मला खिन्नता का वाटते?
अध्याय १३
मला खिन्नता का वाटते?
मेलॉनी, उत्कृष्ट मुलगी असण्याच्या आपल्या आईच्या कल्पनेनुसार नेहमी वागायची—पण फक्त १७ वर्षांची होईपर्यंतच. मग शाळेतल्या कार्यहालचालींत भाग घेण्याचे तिने सोडून दिले, पार्ट्यांची निमंत्रणे नाकारू लागली व वर्गातील तिचा प्रथम श्रेणीतील क्रमांक तृतीय श्रेणीपर्यंत घसरल्याची तिला पर्वा देखील नव्हती. काय झाले असे तिच्या पालकांनी तिला प्रेमाने विचारल्यावर ती खेकसून म्हणाली, “मला एकटं राहू द्या! काहीही झालेलं नाही.”
मार्क १४ वर्षांचा असताना लहरी आणि वैमनस्य राखणारा व तापट स्वभावाचा होता. शाळेत तो उपद्रवी आणि एकमेकांमध्ये भांडणे लावणारा होता. चिडल्यावर किंवा रागाचा पारा चढल्यावर, तो वाळवंटातून भरधाव वेगाने मोटारसायकल चालवायचा किंवा पर्वतांच्या उभ्या कडांवरून त्याच्या स्केटबोर्डने वेगात जायचा.
मेलॉनी आणि मार्क हे दोघेही सारख्याच विकाराच्या, म्हणजेच अवसादाच्या प्रकारांनी ग्रासलेले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थचे डॉ. डॉनल्ड मॅकन्यू म्हणतात, की १० ते १५ टक्के शालेय मुलांना मनोविकार होऊ शकतात. त्यांच्यातील काही जणांना तीव्र अवसाद होतो.
काहीवेळा, या समस्येला जैविक आधार असतो. काही संसर्ग किंवा अंतःस्रावी ग्रंथीशी संबंधित रोग, मासिक पाळीदरम्यान होणारे प्रवर्तकांचे बदल, रक्तशर्करान्यूनता, विशिष्ट औषधे, विषारी धातू किंवा रसायनांशी संपर्क, ॲलर्जीमुळे होणाऱ्या प्रतिक्रिया, असंतुलित आहार, रक्तक्षय—या सर्वांमुळे खिन्नता होऊ शकते.
खिन्नतेच्या मुळाशी असलेले तणाव
तथापि, किशोरावस्थेचा काळच बहुधा भावनिक ताणतणावाचा स्रोत असतो. जीवनातील चढउतार हाताळण्यात प्रौढाप्रमाणे अनुभव नसल्यामुळे, युवकाला असे वाटू शकते की त्याची कोणालाच चिंता नाही व तो तुलनात्मकरित्या लहानसहान गोष्टींमुळे अतिशय खिन्न होऊ शकतो.
पालक, शिक्षक किंवा मित्रमैत्रिणींच्या अपेक्षा पूर्ण करण्यास उणे
पडणे हे विषण्णतेचे आणखी एक कारण आहे. उदाहरणार्थ, डॉनल्डला असे वाटले की आपल्या सुशिक्षित पालकांना संतुष्ट करण्यासाठी त्याला शाळेत इतरांपेक्षा हुशार असणे आवश्यक होते. तसे करू न शकल्यामुळे तो खिन्न झाला व आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागला. “मी आजवर एकही गोष्ट नीट केलेली नाही. मी नेहमीच सर्वांना निराश केलंय,” असे डॉनल्ड खेदाने म्हणाला.अपयशाची भावना खिन्नता निर्माण करू शकते हे एपफ्रदीत नामक एका पुरुषाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. पहिल्या शतकात, या विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीला, तुरुंगात असणाऱ्या प्रेषित पौलाची मदत करण्याच्या खास कामगिरीवर पाठवण्यात आले होते. पण पौलाजवळ पोहंचताच तो आजारी पडला—आणि उलट पौलालाच त्याची काळजी घ्यावी लागली. तर मग, एपफ्रदीताला उणे पडल्यासारखे का वाटले असावे आणि तो “चिंताक्रांत” का झाला असावा याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आजारी पडण्याआधी त्याने जी सर्व चांगली कृत्ये केली होती त्यांकडे त्याने दुर्लक्ष केले हे स्पष्ट आहे.—फिलिप्पैकर २:२५-३०.
गमावल्याची भावना
लहान वयातच मरण—युवक आणि आत्महत्या (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात फ्रॅन्सीन क्लॅग्सब्रुन यांनी असे लिहिले: “मानसिकतेमुळे परिणीत झालेल्या खिन्नतेच्या मुळाशी अत्यंत प्रिय व्यक्ती अथवा गोष्ट गमावल्याची तीव्र भावना असते.” म्हणून, मृत्यू किंवा घटस्फोटामुळे एखादा पालक गमावणे, नोकरी किंवा करियर गमावणे, अथवा एखाद्याचे शारीरिक स्वास्थ्य गमावणे या गोष्टी देखील खिन्नतेच्या मुळाशी असू शकतात.
परंतु, प्रेमाची उणीव, अप्रिय असण्याची आणि काळजी न घेतली
जाण्याची भावना एखाद्या तरुणाकरता उद्ध्वस्त करणारा तोटा असतो. “माझी आई आम्हाला सोडून गेली तेव्हा मला दगा दिल्यासारखं आणि एकटंएकटं वाटलं,” असे सीमा नावाच्या तरुण स्त्रीने प्रकट केले. “अचानक माझं जग पूर्णपणे विस्कळीत असल्यासारखं वाटू लागलं.”तर मग, घटस्फोट, मद्यासक्ती, गोत्रगमन, पत्नीला मारहाण, मुलांवर अत्याचार किंवा स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेल्या पालकाकडून नुसते झिडकारले जाणे अशा कौटुंबिक समस्यांना तोंड देणारे युवक कसे बावरलेले असतात किंवा दुःखी असतात त्याची कल्पना करा. बायबलचे नीतिसूत्र किती खरे ठरते: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ति [त्याचप्रमाणे खिन्नतेचा प्रतिकार करणारी कुवत] अल्प होय”! (नीतिसूत्रे २४:१०) एखादा युवक आपल्या कुटुंबातल्या समस्यांकरता स्वतःला दोषी ठरवण्याची चूक देखील करील.
लक्षणे ओळखणे
अवसादाचे वेगवेगळे प्रमाण आहेत. एखादी तरुण व्यक्ती अस्वस्थ करणाऱ्या घटनेमुळे तात्पुरती निरुत्साहित होऊ शकते. पण बहुधा अशी खिन्नता तुलनात्मकपणे अल्पावधीतच नाहीशी होते.
तथापि, ही खिन्न मनोदशा तशीच राहिली आणि त्या युवकाला सर्वसामान्यपणे पाहिल्यास नकारात्मक भावना व त्यासोबतच निरुपयोगीपणाच्या भावना, चिंता व राग येत असला तर डॉक्टर ज्यास नीचतम चिरकालीन अवसाद म्हणतात तो निर्माण होऊ शकतो. मार्क आणि मेलॉनी यांचे अनुभव (सुरवातीला उल्लेखिलेले) दाखवतात त्यानुसार लक्षणांमध्ये पुष्कळ फरक असू शकतो. एखादा तरुण अधूनमधून चिंताग्रस्त होऊ शकतो. तर दुसऱ्याला नेहमीच थकल्यासारखे वाटत असेल, भूक लागत नसेल, झोप लागत नसेल, त्याचे वजन घटेल किंवा अनेक दुर्दैवी घटना त्याच्यावर येत असतील.
काही युवक मौजमजा करण्यात गर्क होऊन खिन्नता लपवण्याचा प्रयत्न करतात: जसे की, अंतहीन पार्ट्या, लैंगिक स्वैराचार, विध्वंस, अमर्याद मद्यपान आणि अशाच इतर गोष्टी. “मी नेहमीच बाहेर का जातो हे माझं मलाच नीतिसूत्रे १४:१३.
कळत नाही,” असे १४ वर्षांचा एक मुलगा कबूल करतो. “मला एवढंच कळतं, की मी एकटा असलो तर माझी उदासीनता मला जाणवते.” हे अगदी बायबलच्या वर्णनानुसार आहे: “हसताना देखील हृदय खिन्न असते.”—समस्या निराशेपलीकडे जाते तेव्हा
नीचतम चिरकालीन अवसादावर उपचार न केल्यास, आणखी गंभीर विकार होऊ शकतो—तीव्र अवसाद. (पाहा पृष्ठ १०७.) “मी एखादी ‘मृत’ व्यक्ती आहे असं मला नेहमीच वाटायचं,” असे स्पष्टीकरण तीव्र अवसाद अनुभवलेली सीमा देते. “मला काही भावनाच नव्हत्या. एक विचित्र भीती मनात घर करून बसली होती.” तीव्र अवसाद असताना ही उदास मनोदशा कमी न होता कित्येक महिन्यांपर्यंत राहू शकते. परिणामस्वरूप, अशाप्रकारची ही खिन्नता किशोरवयीन आत्महत्या प्रकरणांतील सर्वसामान्य कारण बनते—आता, यास अनेक देशांमध्ये “दृष्टीआड असलेली साथ” असे मानले जाते.
तीव्र अवसादासोबत संबंधित असलेली सतत जाणवणारी—आणि सर्वात घातक भावना म्हणजे आशाहीनतेची तीव्र भावना. तीव्र अवसाद असलेल्या १४ वर्षांच्या विव्यन नामक एका मुलीबद्दल प्राध्यापक जॉन इ. मॅक लिहितात. वरवर पाहिल्यास, तिला काहीच समस्या नाहीत व तिचे पालक काळजी घेणारे आहेत असे वाटायचे. तरीही, निराशा अनावर झाल्यामुळे तिने स्वतःला फास लावून घेतला! प्राध्यापक मॅक यांनी लिहिले: “आपली खिन्नता
दूर होईल व दुःखातून मुक्तता मिळण्याची सरतेशेवटी आपल्याला आशा आहे असे आधीच ओळखून घेण्यास असमर्थ ठरण्याच्या मुख्य कारणामुळेच विव्यनने जीव देण्याचा निर्णय घेतला.”अशाप्रकारे, तीव्र अवसादाने ग्रासलेल्यांना वाटते की ते कधीच त्यातून बाहेर येणार नाहीत; त्यांच्यासाठी उद्याचा दिवस हा उजाडणारच नाही. तज्ज्ञांच्या मते, अशी ही आशाहीनता बहुतेकवेळा आत्महत्येच्या वृत्तीत परिणीत होते.
परंतु, आत्महत्या हे त्याचे उत्तर नाही. सीमा जिचे जीवन वास्तविक दुःस्वप्न बनले होते ती म्हणते: “आत्महत्येचे विचार तर माझ्या मनात आलेच. पण मी जाणून घेतलं की जोपर्यंत मी जीव देत नाही तोपर्यंत माझ्यासमोर आशा आहे.” खरेच, सर्वकाही संपुष्टात आणल्याने कोणतीच समस्या सुटत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी, की निराशेला तोंड द्यावे लागते तेव्हा, युवकांना पर्यायांची किंवा अनुकूल परिणाम असलेल्या संभावनेची कल्पना देखील करता येत नाही. म्हणून, सीमाने स्वतःच्या शरीरात हेरॉईन अंतःक्षेपित करून तिची अडचण लपवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली: “मला पुष्कळ आत्मविश्वास वाटायचा—पण त्या अंमली पदार्थाचा परिणाम असेपर्यंतच.”
लहान मोठ्या दुखण्यांना तोंड देणे
खिन्नतेच्या भावनांना तोंड देण्याचे सुज्ञ प्रकार आहेत. “काही लोक उपाशी राहिल्यामुळे खिन्न होतात,” असे निरीक्षण न्यूयॉर्क येथील डॉ. नेथन एस. क्लाईन या अवसाद विशेषज्ञांनी केले. “एखादी व्यक्ती न्याहारी करणार
नाही आणि काही कारणामुळे दुपारचे जेवणसुद्धा करणार नाही. मग तीन वाजण्याच्या सुमारास, आपल्याला असं विचित्र का वाटतंय हे तिला कळेनासे होते.”तुम्ही जे काही खाता त्यामुळेही मोठा फरक पडू शकतो. निराशेच्या भावनांनी ग्रस्त असलेल्या डेबी नामक तरुणीने कबूल केले: “निकस अन्न माझ्या मनःस्थितीकरता इतकं अपायकारक होतं हे मला कधी जाणवलंच नाही. मी ते खूप खायचे. आता मी पाहते की गोड पदार्थ कमी खाल्ले की मला बरं वाटतं.” इतर उपयोगी ठरणारी पावले: एखाद्या विशिष्ट प्रकारच्या व्यायामामुळे तुम्ही कदाचित प्रसन्न व्हाल. काही बाबतीत, वैद्यकीय तपासणी करणे योग्य असेल कारण अवसाद शारीरिक आजारपणाचे लक्षण असू शकतो.
मनाची लढाई जिंकणे
बहुतेकवेळा, स्वतःविषयी नकारात्मक विचार बाळगल्याने खिन्नता ओढवली जाते अथवा अधिक बिकट केली जाते. “जेव्हा अनेक लोक टीका करतात तेव्हा आपलं काहीच मूल्य नाही असं वाटू लागतं,” असे १८ वर्षांची इवलीन दुःखाने म्हणते.
विचार करा: व्यक्ती या नात्याने तुमचे किती मूल्य आहे हे लोकांनी ठरवायचे असते का? अशाचप्रकारे, ख्रिस्ती प्रेषित पौलाचाही उपहास करण्यात आला होता. काहीजण म्हणाले की तो दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे. यामुळे पौलाला निरुपयोगी असल्याचे वाटले का? मुळीच नाही! देवाच्या दर्जानुरूप असणे महत्त्वाचे आहे हे पौलाला ठाऊक होते. देवाच्या मदतीने त्याने २ करिंथकर १०:७, १०, १७, १८.
जे काही साध्य केले होते त्याचा त्याला अभिमान वाटत होता—मग इतरजण त्याच्याविषयी काहीही बोलत असले तरीही. तुम्ही देखील स्वतःला याची आठवण करून दिली की देवाच्या मापदंडांनुसार तुम्ही चांगली व्यक्ती आहात तर ही उदास मनोदशा बहुधा नाहीशी होईल.—पण तुमच्या एखाद्या कमकुवतपणामुळे किंवा तुम्ही केलेल्या पापामुळे तुम्ही खिन्न असल्यास काय? देवाने इस्राएलास सांगितले, “तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील.” (यशया १:१८) आपल्या स्वर्गीय पित्याची प्रेमळ दया आणि सहनशीलता यांस आपण कधीच दृष्टीआड होऊ देऊ नये. (स्तोत्र १०३:८-१४) परंतु, तुमच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही यत्न देखील करत आहात का? तुमच्या मनातून दोषी भावना घालवण्यासाठी तुम्ही तुमची भूमिका पार पाडलीच पाहिजे. नीतिसूत्र म्हणते त्यानुसार: “जो [आपले दोष] कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.”—नीतिसूत्रे २८:१३.
निराशेला तोंड देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, स्वतःकरता वास्तविक ध्येये राखणे. यशस्वी होण्याकरता तुम्हाला वर्गात सर्वप्रथम असण्याची गरज नाही. (उपदेशक ७:१६-१८) निराशा, जीवनाचा भाग आहे ही वास्तविकता स्वीकारा. त्या निर्माण होतात तेव्हा, ‘मला काय होतं याची कोणालाही काळजी नाही आणि नसणारही,’ असे वाटून घेण्याऐवजी ‘मी यावर मात करीन’ असे स्वतःला म्हणा. तसेच मनसोक्त रडण्यात काहीच वावगे नाही.
साध्यतेचे मूल्य
“निराशा ही आपोआप जात नाही,” असे डॉफ्ने सांगते, जी निरुत्साहाच्या स्थितीत यशस्वीपणे तग धरून राहिली. “तुम्हाला भिन्न दृष्टिकोनातून विचार करावा लागतो किंवा शारीरिकरित्या कशात न कशात गुंतून जावं लागतं. काहीतरी काम सुरु करावं लागतं.” आशाचे उदाहरण घ्या, दुःखी मनःस्थितीला तोंड देण्याकरता झटताना ती म्हणते: “मी शिवणकामात गढून जाते. अशावेळी माझे कपडे शिवून होतात आणि थोड्या वेळानंतर मला कशाचा त्रास होतोय हे विसरून जाते. याने मला खरंच मदत होते.” तुम्ही ज्या गोष्टी करण्यात निपुण आहात त्या केल्याने तुमचा स्वाभिमान, जो खिन्नतेच्या काळात बहुधा पूर्णतः खचलेला असतो तो उभारला जाऊ शकतो.
तुम्हाला सुखावणाऱ्या कार्यहालचालींमध्ये गुंतणे देखील फायदेकारक ठरते. स्वतःकरता काही खरेदी करणे, खेळ खेळणे, तुमचा आवडता खाद्यपदार्थ बनवणे, पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके पाहणे, बाहेर जेवायला जाणे, वाचणे, एवढेच नव्हे, तर सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकात आढळणारी शब्दकोडी सोडवणे असे काही करण्याचा प्रयत्न करा.
डेबीला आढळले, की जवळपास फिरायला जाण्याची योजना करून किंवा स्वतःकरता लहानसहान ध्येये राखून ती स्वतःच्या खिन्न मनोदशेचा सामना करू शकली. तथापि, इतरांना मदतदायी ठरणारी कृत्ये करणे तिच्याकरता सर्वात जास्त साहाय्यकारी ठरले. “मला एक तरुण स्त्री भेटली जी फारच खिन्न होती, आणि मी तिला बायबलचा अभ्यास करायला मदत करू लागले,” असे डेबी सांगते. “या साप्ताहिक चर्चांमुळे ती तिच्या खिन्नतेवर कशी मात करू शकते हे सांगायला मला संधी मिळाली. बायबलने तिला खरी आशा दिली. त्याचवेळी मला सुद्धा मदत मिळाली.” येशूने म्हटल्यानुसार: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
कोणा व्यक्तीशी त्याविषयी बोला
“मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.” (नीतिसूत्रे १२:२५) समजूतदार व्यक्तीच्या ‘गोड शब्दामुळेच’ फरक पडू शकतो. कोणाही मनुष्याला तुमच्या अंतःकरणातील गोष्ट जाणता येत नाही म्हणून ज्या व्यक्तीकडे मदत करण्याचे सामर्थ्य आहे अशा भरवशालायक व्यक्तीजवळ तुमचे अंतःकरण मोकळे करा. नीतिसूत्रे १७:१७ नुसार, “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” “तुम्ही सर्वकाही स्वतःच्या मनात दाबून ठेवलं तर एकट्यानेच मोठा बोजा वागवण्यासारखं ते आहे,” असे २२ वर्षांची इव्हन म्हणाली. “पण मदत द्यायला सिद्ध असणाऱ्या व्यक्तीजवळ तुम्ही त्याविषयी सांगितलं तर तो बोजा खूपच हलका होतो.”
‘पण मी तेही करून पाहिलंय,’ असे तुम्ही म्हणाल, ‘आणि मला फक्त जीवनाच्या सकारात्मक बाजूकडे लक्ष देण्याचं लांबलचक भाषण ऐकवलं नीतिसूत्रे २७:५, ६.
जातं, बस्स.’ तर मग, केवळ ऐकणारी समजूतदार व्यक्तीच नव्हे तर वस्तुनिष्ठ सल्लागारही तुम्हाला कोठे सापडू शकेल?—मदत मिळवणे
“आपले चित्त” आपल्या पालकांना देण्यापासून सुरवात करा. (नीतिसूत्रे २३:२६) इतर कोणापेक्षाही त्यांना तुमच्याबद्दल अधिक माहिती आहे, आणि तुम्ही त्यांना संधी दिल्यास ते बहुधा तुमची मदत करू शकतात. तुमची समस्या गंभीर आहे असे त्यांनी समजून घेतल्यास, तुम्हाला व्यावसायिक मदत पुरवण्याकरता ते कदाचित योजना देखील करतील. a
ख्रिस्ती मंडळीचे सदस्य मदतीचा आणखी एक स्रोत आहेत. “इतकी वर्षं मी खिन्न आहे हे कुणाला कळू दिलं नाही,” असे सीमाने सांगितले. “पण मग मी मंडळीतील एका वृद्ध बहिणीला माझ्या गुपित गोष्टी सांगितल्या. ती अतिशय समजूतदार होती! मला जे अनुभवावे लागले अशाच गोष्टी तिला सुद्धा अनुभवाव्या लागल्या होत्या. म्हणून इतर लोकांनी देखील अशा गोष्टी अनुभवल्या आहेत आणि ते त्यातून यशस्वीपणे पार पडलेत हे समजून घ्यायला मला उत्तेजन मिळालं.”
नाही, सीमाची खिन्नता ही एकाच रात्रीत नाहीशी झाली नाही. पण देवासोबत आपला नातेसंबंध अधिक घनिष्ठ करीत ती आपल्या भावनांना तोंड देऊ लागली. यहोवाच्या खऱ्या उपासकांमध्ये तुम्हाला देखील असे मित्र अथवा “कुटुंबीय” मिळू शकतात जे तुमच्या हिताबद्दल मनःपूर्वक चिंता बाळगतात.—मार्क १०:२९, ३०; योहान १३:३४, ३५.
सामर्थ्याची पराकोटी
तथापि, निराशा दूर करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे, प्रेषित पौलाने म्हटल्यानुसार, “सामर्थ्याची पराकोटी” आहे जी देवाकडून मिळते. (२ करिंथकर ४:७) तुम्ही त्याच्यावर विसंबून राहिलात तर तो तुम्हाला खिन्नतेविरुद्ध लढा द्यायला मदत करू शकतो. (स्तोत्र ५५:२२) आपल्या पवित्र आत्म्याद्वारे तो तुमच्या सर्वसाधारण क्षमतांपलिकडील सामर्थ्य तुम्हाला बहाल करतो.
देवासोबतची ही मैत्री खरोखरच धीर देणारी आहे. जॉर्जिया नामक एक तरुणी म्हणते, “मी दुःखी असते तेव्हा, मी खूप प्रार्थना करते. मला ठाऊक असतं, की माझी समस्या कितीही गंभीर असली, तरी यहोवा यातून मार्ग काढून देणारच.” डॉफ्ने याजशी सहमत होऊन म्हणते: “तुम्ही यहोवाला सगळं सांगू शकता. तुम्ही तुमचं अंतःकरण त्याच्याजवळ मोकळं करू शकता आणि तुम्हाला माहीत असतं, की कोणाही मानवाला जमलं नाही तरीही तो तुम्हाला समजू शकतो व तुमची काळजी करतो.”
म्हणून, तुम्ही खिन्न असल्यास, देवाला प्रार्थना करा आणि आपल्या भावना जिच्याजवळ व्यक्त करू शकाल अशी एखादी सुज्ञ आणि समजूतदार व्यक्ती पाहा. ख्रिस्ती मंडळीत तुम्हाला कुशल सल्लागार असणारे ‘वडिलजन’ आढळतील. (याकोब ५:१४, १५) देवासोबतची तुमची मैत्री टिकवून ठेवण्याकरता तुम्हाला मदत करण्यास ते सज्ज असतात. कारण देव समजून घेतो आणि “तो तुमची काळजी” घेत असल्यामुळे तुम्ही आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकाव्यात असे आमंत्रण तो तुम्हाला देतो. (१ पेत्र ५:६, ७) खरोखर, बायबल असे अभिवचन देते: “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:७.
[तळटीपा]
a बहुतांश वैद्यकीय तज्ज्ञ असा सल्ला देतात, की तीव्र अवसाद असलेल्यांना आत्महत्या करण्याचा धोका असल्यामुळे व्यावसायिक मदत मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ, असा औषधोपचार करण्याची गरज असेल की जो फक्त वैद्यकीय व्यावसायिकाकडूनच मिळू शकतो.
चर्चेसाठी प्रश्न
◻ एखाद्या युवकाला खिन्न करणाऱ्या काही गोष्टी कोणत्या आहेत? तुम्हाला कधी तसे वाटले आहे का?
◻ नीचतम चिरकालीन अवसादाची लक्षणे तुम्ही ओळखू शकता का?
◻ तीव्र अवसाद कसा ओळखावा हे तुम्हाला ठाऊक आहे काय? हा इतका गंभीर विकार का आहे बरे?
◻ निराशा घालवून देण्याचे काही मार्ग सांगा. यातील काही सल्ले तुमच्या बाबतीत कामी पडले आहेत का?
◻ तुम्ही गंभीररित्या खिन्न असता तेव्हा त्याविषयी चर्चा करणे इतके महत्त्वाचे का असते?
[१०६ पानांवरील संक्षिप्त आशय]
तीव्र खिन्नता, किशोरवयीनांच्या आत्महत्येचे सर्वसामान्य कारण आहे
[११२ पानांवरील संक्षिप्त आशय]
देवासोबतचा वैयक्तिक नातेसंबंध तुम्हाला तीव्र अवसादाचा सामना करण्यास मदत करू शकतो
[Box on page 107]
ती अति निराशा असू शकते का?
कोणामध्येही, एखादी गंभीर समस्या नसतानाही खालील लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणे तात्पुरत्या काळासाठी दिसू शकतात. तथापि, अनेक लक्षणे दिसू लागली किंवा एखादे लक्षण तुमच्या सर्वसामान्य कार्यहालचालींमध्ये अडथळा बनण्याइतके गंभीर असल्यास, तुम्हाला (१) शारीरिक आजार असू शकतो व त्याकरता डॉक्टरांकडून तपासून घेणे आवश्यक असू शकते किंवा (२) एखादा गंभीर मानसिक विकार—म्हणजेच तीव्र अवसाद असू शकतो.
कोणत्याच गोष्टीने तुम्हाला आनंद मिळत नाही. एकेकाळी ज्या कार्यहालचाली करण्यात तुम्हाला आनंद वाटायचा त्यांत आता तुम्हाला रस वाटत नाही. तुम्हाला सर्वकाही अवास्तविक वाटते, जणू धुंदीत असल्याप्रमाणे आणि जीवन रटाळ वाटते.
संपूर्णतः निरुपयोगी असल्याची भावना. तुम्हाला वाटते, की तुमच्या जीवनात देण्यासारखी कोणतीच महत्त्वपूर्ण गोष्ट नसून ते पूर्णतः निरुपयोगी आहे. तुम्हाला अतिशय दोषी असल्यासारखे वाटेल.
मनोदशेत संपूर्ण बदल होणे. एकेकाळी तुम्ही अतिशय मनमिळाऊ होता तर आता कदाचित शांत व्हाल किंवा उलट घडेल. तुम्ही बहुतेकवेळा रडत असाल.
संपूर्णतः आशाहीनतेची भावना. तुम्हाला वाटते की सर्वकाही थराला पोहंचले आहे आणि त्याबद्दल तुम्ही काहीच करू शकणार नाही व परिस्थितींत कधीच सुधार होणार नाही.
मरावेसे वाटणे. यातना इतकी तीव्र असते की आपण मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागते.
मन एकाग्र करू शकत नाही. मनात सारखा तोच तो विचार घोळत राहतो किंवा वाचत असताना तुम्हाला काहीच अर्थबोध होत नाही.
खाण्याच्या किंवा शौचाला जाण्याच्या सवयींत बदल. भूक न लागणे किंवा अति खाणे. अधूनमधून बद्धकोष्ठ किंवा अतिसार होणे.
झोपण्याच्या सवयींत बदल. अतिशय कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त झोप लागणे. तुम्हाला वारंवार दुःस्वप्ने पडत असतील.
दुखणीखुपणी. डोकेदुखी, पेटके, पोटात किंवा छातीत दुखणे. कोणतेही योग्य कारण नसताना तुम्हाला सतत थकवा जाणवेल.
[१०८ पानांवरील चित्र]
पालकाच्या अपेक्षा गाठण्यात उणे पडल्यामुळे एखाद्या युवकाला खिन्न वाटू शकते
[१०९ पानांवरील चित्र]
तोंड देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांशी त्याविषयी बोलणे आणि आपले अंतःकरण मोकळे करणे
[११० पानांवरील चित्र]
इतरांसाठी काही करणे हा देखील निराशा घालवण्याचा आणखी एक मार्ग आहे