व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे जग कोणत्या दिशेने जात आहे?

हे जग कोणत्या दिशेने जात आहे?

हे जग कोणत्या दिशेने जात आहे?

संपूर्ण जगभरात, गंभीर समस्या आणि धक्केदायक घटना दररोजच्या गोष्टी बनल्या आहेत! याचा काय अर्थ होतो?

व्यक्‍तिगत सुरक्षा: भर बाजारात बाँम्बस्फोट. शाळेत शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर गोळीबार. आईवडिलांची नजर चुकल्याने तान्ह्या बाळांचे अपहरण. दिवसाढवळ्या स्त्रियांना व वृद्धांना लुबाडले.

धार्मिक परिस्थिती: चर्च युद्धातील पक्षांना पाठिंबा देतात. जातिसंहारात चर्चच्या पुढाऱ्‍यांचा हात असल्याचा आरोप. पाळक तरुणांचे लैंगिक शोषण करतात; चर्च यावर पांघरूण घालतात. चर्चच्या सेवांतील उपस्थितीत कमालीची घट; चर्च इमारती विकण्यात येतात.

पर्यावरण: व्यापारी प्रकल्पांसाठी बेसुमार जंगलतोड. जळणाचे लाकूड मिळवण्यासाठी गरीब लोकांनी वनराईंना बोडके करून टाकले आहे. विहिरी आणि झऱ्‍यांचे पाणी प्रदूषित, पिण्यास सुरक्षित नाही. कारखान्यांचा मल आणि आधुनिक मासेमारीच्या पद्धतींमुळे मासेमारीचा विनाश. हवेतील प्रदूषणामुळे दम कोंडत आहे.

रोजगार: काही आशियाई राष्ट्रांची दरडोई मिळकत खूपच कमी आहे. अधिकाऱ्‍यांच्या लोभामुळे धंदे मंदावलेत ज्यामुळे हजारो बेरोजगार झालेत. लबाडीमुळे, पैसे गुंतवणाऱ्‍यांनी आपली जीवनभरची कमाई गमावली.

अन्‍न टंचाई: जवळजवळ ८०,००,००,००० लोक दररोज उपाशी पोटी झोपी जातात.

युद्ध: विसाव्या शतकातील युद्धांमध्ये, १०,००,००,००० पेक्षा अधिक लोक आपल्या प्राणास मुकले. संपूर्ण मानवजातीचा अनेक वेळा विनाश करता येईल इतका आण्विक शस्त्रसाठा. मुलकी युद्धे. संपूर्ण जगात दहशतवाद्यांचा धुमाकूळ.

साथी आणि इतर आजार: १९१८ पासून सुरू झालेल्या स्पॅनिश फ्लूने २,१०,००,००० लोकांचा बळी घेतला. एड्‌स, “मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी साथीचा रोग बनला आहे.” कॅन्सर व हृदयविकारामुळे संपूर्ण जगभरात दुःख पसरले आहे.

वर सांगितलेल्या फक्‍त एकाच बातमीकडे पाहू नका. या केवळ एकेकच घटना आहेत का? की, खरोखरच महत्त्वपूर्ण असलेल्या संपूर्ण जगभरात घडणाऱ्‍या घटनांचा त्या भाग आहेत?

[५ पानांवरील चौकट/चित्र]

देवाला खरोखरच आपली काळजी आहे का?

धक्केदायक घटना पाहून किंवा स्वतःवर कोसळलेल्या संकटामुळे दुःखी झालेल्या अनेक लोकांच्या मनात असा प्रश्‍न येतो, की या वाईट गोष्टी थांबवण्यासाठी देव काही करत का नाही?

देवाला आपली काळजी आहे. आताही तो विश्‍वसनीय मार्गदर्शन व खरे साहाय्य देतो. (मत्तय ११:२८-३०; २ तीमथ्य ३:१६, १७) हिंसा, आजारपण, मृत्यू यांचा कायमचा अंत करण्यासाठी त्याने व्यवस्था केली आहे. यावरून हे दिसून येते, की त्याला केवळ एकाच राष्ट्राच्या लोकांची नव्हे तर सर्व राष्ट्रांच्या, जातींच्या व भाषांच्या लोकांची काळजी आहे.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

आपण किती पर्वा करतो? तुम्हाला माहीत आहे का, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता कोण आहे? त्याचे नाव काय आहे? त्याचा काय उद्देश आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे त्याने बायबलमध्ये दिली आहेत. हिंसा, आजारपण, मृत्यू यांचा कायमचा अंत करण्यासाठी तो काय करणार आहे हे त्याने बायबलमध्ये सांगितले आहे. आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर मग आपण काय केले पाहिजे? आपण त्याच्याविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी शिकून घेतले पाहिजे. पण आपला जर देवावर विश्‍वासच नसेल तर त्याने केलेल्या तरतुदींचा फायदा आपल्याला कसा घेता येईल बरे? (योहान ३:१६; इब्री लोकांस ११:६) आपण त्याच्या आज्ञा देखील पाळल्या पाहिजेत. (१ योहान ५:३) हे सर्व करण्याची तुमची तयारी आहे का?

देवाने सध्याची परिस्थिती का राहू दिली आहे हे समजण्यासाठी आपण एक महत्त्वपूर्ण वादविषय आधी समजून घेतला पाहिजे. बायबल त्याचे स्पष्टीकरण देते. या प्रकाशनाच्या पृष्ठ १५ वर या वादविषयीची माहिती देण्यात आली आहे.