व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वकाळ जिवंत राहणे शक्य असते तर तुम्ही हे जीवन निवडले असते का?

सर्वकाळ जिवंत राहणे शक्य असते तर तुम्ही हे जीवन निवडले असते का?

सर्वकाळ जिवंत राहणे शक्य असते तर तुम्ही हे जीवन निवडले असते का?

या माहितीपत्रकात स्पष्ट केल्याप्रमाणे पृथ्वीवर एका नंदनवनात सर्वकाळ जगणे खरोखरच शक्य आहे. या पृथ्वीवर अशी परिस्थिती आणण्याचा देवाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही! पण तुम्हाला सर्वकाळ जगायचे असेल, तर तुम्हाला हे जीवन निवडावे  लागेल.

येशू ख्रिस्ताने शिकवले की ही निवड देवाविषयीच्या अचूक ज्ञानाच्या आधारावर केली पाहिजे. हे ज्ञान मिळवण्यास साहाय्य करण्यासाठीच हे माहितीपत्रक तुम्हाला देण्यात आले होते. यासंदर्भात आणखी साहाय्य तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांकडून मिळवता येईल. तुमच्या सोयीच्या वेळी व ठिकाणी येऊन तुमची भेट घेण्यास त्यांना आनंद वाटेल. आणि जर तुम्हाला विनामुल्य गृह बायबल अभ्यास करण्याची इच्छा असेल, तर खालीलपैकी योग्य पत्त्यावर तुम्ही हे यहोवाच्या साक्षीदारांना लिहून कळवू शकता.