मी संकेतभेटीकरता (डेटींग) तयार आहे का?
अध्याय २९
मी संकेतभेटीकरता (डेटींग) तयार आहे का?
अनेक राष्ट्रांमध्ये संकेतभेट रोमँटिक मनोरंजनाचा प्रकार, मौजमजा आहे असे मानले जाते. म्हणून संकेतभेटीची अनेक रूपे आहेत. काहींकरता, संकेतभेट एक औपचारिक, पद्धतशीर प्रकरण असते—फुले, छानसं डिनर आणि गुड-नाईट किस या सर्व गोष्टी त्या कार्यक्रमात हमखास असतातच. इतरांकरता, संकेतभेट म्हणजे, आपल्याला पसंत असलेल्या विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत थोडासा निवांत वेळ घालवणे. अशीही काही जोडपी आहेत की, जी सदा न कदा एकत्र दिसतात पण आपण ‘केवळ मित्र’ आहोत असा दावा ते करतात. आता, तुम्ही त्याला संकेतभेट म्हणा, सोबत फिरणे म्हणा किंवा फक्त एकमेकांना भेटायला जाणे म्हणा, हे सर्वकाही एकच आहे: एक मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत पुष्कळ वेळ घालवतात आणि बहुधा यावर कोणी देखरेख करणारे नसते.
बायबल काळात संकेतभेटींची प्रथा नव्हती. तथापि, हुशारीने, चाणाक्षपणाने आणि आदरणीय पद्धतीने संकेतभेटी केल्यास दोन व्यक्तींना एकमेकांशी परिचित होण्याचा तो उचित मार्ग आहे. त्याचप्रमाणे, ते आनंददायक देखील असू शकते बरे का. पण याचा अर्थ तुम्ही संकेतभेटी कराव्यात का?
संकेतभेटी करण्याचा दबाव
संकेतभेटी करण्याचा तुम्हावर दबाव असल्यासारखे तुम्हाला वाटू शकते. तुमचे बहुतांश समवयस्क संकेतभेटी करत असावेत आणि साहजिकच तुम्हाला विचित्र किंवा निराळे असण्यास आवडणार नाही. संकेतभेटी करण्याचा दबाव सद्हेतू बाळगणाऱ्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडूनही येऊ शकतो. १५ वर्षांच्या मेरी ॲनला संकेतभेटी करण्यासाठी विचारण्यात आले तेव्हा तिच्या मावशीने सांगितले: “तुला त्या मुलाशी लग्न करायचं की नाही याचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही. संकेतभेट केवळ व्यक्ती या नात्याने तुझ्या नैसर्गिक विकासाचा एक भाग आहे. . . . तू जर सर्वच मुलांना नकार देत राहिलीस तर तू अप्रिय ठरशील आणि मग तुला कुणीसुद्धा विचारणार नाही.” मेरी ॲन आठवून
सांगते: “मावशीचे शब्द माझ्या मनात ठसले. मी चांगली संधी दवडत तर नाही? त्या मुलाकडे स्वतःची कार होती, पुष्कळ पैसा होता; आणि त्याच्याबरोबर खूप मजा येईल हे मला ठाऊक होतं. मी त्याच्यासोबत संकेतभेटी कराव्यात की नाही?”काही युवकांकरता हा दबाव, आपुलकी आणि जिव्हाळा मिळवण्याच्या स्वतःच्या इच्छेतून निर्माण होतो. “माझ्यावर कुणी प्रेम करावं आणि माझी प्रशंसा करावी असं मला नेहमी वाटायचं,” असे १८ वर्षांच्या ॲनने म्हटले. “माझ्या पालकांसोबत माझी इतकी जवळीक नसल्यामुळं जवळीक मिळावी आणि माझ्या भावना कुणालातरी सांगता याव्यात व मला खरंच समजून घेतलं जाईल या आशेने मी माझ्या मित्राकडे वळले.”
तथापि, एखाद्या किशोरवयीनाने केवळ त्याच्यावर किंवा तिच्यावर दबाव आणला जातो म्हणून संकेतभेटी करू नयेत! एक कारण म्हणजे, संकेतभेट हे एक गंभीर प्रकरण आहे—वैवाहिक सोबती निवडण्याच्या क्रियेतील एक टप्पा आहे. काय, विवाह? अर्थात संकेतभेटी करणाऱ्या बहुतांश युवकांचा लग्नाचा इरादा मुळीच नसतो हे मान्य आहे. पण खरे पाहिल्यास, लग्नाच्या विचाराशिवाय, दोन विरुद्धलिंगी व्यक्तींना एकमेकांसोबत पुष्कळ वेळ घालवण्याचे आणखी काय कारण असू शकते? या शिवाय इतर कोणत्याही कारणासाठी संकेतभेटी केल्यास “मौजमजा” तर दूरच पण त्यामुळे भविष्यात भलतेच परिणाम घडून येण्याची शक्यता आहे. ते का बरे?
संकेतभेटींची नकारात्मक बाजू
एक गोष्ट म्हणजे, बायबलनुसार “ऐन तारुण्याचा काळ” म्हटलेल्या नाजूक काळात युवक असतात. (१ करिंथकर ७:३६, NW) या कालावधीत, तुम्हाला कदाचित तीव्र लैंगिक भावना जाणवतील. यात काहीच गैर नाही; तो तुमच्या वयात येण्याचा भाग आहे.
किशोरवयीन संकेतभेटींचा विचार केल्यास, इथेच खरे तर पाणी मुरते: किशोरवयीन नुकतेच या लैंगिक भावनांवर ताबा ठेवण्याचे शिकत असतात. हे खरे की, लैंगिक संबंधांबद्दल देवाचे काय नियम आहेत हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहीत असतील आणि निष्कलंक राहण्याची तुमची प्रांजळ इच्छाही असेल. (पाहा अध्याय २३.) तरीही, जीवनातील एक जैविक वस्तुस्थिती सामोरी येते: विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत तुम्ही जितकी जास्त संगत ठेवाल तितकीच लैंगिक वासना वाढू शकते—मग तुमची इच्छा असो अगर नसो. (पाहा पृष्ठे २३२-३.)
आपली घडणच तशी आहे! वयाने मोठे होईपर्यंत आणि भावनांवर ताबा ठेवता येईपर्यंत संकेतभेटी तुमच्याकरता बोजा ठरतील. दुर्दैवाने, अनेक युवक अतिशय कष्टाने हा धडा शिकतात.“आम्ही संकेतभेटी करायला लागलो तेव्हा . . . हात धरायचो नाही किंवा चुंबनही घ्यायचो नाही. मला फक्त तिची संगत आणि तिच्याशी बोलायला हवं असायचं,” असे एक तरुण म्हणाला. “पण, ती अतिशय प्रेमळ स्वभावाची होती आणि ती माझ्या अगदी जवळ बसायची. काही काळानंतर, आम्ही हातात हात घेऊ लागलो आणि चुंबनही घेऊ लागलो. यामुळे माझ्यात अधिकच कामवासना जागृत झाली. माझ्या विचारसरणीवर त्याचा इतका परिणाम झाला की, मला तिच्यासोबत जास्तीतजास्त वेळ घालवावासा वाटू लागला, बोलून आता माझं समाधान होईनासं झालं, आता मला तिला जवळ घ्यावसं, स्पर्श करावसं, तिचं चुंबन घ्यावसं वाटू लागलं. आणि माझी काही केल्या तृप्ती होत नसे. वासनेनं मला पुरतं ग्रासलं होतं. काहीवेळा मला स्वतःचीच किळस, लाज वाटू लागली.”
म्हणून, संकेतभेटींचे, शेवटी अनैतिक लैंगिक संबंधांमध्ये पर्यवसान होऊ शकते यात काहीच नवल नाही. शेकडो किशोरवयीनांच्या एका सर्वेक्षणात असे
आढळून आले, की ८७ टक्के मुली आणि ९५ टक्के मुलांच्या मते, संकेतभेटींमध्ये लैंगिक संबंध हा “सर्वसाधारणपणे महत्त्वाचा किंवा अति महत्त्वाचा” होता. तथापि, ६५ टक्के मुली आणि ४३ टक्के मुलांनी कबूल केले, की संकेतभेटी करताना अनपेक्षितपणे त्यांच्यात लैंगिक जवळीक घडून आली होती!वीस वर्षांची लॉरेट्टा आठवून सांगते: “आम्ही एकमेकांना जितक्या अधिक वेळा भेटायचो तितकंच आमचं प्रकरण वाढलं. चुंबने निरस वाटू लागली आणि आम्ही एकमेकांच्या गुप्तांगांना स्पर्श करू लागलो. मला स्वतःची इतकी किळस वाटू लागली की शेवटी मला नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. माझा प्रियकर माझ्याकडून ‘लैंगिक संबंध ठेवण्याचीही’ अपेक्षा करू लागला . . . मी गोंधळून आणि बावरून गेले होते. पण एकच विचार माझ्या मनात होता आणि तो म्हणजे, ‘मला, त्याला काहीही झाले तरी गमवायचं नाहीय.’ मी विचित्र कोंडीत सापडले होते!”
हे खरे की, प्रत्येक जोडपे लैंगिक संबंध ठेवतातच असे नाही; काहीजण थोडक्यात वाचतात. पण, एखाद्या व्यक्तीच्या भावना चेतवल्यावर त्या भावना व्यक्त करण्याचा आदरणीय मार्ग मिळत नाही तेव्हा काय होते? निश्चित वैफल्यावस्था. त्याचप्रमाणे, त्या वैफल्याच्या भावना केवळ लैंगिक भावनांपुरत्याच मर्यादित नसतात.
द्विधा मनःस्थिती
एक तरुण कसा पेचात सापडला ते पाहा: ‘सुरवातीला मला कॅथी खूप आवडायची. मीच तिला तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी करायला लावल्या हे मान्य आहे. पण आता मला तिचा तिरस्कार वाटतो कारण मला तिच्यात रस उरलेला नाही. तिच्या भावना न दुखावता मी तिला कसे सोडू शकतो?’ किती गुंतागुंतीची ही स्थिती! तुम्ही कॅथीच्या जागी असता तर तुम्हाला काय वाटले असते?
किशोरवयीनांचा हृदयभंग अतिसामान्य दुःख आहे. हे खरे की, हातात हात घालून चालणारे जोडपे मोहक वाटते. पण आतापासून एका वर्षानंतर, विवाह तर सोडूनच द्या पण ते निदान एकत्र असतील याची किती शक्यता आहे?
निश्चितच कमी. म्हणून, किशोरवयीनांमधील प्रेमप्रकरणे बहुधा निष्फळ ठरतात, क्वचितच, ती विवाहात परिणीत होतात आणि सहसा शेवटी हृदयभंगच होतो.तसे पाहिले तर, किशोरावस्थेत तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अद्यापही बदल होत असतात. तुम्ही कोण आहात, तुम्हाला खरोखर काय पसंत आहे, स्वतःच्या जीवनाबाबत तुम्हाला काय करण्याची गरज आहे याचा शोध तुम्ही लावत आहात. जी व्यक्ती तुम्हाला आज पसंत पडते कदाचित ती उद्याला कंटाळवाणी वाटेल. पण रोमँटिक भावनांना वाव दिला जातो तेव्हा कोणाचे तरी नुकसान होणार हे निश्चित. म्हणून, “प्रेयसीबरोबर भांडण” किंवा “प्रेमसंबंधात निराशा” या गोष्टी युवकांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितींपैकी आहेत असा संबंध अनेक संशोधक अभ्यासांनी लावला आहे यात मुळीच आश्चर्य नाही.
मी तयार आहे का?
देव युवकांना सांगतो: “हे तरुणा [तरुणी], आपल्या तारुण्यांत आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा/तशी चाल.” “[आपल्या] मनास वाटेल त्या मार्गाने” चालण्याची प्रवृत्ती युवकांमध्ये असते. म्हणूनच, सहसा जे ‘मार्ग’ मौजमजेचे वाटतात ते अखेरीस खेद आणि उपद्रवास कारणीभूत ठरतात. म्हणून बायबल पुढच्या वचनात असे आर्जवते: “आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.” (उपदेशक ११:९, १०) “खेद”, अति दुखावणे किंवा पीडित असण्याला सूचित करतो. “उपद्रव” हा व्यक्तिगत क्लेशास सूचित करतो. या दोन्ही गोष्टींनी जीवन त्रासदायक होऊ शकते.
परंतु याचा अर्थ, संकेतभेटी हाच खेद आणि उपद्रवाचा उगम आहे असा होतो का? तसे काही नाही. पण तुम्ही अनुचित कारणासाठी (‘मौजमजेखातर’) किंवा तयार असण्याआधीच संकेतभेटी करू लागलात तर हे घडू शकते!
यास्तव, निम्नलिखित प्रश्न, तुम्हाला तुमच्या परिस्थितीचे परीक्षण करण्यास मदतदायी ठरतील.संकेतभेटींमुळे माझ्या भावनात्मक वाढीस मदत मिळेल की ती खुंटेल? संकेतभेटी तुम्हाला मुलगा-मुलगी या नात्यापुरतेच मर्यादित ठेवील. त्याऐवजी, इतरांसोबत तुमची संगती वाढवल्याने तुम्हाला फायदा होणार नाही का? (पडताळा २ करिंथकर ६:१२, १३.) सुझन नामक एक तरुणी म्हणते: “मी मंडळीतील इतर वयस्कर ख्रिस्ती स्त्रियांशी निकट दोस्ती करायला शिकले. त्यांना संगतीची आणि मला त्यांच्या खंबीर प्रभावाची आवश्यकता होती. म्हणून मी सहज कॉफीसाठी म्हणून त्यांच्याकडे जात असे. आम्ही हसतखेळत खूप गप्पागोष्टी करत असू. त्यांच्यासोबत मी खरोखरची, कायमची मैत्री जोडली.”
निरनिराळे—लहानथोर, विवाहित-अविवाहित, स्त्री-पुरुष—मित्र-मैत्रिणी असल्याने लोकांसोबत त्याचप्रमाणे विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबत असतानाही तुम्ही संतुलित राहण्यास शिकता आणि संकेतभेटीच्या वेळी असलेला दबाव येथे कमीच असतो. शिवाय, विवाहित जोडप्यांसोबत सहवास राखल्याने तुम्हाला विवाहाचा आणखी वास्तविक दृष्टिकोन लाभतो. नंतर, चांगला सोबती निवडण्यास आणि विवाहबंधनातील स्वतःची भूमिका पार पाडण्यास तुम्ही अधिक सज्ज व्हाल. (नीतिसूत्रे ३१:१०) स्नेहल नामक एक युवती अशाप्रकारे निष्कर्ष काढते: “विवाह करून सेटल होण्यासाठी मी अजूनही तयार नाही. मी अद्यापही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतेय आणि माझ्यासमोर अशी पुष्कळशी आध्यात्मिक ध्येये आहेत जी मला साध्य करायची आहेत. म्हणून, खरं पाहता, कोणाही विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत इतकी जवळीक राखण्याची मला अजून तरी काही गरज नाही.”
मला भावना दुखवायच्या आहेत का? विवाह करण्याचा हेतू न बाळगता रोमँटिक संबंध राखल्यास तुमच्या त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. विरुद्धलिंगी व्यक्तीचा अनुभव मिळवण्याकरता कोणाशी प्रणयचेष्टा करणे हे खरोखरच उचित आहे का?—पाहा मत्तय ७:१२.
माझ्या पालकांचे काय म्हणणे आहे? सहसा पालकांना असे धोके दिसतात जे तुम्हाला दिसत नाहीत. ते सुद्धा एकेकाळी जवान होतेच की? दोन तरुण इफिसकर ६:१-३) कदाचित, तुम्ही मोठे होईपर्यंत थांबावे एवढेच त्यांना वाटत असावे.
विरुद्धलिंगी व्यक्ती एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागल्यावर कोणत्या समस्या संभवू शकतात हे त्यांना माहीत असते! म्हणून तुमच्या पालकांनी संकेतभेटी करण्यासाठी नकार दिल्यास, त्यांच्याविरुद्ध बंड करू नका. (मी बायबलच्या नीतितत्त्वांचे अनुसरण करू शकेन का? “ऐन तारुण्याचा काळ” सरल्यावर एखादी व्यक्ती लैंगिक संवेदनांना योग्यप्रकारे हाताळू शकते—आणि तेव्हा देखील ते सोपे नसेल. जीवनातील ह्या टप्प्यात, कोणा विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत घनिष्ट नाते ठेवण्यास आणि ते नाते निष्कलंक राखण्यास तुम्ही खरोखरच तयार आहात का?
रोचक गोष्ट अशी की, अनेक युवक स्वतःला हेच प्रश्न विचारित आहेत आणि (आधी उल्लेखिलेली) मेरी ॲन ज्या निष्कर्षावर पोहंचली त्याच निष्कर्षावर पोहंचत आहेत. ती म्हणाली: “संकेतभेटींविषयी इतरांच्या मनोवृत्तींनी मी प्रभावित होणार नाही असा मी निर्धार केला. उचित वयोमानाचे आणि विवाह करण्यास तयार होईपर्यंत त्याचप्रमाणे एखाद्या पतीमध्ये जे गुण असावयास हवेत ते कोणा व्यक्तीमध्ये दिसत नाहीत तोपर्यंत संकेतभेटी करणार नव्हते.”
अशाप्रकारे, मेरी ॲन तो निर्णायक प्रश्न उपस्थित करते जो तुम्ही संकेतभेटी करण्याआधी स्वतःला विचारला पाहिजे.
चर्चेसाठी प्रश्न
◻ “संकेतभेटी” या संज्ञेचा तुम्हाकरता काय अर्थ होतो?
◻ संकेतभेटी करण्यास आपल्यावर दबाव आहे असे काही युवकांना का वाटते?
◻ ‘ऐन तारुण्याच्या काळात’ असणाऱ्या व्यक्तीशी संकेतभेटी करणे मूर्खपणाचे का आहे?
◻ संकेतभेटींच्या बाबतीत एखादा युवक ‘आपला देह उपद्रवापासून कसा राखू’ शकतो?
◻ एक मुलगा आणि मुलगी ‘केवळ मित्र’ असतात तेव्हा कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
◻ तुम्ही संकेतभेटी करण्यास तयार आहात हे तुम्हाला कसे समजू शकते?
[२३१ पानांवरील संक्षिप्त आशय]
“चुंबने निरस वाटू लागली आणि आम्ही एकमेकांच्या गुप्तांगांना स्पर्श करू लागलो. मला स्वतःची किळस वाटू लागली आणि शेवटी मला नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. माझा प्रियकर माझ्याकडून ‘लैंगिक संबंध ठेवण्याचीही’ अपेक्षा करू लागला”
[२३४ पानांवरील संक्षिप्त आशय]
‘कॅथीच्या भावना न दुखावता मी तिला कसे सोडू शकतो?’
[२३२, २३३ पानांवरील चौकट/चित्र]
एक मुलगा आणि मुलगी ‘केवळ मित्र’ असू शकतात का?
तथाकथित प्लॅटोनिक नातेसंबंध (पुरुष व स्त्रियांमधील जिव्हाळ्याचे संबंध ज्यात लैंगिकता नसते) तरुणांमध्ये सर्वसामान्य आहेत. १७ वर्षांचा ग्रेगरी असा दावा करतो: “मला मुलींशी बोलायला सोपं जातं कारण त्या सहसा जास्त सहानुभूतिशील आणि संवेदनशील असतात.” अशाप्रकारच्या मैत्री प्रगल्भ व्यक्तिमत्त्व मिळवण्यास मदत करतात असा इतर युवकांचा दावा आहे.
बायबल, ‘तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मान’ असे तरुणांना आर्जवते. (१ तीमथ्य ५:२) हे तत्त्व लागू केल्याने विरुद्धलिंगी व्यक्तींसोबत शुद्ध, हितकर मैत्री राखणे निश्चितच शक्य आहे. उदाहरणार्थ, प्रेषित पौल सडा पुरुष होता ज्याची अनेक ख्रिस्ती स्त्रियांबरोबर मैत्री होती. (पाहा रोमकर १६:१, ३, ६, १२.) त्याने, ‘त्याच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केलेल्या दोन स्त्रियांविषयी’ लिहिले. (फिलिप्पैकर ४:३) येशू ख्रिस्ताने देखील स्त्रियांबरोबर संतुलित, हितकर सहवास राखला. अनेक प्रसंगी, त्याने मार्था आणि मरिया यांच्या आदरातिथ्याचा आणि संभाषणाचा आनंद घेतला.—लूक १०:३८, ३९; योहान ११:५.
तथापि, “प्लॅटोनिक” मित्रत्व बहुतेकवेळा, त्याच्या नावाखाली होणारा रोमांस असतो किंवा वचनबद्ध न होता कोणा विरुद्धलिंगी व्यक्तीचे लक्ष आकर्षविण्याचा मार्ग असतो. त्याचप्रमाणे, भावना सहजपणे बदलू शकत असल्यामुळे सावधगिरी बाळगणे अगत्याचे आहे. डॉ. मॅरियन हिल्लर्ड यांनी इशारा दिला: “ताशी दहा मैल वेगाने जाणारा सुरळीत नातेसंबंध अचानक कोणत्याही इशाऱ्याविना ताशी शंभर मैलाच्या वेगात जाणाऱ्या बेभान कामवासनेत बदलू शकतो.”
सोळा वर्षांच्या माईकची जेव्हा १४ वर्षांच्या एका मुलीसोबत ‘मैत्री’ झाली तेव्हा त्याला हा धडा मिळाला: “लगेचच माझ्या लक्षात आलं, [की] दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांनाच नियमाने भेटत राहतात तेव्हा फक्त मित्र राहणे शक्य नसते. आमचा नातेसंबंध वाढतच गेला. लवकरच आम्हाला एकमेकांबद्दल काही वेगळंच वाटू लागलं आणि आजही एकमेकांविषयी आम्हाला खास भावना आहेत.” दोघांचेही वय विवाह करण्यासाठी योग्य नसल्यामुळे या भावना व्याकुळतेचे कारण बनल्या.
अतिशय सलगी ठेवल्याने आणखी दुःखद परिणाम होऊ शकतात. एका तरुणाने आपल्या एका मैत्रिणीला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला
कारण तिने तिच्या काही समस्या त्याला सांगितल्या होत्या. लवकरच, ते प्रेमस्पर्श करू लागले. त्याचा परिणाम? त्रस्त विवेक आणि एकमेकांबद्दल वाईट विचार. इतरांच्या बाबतीत पाहू जाता लैंगिक संबंध परिणीत झाले आहेत. सायकोलॉजी टुडे या पत्रिकेने घेतलेल्या सर्वेक्षणात असे प्रकट झाले: “जवळजवळ निम्म्या लोकांची (४९ टक्के) मैत्री लैंगिक संबंधात बदलली.” खरे म्हणजे, “एक तृतीयांश (३१ टक्के) जणांनी गेल्या महिन्यात मित्रासोबत लैंगिक संभोग केल्याचे सांगितले.”‘पण मला माझ्या मित्राचं आकर्षण नाही आणि त्याच्याशी [किंवा तिच्याशी] कधीच प्रेमसंबंध निर्माण होणार नाहीत.’ कदाचित असे असेलही. पण, भवितव्यात तुम्हाला कसे वाटेल? शिवाय, “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख.” (नीतिसूत्रे २८:२६) आपली अंतःकरणे धोकेदायक, फसवी, खऱ्या हेतूंबाबत आपली दिशाभूल करणारी असू शकतात. तसेच, तुमच्या मित्राला अथवा मैत्रिणीला तुम्हाविषयी काय वाटते याची जाणीव तुम्हाला खरोखर आहे का?
मित्रत्वाचा घटक (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात ॲलन लॉय मॅकगिनीस सल्ला देतात: “स्वतःवर फाजील भरवसा करू नका.” सावधगिरी बाळगा, कदाचित तुम्हाला उचित देखरेख असलेल्या कार्यहालचालींपुरतीच आपली संगत मर्यादित ठेवावी लागेल. अनुचित प्रेमभाव दाखवणे किंवा रोमँटिक वातावरणात एकटे राहणे टाळा. तुम्ही त्रस्त असता तेव्हा, विरुद्धलिंगी तरुण व्यक्तीला आपली समस्या सांगण्याऐवजी पालकांना आणि वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना सांगा.
पण, काळजी घेऊनही तुम्हाला नको असलेल्या रोमँटिक भावना उत्पन्न झाल्या तर काय? “खरे बोला,” आणि तुम्हाला काय वाटते ते दुसऱ्या व्यक्तीला कळवा. (इफिसकर ४:२५) यामुळे समस्या सुटली नाही तर दूर राहणे सर्वात उत्तम. “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २२:३) नाहीतर, मित्रत्वाचा घटक हे पुस्तक म्हणते त्याप्रमाणे: “आवश्यकता भासल्यास, सुटका करून घ्या. एखाद वेळेस, कितीही प्रयत्न केले, तरी विरुद्धलिंगी व्यक्तीबरोबरील आपली मैत्री हाताबाहेर जातेच आणि त्याचा शेवट कोठे होणार याची आपल्याला चांगलीच जाणीव असते.” मग, मात्र “माघार घेण्याची” वेळ येते.
[२२७ पानांवरील चित्र]
सहसा युवकांना संकेतभेटी करण्याचा किंवा जोडीने राहण्याचा दबाव असल्यासारखा वाटतो
[२२८ पानांवरील चित्र]
सहसा संकेतभेटींमुळे, नको त्याप्रकारे प्रेम दाखवण्याचा युवकांवर दबाव येतो
[२२९ पानांवरील चित्र]
संकेतभेटीच्या दबावांपासून मुक्त असलेल्या परिस्थितीत एखादी व्यक्ती विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकते
[२३० पानांवरील चित्र]
तथाकथित प्लॅटोनिक नातेसंबंधांमुळे बहुधा हृदयभंग होतो