व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाला भव्य उद्देश आहे

जीवनाला भव्य उद्देश आहे

भाग ५

जीवनाला भव्य उद्देश आहे

१, २. देव आमची काळजी वाहतो हे आपण कसे सांगू शकतो, आणि जीवनाच्या प्रश्‍नांबद्दल उत्तर मिळवण्यासाठी आपण कोठे जाण्यास हवे?

 ही पृथ्वी व तिजवरील जिवंत गोष्टी ज्या पद्धतीने घडवल्या गेल्या त्याद्वारे त्यांचा निर्माणकर्ता खरी काळजी वाहणारा प्रेमळ देव असल्याचे स्पष्ट करते. तो काळजी वाहतो हे त्याचे वचन, पवित्र शास्त्र देखील दाखवते. ते आपल्याला आम्ही या पृथ्वीवर का आहोत, आणि आमचे भवितव्य काय या प्रश्‍नांबद्दल शक्य असणारे सर्वोत्तम उत्तर देते.

ती उत्तरे शोधण्यासाठी आपण पवित्र शास्त्राकडे जाण्यास हवे. देवाचे वचन सांगतेः “जर तुम्ही त्याला शोधाल तर तो तुम्हाला सापडेल, परंतु तुम्ही त्याला सोडले तर तो तुम्हाला सोडील.” (२ इतिहास १५:२, पंडिता रमाबाई भाषांतर) तद्वत, देवाच्या वचनामध्ये केलेला शोध आम्हाला त्याच्या उद्देशांबद्दल काय प्रकट करतो?

देवाने मानवाची निर्मिती का केली

३. देवाने ही पृथ्वी का निर्माण केली?

देवाने खास मानवाला मनात राखून या पृथ्वीची निर्मिती केली असे पवित्र शास्त्र सांगते. यशया ४५:१८ पृथ्वीबद्दल सांगताना म्हणते की, देवाने “ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” याखेरीज, लोकांना नुसते अस्तित्व टिकवण्यासाठी नव्हे तर त्यांनी जीवनाचा पूर्णानंद घ्यावा यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल त्या सर्व गोष्टीनिशी त्याने पृथ्वीला समृद्ध केले.—उत्पत्ती अध्याय १ व.

४. देवाने पहिल्या मानवी दंपतीस का निर्माण केले?

त्याच्या वचनात, देवाने पहिले मानवी दांपत्य, आदाम व हव्वा यांना निर्माण केले अशी तो माहिती देतो व या मानवी कुटुंबाबद्दल त्याच्या मनात कोणता उद्देश होता ते तो प्रकटवितो आहे. त्याने म्हटलेः “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्‍य असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवितील.” (उत्पत्ती १:२६) मानवाने “सर्व पृथ्वीवर” व तिजवरील प्राण्यांवर देखरेख ठेवावयाची होती.

५. पहिल्या मानवी जोडीला कोठे ठेवण्यात आले होते?

देवाने मध्यपूर्वेत एका ठिकाणी एदेन म्हटलेल्या जागी एक मोठी बाग तयार केली. मग, “देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले.” ते नंदनवन होते व यात पहिल्या मानवांना खाण्यासाठी जे जे लागणार होते ते सर्व तेथे होते. त्यामध्ये “दिसण्यात सुंदर व अन्‍नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे” होती; त्याचप्रमाणे निरनिराळ्या वनस्पती आणि पुष्कळ मनोरंजक प्राणीही होते.—उत्पत्ती २:७-९, १५.

६. मानवाची कोणत्या शारीरिक व मानसिक गुणांसह निर्मिती करण्यात आली?

पहिल्या मानवी जोडीची शरीरे परिपूर्ण अशी निर्मिण्यात आली होती, त्यामुळे ते आजारी पडणार नव्हते, वृद्ध होणार नव्हते व मरणारही नव्हते. त्यांना निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि इतर गुण देण्यात आले होते. त्यांची घडण ज्या पद्धतीने करण्यात आली होती त्याबद्दल उत्पत्ती १:२७ मध्ये असे विवेचन दिले आहे: “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” आमची निर्मिती देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे झालेली असल्यामुळे आम्हाला केवळ शारीरिक व मानसिक गुणच मिळाले असे नाही, तर सोबत नैतिक व आध्यात्मिक बाजूही मिळालेली आहे; आणि आपल्याला खरे आनंदी व्हावयाचे आहे तर यांचीही पूर्ती करायला हवी. ही तशीच अन्‍न, पाणी व हवा यांचीही गरज भागवण्यासाठी देव तरतूद करणार होता. येशू ख्रिस्ताने म्हटले आहेच की, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.”—मत्तय ४:४.

७. पहिल्या जोडप्याला कोणता हुकूम देण्यात आला?

तसेच देवाने पहिल्या मानवी जोडप्याला, ते एदेनात असताना, अद्‌भुत हुकूम दिला होताः “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ती १:२८) यामुळे ते परिपूर्ण संतानाला जन्मास घालणार होते. आणि जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तसतशी एदेनातील मूळ बागेची, नंदनवनाची परिसीमा वाढवून ती सर्वत्र फैलावण्याचे आनंदी काम यांना मिळणार होते. मग, सबंध पृथ्वी नंदनवनात परिवर्तित होऊन तिजवर परिपूर्ण, आनंदी लोक भरून जाणार होते व हे सदासर्वकाळ जिवंत राहू शकले असते. हे सर्वकाही घडवून आणल्यावर, पवित्र शास्त्र म्हणते की, देवाने “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे . . . पाहिले.”—उत्पत्ती १:३१, तसेच स्तोत्रसंहिता ११८:१७ पहा.

८. मानवांनी पृथ्वीची कशी काळजी घ्यायची होती?

सत्तेखाली आणलेल्या पृथ्वीला मानवाने आपल्या लाभास्तव उपयोग करायचा होता हे स्पष्ट दिसते. पण हे त्यांनी जबाबदार पद्धतीने पूर्ण करायचे होते. पृथ्वीचे नाशकर्ते नव्हे तर, तिचे आदरणीय कारभारी असे मानवाला व्हावयाचे होते. आज आपण पृथ्वीची जी नासाडी झाल्याचे बघतो ती देवाच्या इच्छेविरुद्ध आहे; व जे त्यात सहभाग घेत आहेत ते पृथ्वीसंबंधाने असणाऱ्‍या त्याच्या उद्देशाविरूद्ध वागत आहेत. यासाठी त्यांना शिक्षा भोगावी लागेल, कारण पवित्र शास्त्र म्हणते की, देव “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करील.—प्रकटीकरण ११:१८.

देवाचा अजूनही तोच उद्देश आहे

९. देवाचा उद्देश पूर्ण होईल याबद्दल आम्हाला का आत्मविश्‍वास वाटतो?

अशाप्रकारे, परिपूर्ण मानवजातीने नंदनवनमय पृथ्वीवर सर्वदा राहावे असा देवाचा आरंभापासूनच उद्देश होता. त्याचा हाच उद्देश आजही आहे! तो उद्देश न चुकता जरूर पूर्ण होईल. पवित्र शास्त्र म्हणतेः “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] शपथ वाहून म्हणाला आहे की, ‘मी कल्पिले तसे होईलच; मी योजिले तसे घडेलच.’” “मी बोलतो तसे घडवूनही आणितो, मी योजितो ते शेवटास नेतो.”—यशया १४:२४; ४६:११.

१०, ११. येशू, पेत्र व स्तोत्रकर्ता दावीद यांनी नंदनवनाबद्दल कोणती बोलणी केली?

१० येशूने भविष्याबद्दल आशा व्यक्‍त करणाऱ्‍या एका विशिष्ट माणसासोबत बोलताना या पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करण्याच्या देवाच्या उद्देशाबद्दल म्हटले. तो म्हणालाः “तू माझ्याबरोबर सुखलोकांत असशील.” (लूक २३:४३) प्रेषित पेत्राने देखील, येणाऱ्‍या नव्या जगाबद्दल भाकीत करताना असे म्हटले की, “ज्यामध्ये नीतीमत्त्व वास करिते असे नवे आकाश [स्वर्गातून अधिपत्य गाजविणारे नवे सरकार] व नवी पृथ्वी [पृथ्वीवरील नवा समाज] ह्‍यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”—२ पेत्र ३:१३.

११ स्तोत्रकर्त्या दावीदाने देखील येणाऱ्‍या नव्या जगाबद्दल व ते कसे चिरकाल टिकेल त्याच्याबद्दल लिहिले. त्याने भाकीत केले: “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील; तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्रसंहिता ३७:२९) या कारणामुळेच येशूने हे अभिवचन दिले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.”—मत्तय ५:५.

१२, १३. देवाचा मानवजातीबद्दल कोणता उद्दात्त उद्देश आहे त्याचा सारांश सांगा.

१२ सर्व प्रकारची दुष्टाई, गुन्हेगारी, आजार, दुःख व वेदना यापासून मुक्‍त असणाऱ्‍या नंदनवनमय पृथ्वीवर अनंतकाळ जगणे, हा जीवनाचा केवढा भव्य उद्देश आहे! पवित्र शास्त्रातील शेवटल्या पुस्तकात देवाचे भविष्यवादित वचन या भव्य उद्देशाचा सारांश या घोषणेद्वारे जाहीर करतेः “‘[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’ तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: ‘पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.’ तो म्हणाला: ‘लिही, कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.’”—प्रकटीकरण २१:४, ५.

१३ होय, देवाच्या मनात उदात्त उद्देश आहे. ते धार्मिकतेचे नवे जग, चिरकालिक नंदनवन असेल. हे ज्याने भाकीत केले ते तो स्वतः घडवून देखील आणू शकतो, कारण “ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.”

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२०, २१ पानांवरील चित्रं]

मानवांनी नंदनवनमय पृथ्वीवर चिरकाल राहावे असे देवाने उद्देशिले होते. अद्याप त्याचा उद्देश तोच आहे

[२२ पानांवरील चित्रं]

घराची नासधूस करणाऱ्‍या भाडेकऱ्‍यांना मालक जाब विचारू शकतो