व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार

देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार

भाग ७

देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार

१, २. दुष्टाई व त्रास यांना संपुष्टात आणण्यासाठी देव कृती करील याबद्दल आम्ही का खात्री बाळगू शकतो?

 मानवाच्या दृष्टिकोनातून देवाने बऱ्‍याच काळाकरता अपूर्णत्व व त्रासाला अनुमती दिली आहे असे वाटत असले तरी तो अशा वाईट परिस्थितींना आता अनिश्‍चित काळापर्यंत पुढे चालू देणार नाही. या सर्व गोष्टींना घडू देण्यासाठी देवाने एक विशिष्ट काळ ठेवला आहे असे पवित्र शास्त्र सांगते.

“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो.” (उपदेशक ३:१) देवाने दुष्टता व त्रास यांना अनुमती दिल्याची त्याची वेळ संपुष्टात आली म्हणजे तो मानवी घडामोडीत हस्तक्षेप करील. तो दुष्टाई व त्रास यांचा शेवट करील आणि ही पृथ्वी परिपूर्ण, आनंदी मानवी कुटुंबांनी बहरून जावी व त्यांनी या नंदनवनातील परिस्थितीत संपूर्ण शांती व आर्थिक सुरक्षेचा लाभ घेत राहावा हा त्याचा मूळचा उद्देश तो पूर्ण करील.

देवाचे न्याय

३, ४. देवाच्या हस्तक्षेपाच्या परिणामाचे नीतीसूत्रे हे पुस्तक कसे वर्णन देते?

देवाने हस्तक्षेप केल्यावर किंवा त्याच्या न्यायाची अमलबजावणी झाल्यावर मानवी कुटुंबांना काय मिळेल याबद्दल पवित्र शास्त्रातील काही भविष्यवादांकडे लक्ष द्या:

“सरळ जनच देशात वस्ती करितील; सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल.”—नीतीसूत्रे २:२१, २२.

५, ६. देव हस्तक्षेप करील तेव्हा काय घडेल असे ३७ वे स्तोत्र सांगते?

“दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्‍वराची [यहोवा, न्यू.व.] प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल. . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्रसंहिता ३७:९-११.

“परमेश्‍वराची [यहोवा, न्यू.व.] प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्‍नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतीप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील. दुर्जनांचा वंश छाटला जाईल.”—स्तोत्रसंहिता ३७:३४, ३७, ३८.

७. देवाचे वचन कोणता सबळ सल्ला देते?

सर्वसमर्थ निर्माणकर्त्याचा आपणावर अधिपत्य करण्याचा हक्क आहे असे ओळखणाऱ्‍यांना जे अद्‌भुत भवितव्य मिळणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून बघता आम्हाला असे आर्जविण्यात आले आहेः “तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील.” खरे म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचे निवडणाऱ्‍यांना चिरकालिक जीवन देण्यात येईल! याकरताच देवाचे वचन आम्हाला असा सल्ला देते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतीसूत्रे ३:१, २, ५, ६.

देवाचे स्वर्गातून असणारे अधिपत्य

८, ९. देव कशाच्या माध्यमाने या पृथ्वीची स्वच्छता करील?

पृथ्वीची ही स्वच्छता देव, मानवजातीला आतापर्यंत लाभलेल्या सरकारापेक्षा सर्वात चांगल्या सरकाराद्वारे करील. या सरकाराद्वारे ईश्‍वरी ज्ञानच परिवर्तित होते, कारण ते स्वर्गातून देवाच्या मार्गदर्शनाने राज्य करते. ते स्वर्गीय राज्य पृथ्वीवरील हरएक मानवी अधिपत्याच्या प्रकाराला समूळ काढून टाकील. तेव्हापासून पुढे मानवाला देवापासून स्वतंत्र राहून स्वतःचे अधिपत्य करण्याचा प्रयत्न कधीही करू दिला जाणार नाही.

या बाबतीत दानीएल २:४४ येथील भविष्यवाद म्हणतो: “त्या राजांच्या अमदानीत [सध्याच्या सरकारांच्या काळात] स्वर्गीय देव एका राज्याची [स्वर्गात] स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही, त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही [मानवाला पुन्हा देवापासून स्वतंत्र असा कारभार करण्याची अनुमती केव्हाही दिली जाणार नाही], तर ते [सध्या अस्तित्वात असणाऱ्‍या] या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—तसेच प्रकटीकरण १९:११-२१; २०:४-६ हे देखील पाहा.

१०. देवाच्या स्वर्गीय राज्याच्या अधिपत्याखाली राहात असताना अधिपत्याच्या बाबतीत कधीही भ्रष्टता उत्पन्‍न होणार नाही याबद्दल आपल्याला खात्री का राहू शकते?

१० अशाप्रकारे, मानवजातीवर पुन्हा कधी भ्रष्ट स्वरुपातील अधिपत्य नसणार, कारण देव या व्यवस्थेचा अंत करील तेव्हा देवापासून स्वतंत्र असणारे मानवी अधिपत्य तेथून पुढे अस्तित्वातच नसणार. जे राज्य स्वर्गातून चालवण्यात येणार ते भ्रष्ट असणार नाही, कारण देव स्वतः त्या राज्याचा मूळ व संरक्षणकर्ता आहे. उलटपक्षी, त्याची कार्यवाही मानवी प्रजेची सर्वोत्तम रीतीने काळजी घेण्यासाठी करण्यात येईल. तेव्हापासून पुढे, जसे स्वर्गात तसे या पृथ्वीभर देवाचीच इच्छा पूर्ण होत राहील. या कारणामुळेच येशूने आपल्या शिष्यांना अशी प्रार्थना करण्याचे शिकवले: “तुझे राज्य येवो; जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”—मत्तय ६:१०.

आपण किती जवळ आलो आहोत?

११. या व्यवस्थेच्या अंताच्या आम्ही किती जवळ आलो आहे हे पाहण्यासाठी पवित्र शास्त्रात आपल्याला कोठे भविष्यवाद आढळतात?

११ या असमाधानी व्यवस्थेच्या अंताच्या आणि देवाच्या नव्या जगाच्या आरंभाच्या आपण केवढे जवळ आलो आहोत? याचे उत्तर पवित्र शास्त्रातील भविष्यवाद अगदी स्पष्टपणे आम्हाला देतो. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र ज्याला “व्यवस्थीकरणाची समाप्ती” असे म्हणते त्याबद्दल आपली भूमिका कोणती ठेवावी व काय बघावे यासाठी येशूने स्वतः भाकीत केले आहे. त्याचे लिखाण मत्तयाच्या २४ व २५वा अध्याय, मार्कचा १३वा अध्याय व लूकच्या २१व्या अध्यायात करण्यात आले आहे. याचप्रमाणे तीमथ्याला दुसरे पत्र ३ऱ्‍या अध्यायात लिखित असल्याप्रमाणे पौलाने “शेवटला काळ” म्हटलेला कालावधी असेल असे भाकीत केले, तेव्हा घडत असलेल्या विविध घटनांद्वारे आपण काळाच्या ओघात कोठे आहोत हे समजू शकेल.

१२, १३. शेवटल्या काळाबद्दल येशू व पौल यांनी काय सांगितले?

१२ हा विशिष्ट कालावधी या घटनांनी सुरु होईल असे येशूने म्हटलेः “राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील.” (मत्तय २४:७) त्याने “जागोजागी मऱ्‍या होतील,” असे म्हटल्याचे लूक २१:११ सांगते. तसेच “अनीती वाढेल” असाही त्याने इशारा दिला.—मत्तय २४:१२.

१३ प्रेषित पौलाने असे भाकीत केले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र [“बेईमानी,” न्यू.व.], ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी . . . होतील. . . . दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.”—२ तीमथ्य ३:१-५, १३.

१४, १५. या २०व्या शतकातील घटना, आम्ही खरोखरीच शेवटल्या दिवसात जगत असल्याची कशी पुष्टी देत आहेत?

१४ येशू व पौलाने भाकीत केलेल्या गोष्टी आमच्या काळात घडल्या आहेत का? होय, त्या निश्‍चितपणे घडल्या आहेत. पहिले जागतिक महायुद्ध ते त्या काळाचे अत्यंत मोठे व अत्यंत वाईट असे होते. ते पहिलेच जागतिक युद्ध होते व त्याने आधुनिक इतिहासाला वळण दिले होते. या युद्धासोबतच पुढे अन्‍नटंचाई, आजारांची पीडा व इतर विपत्ती आल्या. येशूने म्हटले तशा १९१४च्या पुढे घडलेल्या घटना “वेदनांचा प्रारंभ” होत्या. (मत्तय २४:८) त्यांनी “शेवटला काळ” या भाकीत केलेल्या काळाची सुरवात केली, शेवटल्या पिढीची सुरवात, जोपर्यंत देव दुष्टाई व त्रास यांना अनुमती देणार होता.

१५ या २०व्या शतकातील घटनांशी तुम्ही बहुधा परिचित असाल. जो गोंधळ उठलेला आहे त्याची तुम्हास कदाचित कल्पना असेल. युद्धात साधारण दहा कोटी लोक ठार झाले आहेत. इतर कोटी लोक उपासमार व आजारामुळे मृत्यूमुखी पडले. भूकंपाने देखील बरेच बळी घेतले. जीवन व मालमत्ता याबद्दलचा अनादर वाढत चालला आहे. गुन्हेगारीची भीती तर काही ठिकाणी दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. नैतिक दर्जांना धाब्यावर बसवले जात आहेत. लोकसंख्येचा स्फोट होण्याची समस्या अद्याप हाताळली गेली नाही. प्रदूषण जीवनाच्या दर्जाला बिघडवून टाकत आहे आणि ते धोक्यात आणत आहे. खरेच, आपण १९१४ पासून शेवटल्या काळात राहात आहोत आणि आमच्या काळाशी संबंधित असलेल्या पवित्र शास्त्र भविष्यवादांच्या समाप्तीला आलो आहोत.

१६. शेवटल्या दिवसांचा कालावधी कोठवर जातो?

१६ या शेवटल्या दिवसांचा कालावधी किती लांब असल्याचे सिद्ध होईल? १९१४ पासून पुढे “वेदनांचा आरंभ” अनुभवणाऱ्‍या त्या युगाबद्दल येशूने असे म्हटले: “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:८, ३४-३६) अशाप्रकारे, शेवटल्या दिवसात घडणाऱ्‍या सर्व घटना एका पिढीच्या, १९१४च्या पिढीच्या वयोमानात घडल्या पाहिजेत. त्यामुळे १९१४ मध्ये जिवंत असणारे काही लोक हे व्यवस्थीकरण संपुष्टात येईल तेव्हाही जिवंत राहतील. ती पिढी आता खूप वयोवृद्ध झाली आहे व ते ही सुचवते की, देवाने या सद्य व्यवस्थेचा अंत करण्यासाठी आता अधिक काळ राहिलेला नाही.

१७, १८. आम्ही या जगाच्या शेवटाच्या अगदी जवळ आलो आहोत हे कोणता भविष्यवाद दाखवतो?

१७ या व्यवस्थीकरणाचा अंत अगदी जवळ आलेला आहे हे दाखवण्यासाठी प्रेषित पौलाने सुद्धा एक भविष्यवाद केला. त्याने म्हटले: “जसा रात्री चोर येतो तसा प्रभूचा [यहोवा, न्यू.व.] दिवस येतो. ‘शांती आहे, निर्भय आहे,’ असे ते म्हणतात तेव्हा . . .  त्यांचा अकस्मात्‌ नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३; तसेच लूक २१:३४, ३५ पहा.

१८ आता शीत युद्ध संपले आहे आणि आंतरराष्ट्रीय युद्ध इतकी दहशत बसवणार नाही. तेव्हा राष्ट्रांना वाटेल की, ते आता नव्या जगाच्या व्यवस्थेकडे जात आहेत. आणि जेव्हा त्यांना वाटेल की, आपले प्रयत्न यशस्वी होत आहेत तेव्हा नेमके विरुद्धच घडेल; कारण ते देवाकडील या व्यवस्थीकरणाचा नाश आता त्वरित होणार आहे याचा तो शेवटला संकेत असेल. राजकारणी वाटाघाटी व तह लोकात खरा बदल घडवून आणीत नाहीत हे लक्षात घ्या. ते लोकांना एकमेकांवर प्रेम करणारे बनवत नाही. शिवाय जागतिक नेते गुन्ह्‌यांना थोपवू शकत नाहीत, आणि त्यांना आजार व मृत्यू काढून टाकता येत नाही. या कारणामुळे मानवी शांती व निर्भयतेच्या बाबतीत ज्या घडामोडी होतील त्यावर आपला भाव ठेवू नका आणि असे समजू नका की, जग हे आपल्या समस्या सोडवण्याच्या मार्गाला लागले आहे. (स्तोत्रसंहिता १४६:३) शांती व निर्भयतेच्या ओरडीचा खरा अर्थ हा होईल की, हे जग त्याच्या अंताला आले आहे.

सुवार्तेचा प्रचार करणे

१९, २०. शेवटल्या काळी होणाऱ्‍या सुवार्ता प्रचाराचा समावेश कोणत्या भविष्यवादाची पूर्णता होत असल्याचे आपल्याला बघायला मिळते?

१९ आपण १९१४ पासून शेवटल्या काळात जगत आहोत हे येशूचा आणखी एक भविष्यवाद दाखवतो. त्यात म्हटले आहे: “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) किंवा मत्तय २४:१४ मध्ये सांगितल्यानुसार, “सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.”

२० इतिहासात पूर्वी कधीही नव्हते तितक्या अधिक प्रमाणात आज, या जगाच्या अंताची आणि देवाच्या राज्याखाली येत असलेल्या नंदनवनमय नव्या जगाची सुवार्ता सबंध पृथ्वीवर गाजविली जात आहे. कोणाद्वारे? लाखो यहोवाच्या साक्षीदारांद्वारे. ते पृथ्वीच्या प्रत्येक देशात सुवार्तेची घोषणा करीत आहेत.

२१, २२. यहोवाच्या साक्षीदारांची खरे ख्रिस्ती या नात्याने कशामुळे खास ओळख मिळते?

२१ देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासोबत यहोवाचे साक्षीदार अशा प्रकारातील स्वतःची वागणूक ठेवीत आहेत जी त्यांची ओळख ख्रिस्ताचे खरे अनुयायी असल्याचे देत आहे, कारण त्याने असे म्हटले होते: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” अशाप्रकारे, यहोवाचे साक्षीदार प्रीतीच्या अतूट बंधनाद्वारे गोलार्धव्याप्त बंधुवर्गात बांधले गेले आहेत व ते ऐक्याने राहात आहेत.—योहान १३:३५; तसेच यशया २:२-४; कलस्सैकर ३:१४; योहान १५:१२-१४; १ योहान ३:१०-१२; ४:२०, २१; प्रकटीकरण ७:९, १० पहा.

२२ यहोवाच्या साक्षीदारांचा, पवित्र शास्त्र शिकवते त्याप्रमाणे असा विश्‍वास आहे की: “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) सर्व राष्ट्रात असणारे आपले सह-साक्षीदार कोणत्याही वंशाचे किंवा वर्णाचे असले तरी ते आपले आध्यात्मिक भाऊ-बहिणी आहेत असे ते मानतात. (मत्तय २३:८) अशाप्रकारचे हे गोलार्धव्याप्त बंधुत्व आज जगभर अस्तित्वात आहे हा देवाचे उद्देश लवकरच पूर्ण होईल याचा दृश्‍य पुरावा आहे.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्रं]

देवाचे परिपूर्ण स्वर्गीय राज्य हे नव्या जगात मानवजातीवरील एकमेव अधिपत्य असेल