व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनात काही उद्देश आहे का?

जीवनात काही उद्देश आहे का?

भाग १

जीवनात काही उद्देश आहे का?

१. जीवनाच्या उद्देशाबद्दल बहुधा काय विचारले जाते, आणि एका व्यक्‍तीने याबद्दल काय विवेचन मांडले?

 जीवनाचा उद्देश तो काय, असा प्रश्‍न प्रत्येकाला लवकर असो की उशीरा, पण येतोच. आमचे राहणीमान सुधारण्यासाठी, आमच्या कुटुंबाची तरतूद करण्यासाठी काबाडकष्ट करणे, व नंतर ७० किंवा ८० वर्षे झाली की मरणे व मग, तेथून पुढे कायमचे अस्तित्त्वविरहीत व्हावे यासाठीच हे सर्व काही आहे का? असे वाटणाऱ्‍या एका तरुणाने म्हटले की, “जगावे, मुले असावीत, आनंदी व्हावे व शेवटी मरावे” यापरत्वे जीवनात असा दुसरा उद्देशच नाही. पण हे खरे आहे का? आणि मृत्यू हा सर्व गोष्टींचा अंत करतो का?

२, ३. भौतिक संपत्ती संपादणे हे जीवनाचा उद्देश का पुरा करू शकत नाही?

पूर्व तसेच पाश्‍चिमात्य देशात राहणाऱ्‍या अनेकांना वाटते की, जीवन जगण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे भौतिक संपत्ती मिळवावी हा आहे. हे आनंदी व अर्थभरीत जीवनाकडे निरवू शकते असे त्यांना वाटते. पण जे लोक मुळातच सधन आहेत त्यांच्याबद्दल काय? हॅरी ब्रूस या कॅनडीयन लेखकाने म्हटले: “गोंधळलेल्या स्थितीत वावरणारा श्रीमंतांचा वर्ग म्हणतो की, ते आनंदी नाहीत.” त्यांनी पुढे म्हटले: “उत्तर अमेरिकेला भयंकर निराशेने पछाडलेले आहे अशी चाचणी दाखवून देते. . . . या जगात कोणी आनंदी आहे का? आहे तर त्यामागील गुपित काय आहे?”

जिमी कार्टर या माजी अमेरिकन अध्यक्षांनी असे म्हटले: “आम्हापाशी काही गोष्टी असणे व त्यांचा उपभोग घेणे हे आम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्‍या अर्थभरीतपणाची तृप्ती देत नाही. . . . भौतिक गोष्टींचा साठा करणे, जेथे आत्मविश्‍वास किंवा उद्देश नाही त्या पोकळ जीवनाला भरून टाकू शकत नाही.” तसेच, आणखी एका राजकीय नेत्याने म्हटले: “मी मजबद्दल तसेच माझे जीवन याबद्दल गेली कित्येक वर्षे सूक्ष्मपणे सत्याचा शोध घेत आहे, आणि मजप्रमाणे मला माहीत असणारे इतरही असेच करीत आहेत. पूर्वी नव्हते इतके अधिक लोक आज विचारत आहेत की, ‘आम्ही कोण आहोत? आमचा खरा उद्देश काय आहे?’”

अधिक कठीण परिस्थिती

४. जीवनाला एखादा उद्देश आहे की काय याबद्दल अनेक का संशय धरतात?

जीवनातील स्थिती अधिकच कठीण होत आहे हे पाहता पुष्कळांना जीवनातील उद्देशाचा संशय वाटतो. आज जगभरात १०० कोटींपेक्षा अधिक लोक भयंकररित्या आजारी आहेत किंवा अपुऱ्‍या आहारावर आहेत. दर वर्षी एकट्या आफ्रिकेत अशा कारणांमुळे १ कोटीएवढी बालके मरत आहेत. पृथ्वीची ६०० कोटींच्या जवळ असणारी लोकसंख्या वर्षाला ९ कोटी इतक्या प्रमाणाने वाढत आहे, ही विकसित राष्ट्रात ९० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ आहे. ही सतत वाढत असणारी लोकसंख्या अन्‍न, घरे, उद्योगधंदा यांची वाढती मागणी करते व यामुळे पर्यायाने जमीन, पाणी व हवा यांजवर कारखाने तसेच इतर प्रदूषण घडवणाऱ्‍या गोष्टींद्वारे हानी केली जात आहे.

५. पृथ्वीतील वनस्पतींच्या बाबतीत काय घडत आहे?

वर्ल्ड मिलटरी ॲण्ड सोशल एक्स्पेंडीचर्स १९९१ हे प्रकाशन कळवते: “दर वर्षी [ग्रेट ब्रिटन इतक्या] पृष्ठभागावरील जंगले नष्ट होत आहेत. जी जंगलतोड होत आहे त्याचे सध्याचे प्रमाण पाहता, २००० वे वर्ष लागेपर्यंत दमट उष्णकटिबंधातील साधारण ६५ टक्के जंगले नाहीशी झालेली दिसतील.” अमेरिकन एजन्सीच्या मते त्या प्रदेशात एका झाडाची लागवड होत असताना १० झाडे तोडण्यात येतात आणि आफ्रिकेत तर हे प्रमाण २०स १ यापेक्षाही जास्त आहे. अशाप्रकारे वाळवंटे ही वाढत आहेत आणि दर वर्षी बेल्जियमच्या आकाराइतका प्रदेश शेतीच्या वापराला निकामी होत आहे.

६, ७. मानवी नेत्यांना सोडवता न येणाऱ्‍या काही समस्या कोणत्या आहेत, यास्तव, कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजेत?

याचप्रमाणे, या २०व्या शतकात, गेल्या चार शतकाच्या युद्धांना एकत्र केल्यावर जितके युद्धबळी झाले आहेत त्याच्या चौपटीत मृत्यू घडले आहेत. चोहीकडे वाढती गुन्हेगारी व हिंसाचार वाढत चालला आहे. कुटुंबाचे मोडकळीस येणे, मादक औषधांचा दुरुपयोग, एडस्‌ व लैंगिकरित्या संसर्गित होणारे आजार आणि इतर कित्येक नकारात्मक गोष्टी जीवनास अधिक कठीण करीत आहेत. मानवी कुटुंबाला पीडा देणाऱ्‍या विविध समस्यांच्या बाबतीत जागतिक नेत्यांना खरा उपाय देता आला नाही. या कारणामुळेच, “जीवनाचा उद्देश तो काय?” असा प्रश्‍न लोक का विचारत आहेत ते समजण्याजोगे आहे.

आता या प्रश्‍नाबाबत प्रामाण्य व धार्मिक पुढारी काय म्हणतात? इतक्या शतकानंतरच्या कालावधीनंतर यांनी आता समाधानकारक उत्तर दिले आहे का?

ते काय म्हणतात

८, ९. (अ) जीवनाच्या उद्देशाबद्दल एका चिनी प्रामाण्याने काय म्हटले? (ब)  नाझींच्या मृत्यू छावणीतून वाचलेला एक जण काय म्हणाला?

कन्फ्युशियन प्रामाण्य डू वामिन यांनी म्हटले: “आमच्या साध्या मानवी अस्तित्वात जीवनाचा परमोच्च अर्थ आढळतो.” या दृष्टिकोनाधारे मानव जन्म घेतील, अस्तित्व राखण्यासाठी धडपडतील आणि शेवटी मरतील हे चालूच राहणार. अशा या दृष्टिकोनात खूपच कमी आशा दिसते. पण ती खरी भासते का?

दुसऱ्‍या जागतिक महायुद्धा दरम्यान नाझींच्या ठार मारण्यात येणाऱ्‍या छावण्यातून वाचलेला एली विसेल हा गृहस्थ म्हणतो: “‘आम्ही येथे का आहोत?’ हा मानवजातीला सामोरा असणारा फारच महत्त्वाचा प्रश्‍न आहे . . . मला निरर्थक मृत्यू बघावयास मिळाला असला तरी असे वाटते की, जीवनाला काही अर्थ आहे.” पण जीवनाचा हा कोणता अर्थ आहे हे तो सांगू शकला नाही.

१०, ११. (अ) माणसाकडे उत्तर नाही हे एका संपादकाने कसे दाखवून दिले? (ब) उत्क्रांतवाद शास्त्रज्ञाचा दृष्टिकोन का समाधानकारक वाटत नाही?

१० व्हेरमंट रॉयस्टर या संपादकांनी म्हटले: “मनुष्य स्वत: . . . त्याचे विश्‍वातील स्थान याबाबतीत त्याने केलेले चिंतन पाहता, आम्ही काळ सुरु झाला त्यापेक्षा पुढे सरकलेलो आहोत. तथापि, अद्याप आम्हाला, आम्ही कोण आहोत, आम्ही का आहोत व कोठे जाणार आहोत याबद्दल अजून प्रश्‍नच आहेत.”

११ उत्क्रांतवादी शास्त्रज्ञ स्टिफन जे गौड यांनी परिक्षिले: “आपल्याला ‘वरिष्ठ’ उत्तराची तळमळ असेल, पण ते उत्तर अस्तित्वातच नाही.” या उत्क्रांतवाद्यांना जीवन म्हणजे स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केली जाणारी धडपड व पराकाष्ठा वाटते आणि शेवटी मृत्यू सर्व गोष्टी संपवितो. अशा या दृष्टिकोनात देखील काही आशा दिसत नाही. पण ती खरीच आहे का?

१२, १३. चर्चपुढाऱ्‍यांचे कोणते दृष्टिकोन आहेत, आणि ते प्रापंचिक निरिक्षकांच्या अनुमानापेक्षा अधिक समाधान देणारे आहेत का?

१२ पुष्कळ धार्मिक पुढाऱ्‍यांचे म्हणणे आहे की, चांगले अस्तित्व राखणे हाच जीवनाचा उद्देश आहे की, ज्यामुळे मृत्यूसमयी माणसाचा जीव स्वर्गात जाऊ शकतो व तेथे तो चिरकाल राहू शकतो. वाईट लोकांसाठी पर्यायी गोष्ट म्हणजे नरकाग्नीतील चिरकालिक यातना, असे त्यांचे म्हणणे आहे. या विश्‍वासानुरुप बघितल्यास, या पृथ्वीवर सबंध इतिहासात दिसते त्याप्रमाणे अधिक असमाधानकारक अस्तित्व चालू राहील. तथापि, लोकांनी स्वर्गात देवदूतासारखे राहावे असा देवाचा उद्देश होता तर त्याने स्वर्गात असणाऱ्‍या देवदूतांसारखी मानवाची प्रथमपासूनच का निर्मिती केली नाही?

१३ हा दृष्टिकोन धार्मिक पुढाऱ्‍यांना देखील कठीण वाटतो. लंडनमधील सेंट पॉल कॅथेड्रलचे माजी डीन डॉ. डब्ल्यु. आर. इंग म्हणाले: “मी माझ्या सबंध आयुष्यभर जीवनाचा उद्देश शोधून काढण्यात बरीच खटपट केली. मला नेहमीच मूलभूत वाटणाऱ्‍या तीन समस्यांचे उत्तर मिळवण्याचा मी बराच प्रयत्न केला: चिरकालिकतेची समस्या, मानवी व्यक्‍तित्वाची समस्या व दुष्टपणाची समस्या या त्या होत. पण त्यात मी अपयशी झालो. मला एकीलाही सोडवता आले नाही.”

परिणाम

१४, १५. परस्परविरोधी दृष्टिकोनांचा पुष्कळांवर कसा परिणाम घडला आहे?

१४ जीवनाच्या उद्देशाच्या प्रश्‍नाबद्दल प्रामाण्य तसेच धार्मिक पुढारी यांनी ज्या वेगवेगळ्या कल्पना प्रस्तुत केल्या आहेत त्यांचा काय परिणाम दिसून येतो? एका वृद्ध गृहस्थाने जो प्रतिसाद दर्शवला त्याच्यासारखीच बहुतेकांची प्रतिक्रिया दिसते की: “मी माझ्या जीवनभर येथे का आहे हा प्रश्‍न स्वतःला विचारत आलो आहे. एखादा उद्देश असलाच तर आता त्याच्याबद्दल मला काहीही स्वारस्य वाटत नाही.”

१५ जगाच्या धर्मांमध्ये दृष्टिकोनांची जी वैपुल्यता दिसते ती पाहिल्यावर एखादा हाच निर्णय घेतो की, तुमचा विश्‍वास कोणताही असला तरी ते चालण्याजोगे आहे. त्यांना वाटते की, धर्म हा मनाला विरंगुळा देणारा, मनाची शांती करणारा व समाधान देणारा आहे व यामुळे जीवनाच्या समस्यांना तोंड देता येते. दुसऱ्‍यांना वाटते की, धर्म म्हणजे अंधश्रद्धा. ते म्हणतात की, शतकांच्या धार्मिक अंदाजांनी जीवनाच्या उद्देशाबद्दल वाटणाऱ्‍या प्रश्‍नाचे उत्तर दिले नाही आणि त्याने सर्वसाधारण मानवाचे जीवन सुधारले नाही. जगाच्या धर्मांनी मानवजातीला प्रगतिपासून रोखले असल्याचे आणि ते द्वेष व युद्धे यांना कारणीभूत असल्याचे इतिहासाने खरेच दाखवले आहे.

१६. जीवनाचा उद्देश शोधणे हे किती महत्त्वाचे असू शकते?

१६ तर मग, जीवनाच्या उद्देशाबद्दलचे सत्य शोधणे तितके महत्त्वाचे आहे का? व्हिक्टोर फ्रँकल या मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी उत्तर दिले: “जीवनाच्या अर्थाचा शोध घेणे ही मानवात प्रमुख अशी प्रबळ भावना आहे. . . . तरीही मी हे म्हणतो की, एखाद्याला अत्यंत कठीण परिस्थतीतून वाचवण्यास प्रभावीपणे मदत करू शकेल असे जगात काही नाही, जीवनाला अर्थ आहे हे ज्ञानसुद्धा.”

१७. आता आम्ही कोणते प्रश्‍न विचारण्याची गरज आहे?

१७ अशाप्रकारे, मानवी तत्त्वज्ञान आणि धर्म यांना जीवनाच्या उद्देशाबद्दल समाधानकारक विवेचन देता येत नाही तर मग ते काय असू शकेल हे पाहण्यासाठी आम्हाला कोठे जाता येईल? या प्रकरणाचे सत्य काय आहे हे समजावून सांगणारा श्रेष्ठ ज्ञानाचा एखादा उगम आहे का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४ पानांवरील चित्रं]

“दर वर्षी [ग्रेट ब्रिटन इतक्या] पृष्ठभागावरील जंगले नष्ट होत आहेत”

[५ पानांवरील चित्रं]

“मी माझ्या जीवनभर येथे का आहे हा प्रश्‍न स्वतःला विचारत आलो आहे”