व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला स्वतःबद्दल नावड का वाटते?

मला स्वतःबद्दल नावड का वाटते?

अध्याय १२

मला स्वतःबद्दल नावड का वाटते?

“मी कोणी खास आहे असं मला वाटत नाही,” असे लुईस खेदाने म्हणाली. तुम्हाला देखील अधूनमधून स्वतःचे वाईट वाटते का?

प्रत्येकालाच थोडाफार स्वाभिमान आवश्‍यक असतो हे खरे आहे. त्यास, “मानवी अस्तित्वाला भारदस्तपणा आणणारा घटक” असे संबोधले गेले आहे. पुढे, बायबल असे म्हणते: “आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय १९:१९) तसेच, तुमचे स्वतःविषयीचे मत चांगले नसले तर कदाचित ते इतरांविषयी देखील चांगले नसेल.

‘मला कोणतीच गोष्ट नीट करता येत नाही!’

तुम्हाला स्वतःविषयी अशा नकारात्मक भावना का असाव्यात बरे? एक गोष्ट म्हणजे, तुमच्या मर्यादांमुळे तुम्ही निराश होत असाल. तुम्ही मोठे होत आहात, आणि सहसा अस्वस्थपणाचा असा काळ असतो जेव्हा वस्तू हातातून पडणे किंवा वस्तुंवर आदळणे ह्‍या दररोजच्याच लाजविणाऱ्‍या घटना असतात. तसेच, प्रौढांप्रमाणे निराशेवर मात करण्याचा अनुभव तुमच्याकडे नसतो. त्याचप्रमाणे, तुमची ‘ज्ञानेंद्रिये वहिवाटीने’ हवी तितकी प्रशिक्षित न झाल्यामुळे तुम्ही नेहमीच जाणतेपणाने निर्णय घेणार नाही. (इब्री लोकांस ५:१४) काही वेळा, तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला कोणतीच गोष्ट सुरळीतपणे पार पाडता येत नाही!

आपल्या पालकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात उणे पडणे हे सुद्धा कम-स्वाभिमानाचे आणखी एक कारण असू शकते. एक युवक म्हणतो, “मी शाळेत ‘७० टक्के’ मिळवले, तर ७५ टक्के का मिळवले नाहीस असं माझे आईवडील विचारतात आणि मग ते मला जमण्यासारखं नाही असं सांगतात.” अर्थात, पालकांनी आपल्या मुलांना सर्वंकश प्रयत्न करण्याचा आग्रह करणे उत्तम करायला आग्रहाने सांगणे हे साहजिकच आहे. तसेच, वाजवी अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्ही अपुरे पडता तेव्हा तुम्हाला निश्‍चितच बोलणी खावी लागतात. बायबलचा सल्ला असा आहे: “माझ्या मुला [मुली], आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” (नीतिसूत्रे १:८, ९) निरुत्साही होण्याऐवजी, टीका स्वीकारा आणि त्यापासून शिका.

परंतु, एखाद्याच्या पालकांनी अवाजवी तुलना केल्यास काय? (“तू तुझ्या मोठ्या भावासारखा, पॉलसारखा का होत नाहीस? अभ्यासात तो नेहमीच पुढे होता.”) अशा तुलनांमुळे, तेवढ्यापुरते वाईट वाटले, तरी त्यांच्यात बहुतेकवेळा काही तरी तथ्य असते. तुमचे भले व्हावे हीच तुमच्या पालकांची इच्छा असते. पण ते तुमच्याशी अतिशय कठोरतेने वागतात असे तुम्हाला वाटल्यास, याविषयी त्यांच्यासोबत शांत चित्तवृत्तीने चर्चा का करू नये बरे?

स्वाभिमान वाढवणे

खचत असलेला स्वाभिमान तुम्ही कशाप्रकारे दृढ करू शकता? प्रथम, तुमच्या हिकमती आणि जबाबदाऱ्‍यांवर प्रामाणिकपणे नजर टाका. तुम्हाला आढळेल, की तुमच्या अनेक तथाकथित जबाबदाऱ्‍या खरे पाहता अतिशय क्षुल्लक आहेत. गंभीर वैगुण्यांबद्दल काय, जसे की, तापट स्वभाव किंवा स्वार्थीपणा? प्रामाणिकपणे ही वैगुण्ये सुधारण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमचा स्वाभिमान निश्‍चितच वाढेल.

शिवाय, तुमच्याजवळ काही करण्याची हिकमत आधीच आहे याकडे डोळेझाक करू नका! स्वयंपाक करता येणे किंवा एखाद्या गाडीचे पंक्चर झालेले चाक बदलता येणे खास महत्त्वाचे आहे असा कदाचित तुम्ही विचार करणार नाही. पण एखादी उपाशी व्यक्‍ती किंवा खोळंबलेला वाहन चालक तुमच्याजवळ असलेल्या या कौशल्यांची प्रशंसा करील! तुमच्या सद्‌गुणांचा देखील विचार करा. तुम्ही अभ्यासू? सहनशील? दयाळू? उदार? अनुग्रही आहात का? हे गुण क्षुद्र त्रुटींपेक्षा फार वरचढ ठरतात.

या संक्षिप्त तपासणी यादीचा विचार केल्यासही मदत होऊ शकेल:

वास्तविक ध्येये राखा: तुम्ही नेहमीच गगनातील ताऱ्‍यांकडे धाव घेतली तर तुम्ही अतिशय निराश होऊ शकता. साध्य करण्याजोगी ध्येये राखा. टाईपींगसारखी एखादी कला शिकण्याबद्दल काय? एखादे वाद्य वाजवण्यास किंवा नवीन भाषा शिका. तुमचे वाचन सुधारा किंवा वाढवा. कार्यसिद्धीसोबत स्वाभिमान हा उपयुक्‍त गुण देखील निर्माण होतो.

चांगले काम करा: तुम्ही हलगर्जीपणाने काम केल्यास, तुम्हाला समाधान मिळणार नाही. देवाने आनंदाने त्याची निर्मिती कृत्ये पार पाडली आणि निर्मितीचा प्रत्येक कालावधी संपल्यावर त्यांस “चांगले” असे म्हटले. (उत्पत्ति १:३-३१) तुम्ही घरात किंवा शाळेत जे काही काम करता ते निपुणतेने आणि प्रामाणिकपणाने केल्यास तुम्हालाही आनंद वाटेल.—पाहा नीतिसूत्रे २२:२९.

इतरांसाठी काही करा: आरामात बसून इतरांकडून स्वतःची सेवा करून घेतल्याने स्वाभिमान मिळवला जात नाही. येशूने म्हटले, “जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने . . . [इतरांकरता] सेवक” किंवा चाकर व्हावे.—मार्क १०:४३-४५.

उदाहरणार्थ, १७ वर्षांच्या किमने इतरांना बायबल सत्ये शिकण्यास मदत करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुटीत महिन्याचे ६० तास खर्च करण्याचे योजिले. ती म्हणते: “यामुळे मी यहोवाच्या निकट आले आहे. तसेच, लोकांबद्दल खरं प्रेम बाळगायला सुद्धा मला मदत झालीय.” या आनंदी तरुणीला निश्‍चितच स्वाभिमान वाटला असेल!

तुमच्या मित्रमैत्रिणींची काळजीपूर्वक निवडा करा: “मला स्वतःबद्दल समाधान नाही,” असे १७ वर्षांची बार्बरा म्हणाली. “ज्या लोकांना माझ्यावर आत्मविश्‍वास आहे अशांसोबत मी असते तेव्हा मी चांगलं काम करते. पण जे लोक मला कमी लेखतात त्यांच्यासमोर मी बावळटासारखं वागते.”

स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्‍या किंवा अपमान करणाऱ्‍या लोकांमुळे तुम्हाला स्वतःबद्दल निश्‍चित समाधान वाटणार नाही. म्हणून असे मित्रमैत्रिणी निवडा की ज्यांना तुमच्या हिताविषयी चिंता आहे व जे तुमची उभारणी करतात.—नीतिसूत्रे १३:२०.

देवाला तुमचा अगदी जवळचा मित्र बनवा: “परमेश्‍वर माझा दुर्ग, माझा गड” आहे, असे स्तोत्रकर्त्या दावीदाने म्हटले. (स्तोत्र १८:२) त्याला, स्वतःच्या कार्यक्षमतांवर नव्हे तर यहोवासोबतच्या निकट मैत्रीवर आत्मविश्‍वास होता. यास्तव, पुढे त्याच्यावर आपत्ती कोसळली तेव्हा, मन स्थिर राखून तो तीव्र टीका सहन करू शकला. (२ शमुवेल १६:७, १०) तुम्ही देखील ‘देवाजवळ येऊ’ शकता आणि अशाप्रकारे स्वतःचा नव्हे तर यहोवाचा “अभिमान” बाळगू शकता!—याकोब २:२१-२३; ४:८; १ करिंथकर १:३१.

फसवे मार्ग

एका लेखकाने म्हटले: “काहीवेळा सशक्‍त स्वत्व नसलेला आणि कम-स्वाभिमान असलेला पौगंड, जगाला तोंड देण्याकरता खोटे स्वरूप धारण करण्याचा किंवा वरकरणी दिखावा करण्याचा प्रयत्न करतो.” काहीजण ज्या मनोवृत्ती धारण करतात त्या परिचयाच्या आहेत: “दांडग्या मुलाचा रफटफपणा,” उच्चभ्रू लोकांचा लैंगिक स्वैराचार, पंक रॉकरच्या पेहरावातील निर्लज्जपणा. परंतु, या वरकरणी दिखाव्यामागे, असे युवक न्यूनगंडाच्या भावनांशी अजूनही झटत असतात.—नीतिसूत्रे १४:१३.

उदाहरणासाठी, “अवसाद दूर करण्यासाठी, स्वाभिमान वाढवण्यासाठी [कोणाला हवेहवेसे वाटण्याद्वारे], सलगी ठेवण्याकरता आणि गर्भधारणेद्वारे आणखी एका मानवी जिवाचे—एका बाळाचे प्रेम आणि विनाहरकत स्वीकृती प्राप्त करण्यासाठी” जे लैंगिक स्वैराचाराने जीवन व्यतीत करतात त्यांचा विचार करा. (किशोरावस्थेतील खिन्‍नतेला तोंड देणे) (इंग्रजी) भ्रमनिरास झालेल्या एका तरुणीने असे लिहिले: “माझ्या निर्माणकर्त्यासोबत एक मजबूत नातं उभारण्याऐवजी मी लैंगिक संबंध हाच दिलासा मिळवण्याचा मार्ग आहे असे समजू लागले. पण, यामुळे मी फक्‍त पोकळपणा, एकलकोंडेपणा आणि खिन्‍नता यामध्ये आणखीनच भर घातली.” तर मग, अशा फसव्या मार्गांपासून सावध राहा.

सावधानतेचा इशारा

मनोरंजक गोष्ट अशी, की शास्त्रवचनांत स्वतःला अतिश्रेष्ठ न समजण्याचा वारंवार इशारा दिला आहे! असे का बरे? कारण आपल्यातील बहुतांश जण, आत्मविश्‍वास वाढवण्याच्या आपल्या प्रयत्नांत अति करायला जाऊन फसतात. अनेकजण अहंकारी बनतात आणि स्वतःच्या कला व क्षमतांबद्दल अतिशय फुगवून सांगतात. काहीतर, इतरांना कमी लेखून स्वतःलाच श्रेष्ठ समजतात.

पहिल्या शतकात, रोममधील ख्रिस्ती मंडळी, यहुदी आणि विदेश्‍यांमधील (गैर-यहुदी) तीव्र झगड्याने ग्रासली होती. म्हणून प्रेषित पौलाने विदेश्‍यांना याची आठवण करून दिली, की मात्र देवाच्या ‘ममतेमुळे’ देवाची कृपादृष्टी असलेल्या स्थानी त्यांचे “कलम” करण्यात आले होते. (रोमकर ११:१७-३६) फाजील धार्मिक यहुद्यांना देखील त्यांच्या अपरिपूर्णतेला तोंड द्यावे लागले. “कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत,” असे पौल म्हणाला.—रोमकर ३:२३.

पौलाने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला नाही पण तो म्हणाला: “कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी . . . प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका.” (रोमकर १२:३) यास्तव, थोडाफार स्वाभिमान बाळगणे ‘योग्य’ असले तरी एखाद्याने त्याचा अतिरेक करू नये.

डॉ. ॲलन फ्रॉम्म असे निरीक्षण करतात: “ज्या व्यक्‍तीला स्वतःची योग्य प्रमाणात कल्पना असते ती दुःखी नसते, पण तिला आनंदाने वेडेपिसे होण्याचीही गरज नाही. . . . ती नैराश्‍यपूर्ण नसते, पण तिचा आशावाद अनियंत्रित नसतो. ती अविचारीपणे धाडस करत नाही त्याचप्रमाणे ती विशिष्ट गोष्टींच्या भयापासून मुक्‍त देखील नसते . . . आपण नेहमीच यशस्वी असणारी उल्लेखनीय व्यक्‍ती नाही तसेच सदा न कदा [नेहमीच] अपेशी ठरणारे नाही हे सुद्धा ती जाणून घेते.”

म्हणून मर्यादशील असा. “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (याकोब ४:६) तुमच्याजवळ ज्या हिकमती आहेत त्या मान्य करा पण तुमच्यातील वैगुण्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्याउलट, ती वैगण्ये सुधारा. तरीही, वेळोवेळी तुम्हाला स्वतःबद्दल शंकाच वाटेल. तुम्हाला काही महत्त्व आहे का किंवा देव तुमची खरोखरच काळजी वाहतो का याबद्दल शंका बाळगण्याची तुम्हाला कदापि गरज नाही. कारण “जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.”—१ करिंथकर ८:३.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ काही युवकांना स्वतःविषयी नकारात्मक भावना का असतात? अशा युवकांना कसे वाटते ते तुम्ही सांगू शकता का?

◻ तुमच्या पालकांच्या अपेक्षांविषयी तुम्ही काय करू शकता?

◻ आत्म-सन्मान वाढवण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

◻ स्वाभिमान वाढवण्यातील धोके कोणते आहेत?

◻ स्वतःला अतिश्रेष्ठ न समजण्याबद्दल तुम्ही सावध का असावे?

[९८ पानांवरील संक्षिप्त आशय]

स्वाभिमानास “मानवी अस्तित्वाला भारदस्तपणा आणणारा घटक” असे संबोधले गेले आहे

[९९ पानांवरील चित्र]

तुम्हाला खचल्यासारखे, न्यून असल्यासारखे वाटते का? यावर उपाय आहे

[१०१ पानांवरील चित्र]

गर्विष्ठपणा करणारी किंवा बढाई मारणारी व्यक्‍ती बनणे हा कम-स्वाभिमानावरील उपाय नाही

[१०२ पानांवरील चित्र]

तुम्हाला कोणतीच गोष्ट सुरळीतपणे पार पाडता येत नाही असे काहीवेळा वाटते का?