख “सत्य देव” अशी करून देते त्याच्या नावाचा आदर करत नाहीत.—यिर्मया १०:१०.

निर्माणकर्ता स्वतःविषयी असे सांगतो: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.” (यशया ४२:५, ८, पं.र.भा.) मूळ भाषांमधील बायबलमध्ये जवळजवळ ७,००० वेळा या नावाचा उल्लेख आला आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना अशाप्रकारे प्रार्थना करायला शिकवले: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.”—मत्तय ६:९.

खऱ्‍या देवाचे व्यक्‍तिमत्त्व कसे आहे? तो स्वतःचे वर्णन “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,” आणि जे जाणूनबुजून त्याच्या आज्ञांचे उल्लंघन करतात अशांची गय न करणारा, असे करतो. (निर्गम ३४:६, ७) मानवजातीबरोबर त्याने केलेल्या व्यवहाराचा अहवाल, या वर्णनाची सत्यता पटवून देतो.

त्याच्या नावाला आणि या नावाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या व्यक्‍तीला पवित्र, पूज्य मानले पाहिजे. निर्माणकर्ता आणि सार्वभौम शासक या नात्याने तो, आपली आज्ञाधारकता व आपली उपासना मिळण्यास पात्र आहे. असे तुम्ही व्यक्‍तिशः करत आहात का?

[१८ पानांवरील चौकट/चित्र]

“नवे आकाश व नवी पृथ्वी” कोणते बदल आणील?

पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर होईल यशया ३५:१

सर्व राष्ट्रांच्या, सर्व जातींच्या, योहान १३:३५;

सर्व भाषेच्या लोकांचा एक असा प्रकटीकरण ७:९, १०

विश्‍वव्यापी मानव समाज तयार होईल

जो प्रेमाने एकजूट होईल

विश्‍वव्यापी शांती, सर्वांसाठी खरी स्तोत्र ३७:१०, ११;

सुरक्षा असेल मीखा ४:३, ४

समाधानकारक काम, विपुल अन्‍न यशया २५:६; ६५:१७, २१-२३

असेल

आजारपण, दुःख, मरण कायमचे यशया २५:८;

नाहीसे केले जाईल प्रकटीकरण २१:१, ४

संपूर्ण जग खऱ्‍या देवाची ऐक्याने प्रकटीकरण १५:३, ४

उपासना करेल

[१९ पानांवरील चौकट/चित्रे]

तुम्हाला याचा फायदा होईल का?

देवाला असत्य बोलवतच नाही!—तीत १:२, पं.र.भा.

यहोवा म्हणतो: “माझ्या मुखातून निघणारे वचन . . . माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.

यहोवाने “नवे आकाश व नवी पृथ्वी” तयार करायला केव्हाच सुरवात केली आहे. स्वर्गीय सरकार देखील कार्य करू लागले आहे. ‘नव्या पृथ्वीचा’ पाया केव्हाच घालण्यात आला आहे.

प्रकटीकरणाच्या पुस्तकात, “नवे आकाश व नवी पृथ्वी” मानवजातीसाठी कोणत्या अद्‌भुत गोष्टी साध्य करेल याबद्दल सांगितल्यावर, खुद्द देवाचे अर्थात सार्वभौम शासकाचे शब्द उद्धृत केले आहेत, की “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.” तो असेही म्हणतो: “लिही; कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:१,.

“नवी पृथ्वी” आणि “नवे आकाश” यांचा भाग होण्याच्या पात्रतेचे ठरण्यासाठी आपण आवश्‍यक ते बदल करत आहोत का? हा महत्त्वाचा प्रश्‍न आपल्यासमोर उभा राहतो.