व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती धर्मजगताने देव व पवित्र शास्त्र यांचा विश्‍वासघात केला आहे

ख्रिस्ती धर्मजगताने देव व पवित्र शास्त्र यांचा विश्‍वासघात केला आहे

भाग ४

ख्रिस्ती धर्मजगताने देव व पवित्र शास्त्र यांचा विश्‍वासघात केला आहे

१, २. काही लोकांना पवित्र शास्त्राबद्दल का आदर वाटत नाही, पण पवित्र शास्त्र काय म्हणते?

 पुष्कळ देशातील लोकांनी पवित्र शास्त्राला टाळले आहे व त्यांना त्याच्याबद्दल कमी आदर वाटतो. ते अनुसरण करीत असल्याचा दावा करणाऱ्‍यांची वाईट वागणूक हे याचे कारण आहे. काही देशात असेही म्हटले गेले की, पवित्र शास्त्र हे पुस्तक युद्धाला चालना देते, ते गोऱ्‍या लोकांचे पुस्तक आहे आणि ते वसाहतवादाला पाठबळ देते. पण हे सर्व चुकीचे ग्रह आहेत.

खरे म्हणजे, इतक्या शतकांमध्ये ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली केल्या गेलेल्या वसाहती युद्धाबद्दल व लोभी पिळवणूकीबद्दल मध्यपूर्वेत लिहिण्यात आलेले पवित्र शास्त्र आपली संमती दर्शवीत नाही. उलटपक्षी, पवित्र शास्त्राचे वाचन करण्यामुळे आणि येशूने शिकवलेल्या खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची शिकवण जाणून घेतल्यामुळे ते, युद्धे, अनैतिकता आणि इतरांची पिळवणूक करणे याचे जोरदार खंडण करते हे तुम्हाला दिसेल. दोष लोभी लोकांचा आहे, पवित्र शास्त्राचा नव्हे. (१ करिंथकर १३:१-६; याकोब ४:१-३; ५:१-६; १ योहान ४:७, ८) या कारणास्तव, पवित्र शास्त्राच्या चांगल्या सल्ल्याच्या विरुद्ध स्वतःची वागणूक ठेवणाऱ्‍या स्वार्थी लोकांच्या गैरवर्तणुकीने तुम्हाला त्याच्या धनसंपदेपासून लाभ घेण्याकडून वंचित होऊ देऊ नका.

३. ख्रिस्ती धर्मजगताबद्दल इतिहास कोणती वस्तुस्थिती दाखवतो?

जे पवित्र शास्त्राच्या सूचनेनुसार आपले जीवन व्यतित करीत नाहीत, त्यामध्ये ख्रिस्ती धर्मजगताच्या लोकांचा व राष्ट्रांचा समावेश होतो. “ख्रिस्ती धर्मजगत” याची व्याख्या जेथे ख्रिस्ती धर्म अस्तित्वात असल्याचे समजले जाते त्या जगातील भाग अशी केली जाते. त्याचा बहुतेक भाग पाश्‍चिमात्य राष्ट्रांनी व्यापला असून त्यांच्या चर्चव्यवस्था प्रामुख्यत्वे चवथ्या शतकापासून प्रसिद्ध बनल्या. ख्रिस्ती धर्मजगताकडे तर कित्येक शतके पवित्र शास्त्र आहे आणि त्याचे पाळक त्या शास्त्राचे शिक्षण देणारे व देवाचे प्रतिनिधी असल्याचे दाव्याने सांगतात. पण ख्रिस्ती धर्मजगताच्या या पाळकांनी व मिशनऱ्‍यांनी खरेच सत्य शिकवले आहे का? शिवाय त्यांची कृती देव व पवित्र शास्त्राचे प्रतिनिधीत्व करते का? ख्रिस्ती धर्मजगात ख्रिस्ती धर्म खराच वास्तव्य करतो का? नाही. त्याचा धर्म चवथ्या शतकापासून सामोरा आल्यानंतर, ख्रिस्ती धर्मजगत देव व पवित्र शास्त्र यांचा शत्रू असल्याचे सिद्ध झाले आहे. होय, इतिहासातील वस्तुस्थिती, ख्रिस्ती धर्मजगताने देव व पवित्र शास्त्र यांचा विश्‍वासघात केला असल्याचे दाखवते.

अशास्त्रीय सिद्धान्त

४, ५. चर्चेसद्वारे कोणते अशास्त्रीय सिद्धान्त शिकवली जातात?

ख्रिस्ती धर्मजगताची प्रमुख शिकवण पवित्र शास्त्र शिकवणींवर नव्हे तर प्राचीन ग्रीक, मिसर, बाबेल व इतर दंतकथा यांच्यावर आधारलेल्या आहेत. मानवी जीवाचे अमरत्व, अग्नी नरकातील चिरकालिक यातना, परगेटरी आणि त्रैक्य (एका देवपणात तीन व्यक्‍ती) ही तत्त्वे पवित्र शास्त्रात आढळत नाहीत.

उदाहरणार्थ, यापैकीच्या एकाचा जरा विचार करा की, सर्व दुष्ट लोकांना अग्नी नरकात सदासर्वदा पीडा मिळेल. या कल्पनेबद्दल तुम्हाला स्वतःला कसे वाटते? पुष्कळांना ती तिरस्करणीय वाटते. देव, लोकांना सर्वदा अतियातनाकारक पीडा देत राहणार ही गोष्ट पुष्कळांना अव्यवहार्य वाटते. अशी ही रानटी कल्पना पवित्र शास्त्राच्या देवाविरुद्ध आहे, कारण “देव प्रीती आहे.” (१ योहान ४:८) पवित्र शास्त्र असे स्पष्टरित्या सांगते की, अशी ही कल्पना सर्वसमर्थ देवाच्या ‘मनात कधीच आली नाही.’—यिर्मया ७:३१; १९:५; ३२:३५.

६. पवित्र शास्त्र अमर आत्म्याच्या शिकवणीचे कसे खंडन करते?

आज ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेससोबत पुष्कळ धर्म, मानवाला एक अमर असा आत्मा असून तो मृत्यूच्या वेळी स्वर्गात किंवा नरकात जातो अशी शिकवण देतात. पण हे पवित्र शास्त्राचे शिक्षण नाही. उलटपक्षी, पवित्र शास्त्र स्पष्ट म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही; . . . कारण ज्या अधोलोकाकडे [शिओल, कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍तिप्रयुक्‍ती, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) तसेच स्तोत्रकर्ता म्हणतो की, मरणाच्या वेळी मनुष्य “आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.”—स्तोत्रसंहिता १४६:४.

७. देवाचा नियम तोडल्यामुळे आदाम व हव्वा यांना देवाने कोणती शिक्षा सांगितली होती?

शिवाय हेही लक्षात आणा की, आदाम व हव्वेने देवाचा कायदा मोडला तेव्हा त्यांना अमरत्व ही शिक्षा मिळाली नाही. तसे झाले असते तर ते वरदान ठरले असते, शिक्षा नव्हे! तथापि, त्यांना म्हटले गेले की, ते ‘अंती पुनः मातीला जाऊन मिळतील, कारण तिच्यातून त्यांची उत्पत्ती होती.’ देवाने आदामाला हे बजावून सांगितले: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ती ३:१९) अशाप्रकारे जीवाचे जन्मापासूनचे अमरत्व ही पवित्र शास्त्राची शिकवण नाही, तर ती ख्रिस्ती धर्मजगताने त्याच्याआधी जिवंत राहिलेल्या ख्रिस्तेत्तर लोकांकडून उचलली आहे.

८. ख्रिस्ती धर्मजगताच्या त्रैक्य सिद्धान्ताला पवित्र शास्त्र कसे धुडकावून देते?

याचप्रमाणे, ख्रिस्ती धर्मजगताच्या त्रैक्याचे शिक्षण देवाला तीन देवांचा मिळून असलेला कोणी गूढ देव असल्याचे चित्र देते. पण हेही शिक्षण पवित्र शास्त्रात आढळत नाही. उदाहरणार्थ, यशया ४०:२५ मध्ये देव अगदी स्पष्टपणे म्हणतो: “मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल?” याचे उत्तर स्पष्टच आहे की, कोणीही त्याच्या तुल्य ठरू शकत नाही. याचप्रमाणे स्तोत्रसंहिता ८३:१८ साधेपणात म्हणते: “तू केवळ तूच परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] या नामाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस.”—तसेच यशया ४५:५; ४६:९; योहान ५:१९; ६:३८; ७:१६ देखील पहा.

९. पवित्र शास्त्राचे शिक्षण आणि ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसचे शिक्षण याबद्दल आपल्याला काय म्हणता येईल?

पवित्र शास्त्राने देव व त्याच्या उद्देशाबद्दल दिलेले शिक्षण स्पष्ट, सहजपणे समजण्याजोगे आणि व्यवहार्य आहे. पण ख्रिस्ती धर्मजगातील चर्चेसच्या शिकवणी समजू शकत नाहीत. यापेक्षा वाईट म्हणजे, त्या पवित्र शास्त्राच्या शिक्षणाच्या विरुद्ध आहेत.

अभक्‍त कृती

१०, ११. ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेस जे जे करीत आले आहेत त्याच्या कोणकोणत्या विरुद्ध गोष्टींचे आचरण पवित्र शास्त्राचे शिक्षण अपेक्षिते?

१० ख्रिस्ती धर्मजगताने खोट्या सिद्धांताचे शिक्षण देण्यासोबत आपल्या कृतीने देखील देव व पवित्र शास्त्राचा विश्‍वासघात घडवून आणला आहे. पाळक व चर्चेस यांनी गेल्या शतकांत जे काही केले व आताही करीत आहेत ते पवित्र शास्त्राचा देव जे अपेक्षितो त्याच्याविरुद्ध तसेच ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त याने जे शिकवले व केले त्याच्याविरुद्ध आहे.

११ उदाहरणार्थ, येशूने आपल्या अनुयायांना जगाच्या राजकारणी घडामोडीत ढवळाढवळ न करण्याचे व त्यांच्या युद्धात समाविष्ट न होण्याचे शिकवले. तसेच त्यांनी शांतीप्रिय, आज्ञाधारक आणि कसलाही अहंभाव न बाळगता आपल्या सहमानवांबद्दल प्रीती करण्याचे आणि त्यांचे जीवन घेण्याच्याऐवजी वेळप्रसंगी स्वतःच्या जीवनाचे यज्ञार्पण करण्याची तयारी देखील राखली पाहिजे असे सांगितले.—योहान १५:१३; प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १ योहान ४:२०, २१.

१२. खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख कशाप्रकाराने होईल असे येशूने म्हटले?

१२ येशूने शिकवलेले हे प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खोट्या दांभिक ख्रिश्‍चनांपेक्षा खरेपणाने वेगळे असल्याचे प्रदर्शित करणारे चिन्ह असेल असे त्याने शिकवले. त्याच्या होणाऱ्‍या अनुयायांबद्दल तो असे म्हणाला होता: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३४, ३५; १५:१२.

१३, १४. ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेस देवाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत हे कशावरून दिसते?

१३ तरीपण, ख्रिस्ती धर्मराज्याचे पाळक शतकामागून शतके राजकारणात लुडबुडत राहिले आणि त्यांनी आपल्या राष्ट्राच्या युद्धांची जोखीम पत्करली. त्यांनी या शतकाच्या दोन जागतिक युद्धात ख्रिस्ती धर्मराज्यातील आपसातील दोन विरुद्ध बाजूंना आपले समर्थन दर्शवले. त्या झगड्यात प्रत्येक बाजूकडील पाळकांनी स्वतःचा विजय व्हावा म्हणून प्रार्थना केल्या व तेव्हाच त्यांच्या धर्माच्या एका देशाच्या सदस्यांनी आपल्याच धर्माच्या दुसऱ्‍या देशातील सदस्यांची कत्तल घडवली. असे कृत्य देवाची नव्हे तर, सैतानाची मुले करतात असे पवित्र शास्त्र सांगते. (१ योहान ३:१०-१२, १५) अशाप्रकारे, पाळक व त्यांच्या अनुयायांनी ख्रिस्ती असल्याचा दावा केला असला तरी ज्या येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना “तरवार जागच्या जागी घाल”ण्याची आज्ञा दिली होती त्याच्याविरुद्ध ते वागले.—मत्तय २६:५१, ५२.

१४ साम्राज्यशाही काळात काही शतके ख्रिस्ती धर्मजगतातील राजकीय सत्तांनी इतर लोकांवर विजय मिळवला, त्यांना बंदिवान केले व अपमानकारक वागणूक दिली तेव्हा चर्चेसनी त्याजबरोबर आपली युती साधली. ही परिस्थिती आफ्रिका खंडात कित्येक शतके होती. बळाच्या जोरावर पश्‍चिमी तसेच इतर राष्ट्रांनी अफुयुद्ध काळात तसेच चीनमधील हिंसाचारात आपले वर्चस्व वाढवण्याची लालसा धरली तेव्हा चीनला देखील असाच अनुभव मिळाला.

१५. ख्रिस्ती धर्मजगतावर कोणती दुष्कृत्ये करण्याचा अपराध आहे?

१५ याचप्रमाणे, ज्याला काळे युग म्हणण्यात आले त्या शतकातील इतिहासामध्ये, स्वतःच्या मताशी सहमत न होणाऱ्‍यांचा छळ करण्यात, पीडा देण्यात व ठार देखील मारण्यात ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक पुढे होते. तसेच शेकडो वर्षे चाललेल्या चौकशीसत्र काळात चांगल्या व अजाण लोकांचा रानटीपणाने छळ करण्याचे व त्यांना ठार मारण्याचे कृत्य अधिकारयुक्‍तपणे केले गेले. हे दुष्कृत्य घडवून आणणारे सर्व पाळक व त्यांचे अनुयायी होते, जे ख्रिस्ती असल्याचा दावा करीत होते. सर्वसाधारण माणसाने वाचू नये यासाठी पवित्र शास्त्राला देखील नेस्तनाबूद करण्याचा यांनी प्रयत्न केला.

ख्रिस्ती नाहीत

१६, १७. चर्चेस ख्रिस्ती नाही असे आपण का म्हणू शकतो?

१६ ख्रिस्ती धर्मजगतातील राष्ट्रे व चर्चेस ख्रिस्ती नव्हते व आताही नाहीत. ते देवाचे सेवक नाहीत. त्याचे प्रेरित वचन त्यांच्याबद्दल म्हणते: “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतींनी त्याला नाकारितात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.”—तीतास १:१६.

१७ येशूने म्हटले की, खोटा धर्म जे काही निपजवितो, त्याच्या फलप्राप्तीवरुन त्याला ओळखता येते. त्याने म्हटलेः “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा, ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. . . . प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्‍यास्तव, तुम्ही त्यांच्या फळावरून [खोट्या संदेष्ट्यांना] ओळखाल.”—मत्तय ७:१५-२०.

१८. ख्रिस्ती धर्मजगताची शिकवण व त्याच्या कृतींपासून कोणते परिणाम उद्‌भवले आहेत?

१८ अशाप्रकारे, ख्रिस्ती धर्मजगाच्या धर्मांनी जे शिकवले व जे केले त्याद्वारे आपण पवित्र शास्त्रावर विश्‍वास ठेवत आहोत व देवभिरु ख्रिस्ती आहोत असा त्यांचा दावा लबाडी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी देव व पवित्र शास्त्र यांचा विश्‍वासघात केला आहे. या सर्व खटाटोपात त्यांनी लाखो लोकांमध्ये सर्वोच्च देवाबद्दल अत्यंत तिटकारा आणला व त्यांना त्याच्या विश्‍वासापासून दूर केले.

१९. ख्रिस्ती धर्मजगताला अपयश आले आहे याचा अर्थ देव व पवित्र शास्त्र यांनाही अपयश आले असा होतो का?

१९ तथापि, ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्ग व त्यांच्या चर्चेसचे त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगाच्या बाहेरील इतर धर्मांचे अपयश म्हणजे पवित्र शास्त्राचे अपयश नव्हे. तसेच याचा अर्थ, देव अपयशी ठरला आहे असाही होत नाही. उलटपक्षी, सर्वशक्‍तीमान परमेश्‍वर अस्तित्वात असल्याची व तो आमची सध्याची व भविष्याची काळजी करतो असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. जे योग्य ते करतात आणि ज्यांची सबंध पृथ्वीभर न्याय व शांती टिकलेली पाहण्याची इच्छा आहे अशा सर्वांना तो कसे प्रतिफळ देईल याचीही ते स्पष्टता करते. तसेच, देवाने दुष्टाईला अस्तित्वात राहण्याची का अनुमती दिली आहे, आणि जे लोक त्याची सेवा करीत असल्याचा दावा करतात पण वस्तुतः आपल्या सहमानवाची हानी करतात अशांचे तो या पृथ्वीवरुन कसे उच्चाटन करील याचीही ते माहिती देते.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रं]

डान्टेचा “इन्फर्नो”

हिन्दू त्रैक्य

ख्रिस्ती धर्मजगातील त्रैक्य

मिसरी त्रैक्य

[१८ पानांवरील चित्रं]

येशूच्या शिक्षणाला न जुमानता पाळकांनी युद्धामध्ये दोन्ही बाजूच्या पक्षाला आपले पाठबळ दिले