व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न १०

मला बायबलमधून कशी मदत मिळेल?

मला बायबलमधून कशी मदत मिळेल?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

बायबलमध्ये असं म्हटलं आहे की प्रत्येक शास्त्रलेख “परमेश्वरप्रेरित” आहे. (२ तीमथ्य ३:१६) जर हे खरं आहे तर बायबलमध्ये तुमच्यासाठी मार्गदर्शन दिलं आहे.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: डेविड गाडी चालवता-चालवता एका अशा ठिकाणी पोहचला जिथं कोणतीच गोष्ट त्याच्या ओळखीची नव्हती. रस्त्यावरच्या पाट्या किंवा इतर काहीच ओळखीचं दिसत नव्हतं. त्याला जिथं जायचं होतं तिथं तो पोहचलाच नव्हता. आपण वाट चुकलोय हे डेविडला कळलं. गाडी चालवता-चालवता तो कुठेतरी रस्ता चुकला.

तुम्ही डेविडच्या जागी असता तर काय केलं असतं?

थांबा आणि विचार करा!

तुमच्याकडे पुढील पर्याय आहेत:

  1. १. कुणालातरी रस्ता विचारा.

  2. २. नकाशा पाहा किंवा जीपीएस वापरा.

  3. ३. गाडी चालवत राहा. चालवता-चालवता कसाबसा बरोबर रस्ता सापडेल.

तुम्ही जर पर्याय ३ निवडला, तर योग्य ठिकाणी पोहचण्याची शक्यता फारच कमी आहे.

पर्याय २, पर्याय १ पेक्षा चांगला वाटतो, कारण नकाशा किंवा जीपीएस या गोष्टी पूर्ण प्रवासात तुमच्यासोबत असतील आणि एका गाईडसारखी तुमची मदत करतील.

बायबलमधून सुद्धा तुम्हाला अशीच मदत मिळू शकते!

जगात सर्वात जास्त खप असलेल्या या पुस्तकामुळे:

  • तुम्हाला जीवनातील समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन मिळेल

  • तुम्हाला स्वतःबद्दल जास्त जाणून घेण्यास आणि एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत मिळेल

  • तुम्हाला सर्वात चांगलं जीवन कसं मिळवता येईल हे समजेल

जीवनातील महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळवा

आपण जेव्हापासून बोलायला शिकतो तेव्हापासून प्रश्न विचारू लागतो.

  • आभाळाचा रंग निळा का आहे?

  • तारे का लुकलुकतात?

नंतर मोठं झालो, की जगात जे चाललं आहे त्याबद्दल प्रश्न विचारू लागतो.

समजा या सर्व प्रश्नांची उत्तरं बायबलमध्ये आधीच दिलेली असली तर?

आज अनेक लोक म्हणतात बायबलमध्ये बऱ्याच कहाण्या आणि दंतकथा आहेत. ते जुन्या काळातलं आहे किंवा समजण्यास खूप कठीण आहे. पण बायबल हे तसं आहे का? की लोकांनी बायबलबद्दल जे ऐकलं आहे त्यामुळे ते असा विचार करतात? त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल का?

उदाहरणार्थ, लोकांना वाटतं बायबलमध्ये सांगितलं आहे की, हे जग देवाच्या हातात आहे. पण हे कसं शक्य आहे? जगातील परिस्थिती तर हाताबाहेर चालली आहे! या जगात सर्वत्र दुःख, त्रास, रोगराई, मृत्यू, गरिबी आणि विपत्ती या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींसाठी एक प्रेमळ देव जबाबदार कसा असू शकतो?

तुम्हाला या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल का? जग कोणाच्या हातात आहे हे बायबलमधून समजल्यावर तुम्ही कदाचित चकित व्हाल!

तुम्ही हेदेखील पाहिलं असेल की, या माहितीपत्रकात जे सल्ले दिले आहेत ते बायबलवर आधारित आहेत. बायबलमध्ये भरवशालायक मार्गदर्शन दिलं आहे, असं यहोवाच्या साक्षीदारांची खातरी पटली आहे. कारण “परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखवणे, सुधारणूक याकरता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६, १७) तुमच्या फायद्यासाठी तुम्ही हे प्राचीन असलेलं, पण आजच्या काळासाठी व्यावहारिक सल्ला देणारं पुस्तक पडताळून पाहायला हवं!