व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एवढा त्रास व अन्याय का?

एवढा त्रास व अन्याय का?

भाग ६

एवढा त्रास व अन्याय का?

१, २. मानवाला ज्याचा अनुभव घडत आहे त्या दृष्टिकोनातून बघता कोणते प्रश्‍न विचारता येतील?

 परिपूर्ण लोकांनी या पृथ्वीवर नंदनवनमय परिस्थितीमध्ये चिरकाल राहावे अशी सर्वशक्‍तिमान परमेश्‍वराची इच्छा होती व अजूनही त्याचा तोच उद्देश आहे तर, सध्याला हे नंदनवन का दिसत नाही? त्याऐवजी मानवजात इतक्या शतकांपासून त्रास व अन्यायाचा का अनुभव घेत आहे?

मानवी इतिहास युद्धे, साम्राज्यशाही चढाओढी, पिळवणूक, अन्याय, दारिद्‌य्र, विपत्ती, आजार व मरण यांनी येणाऱ्‍या दैन्यावस्थेमुळे खरेच ओतप्रोत भरलेला आहे. या सर्व वाईट गोष्टी अजाण लोकांवर का गुदरल्या? देव जर खराच सर्वशक्‍तिमान आहे तर मग त्याने हजारो वर्षांपासून इतका प्रचंड त्रास येत राहण्याची का अनुज्ञा दिली आहे? देवाने या विश्‍वाची रचना इतक्या चांगलेपणाने व सुव्यस्थित रितीने केलेली आहे तर तो या पृथ्वीवर अव्यवस्था व नाश का येऊ देतो?

एक उदाहरण

३-५. (अ) सुव्यवस्थेचा देव पृथ्वीवर अव्यवस्था माजू देण्यास का मुभा देणार हे समजण्यासाठी कोणते उदाहरण आमची मदत करील? (ब) जे विविध पर्याय सुचवण्यात आले आहेत त्यापैकी कोणती स्थिती पृथ्वीच्या स्थितीला लागू होणारी आहे?

सुव्यवस्थेचा देव या पृथ्वीवर इतकी अव्यवस्था माजू देण्यास का परवानगी देईल ते कळण्यासाठी आपण एक उदाहरण विचारात घेऊ या. असे समजा की, तुम्ही एका जंगलातून जात आहात व जाता जाता तुम्हाला एक घर आढळते. तुम्ही घरात शिरता व त्याची पाहणी करता, तेव्हा तुम्हाला ते विस्कळीत असल्याचे दिसते. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत, छपराला तर मोठे भोकच पडले आहे, आणि लाकडाच्या प्रवेशाच्या द्वारमंडपाला बरीच छिद्रे पडली आहेत. दरवाजा एका बिजागिरीवर लोंबकळत आहे व नळकोंडाळी तर वाईट स्थितीची आहेत.

हा सर्व विस्कळितपणा बघून तुम्ही असे म्हणाल का की, या घराचा कोणी बुद्धिमान रचनाकार असू शकणार नाही? ती अव्यवस्था बघून ते घर योगायोगाने घडले गेले अशी तुमची खात्री होईल का? किंवा ते घर कोणीतरी रचून बांधले असे तुम्ही मानले तर तो माणूस इतका कुशल व विचारी नव्हता असे तुम्हाला वाटायला लागेल का?

घराच्या इमारतीचे सूक्ष्म परिक्षण केल्यावर तुम्हाला, त्याचे सर्व भाग आरंभाला नीट होते आणि ते घर फारच काळजीपूर्वक बांधण्यात आले होते असे दिसते. पण सध्याला त्याची तितकी काळजी घेण्यात आली नव्हती, त्यामुळे ते पडण्याच्या मार्गावर होते. तर ते सर्व दोष व समस्या काय सुचवू शकतील बरे? ते हेच सुचवतील की, (१) त्या घराच्या मालकाला मृत्यू आलेला आहे; (२) त्याला बांधण्याची कुशलता आहे पण घराबद्दल त्याला इतके स्वारस्य वाटत नाही किंवा; (३) त्याने आपली ही मिळकत एका बेपर्वा वृत्तीच्या माणसाला भाड्याने दिली आहे. ही शेवटली स्थिती पृथ्वीबद्दल असणाऱ्‍या स्थितीशी मिळतीजुळती आहे.

कशामुळे सगळे बिघडले

६, ७. आदाम व हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडल्यावर काय घडले?

पवित्र शास्त्राच्या आरंभीच्या लिखाणावरून आपण शिकलो की, लोकांनी त्रास सहन करावा व शेवटी मरावे हा देवाचा उद्देश नव्हता. आपले पहिले पालक, आदाम व हव्वा केवळ देवाच्या आज्ञेचा भंग केल्यामुळे मरण पावले. (उत्पत्ती अध्याय २ व) त्यांनी आज्ञाभंग केला तेव्हापासून ते देवाची इच्छा आचरीत राहिले नाही. ते देवाच्या काळजीतून बाहेर पडले. यामुळे ते देवापासून, “जीवनाचा उगम” याच्यापासून दूर गेले—स्तोत्रसंहिता ३६:९.

विद्युतशक्‍ती खंडित झाल्यामुळे एखादे यंत्र जसे मंद होते व बंद पडते, तसेच त्यांची शरीरे व मने निकृष्ट बनली. यामुळे आदाम व हव्वा यांना अधोगती लागली, ते म्हातारे झाले व शेवटी मेले. यानंतर काय झाले? ते जेथून आले तेथेच परतले: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” आज्ञेचा भंग केल्यास त्याचा परिणाम मरण घडेल, असे देवाने त्यांना बजावून सांगितले होते: “तू खास मरशील.”—उत्पत्ती २:१७; ३:१९.

८. आमच्या पहिल्या पालकांच्या पापाने मानवी कुटुंबावर कसा परिणाम केला?

आपल्या पहिल्या पालकांनाच केवळ मरण आले नाही तर, त्यांच्या सर्व वंशजांना, सबंध मानवजातीला देखील मरणास अधीन व्हावे लागले. ते का? कारण आनुवंशिकतेच्या नियमाप्रमाणे, मुलांना त्यांच्या पालकांपासून गुणलक्षणांचा वारसा मिळत असतो. आमच्या प्रथम पालकांच्या मुलांना वारशाने काय मिळाले असेल तर ती अपूर्णता व मृत्यू या गोष्टी होत्या. रोमकरांस पत्र ५:१२ आपल्याला सांगते: “एका माणसाच्या द्वारे [मानवजातीचा पूर्वज, आदाम] पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी [अपूर्णत्व किंवा पापी प्रवृत्ती वारशाने मिळाल्यामुळे] पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशाप्रकारे मरण पसरले.” वस्तुत: पाप, अपूर्णत्व व मरण याच गोष्टी लोकांना ठाऊक असल्यामुळे काहींना या स्वाभाविक व अपरिहार्य अशा वाटतात. तरीसुद्धा, आरंभीच्या माणसांना चिरकाल जगण्याच्या आशा व क्षमतेसह निर्माण करण्यात आले होते. या कारणामुळे, पुष्कळ लोकांना आपल्या जीवनाचे भवितव्य मरणामुळे छाटले जाईल या विचारामुळे मोठे वैफल्य वाटू लागते.

इतका काळ का?

९. देवाने त्रास इतका काळ चालू राहू देण्याची का मुभा दिली?

देवाने माणसांना इतक्या स्वतंत्रपणे आपलाच मार्ग अनुसरण्याची मुभा इतक्या काळ का दिली? या सर्व शतकभरात त्याने त्रासाला वावरण्याची का अनुमती दिली? याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, एक अत्यंत महत्त्वपूर्ण वादविषय सामोरा आणण्यात आलाः अधिपत्य गाजविण्याचा हक्क कोणाचा आहे? देव मानवांचा अधिपती असू शकतो का किंवा मानव स्वतः त्याच्याविना यशस्वीरित्या अधिपत्य गाजवू शकतो?

१०. मानवाला कोणती क्षमता देण्यात आली, व तिच्यासोबत कोणती जबाबदारी होती?

१० मानवाची निर्मिती स्वेच्छा स्वातंत्र्याद्वारे करण्यात आली होती, म्हणजे त्यांना निवड करण्याची क्षमता दिली गेली. त्यांना कोणा यंत्रमानवासारखे किंवा उपजत बुद्धिने मार्गदर्शित होणाऱ्‍या जनावरांसारखे घडवण्यात आले नव्हते. याकरताच, आपण कोणाची सेवा करू इच्छितो याची मानव निवड करू शकतात. (अनुवाद ३०:१९; २ करिंथकर ३:१७) या कारणामुळे, देवाचे वचन असा सल्ला देते: “स्वतंत्र माणसासारखे असा, तथापि, आपली स्वतंत्रता दुष्टपणाला पांघरूण होईल असा तिचा उपयोग करू नका. तर देवाचे दास असे असा.” (१ पेत्र २:१६) तथापि, मानवाला मुक्‍तपणे निवड करण्याची अद्‌भुत देणगी मिळाली असली तरी या निवडीनुसार आचरलेल्या कृतीचे परिणामही त्याने स्वीकारलेच पाहिजे.

११. देवापासून स्वतंत्र असणारे मार्गाक्रमण यशस्वी होऊ शकते का हे शोधण्याचा एकमेव मार्ग कोणता होता?

११ आमच्या पहिल्या पालकांनी चुकीची निवड केली. त्यांनी देवापासून स्वतंत्र होण्याचा मार्ग निवडला. हे खरे की, आपले स्वेच्छा स्वातंत्र्य चुकीने वापरल्यामुळे देवाला त्या बंडखोर जोडप्याला लगेचच मारून टाकता आले असते. पण त्यामुळे मानवावर अधिपत्य करण्याच्या देवाच्या हक्काबद्दल उद्‌भवलेल्या प्रश्‍नाचा निकाल लागला नसता. पहिल्या जोडप्याने देवापासून स्वतंत्र होण्याची इच्छा धरल्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तर मिळावयास हवे होते की, त्यांच्या या मार्गाक्रमणामुळे आनंदी व यशस्वी जीवन परिणामित होऊ शकत होते का? हे शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आमच्या पहिल्या पालकांना व त्यांच्या संतानांना त्यांच्या मर्जीच्या मार्गाने जाऊ देणे, कारण तीच त्यांची निवड होती. निर्माणकर्त्याविना स्वतः यशस्वीरित्या अधिपत्य करू शकतो यासाठी मानवाची निर्मिती करण्यात आली होती की नव्हती हे केवळ वेळच दाखवून देणार होता.

१२. मानवी अधिपत्याबद्दल यिर्मयाने कोणता निर्वाळा दिला व ते तसे का होते?

१२ पवित्र शास्त्र लेखक यिर्मयाला, काय परिणाम होणार होता हे ठाऊक होते. देवाचा सामर्थ्यशील आत्मा किंवा क्रियाशील शक्‍तीने मार्गदर्शित होऊन त्याने सत्यतेने हे लिहिले: “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.], मला ठाऊक आहे की, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही. हे परमेश्‍वरा मला शिक्षा कर.” (यिर्मया १०:२३, २४) माणसाला देवाच्या स्वर्गीय सुज्ञानाचे मार्गदर्शन मिळालेच पाहिजे हे त्याला ठाऊक होते. ते का? कारण त्याच्या मार्गदर्शनाविना यशस्वी होता येईल अशा पद्धतीने देवाने मानवाची निर्मिती केलीच नव्हती.

१३. मानवी अधिपत्याच्या हजारो वर्षांच्या परिणामाने कोणती गोष्ट निःसंशये सिद्ध केली आहे?

१३ मानवी अधिपत्याचा हजारो वर्षांचा परिणाम निःसंशये दाखवतो की, निर्माणकर्त्याविना आपल्या कारभाराला मार्गदर्शित करणे मानवाला शक्य नाही. तसा प्रयत्न केल्यामुळे उद्‌भवलेल्या संकटाबाबत त्यांना स्वतःला दोष द्यावा लागेल. पवित्र शास्त्र स्पष्ट करते: “तो [देव] दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे. त्याच्याठायी अनीती नाही. तो न्यायी व सरळ आहे. हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हेत, हा त्यांचा दोष आहे.”—अनुवाद ३२:४, ५.

देव लवकरच हस्तक्षेप करील

१४. मानवी घडामोडीत हस्तक्षेप करण्यासाठी देव आता आणखी उशीर का करणार नाही?

१४ शतकांभरच्या वेळेत मानवी अधिपत्याच्या अपयशाचे भरपूर प्रदर्शन दाखवल्यावर आता देव मानवी घडामोडीत हस्तक्षेप करू शकतो आणि त्रास, दुःख, आजार व मृत्यू यांना थांबवू शकतो. मानवाला विज्ञान, उद्योग, औषधे व इतर क्षेत्रात आपल्या साध्यतेचा कळस गाठण्याची अशी अनुमती दिल्यावर आता तो आपल्या निर्माणकर्त्याविना स्वतंत्रपणे राहून शांतीमय, नंदनवनाने युक्‍त असणारे जग आणू शकतो का हे दाखवून देण्यासाठी आणखी काही शतकांचा अवधी देण्याची काही गरज नाही. त्यांनी ते जग कधी आणले नाही व तसे आणताही येणार नाही. देवापासून स्वतंत्र राहिल्यामुळे खूपच ओबडधोबड, द्वेषपूर्ण व मरणप्राय जगाची निर्मिती झाली आहे.

१५. आपण पवित्र शास्त्राचा कोणता सल्ला ऐकला पाहिजे?

१५ मानवजातीची प्रामाणिकपणे मदत करू इच्छिणारे शासनकर्ते होते हे जरी खरे असले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. मानवी अधिपत्य मोडकळीला येत आहे याचे आज सर्वत्र पुरावे दिसत आहेत. या कारणास्तव, पवित्र शास्त्र उचितपणे असा सल्ला देते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका, मनुष्यांवर भरवसा ठेवू नका, त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”—स्तोत्रसंहिता १४६:३.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४, २५ पानांवरील चित्रं]

प्रामाणिक जागतिक अधिपतींना देखील शांतीमय व नंदनवनाने युक्‍त असणारे जग आणता आले नाही