व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हस्तमैथुन—मी या इच्छेचा प्रतिकार कसा करावा?

हस्तमैथुन—मी या इच्छेचा प्रतिकार कसा करावा?

अध्याय २६

हस्तमैथुन—मी या इच्छेचा प्रतिकार कसा करावा?

१५ वर्ष हस्तमैथुनाच्या समस्येशी झटत असलेल्या तरुणाने म्हटले, “त्याचं व्यसन अतिशय तीव्र आहे. अंमली पदार्थ किंवा मद्यासारखीच त्याचीही सवय जडू शकते.”

तथापि, प्रेषित पौलाने आपल्या वासनांना कठोर धनी बनू दिले नाही. उलटपक्षी, त्याने लिहिले: “मी आपले शरीर [शारीरिक वासना] कुदलतो व त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथकर ९:२७) तो स्वतःशीच कडक वागला! अशाचप्रकारचा यत्न केल्याने कोणालाही हस्तमैथुनाच्या सवयीतून मुक्‍त होण्यास मदत मिळू शकते.

“कृती करण्यासाठी आपल्या मनाची तयार करा”

अनेकजण ताणतणाव आणि चिंता घालवून देण्यासाठी हस्तमैथुन करतात. तथापि, हस्तमैथुन ही समस्यांप्रती प्रतिक्रिया दाखवण्याची बालिश पद्धत आहे. (पडताळा १ करिंथकर १३:११.) “विचारशीलता” प्रदर्शित करून समस्येवर हल्ला करणे सर्वात उत्तम. (नीतिसूत्रे १:४) समस्या आणि निराशा ग्रासून टाकणाऱ्‍या भासतात तेव्हा, “[देवावर] . . . आपली सर्व चिंता टाका.”—१ पेत्र ५:६, ७.

समजा, लैंगिकरित्या उत्तेजक असे काहीतरी सहज तुमच्या नजरेस अथवा कानी पडले तर काय? बायबल असा सल्ला देते: “कृती करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करा; आत्मनिग्रही व्हा.” (१ पेत्र १:१३, सुबोध भाषांतर) यत्नपूर्वक मनातील अनैतिक विचार झिडकारा. मग कामोत्तेजना लगेचच मरून जाईल.

तथापि, रात्रीच्या वेळी एकटे असताना वाईट विचार झिडकारणे अतिशय कठीण असते. एक तरुणी असा सल्ला देते: “तत्काळ अंथरूणातून बाहेर पडा आणि एखादं काम करू लागा किंवा थोडंसं काही खा म्हणजे तुमचं मन दुसऱ्‍या गोष्टींकडे वळेल.” होय, स्वतःला ‘न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, श्रवणीय, आणि स्तुत्य गोष्टींचे मनन’ करण्यास लावा.—फिलिप्पैकर ४:८.

झोप लागत नसल्यास, विश्‍वासू राजा दावीदाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा ज्याने लिहिले: “मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे [देवाचे] स्मरण करितो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.” (स्तोत्र ६३:६) देव व त्याच्या गुणांवर मनन करण्याची आपल्या मनावर सक्‍ती केल्याने सहसा ह्‍या आकर्षणात भंग पडू शकतो. देव या ओंगळ सवयीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो याचा विचार करत राहिल्याने देखील मदत मिळते.—स्तोत्र ९७:१०.

प्रतिरोधक पावले उचला

“चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात,” असे सुज्ञ प्रेरित मनुष्याने लिहिले. (नीतिसूत्रे २२:३) दूरदृष्टी दाखवून तुम्ही चतूर असल्याचे शाबीत करू शकता. उदाहरणार्थ, विशिष्ट कार्यहालचालींत भाग घेतल्याने, तंग कपडे घातल्याने किंवा विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुम्हाला कामोत्तेजना वाटत असल्यास ते सर्वकाही टाळा. उदाहरणार्थ, मद्यामुळे एखाद्याचा ताबा सुटून आत्मनियंत्रण राखणे कठीण होऊ शकते. त्याचप्रमाणे, उत्तेजक विषय असलेले वाचन साहित्य, टीव्ही कार्यक्रम किंवा चित्रपट आवर्जून टाळा. “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव,” अशी प्रार्थना स्तोत्रकर्त्याने केली.—स्तोत्र ११९:३७.

तुम्ही सहज बळी पडण्याच्या स्थितीत असता तेव्हा देखील प्रतिरोधक पावले उचलली जाऊ शकतात. महिन्याच्या विशिष्ट काळी आपल्या कामवासना अधिक तीव्र होत असल्याचे एखाद्या तरुणीला कदाचित आढळेल. किंवा एखादी व्यक्‍ती भावनिकरित्या दुखावलेली अथवा खिन्‍न असेल. “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय,” असा इशारा नीतिसूत्रे २४:१० देते. म्हणून दीर्घ काळापर्यंत एकटे राहण्याचे टाळा. आव्हानात्मक उद्योगांमध्ये मन रमेल अशाप्रकारच्या उभारणीकारक कार्यहालचालींची योजना करा ज्यामुळे अनैतिक विचारांकडे आकर्षित होण्यासाठी कमीतकमी वाव मिळेल.

आध्यात्मिक प्रतिरोध

अकरा वर्षांच्या वयापासून ह्‍या सवयीशी झगडणारा २७ वर्षीय पुरुष यावर शेवटी मात करू शकला. “त्यासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा लागला,” तो म्हणतो. “न चुकता प्रत्येक दिवशी मी बायबलमधून निदान दोन अध्याय हमखास वाचायचो.” खंड न पडू देता त्याने हे तीन पेक्षा अधिक वर्षांसाठी केले आहे. आणखी एक ख्रिस्ती सल्ला देतो: “रात्री झोपी जाण्याआधी आध्यात्मिकतेशी संबंधित असलेलं काहीतरी वाचा. दिवसाचा शेवटला विचार आध्यात्मिक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. यावेळी प्रार्थना सुद्धा खूपच मदतदायी ठरते.”

इतरांना बायबल शिकवण्याच्या कामाप्रमाणेच, “प्रभूच्या कामात सर्वदा पुष्कळ” करण्याजोगे असल्यामुळे देखील मदत मिळते. (१ करिंथकर १५:५८, NW) हस्तमैथुनावर मात केलेल्या एका स्त्रीने म्हटले: “पूर्ण-वेळेची सुवार्तिक असल्याकारणानं माझं मन आणि माझी शक्‍ती, देवासोबत स्वीकृत नातेसंबंध प्राप्त करण्यास इतरांना मदत करण्यावर केंद्रित असल्याने ही सवय टाळण्यास मला खरोखर मदत मिळाली आहे.”

मनःपूर्वक प्रार्थनेद्वारे तुम्ही देखील देवाकडे “सामर्थ्याची पराकोटी” मागू शकता. (२ करिंथकर ४:७) “त्याच्यापुढे [देवापुढे] आपले मन मोकळे करा.” (स्तोत्र ६२:८.) एक तरुणी म्हणते: “प्रार्थनेमुळे तत्काळ सामर्थ्य मिळते. इच्छा प्रबळ होते तेव्हा प्रार्थना केल्याने निश्‍चितच मदत मिळते.” त्यासोबतच, सकाळी उठल्यावर आणि दिवसभरात आपला निर्धार देवाला कळवा आणि सामर्थ्य देणाऱ्‍या त्याच्या पवित्र आत्म्यासाठी विनंती करा.—लूक ११:१३.

इतरांकडून मदत

तुमचे व्यक्‍तिगत प्रयत्न अयशस्वी ठरल्यास, तुमची मदत करील अशा कोणाशी तरी, पालकाशी अथवा ख्रिस्ती वडिलांशी बातचीत करा. तरुण मुलींना एखाद्या प्रौढ ख्रिस्ती स्त्रीला सांगणे मदतदायी वाटेल. (तीत २:३-५) अगदीच आशाहीन झालेल्या एका तरुणाने म्हटले: “एकदा सायंकाळी माझ्या वडिलांसोबत मी याविषयी एकांतात बोललो.” त्याने सांगितले: “त्यांना सांगायला मला खूप कठीण गेलं. बोलता बोलता मी रडलो आणि मला खूप लाज वाटत होती. पण त्यांनी काय म्हटलं ते मी कधीच विसरणार नाही. दिलासा देणारे स्मित करत ते म्हणाले: ‘मला तुझा अभिमान वाटतो.’ तेवढं करण्यासाठी मला काय काय सोसावं लागलं हे ते समजू शकत होते. त्यांच्या त्या शब्दांनी मला अत्यंत प्रोत्साहन मिळालं.

तो युवक म्हणतो, “मग माझ्या वडिलांनी काही शास्त्रवचनांद्वारे मला, ‘मी खूप वाहवत’ गेलेलो नव्हतो हे पाहण्यास मदत केली आणि मग आणखी काही शास्त्रवचने दाखवून माझ्या चुकीच्या मार्गाचे गांभीर्य मला कळालंय ही खात्री केली. विशिष्ट काळापर्यंत माझ्या ‘मनातून हे विचार घालवून’ द्यायला आणि आपण पुन्हा त्यावर चर्चा करू असं त्यांनी सांगितलं. ते पुन्हा घडल्यावर त्यामुळं दुखावले न जाण्यास आणि पुढच्या वेळी जास्त काळापर्यंत हार न मानण्यास त्यांनी सांगितलं.” समस्येवर पूर्णपणे मात केल्यावर हा तरुण म्हणाला: “दुसऱ्‍या व्यक्‍तीला माझ्या समस्येची जाणीव असणे आणि तिच्याकडून मदत मिळवणे हे सर्वात लाभदायक ठरले.”

पुनःउद्‌भवाला तोंड देणे

या सवयीवर मात मिळवण्याचा प्रयास केल्यावर एक तरुण पुन्हा ह्‍या सवयीकडे वळाला. त्याने कबूल केले: “मला उद्‌ध्वस्त झाल्यासारखंच वाटलं. मी लायक नाही असं मला वाटू लागलं. मग मी स्वतःची अशी समजूत घातली: ‘मी हाताबाहेर गेलोय. माझ्यावर नाहीतरी यहोवाची कृपा नाही मग इतकं कडक असूनही काय फायदा?’” तथापि, सवय उलटणे याचा अर्थ एखादी व्यक्‍ती हारली आहे असा होत नाही. १९ वर्षांची एक मुलगी असे आठवून सांगते: “सुरवातीला दररोज रात्री असं व्हायचं, पण मग मी यहोवावर आणखीनच विसंबून राहू लागले आणि त्याच्या आत्म्याच्या मदतीनं मी आता फक्‍त वर्षांतून सहा की काय वेळा अयशस्वी ठरते. मला नंतर अतिशय वाईट वाटतं, पण प्रत्येक वेळा हारल्यावर पुढच्या वेळी मोह होतो तेव्हा मी आणखी दृढ असते.” तर हळूहळू ती यशस्वी ठरत आहे.

सवय उलटल्यावर ती कशामुळे उलटते त्याचे परीक्षण करा. एक युवक म्हणतो: “मी काय वाचत किंवा विचार करत होतो त्याच्यावर मी पुनर्विचार करतो. जवळजवळ प्रत्येक वेळी उणे पडण्याचं नेमकं कारण मला सांगता येतं. अशाप्रकारे मी ते करण्याचं थांबवू शकतो आणि त्यात सुधार करू शकतो.”

उत्तम लढ्याची प्रतिफळे

हस्तमैथुनावर मात केलेल्या एका तरुणाने म्हटले: “त्या समस्येवर मात केल्यापासून यहोवासमोर मी शुद्ध विवेक राखू शकलोय आणि ते माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वपूर्ण नाही!”

होय, चांगला विवेक, स्व-मूल्याची सुधारित जाणीव, अधिक नैतिक सामर्थ्य आणि देवासोबत निकटचा नातेसंबंध हे सर्व हस्तमैथुनाविरूद्ध दिलेल्या लढ्याची प्रतिफळे आहेत. अखेरीस हस्तमैथुनावर विजय मिळवलेली एक तरुणी अशी म्हणते: “माझं ऐका, या सवयीवर मात करण्यासाठी केलेला प्रयास सार्थ ठरतो.”

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ उत्तेजक विचारांचे मनन करत राहणे घातक का आहे? दुसऱ्‍या गोष्टीवर मन फिरवण्यासाठी एखादी तरुण व्यक्‍ती काय करू शकते?

◻ हस्तमैथुन करण्याचा मोह कमी करण्यासाठी एखादा युवक कोणती प्रतिरोधक पावले उचलू शकतो?

◻ आध्यात्मिक आक्रमक पवित्रा मदतदायी का असतो?

◻ या सवयीवर मात करण्यामध्ये प्रार्थना कोणती भूमिका निभावते?

◻ या बाबतीत समस्या असल्यास, कोणा व्यक्‍तीला याविषयी सांगणे मदतदायी का आहे?

[२०८, २०९ पानांवरील चौकट/चित्र]

पोर्नोग्रॅफी—सवय लावणारी आणि घातक!

“पोर्नोग्रॅफी सगळीकडे आहे: रस्त्यावरून चालत गेलात तर वृत्तपत्राच्या स्टँडवर उघडपणे प्रदर्शित केलेली दिसेल,” असे १९ वर्षांचा रोनल्ड आठवून सांगतो. “आमचे काही शिक्षक ती शाळेला घेऊन यायचे आणि पुढच्या वर्गात जाण्याआधीच्या वेळेत वाचत बसायचे.” होय, विविध वयोगट, पार्श्‍वभूमी आणि शैक्षणिक स्तरांतील लोक पोर्नोग्रॅफीचे व्यासंगी आहेत. मोहित नामक एका तरुणाने म्हटले: “अश्‍लील नियतकालिकं वाचून त्यातली चित्रं पाहायला मला मजा वाटली! . . . या नियतकालिकांच्या नवीन अंकांची मी अक्षरशः वाट पाहायचो कारण वाचून झालेली नियतकालिके पुन्हा वाचल्यावर मला आधीसारखी रोमांचकता वाटली नाही. तिची सवय लागते.” परंतु ही चांगली सवय आहे का?

पोर्नोग्रॅफीचा मोठा संदेश आहे: ‘लैंगिक संबंध निव्वळ आत्म-तृप्तीकरता आहेत.’ ती बलात्कार आणि अतिक्रूर हिंसेच्या विषयांनी भरलेली असतात. अनेक पाहणाऱ्‍यांना लवकरच असे दिसून येते की, “सौम्य” प्रकार (सॉफ्ट-कोर) इतके उत्तेजक नाहीत आणि म्हणून ते आणखी अश्‍लील चित्रे किंवा चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतात! न्यूयॉर्क विद्यापीठातील सहायक प्राध्यापक अर्नस्ट वॅन डेन हॅग्ग यांनी म्हटल्यानुसार: “पोर्नोग्रॅफी इतरांकडे केवळ उपभोग्य वस्तू, आपल्या कामवासनांकरता भ्रष्ट करावयाची साधनं म्हणून पाहण्यास जणू आमंत्रण देते.”

पोर्नोग्रॅफी, लैंगिक संबंधांचा विकृत व त्यास अवाजवी महत्त्व देणारा दृष्टिकोन सादर करते ज्यामुळे बहुधा वैवाहिक समस्या उद्‌भवतात. एका तरुण पत्नीने म्हटले: “पोर्नोग्रॅफी वाचल्याने पुस्तकात ज्या विकृत गोष्टी दिल्या होत्या त्या माझ्या पतीसोबत करण्याची इच्छा मला झाली. यामुळे लैंगिकरित्या सतत निराशा आणि हताशपणा जाणवत असे.” पोर्नोग्रॅफीचे वाचन करणाऱ्‍या आपल्या जीवनातील पुरुषांबरोबरील स्नेहबंधावर त्याचा काय परिणाम होतो यांविषयी शेकडो स्त्रियांचे १९८१ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. जवळजवळ निम्म्या स्त्रियांनी सांगितले की त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे प्रत्यक्षात काही विवाह किंवा मागण्या मोडल्या. एका पत्नीने खेदाने म्हटले: “पोर्नोग्रॅफीद्वारे लैंगिक तृप्ती करण्याच्या [माझ्या पतीची] गरज आणि वासना यांवरून मी अपुरी ठरते एवढेच गृहीत धरू शकते . . . त्यास तृप्त करणारी स्त्री असते तर बरं झालं असतं असं कधी कधी वाटतं, पण त्याला प्लॅस्टिक आणि कागद जास्त आवडतात आणि त्याच्या या गरजेने माझ्या अस्तित्वाचा एक भाग नष्ट केलाय. . . . पोर्नोग्रॅफी . . . प्रेमाच्या विरुद्ध आहे . . . घाणेरडी, क्रूर आणि नाशकारक आहे.”

तथापि, देवाच्या नजरेत शुद्ध राहण्याच्या प्रयत्नांविरुद्ध पोर्नोग्रॅफी थेट काम करते ही वास्तविकता ख्रिस्ती युवकांकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. (२ करिंथकर ६:१७–७:१) बायबल दाखवते की, प्राचीन काळात काहींनी आपल्या “अंतःकरणातील कठीणपणामुळे” ‘कोडगे होऊन’ “हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले.” (इफिसकर ४:१८, १९) अशाप्रकारची भ्रष्टता अनुभवण्याची तुम्ही इच्छा करता का? लक्षात असू द्या, पोर्नोग्रॅफी अधूनमधून पाहिल्याने देखील एखाद्याचा विवेक निबर होऊ शकतो. त्यामुळे काही ख्रिस्ती तरुण हस्तमैथुन करू लागले आणि त्याहूनही वाईट म्हणजे, लैंगिक अनैतिकतेत भाग घेऊ लागले. म्हणून, पोर्नोग्रॅफीपासून मुक्‍त असण्यासाठी यत्न करणे ही सुज्ञपणाची गोष्ट आहे.

“पुष्कळदा पोर्नोग्रॅफी थेट माझ्या नजरेसमोर असते,” असे डॅरिल्‌ म्हणतो. “म्हणून पहिल्यांदा माझी नजर तिजवर पडतेच; पण दुसऱ्‍या वेळी मी पाहायला जात नाही.” होय, जेथे तिचे उघडपणे प्रदर्शन केले जाते तेथे पाहू नका आणि तुमचे वर्गमित्र तुम्हाला पाहायला गळ घालत असल्यास त्यांना स्पष्ट नकार द्या. १८ वर्षांच्या कॅरेनने असा तर्क केला: “अपरिपूर्ण व्यक्‍ती असल्यामुळे शुद्ध आणि प्रसंशनीय गोष्टींवर आपले मन लावण्यास मला कठीण जाते. मग जर, मी मुद्दामहून पोर्नोग्रॅफी वाचू लागले तर मला आणखीनच जड जाणार नाही का?”

[२०६ पानांवरील चित्र]

“प्रार्थनेमुळे तत्काळ सामर्थ्य मिळते. आसक्‍ती वाटते तेव्हा प्रार्थना केल्याने निश्‍चितच मदत होते”