व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १—घरातले रणांगण: कौटुंबिक सदस्यांबरोबरील व्यवहार

भाग १—घरातले रणांगण: कौटुंबिक सदस्यांबरोबरील व्यवहार

भाग १

घरातले रणांगण: कौटुंबिक सदस्यांबरोबरील व्यवहार

“सुंदर माझं घर.” या सुपरिचित म्हणीतून व्यक्‍त होणारी भावना आजकाल अगदीच नामशेष झाल्यासारखी वाटते. अंतहीन कौटुंबिक झगड्यांमुळे अनेक घरकूल रणक्षेत्रांत परिवर्तित होत असल्याचे शाबीत होत आहे. तसेच दळणवळणातील दरा पुष्कळदा तह निर्माण करण्याच्या सर्व प्रयत्नांना फोल ठरवतो.

तुमचे घर शत्रुत्वाची आडी असण्याऐवजी शांतिमय घरकूल असावे असे तुम्हाला वाटते का? हे खरे की, कुटुंबातील इतर सदस्यांनी आपापली भूमिका पार पाडली पाहिजे. परंतु, काही बायबल तत्त्वांची उत्तम समज प्राप्त केल्याने घरातल्या शांतीला हातभार लावण्याकरता तुम्हीही पुष्कळ काही करू शकता.