नंदनवनमय पृथ्वीवर चिरकाल जगा
भाग ८
नंदनवनमय पृथ्वीवर चिरकाल जगा
१, २. देवराज्याच्या अधिपत्यामध्ये जीवन कसे असणार?
देवाने पृथ्वीवरून दुष्टाई व त्रास काढून टाकून त्याच्या स्वर्गीय राज्याच्या प्रेमळ अधिपत्याखाली त्याचे नवे जग आणल्यावर तेव्हाचे जीवन कसे असेल? देव ‘आपली मूठ उघडून सर्व प्राण्यांची इच्छा तृप्त’ करण्याचे अभिवचन देतो.—स्तोत्रसंहिता १४५:१६.
२ तुमच्या रास्त इच्छा कोणत्या आहेत? एक आनंदी जीवन असावे; करायला योग्य काम असावे; भौतिक समृद्धता असावी; सभोवतालचा परिसर रम्य असावा; सर्व लोकांत शांती राहावी; आणि अन्याय, आजार, त्रास व मृत्यू यापासून सुटका मिळावी हीच नाही का? आणि आनंदी आध्यात्मिक दृष्टिकोनाबद्दल काय? या सर्व गोष्टींची पूर्तता लवकरच देवाच्या राज्याच्या अधिपत्याखाली करण्यात येईल. त्या नव्या जगात मिळणाऱ्या आशीर्वादाबद्दल पवित्र शास्त्रातील भविष्यवाद काय माहिती देतात त्याकडे लक्ष द्या.
संपूर्ण शांतीत असलेली मानवजात
३-६. नव्या जगात लोकांना शांती मिळेल याबद्दल आम्हाजवळ कोणती आश्वासने आहेत?
३ “[देव] दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; [युद्ध] रथ अग्नीत जाळून टाकितो.”—स्तोत्रसंहिता ४६:९.
४ “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४.
५ “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्रसंहिता ३७:११.
६ “सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे, लोक गाण्याचा गजर करीत आहेत.”—यशया १४:७.
मानव व पशु शांतीसंबंधात
७, ८. लोक व जनावरे यात कोणते शांतीसंबंध राहतील?
७ “लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरूण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांस लहान मूल वळील. गाय व अस्वल यांचे बच्चे एकत्र बसतील; सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत.”—यशया ११:६-९.
८ “त्या दिवशी . . . मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव यांबरोबर करार करीन. . . . ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.”—होशेय २:१८.
परिपूर्ण आरोग्य, सार्वकालिक जीवन
९-१४. नव्या जगात आरोग्य कसे असेल त्याची माहिती द्या.
९ “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील. मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३५:५, ६.
१० “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील. ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”—प्रकटीकरण २१:४.
११ “‘मी रोगी आहे,’ असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.
१२ “त्याचे शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात.”—ईयोब ३३:२५.
१३ “देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोमकर ६:२३.
१४ “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो . . . त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त [होईल].”—योहान ३:१६.
मृतांना परत जीवन मिळते
१५-१७. जे आधीच वारलेले आहेत अशांसाठी कोणती आशा आहे?
१५ “नीतीमानांचे व अनीतीमानांचे पुनरुत्थान होईल.”—प्रे. कृत्ये २४:१५.
१६ “कबरेतील [“स्मृती कबरेतील,” न्यू.व. (देवाच्या स्मरणातील)] सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.
१७ “समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यु व अधोलोक [“हेडीज,” न्यू.व. (कबर)] ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले.”—प्रकटीकरण २०:१३.
नंदनवनाची समृद्धता असलेली पृथ्वी
१८-२२. सबंध पृथ्वीचे रुपांतर कशामध्ये होईल?
१८ “मंगलदायक वृष्टि होईल. मळ्यातील झाडे फलद्रूप होतील, भूमि आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील.”—यहेज्केल ३४:२६, २७.
१९ “भूमी आपला उपज खचितच देईल; देव, आमचा देव आम्हाला आशीर्वाद देईल.”—स्तोत्रसंहिता ६७:६, न्यू.व.
२० “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमळाप्रमाणे फुलेल.”—यशया ३५:१.
२१ “पर्वत व टेकड्या तुम्हांपुढे जयघोष करितील; वनातील सर्व वृक्षे टाळ्या वाजवितील. कांटेऱ्याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल.”—यशया ५५:१२, १३.
२२ “तू मजबरोबर सुखलोकात असशील.”—लूक २३:४३.
सर्वांसाठी साजेशी घरे
२३, २४. सर्वांसाठी साजेशी व पुरेशी घरे असतील याबद्दल आम्हाला कोणती खात्री आहे?
२३ “ते घरे बांधून त्यात राहतील . . . ते घरे बांधतील व त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील व फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही. . . . माझे निवडलेले आपल्या हातच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत.”—यशया ६५:२१-२३.
२४ “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.
तुम्हाला नंदनवनात चिरकाल जगता येईल
२५. आपल्याला भविष्यासंबंधाने कोणता अद्भुत दृष्टिकोन आहे?
२५ भविष्याबद्दल हा केवढा अद्भुत दृष्टिकोन! देवाच्या नव्या जगात सध्याच्या सर्व समस्या कायमच्या गतकाळात गेलेल्या असतील या बळकट आशेमध्ये आपला विश्वास रोवून आमचे आजचे जीवन देखील केवढ्या खऱ्या उद्देशाने ओतप्रोत भरलेले राहणार! “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत; त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यशया ६५:१७) शिवाय, तेव्हा जीवन चिरकालचे असेल हे जाणणे देखील किती समाधानदायक आहे: “[देव] मरणाला कायमचे गिळून टाकील.”—यशया २५:८, सुबोध भाषांतर.
२६. देवाच्या नव्या जगात सर्वकाळासाठी जिवंत राहण्याची किल्ली कोणती आहे?
२६ इतक्या जवळ आलेल्या नंदनवनमय नव्या पृथ्वीवर चिरकाल जगण्याची तुमची इच्छा आहे का? ‘जगाचा अंत होताना मला देवाची मर्जी लाभावी आणि नव्या जगात जिवंत राहावे यासाठी मी काय करण्याची गरज आहे?’ असे तुम्ही विचाराल. येशूने देवाला केलेल्या प्रार्थनेत जे उद्गार काढले, त्याप्रमाणेच तुम्ही करण्याची गरज आहे की, “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान त्यांनी मिळवावे.”—योहान १७:३, न्यू.व.
२७. देवाच्या उद्देशात सहभागी होण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे?
२७ यास्तव, एक पवित्र शास्त्र घ्या आणि या माहितीपत्रकात तुम्ही जे काही वाचले आहे ते तसेच आहे का याची खात्री करून घ्या. ही पवित्र शास्त्रीय सत्ये जे अभ्यासतात व शिकवतात त्यांना शोधून काढा. जे पवित्र शास्त्राच्याविरहीत शिक्षण देतात व तशी कर्मे आचरतात अशा दांभिक धर्मांपासून मोकळे व्हा. मानवाने नंदनवनमय पृथ्वीवर चिरकाल जिवंत राहावे या देवाच्या उद्देशात तुम्ही देवाची इच्छा आचरणाऱ्या इतर लाखो लोकांसमवेत कसे सहभागी होऊ शकता त्याचे शिक्षण घ्या. तसेच देवाचे प्रेरित वचन अगदी जवळच्या भवितव्याबद्दल जे जाहीर करते तो उपदेश आपल्या अंतःकरणी लावाः “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.
[अभ्यासाचे प्रश्न]
[३१ पानांवरील चित्रं]
पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करावी हा देवाचा उद्देश लवकरच साकार होईल