व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहपूर्व लैंगिक संबंधांस मी कसा नकार द्यावा?

विवाहपूर्व लैंगिक संबंधांस मी कसा नकार द्यावा?

अध्याय २४

विवाहपूर्व लैंगिक संबंधांस मी कसा नकार द्यावा?

‘टीन नियतकालिकाने घेतलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात अनेक तरुण वाचकांना “लैंगिक दबावाला नकार कसा द्यावा,” या प्रश्‍नावर माहिती हवी होती हे प्रकट झाले.

स्तोत्र ११९:९ येथे स्तोत्रकर्त्याने देखील असाच प्रश्‍न उपस्थित केला: “तरुण [अथवा तरुणी] आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील?” उत्तर आहे: “तुझ्या [देवाच्या] वचनानुसार तो राखण्याने.” परंतु केवळ ज्ञान असून चालायचे नाही. “अनैतिक लैंगिक संबंधांविषयी बायबलचं म्हणणं बुद्धीला पटतं पण मन मात्र या कारणांना विसरून जाण्याचा प्रयत्न करत असतं,” असे एक तरुणी कबूल करते. स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे.”—स्तोत्र ११९:११.

मनाला जपा

देवाची वचने आपल्या अंतःकरणात जपून ठेवण्यासाठी प्रथम शास्त्रवचने आणि बायबल-आधारित साहित्य वाचणे आणि अभ्यास करणे अगत्याचे आहे. यामुळे देवाच्या नियमांचे मूल्य तुम्हाला पटवून देण्यात तुमची मदत होऊ शकते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, लैंगिकरित्या उत्तेजक गोष्टी वाचल्याने, पाहिल्याने अथवा ऐकल्याने “कामवासना” चेतवली जाते. (कलस्सैकर ३:५) म्हणून असे साहित्य पूर्णपणे टाळा! त्याउलट, शुद्ध आणि पवित्र गोष्टींचे चिंतन करा.

संशोधनाने पुढे हेही दाखवून दिले आहे, की एखाद्याच्या शुद्ध राहण्यावर जवळच्या मित्रांचा मोठा प्रभाव पडू शकतो. स्तोत्रकर्ता म्हणतो: “तुझे [देवाचे] भय धरणाऱ्‍या सर्वांचा, तुझे विधि पाळणाऱ्‍यांचा, मी सोबती आहे.”—स्तोत्र ११९:६३.

तुमचे मित्र खरोखर ‘देवाचे विधी पाळणारे’ आहेत काय? जोएन्‍ना नामक एक तरुणी स्वतःच्या मित्रमैत्रिणींच्या निवडीविषयी असे म्हणते: “यहोवावर प्रीती करणाऱ्‍या युवकांसोबत असताना असे दिसून येते की, नीतिमूल्यांविषयी बोलत असताना तुम्हालाही त्यांच्याप्रमाणे वाटू लागते. उदाहरणार्थ, अनैतिकता घृणास्पद आहे असे त्यांनी म्हटले तर तुम्हाला देखील तसेच वाटू लागते. पण दुसऱ्‍या बाजूला पाहिले, तर त्याविषयी बेपर्वा मनोवृत्ती असणाऱ्‍या कोणासोबत तुम्ही असल्यास पाहता पाहता तुम्हीही त्याच्यासारखेच व्हाल.”—नीतिसूत्रे १३:२०.

तथापि, शुद्ध राहण्यासाठी संकेतभेटी आणि प्रणयाराधन सहसा सर्वात मोठे आव्हान प्रस्तुत करतात. रॉबर्ट सोरेंसन यांनी केलेल्या एका राष्ट्रीय अभ्यासाचा विचार करा. त्यांच्या दृष्टीस आले, की लैंगिक जवळीक उपभोगलेल्या सर्वेक्षणातील ५६ टक्के तरुणांनी आणि ८२ टक्के स्त्रियांनी आपल्या प्रियकराशी—अथवा त्यांच्या परिचयाच्या आणि आवडणाऱ्‍या व्यक्‍तीशीच जीवनात पहिल्यांदा लैंगिक जवळीक ठेवली होती. मग, तुमचे लग्न करण्याचे वय असून तुम्ही कोणाशी भेटीगाठी करत असल्यास काय? तुम्ही शुद्ध राहूनही त्या व्यक्‍तीशी उत्तमरित्या परिचित कसे होऊ शकता?

प्रणयाराधन करतेवेळी धोके टाळणे

बायबल इशारा देते: “हृदय सर्वात कपटी आहे आणि ते अधीर आहे; त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९, बाइंग्टन) एखाद्याला विरुद्ध लिंगी व्यक्‍तीकडे अगदीच स्वाभाविक आकर्षण वाटेल. पण, तुम्ही एकमेकांच्या सहवासात जितके असता तितकेच हे आकर्षण वाढते. मग हीच सर्वसाधारण इच्छा तुमच्या अंतःकरणास भुलवू शकते. “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, . . . व्यभिचार . . . ही निघतात,” असे येशू ख्रिस्त म्हणाला.—मत्तय १५:१९.

सहसा एखादे तरुण जोडपे लैंगिक संभोग ठरवून करत नसते. a बहुतेक प्रकरणांत, गुप्तांगांचा स्पर्श किंवा चेतवणारे स्पर्श केल्यामुळे शरीरसंबंध ठेवला जातो. एका अविवाहित मातेने हे कबूल केले: “माझ्याबाबतीत आणि मला परिचित असलेल्या मुलींच्या बाबतीत असं घडलं की दर वेळी प्रकरण जराजरा करून पुढं गेलं आणि अखेरीस आमचं कौमार्य आम्ही गमावलं. जरासा कामुकस्पर्श करण्यानेच सुरवात होते पण काय चाललंय हे लक्षात येतं तेव्हा स्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असते.”

लैंगिक अनैतिकतेत न फसण्याकरता, हृदयास तुम्हावर नियंत्रण करू देण्याऐवजी स्वतः हृदयावर नियंत्रण केले पाहिजे. (नीतिसूत्रे २३:१९) तुम्ही हे कसे करू शकता?

मर्यादा घाला: चुंबन घ्यावे आणि कामुकस्पर्श करावेत असे आपली प्रेयसी अपेक्षिते असे कदाचित एखाद्या तरुणाला वाटत असावे, पण खरे पाहता कदाचित तिला तसे वाटतही नसेल. “गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्‍यांजवळ ज्ञान असते.” (नीतिसूत्रे १३:१०) म्हणून भेटीगाठी करतेवेळी “मसलत” करून दुसऱ्‍या व्यक्‍तीला आपले विचार सांगा. सुज्ञपणाने, प्रेमभावनांवर मर्यादा घाला. त्याचवेळी, द्विअर्थी इशारे देऊ नका. तंग, शरीर-प्रदर्शन करणारे, कामोत्तेजक कपडे घातल्याने तुमच्या सोबत्याचा गैरसमज होऊ शकतो.

मोहविणाऱ्‍या परिस्थिती टाळा: एका तरुण कुमारिकेला तिच्या जिवलगाने डोंगरावरील एकांत ठिकाणी बोलवण्याच्या एका प्रसंगाबद्दल बायबल सांगते. त्याचा हेतू काय होता? दोघेही वसंताच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतील हा होता. तथापि, त्या तरुणीच्या भावांना या योजलेल्या सहलीविषयी कळाले, तेव्हा त्यांनी संतप्त होऊन मनाई केली. तिची लैंगिक प्रवृत्ती होती असे वाटल्यामुळे त्यांनी हे केले का? मुळीच नाही! परंतु, अशा परिस्थितींमध्ये मोह किती प्रबळ असू शकतो याची त्यांना चांगलीच जाणीव होती. (गीतरत्न १:६; २:८-१५) त्याचप्रमाणे, मोहात पाडण्यास कारणीभूत ठरणाऱ्‍या परिस्थिती, जसे की, घरात, अपार्टमेंटमध्ये किंवा मोटारीत, भेटीगाठी करत असलेल्या व्यक्‍तीसोबत एकांतात असण्यासारख्या परिस्थिती टाळल्या पाहिजेत.

आपल्या मर्यादा ओळखा: काही विशिष्ट परिस्थितीत तुम्ही विषयवासनेला एरवीपेक्षा अधिक सहजगत्या बळी पडण्याच्या स्थितीत असता. उदाहरणार्थ, स्वतःच्या अपयशामुळे किंवा पालकांसोबत बाचाबाची झाल्यामुळे तुम्ही कदाचित निरुत्साहित झाला असाल. कारण काहीही असले, तरी अशा वेळी तुम्हाला विशेष दक्ष असण्याची गरज आहे. (नीतिसूत्रे २४:१०) त्याचप्रमाणे, मद्य घेण्याबाबतीतही सावधगिरी बाळगा. मद्याच्या प्रभावात कदाचित तुम्ही आपले नियंत्रण गमावू शकता. “द्राक्षारस व नवा द्राक्षारस ही त्यांचा विवेक नष्ट करितात.”—होशेय ४:११.

नकार द्या आणि त्याप्रमाणे वागा: भावनांवर ताबा राहत नाही आणि जवळीक घातक होत असल्याचे जोडप्याच्या लक्षात येते तेव्हा ते काय करू शकतात? कोणा एखाद्याला असे काही म्हणावे अथवा करावे लागते की ज्यामुळे ती इच्छा मरते. डेब्रा भेटीगाठी करणाऱ्‍या आपल्या मित्रासोबत कारमध्ये एकटी होती कारण त्याने “बोलण्याकरता” कार एका एकांत ठिकाणी थांबवली होती. भावना अनावर होऊ लागल्या तेव्हा डेब्रा आपल्या मित्राला म्हणाली: “हे जरा अतीच होत चाललंय नाही का? आता आपण सावरायला हवं.” त्यामुळे त्याचा मूडच बदलला. तत्काल त्याने तिला घरी नेले. अशा स्थितीत असताना नकार देणे अत्यंत कठीण असेल. पण लैंगिक संबंधांपुढे शरणागती पत्करलेल्या एका २० वर्षीय मुलीने म्हटले: “तुम्ही तेव्हाच चालते झाला नाहीत, तर मागाहून पश्‍चात्ताप होईल!”

सोबत कुणालातरी न्या: काहींच्या मते ही पुरोगामी पद्धत असली, तरी भेटीगाठीच्या वेळी सोबत म्हणून कुणाला तरी नेणे शहाणपणाची कल्पना आहे. “आमच्यावर काही भरवसाच नाही असं त्यावरून वाटतं,” अशी तक्रार काही जोडपी करतात. कदाचित तसे वाटतही असेल. परंतु, स्वतःवर भरवसा करणे खरंच शहाणपणाचे आहे का? नीतिसूत्रे २८:२६ अगदी सडेतोडपणे म्हणते: “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.” भेटीगाठीच्या वेळी सोबत कुणाला तरी नेण्याचा शहाणपणा दाखवा. “स्वतःसोबत कोणाला तरी आणणाऱ्‍या व्यक्‍तीचा मी खरोखर आदर करते. निष्कलंक राहण्यास मला जितकी इच्छा आहे तितकीच त्यालाही आहे असं त्यावरून मला कळतं,” डेब्राने प्रकट केले. “त्यामुळे कोणतीही अडचण होत नाही, कारण खासगी गोष्टी बोलायच्या असतात तेव्हा आम्ही फक्‍त जरा दूर जाऊन बोलतो. यामुळे जी सुरक्षा मिळते तिचा विचार करता गैरसोय झाली तरी काही हरकत नाही असं मला वाटतं.”

देवासोबत मैत्री

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवासोबत निकटचा नातेसंबंध विकसित करून, देवाला भावना आहेत अशी जाणीव राखल्याने त्याला नापसंत असणारी वर्तणूक टाळण्यास तुम्हाला मदत होईल. विशिष्ट समस्यांविषयी स्वतःचे अंतःकरण त्याच्यापाशी मोकळे केल्यास तुम्ही त्याच्या अधिक निकट जाता. भावनातिरेकी परिस्थितींमध्ये शुद्ध राहण्याची मनसा असणाऱ्‍या अनेक जोडप्यांनी तर देवाला एकत्र मिळून प्रार्थना करून त्याच्याजवळ आवश्‍यक शक्‍तीही मागितली आहे.

अशांना “सामर्थ्याची पराकोटी” देऊन यहोवा मोठ्या मनाने प्रतिसाद देतो. (२ करिंथकर ४:७) अर्थात, तुम्हाला तुमची भूमिका पार पाडावी लागते. तरीही, देवाच्या साहाय्याने आणि आशीर्वादाने लैंगिक अनैतिकतेस नकार देणे शक्य आहे याबद्दल निश्‍चिंत असा.

[तळटीपा]

a एका अभ्यासानुसार ६० टक्के स्त्रियांनी हे कृत्य स्वयंस्फूर्त असून ते ठरवून केलेले कृत्य नव्हते असे सांगितले.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ लैंगिक संबंधांबद्दल यहोवाचे नियम जपून ठेवण्यात मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

◻ विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल तुमच्या दृष्टिकोनावर तुमचे मित्र कसे प्रभाव पाडू शकतात?

◻ तुमच्या मते, भेटीगाठी करताना दक्षतेची गरज का आहे?

◻ लैंगिक अनैतिकतेत न फसण्यासाठी प्रणयाराधन करणारे जोडपे कोणत्या गोष्टी अनुसरू शकते?

[१९३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“जराशा कामुकस्पर्शानेच सुरवात होते . . . ”

[१९४ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्रणयाराधनेच्या वेळी, स्वतःला अलिप्त न करण्याने अनैतिकता टाळा

[Box/Pictures on page 195]

संकेतभेटीच्या वेळी शुद्धता राखणे

कामुकस्पर्श घडेल अशा परिस्थिती टाळा

समूहांमध्ये संकेतभेटी करा किंवा कोणाला तरी सोबत घ्या

संभाषण उभारणीकारक असू द्या

सुरवातीपासूनच, प्रेम व्यक्‍त करण्याच्या मर्यादांविषयी तुमचे काय विचार आहेत ते तुमच्या सोबत्याला सांगा

विनयशील पेहराव करा आणि कामोत्तेजक कृत्ये टाळा

तुमच्या मते तुमचे चारित्र्य धोक्यात असल्यास तुम्हाला घरी पोहंचवण्यास सांगा

“निरोप घेण्यासाठी” जास्त वेळ लावू नका

लवकर परतण्याचा नियम ठेवा

[Pictures]

प्रणयाराधन करणाऱ्‍या जोडप्यांनी एकांत टाळावा

[१९६ पानांवरील चित्र]

परिस्थिती “नियंत्रणाबाहेर” जाऊ लागल्यास, शुद्धीवर राहून नको! म्हणा—आणि त्याप्रमाणे वागा