व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या सर्वांचा काय अर्थ होतो?

या सर्वांचा काय अर्थ होतो?

या सर्वांचा काय अर्थ होतो?

येशू ख्रिस्ताने म्हटले: “युगाच्या समाप्तीचे चिन्ह,” युद्धे, अन्‍नटंचाई, मऱ्‍या आणि भूमिकंप, हे असेल.—(तिरपे वळण आमचे.)—मत्तय २४:१-८; लूक २१:१०, ११.

सन १९१४ पासून, बहुतेकदा पाद्र्‌यांनी राजकारणात ढवळाढवळ केल्यामुळे आणि आता संपूर्ण जगभरात बोकाळत चाललेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे होत असलेल्या राष्ट्रा-राष्ट्रांमधील आणि वांशिक गटांतील युद्धांमुळे जीवितहानी होत आहे.

शास्त्रोक्‍त पद्धतीने अन्‍न उत्पादनात विकास झालेला असला तरी, कमालीच्या अन्‍नटंचाईमुळे पृथ्वीतलावरील कोट्यवधी लोक उपाशी असतात. दर वर्षी लाखो लोक पोटभर अन्‍न न मिळाल्यामुळे मरण पावतात.

मऱ्‍या अर्थात संसर्गजन्य रोगांच्या सर्वत्र आढळणाऱ्‍या साथी देखील येशूने दिलेल्या चिन्हाचा भाग आहेत. पहिल्या महायुद्धानंतर, २,१०,००,००० लोकांचा बळी फ्लूच्या साथीने घेतला. ही साथ, गत काळात विशिष्ट क्षेत्रात आलेल्या साथींप्रमाणे नव्हती; ती संपूर्ण पृथ्वीवरील राष्ट्रांत आणि दूरदूरच्या द्वीपांवरही पसरली होती. आता एड्‌सचे राज्य चालू आहे; तसेच, विकसनशील राष्ट्रांतील लोकही टीबी, मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू यांना बळी पडत आहेत.

अहवालानुसार, दर वर्षी विविध तीव्रतेचे हजारो भूकंप होत राहतात. उपलब्ध साधने व भूकंपांची माहिती देणाऱ्‍या सुधारित पद्धती असूनही, दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रात भूकंपाशी संबंधित असलेल्या संकटांची बातमीसुद्धा ठळक बातम्यांमध्ये वारंवार ऐकायला मिळते.

बायबलमध्ये हेही भाकीत करण्यात आले होते: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनहि दूर राहा.”—२ तीमथ्य ३:१-५.

आपण ‘कठीण दिवस असलेल्या शेवटल्या काळात’ जगत आहोत याजशी तुम्ही सहमत आहात का?

लोक कमालीचे स्वार्थी, पैशासाठी वेडेपिसे आणि गर्विष्ठ झाले आहेत, हे तुमच्या पाहण्यात आले आहे का?

हे जग, हेकेखोर, कृतघ्न, शांतताद्वेषी, विश्‍वासघातकी लोकांनीच भरले आहे, हे कोण अमान्य करेल का?

केवळ काही ठिकाणीच नव्हे तर संपूर्ण जगभरात, आईबापांस न मानणारे व धक्का बसेल इतक्या थरापर्यंत लोक ममताहीन झाले आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का?

तुम्हाला जाणवत असेल, की आपण अशा एका जगात राहत आहोत जे सुखविलासात तर्र आहे परंतु चांगल्याबद्दल त्याला तीळमात्रही प्रेम नाही. बायबलमध्ये, “शेवटल्या काळांत” अशा मनोवृत्तीचे लोक असतील असे सांगितले आहे.

आपण कोणत्या काळात जगत आहोत यासाठी आणखी पुराव्याची गरज आहे का? येशूने असेही भाकीत केले होते, की याच काळात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा संपूर्ण पृथ्वीवर प्रचार केला जाईल. (मत्तय २४:१४) हे आज पूर्ण होत आहे का?

यहोवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यास वाहिलेले, टेहळणी बुरूज नावाचे बायबल आधारित नियतकालिक, इतर कोणत्याही नियतकालिकापेक्षा अधिक भाषांमध्ये नियमितरीत्या छापले जात आहे.

दर वर्षी, यहोवाचे साक्षीदार इतरांना देवाच्या राज्याचा व्यक्‍तिगतपणे प्रचार करण्याकरता १०० कोटींपेक्षा अधिक तास खर्च करतात.

ते, सध्या बायबलचे स्पष्टीकरण देणारे साहित्य जवळजवळ ४०० भाषांमध्ये आणि दूरदूर वसलेले व अल्पसंख्यांक लोक वाचत असलेल्या भाषांमध्ये देखील प्रकाशित करत आहेत. यहोवाच्या साक्षीदारांनी सर्व राष्ट्रांत सुवार्ता पोहंचवली आहे; राजनैतिक दृष्टिकोनात अगदी लहान असलेल्या अनेक द्वीपांवर व क्षेत्रांमध्ये देखील त्यांनी प्रचार केला आहे. बहुतेक देशांत ते बायबल शिक्षणाचा नियमित कार्यक्रम चालवतात.

होय, देवाच्या राज्याची सुवार्ता संपूर्ण पृथ्वीवर गाजवली जात आहे; धर्मपरिवर्तन करण्यासाठी नव्हे तर साक्ष देण्यासाठी. सर्वत्र असलेल्या लोकांना, स्वर्ग आणि पृथ्वी कोणी निर्माण केली हे जाणून घेण्याची, तसेच ज्याने ती निर्माण केली त्याच्या नियमांबद्दल आदर दाखवण्याची, सहमानवांबद्दल प्रेम दाखवण्याची संधी दिली जात आहे.—लूक १०:२५-२७; प्रकटीकरण ४:११.

लवकरच, देवाचे राज्य पृथ्वीवरील सर्व दुष्टाई काढून पृथ्वीला विश्‍वव्यापी परादीस बनवणार आहे.—स्तोत्र ३७:१०, ११, २९.

[६ पानांवरील चौकट]

शेवटले दिवस—कशाचे?

मानवजातीचे नव्हे. कारण, बायबलमध्ये, जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांना अनंतकाळ जगण्याची आशा आहे.—योहान ३:१६, ३६; १ योहान २:१७.

पृथ्वीचेही नाहीत. कारण, लोकवस्ती असलेली पृथ्वी कायमची राहील, असे अभिवचन देवाच्या वचनात दिले आहे.—स्तोत्र ३७:२९; १०४:५; यशया ४५:१८.

हे शेवटले दिवस, या हिंसक, प्रेमहीन व्यवस्थीकरणाचे आणि या व्यवस्थीकरणाशी घट्ट जडून असलेल्यांचे आहेत.—नीतिसूत्रे २:२१, २२.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

बायबल खरोखरच देवाचे वचन आहे का?

बायबल संदेष्ट्यांनी वारंवार असे लिहिले: “यहोवा असे म्हणतो.” (यशया ४३:१४, पं.र.भा; यिर्मया २:२, पं.र.भा.) देवाचा पुत्र असलेल्या येशू ख्रिस्ताने देखील, ‘मी आपल्या मनच्या गोष्टी सांगत नाही,’ हे ठासून सांगितले. (योहान १४:१०) बायबलमध्येसुद्धा स्पष्टपणे म्हटले आहे: “संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे.”—२ तीमथ्य ३:१६, पं.र.भा.

युनायटेड बायबल सोसायटीजने दिलेल्या अहवालानुसार २,२०० पेक्षा अधिक भाषांमध्ये बायबल व्यतिरिक्‍त इतर कोणतेही पुस्तक प्रकाशित केले जात नाही. इतर कोणत्याही पुस्तकाच्या प्रतींचे—आता चार अब्जांपेक्षा अधिक प्रमाणात वितरण होत नाही. सर्व मानवजातीसाठी देवाकडून आलेल्या संदेशाविषयी तुम्ही अशीच अपेक्षा करत नाही का?

बायबल हे ईश्‍वरप्रेरित आहे याचा पुरावा देणारी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक हे माहितीपत्रक पाहा.

बायबल हे खरोखरच देवाचे वचन आहे हे ओळखून तुम्ही ते वाचाल तर तुम्हाला निश्‍चित त्याचा खूप फायदा होईल.

[८ पानांवरील चौकट/चित्रे]

देवाचे राज्य काय आहे?

हे एक स्वर्गीय सरकार आहे ज्याची स्थापना स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता यहोवा याने केली आहे.—यिर्मया १०:१०, १२.

बायबलमध्ये या राज्याचा अधिकार देवाने ज्याला दिला आहे त्या राजाचे नाव येशू ख्रिस्त असे सांगितले आहे. (प्रकटीकरण ११:१५) पृथ्वीवर असताना, येशूने दाखवून दिले की त्याला देवाकडून अद्‌भुत अधिकार मिळाला होता. या अधिकाराने तो दाखवू शकला, की त्याला निसर्गावर ताबा आहे, तो सर्व प्रकारचे आजार बरे करू शकतो आणि तो मृतांना पुन्हा जिवंत करू शकतो. (मत्तय ९:२-८; मार्क ४:३७-४१; योहान ११:११-४४) ईश्‍वरप्रेरित बायबल भविष्यवाणीने भाकीत केले, की “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून [देव] त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य” देणार आहे. (दानीएल ७:१३, १४) या सरकाराला स्वर्गाचे राज्य म्हटले आहे; येशू ख्रिस्त आता स्वर्गातूनच आपले राज्यशासन चालवत आहे.

[७ पानांवरील चित्रे]

संपूर्ण जगभरात सुवार्तेचा प्रचार होत आहे