कौटुंबिक सौख्यानंदाची किल्ली शोधणे
अध्याय १
कौटुंबिक सौख्यानंदाची किल्ली शोधणे
१, २. हितकर कौटुंबिक जीवन कोणत्या चांगल्या गोष्टी पुरवू शकते? यास्तव कोणते प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे?
सौख्यानंदाच्या अनेक मानवी गरजांची तृप्तता कौटुंबिक वर्तुळात होऊ शकते. आम्ही सर्वच नेहमी या गोष्टींबद्दल उत्कंठित असतो की, आमची गरज भासावी, आवड असावी व प्रेम करावे, त्या तेथेच प्राप्त होऊ शकतात. उबदार कौटुंबिक नातेसंबंध या सर्व आकांक्षाची विस्मयकारक मार्गी पूर्तता करु शकतात. विश्वास, एकमत आणि करूणा यांचे वातावरण ते निर्माण करू शकते. मग घर हे बाहेरील त्रास आणि गोंधळ यांच्यापासून विश्राम देणारे खरे आश्रयस्थान बनते. मुलांना सुरक्षितता भासते आणि त्यांचे व्यक्तित्व त्याच्या सुप्त सामर्थ्याच्या समृद्धतेत हळुवारपणे बहरू लागते.
२ हे कौटुंबिक जीवन आहे, जे अशाच प्रकारे नांदत राहावे असे आम्ही सर्व पाहू इच्छितो. पण यापैकी काहीही आपोआप प्राप्त होत नाही. मग ते कसे साध्य करू शकतो? जगभरातील अनेक भागात कौटुंबिक जीवन आज एवढ्या त्रासात का आहे? मग ती कोणती किल्ली असू शकेल जी, वैवाहिक जीवनातील सौख्यता आणि वैवाहिक जीवनातील दैनावस्था तसेच, प्रेमळ आणि अविभक्त कुटुंब आणि जे थंड आणि विभक्तित अशातील फरक उघड करते?
३. कौटुंबिक जीवनाच्या महत्त्वाबद्दल ऐतिहासिक पुरावे काय स्पष्टता देतात?
३ तुम्हास जर तुमच्या कुटुंबियांच्या सुखाबद्दल आणि यशाबद्दल फार काळजी वाटते तर ती उत्तम गोष्ट आहे. कौटुंबिक योजनेच्या महत्त्वाच्या वर्णनात द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीया (१९७३) म्हणते:
“कुटुंब ही सर्वात पुरातन संस्था आहे. अनेक मार्गी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील तो मध्यबिंदू आहे. कौटुंबिक जीवनाच्या भक्कमतेवर अथवा कमकुवतपणा यावर आधारित असलेल्या अनेक संस्कृती एक तर बचाविल्या किंवा पार नाहीशा झाल्या.”
४, ५. अनेक कुटुंबात कोणती अनिष्ट चित्तवृती तुम्हास आढळते?
४ पण आज प्रेमाच्या बळकट बंधनाने कितीशी कुटुंबे दाट विणलेली आहेत? त्यांच्यातील किती अशी आहेत जी परस्परात काढलेले मायेचे बोल, दर्शविलेली कृतज्ञता आणि उदारता यांचा आनंद लुटीत आहेत? “घेण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे” या उद्गाराची सत्यता त्यातील किती जण शिकले?
५ आज सबंध जगभरात एका नवीन आत्म्याचा फैलाव होत आहे. जरी पाश्चिमात्य देशात प्रचलित झालेला असला तरी, जेथे पिढीजाद संस्कृतीमुळे कौटुंबिक जीवन स्थिरावलेले होते त्या पौर्वात्य आणि इतर देशातही तो प्रवेश मिळवित आहे. यातच आधुनिक विचारांची भर पडत आहे की, ‘तुम्हास हवे ते करा; इतर, इतरांचे पाहून घेतील.’ ‘शासन हे जुने बनले आहे; म्हणून मुलांना त्यांचा स्वतःचा मार्ग शोधून काढू द्या.’ तसेच ‘बरोबर कोणते व चुकीचे कोणते याचा न्याय करू नका.’ अधिकाधिक देशात घटस्फोट, युवकांतील गुन्हेगारी आणि प्रौढातील अनैतिकता बेसुमार वाढत आहे. मानसरोग चिकित्सक मानसशास्त्रज्ञ, पाद्रीगट आणि इतर सल्लागार विविध सल्ले देतात. पण कौटुंबिक एकात्मतेस भक्कमपणा आणण्याऐवजी विफलतेपासून सुटका मिळविण्याकरता अनेक सल्लागार अनीतीची क्षमा करतात, आणि काही वेळा तर तिची शिफारस करतात. या सर्व गोष्टींमुळे जे नासके पीक येते ते या म्हणीस पुष्टी देते की: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”
कौटुंबिक योजनेस इतिहासाचा पाठिंबा
६. जे काही प्राचीन काळातील ग्रीस व रोममध्ये घडले ते कुटुंबाच्या महत्त्वपूर्णतेचे स्पष्टीकरण कसे देते?
६ कौटुंबिक महत्तेबद्दलचे जे धडे इतिहास शिकवितो त्यांच्याकडे गंभीरतेत लक्ष देण्याच्या पात्रतेचे ते आहेत. द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन खंड दुसरा यामध्ये इतिहासकार वील डुरांट, ग्रीसमधील कुटुंबाचे खचणे कसे घडले यांचे वर्णन केल्यानंतर पुढे म्हणतात: “ग्रीसचे पतन करण्यात रोम यशस्वी झाले व त्यामागील खरे कारण पाहता, ग्रीक संस्कृतीचे आतल्याआत जे तुकडे झाले होते ते होते.” मग लेखक पुढे सांगतात की कुटुंब हेच रोमचे बळ होते. पण जेव्हा या कौटुंबिक योजनेचे लैंगिक अनैतिकतेमुळे तुकडे झाले तेव्हा त्या साम्राज्याचा ऱ्हास झाला.
७. इतर लोक गंभीर समस्यांना तोंड देत असता रोमी साम्राज्यातील काही लोक कौटुंबिक जीवनातील हितकारक गोष्टी अनुभवीत होते, ते का?
७ प्रत्यक्षात स्वतः इतिहास त्या प्राचीन म्हणीचे समर्थन करतो की: “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” पण ते हेही सूचित करते की मानवी ज्ञानाच्या पलिकडे असा एक मूळाधार आहे ज्याच्याकडे, परिणामांती कौटुंबिक वर्तुळ समृद्ध होईल असे मार्गदर्शन पुरविण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष दिले जाऊ शकते. इतिहासकार अहवाल देतात की रोमी साम्राज्याचा ऱ्हास होतेवेळी “यहुद्यातील कौटुंबिक जीवन नमुनेदार होते, आणि ख्रिश्चनांचा जो छोटासा समाज होता तो त्याजमधील देव, धर्म आणि पालकांचा आदर आणि व्यवस्थितपणा यांच्याद्वारे मौजमजेच्या वेडाने भरलेल्या मूर्तिपूजक जगास सतावीत होता.” (द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन, खंड ३रा, पृ. ३६६) या कुटुंबांना एवढे भेददर्शक कोणत्या गोष्टीने बनविले? त्यांच्यापाशी, पवित्र शास्त्र हे वेगळ्याच प्रकारचे मार्गदर्शक होते. त्यातील उपदेशास, देवाचे वचन या नात्याने त्यांनी स्वतःस जितके लागू केले, तितका हितकारक शांततामय कौटुंबिक जीवनाचा आनंद त्यांनी अनुभवला. त्या परिणामांनी ऱ्हासास चाललेल्या रोमी जगाच्या मनास टोचणी दिली.
८. जेव्हा कौटुंबिक समस्या सोडविण्याची वेळ येते तेव्हा पवित्र शास्त्राकडे लक्ष देणे इष्ट का ठरेल? (स्तोत्रसंहिता ११९:१००-१०५)
८ या आधीच्या परिच्छेदात ज्या म्हणींचा उल्लेख केला आहे त्या पवित्र शास्त्रातील आहेत. त्याच पुस्तकात, घेण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे, हे येशू ख्रिस्ताचे शब्द, माणूस जे काही परितो त्याचेच त्याला पीक मिळेल, हे प्रेरित झालेल्या प्रेषित पौलाचे वाक्य, आणि पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही, ही देवाचा संदेष्टा, यिर्मयाची घोषणा आढळते. (प्रे. कृत्ये २०:३५; गलतीकर ६:७; यिर्मया १०:२३) पवित्र शास्त्रातील ती तत्त्वे खरी ठरलेली आहेत. येशूने हेही म्हटले आहे: “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” (मत्तय ११:१९) कौटुंबिक समस्या सोडविण्यात शास्त्रवचनीय उपदेश जर खरोखरी उपयुक्त आहे, तर मग तो तेवढ्याच आदराने पाळू नये का?
९, १०. (अ) आनंदी कौटुंबिक जीवन अनुभवण्यास साहाय्यक सूचना आणि स्वाभाविक प्रेम दाखविणेच पुरे नाही ते का? (ब) याशिवाय आणखीन कशाची गरज आहे? (प्रकटीकरण ४:११)
९ विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयावर आधारित हजारो प्रकाशने आज उपलब्ध आहेत. अनेकात बरीचशी साहाय्यक माहिती मिळते. तरी कौटुंबिक जीवन सतत ढासळत आहे. याकरिता कौटुंबिक वर्तुळास जे दबाव भीती घालून आहेत, त्यांना तोंड देण्यास बळ पुरवील असे काही तरी अधिक हवे. पती आणि पत्नीमधील तसेच पालक आणि मुले यांच्यामधील स्वाभाविक प्रेमच याला बळ पुरविते. पण काही वेळा आणीबाणीची परिस्थिती गुदरली तर तेवढ्यावर भागत नाही असे अनेक कुटुंबांबद्दल शाबीत झाले आहे. तर आणखीन काय हवे असते?
१० केवळ विवाहित सोबत्याच्या आणि मुलांच्या किंवा पालकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याची आणि आसक्तता प्रदर्शित करण्याची जाणीव राखणे एवढ्याचीच गरज नाही. तर त्यांच्या सोबतच त्या सर्वसामर्थ्याबद्दल वाटणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवण्याची गरज आहे. त्याच्याविषयी, पवित्र शास्त्र, ‘स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्यावरून नाव देण्यात आले तो पिता,’ असा उल्लेख करते. तोच विवाह आणि कौटुंबिक जीवनाचा मूळ उत्पादक, मानवजातीचा सृष्टीकर्ता आहे व तो यहोवा देव आहे.—इफिसकर ३:१४, १५.
कुटुंब योजनेतील देवाची आस्था
११-१३. पृथ्वी आणि कौटुंबिक जीवनाबद्दल देवाकडील उद्देश काय आहे?
११ यहोवा देवास मानवजातीच्या गरजांची चांगली जाणीव आहे, व आम्ही आनंदी असावे हेच तो इच्छितो. याकरिताच त्याने कौटुंबिक जीवनावर उपदेश पुरविलेला आहे. पण याहीपेक्षा अधिक गौरवी उद्देश, तो जी कुटुंबाबद्दलची आस्था बाळगून आहे तीत प्रतिक्षेपित होतो. तो उद्देश काय आहे याचे विवेचन पवित्र शास्त्र करते. ते हे स्पष्ट करते की पृथ्वी ही अकस्मात प्रकट झाली नाही. आम्ही अकस्मात उद्भवलो नाही. तर यहोवा देवाने पृथ्वीस निर्माण केले, आणि ती कायम टिकावी व तिजवर कायम वस्ती असावी असे त्याने उद्देशिले. संदेष्टा यशयाने टिपले: “ज्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती राहावी म्हणून घडिली आहे.”—यशया ४५:१८.
१२ त्याचा उद्देश साध्य करण्याकरिता देवाने पहिल्या मानवी जोडप्याला उत्पन्न केले व त्यांना कुटुंब स्थापण्यास सांगितले: “नर व नारी असे त्यांना निर्माण केले. देवाने त्यास आशीर्वाद दिला, देव त्यास म्हणाला: ‘फलद्रूप व्हा. बहुगुणीत व्हा, पृथ्वी व्यापून टाका.’” (उत्पत्ती १:२७, २८) याशिवाय, त्यांच्या संततीने त्याच्या आज्ञेत राहावे आणि पृथ्वीची निगा राखावी हाही त्याचा उद्देश त्यांच्याकडून अपेक्षित होता. उत्पत्ती २:१५ म्हणते: “यहोवा देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन त्याची मशागत व राखण करण्यास ठेविले.” ती उद्यान समान परिस्थिती सबंध गोलार्धास ओघाओघाने वेष्टिणार होती, पृथ्वीची मशागत करण्यात आणि तिच्याठायीच्या साठ्यांचा उपयोग करून घेण्यात जगभरातील मानवी कुटुंबाठायीच्या गर्भित गुणांना अधिक तीक्ष्ण व समाधानी बनविण्याचे असंख्य योग प्राप्त झाले असते.
१३ आज पृथ्वीची लोकसंख्या ४ महापद्मापेक्षा अधिक आहे. पण ते सर्वच पृथ्वीबद्दल यहोवाचा जो उद्देश आहे त्याची पूर्तता करीत नाहीत. बहुसंख्य त्याची आज्ञा मानीत नाही, आणि पृथ्वीची देखभाल करत नाहीत. याउलट पाणी, हवा आणि जमीन यांना दूषित करून ते तिची नासाडी करीत आहेत. देवाच्या मूळ उद्देशास अनुसरून, त्याने हे सर्व केवळ थांबविण्याचेच नव्हे तर, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करण्याचे देखील भाकीत केले.—प्रकटीकरण ११:१८.
आम्ही तोंड देण्याची गरज असलेले प्रश्न
१४. कौटुंबिक जीवनाबद्दलचा देवाकडील उद्देश निष्फळ ठरणार नाही याबद्दल आम्ही खात्री का बाळगू शकतो?
१४ पृथ्वी आणि कौटुंबिक जीवन यांच्याबद्दलचा देवाचा उद्देश कधीच निष्फळ ठरणार नाही. तो घोषित करतो: “माझ्या मुखातून निघणारे वचन . . . माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यशया ५५:११) कुटुंब वर्तुळाची योजना देवाने केलेली आहे, आणि त्याच्या हालचालीबद्दलचा सल्लाही दिला आहे. त्याजकडील मार्गदर्शन, कदाचित तुम्हालाही ज्याला तोंड द्यावे लागेल अशा महत्त्वपूर्ण कौटुंबिक जीवनावरील प्रश्नांची उत्तरे देते.
१५-१७. (अ) कौटुंबिक जीवनावरील काही खरोखरचे महत्त्वाचे प्रश्न कोणते असू शकतात असे तुम्हाला वाटते? (ब) या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळविणे उत्तम का ठरेल?
१५ उदाहरणार्थ: कोणा व्यक्तिस विवाहाकरिता अनुरूप सोबती कसा मिळू शकेल? विवाहातील बोचक प्रकरणात सहमत कसे गाठता येईल? एकापेक्षा दोन मने बरी, पण विचार विनिमयानंतर निर्णय कोणी घ्यावयाचा? पती, पत्नीकडील आदर कसा मिळवू शकतो आणि हे त्याच्याकरिता महत्त्वाचे का आहे? पत्नीस पतीप्रेमाची गरज का आहे व याबद्दलची खात्री संपादन करण्यात ती काय करू शकते?
१६ मुलांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? काहीजन त्यांच्याकडे, प्रतिष्ठेचे चिन्ह, स्वस्ताईचे फळ किंवा उतारवयाकरिता विमा या दृष्टिकोनातून पाहतात; आणि इतर त्यांच्याकडे एक बोजा म्हणून पाहतात. पण पवित्र शास्त्र त्यांना आशीर्वाद असे म्हणते. ते तसेच आहेत हे कशावरून निश्चित होते? तालीम देण्यास कधीपासून सुरुवात व्हावी? शासन असावे का? जर होय, तर कितपत आणि कोणत्या प्रकारचे? कुटुंबात पीढीजात दरा उदयास आलेला असावा का? तो मिटविता येतो का? याहीपेक्षा अधिक उत्तम म्हणजे, त्याला उदयास येण्याचेच टाळता येईल का?
१७ या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवण्यामध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनात सौख्यानंद येण्यास पुष्कळसे साहाय्य प्राप्त होण्याचे आश्वासन आहे. त्याहून अधिक ते, हा आत्मविश्वास पुरवू शकतात, की अशीही एक असामान्य शक्ती, दया आणि सुज्ञानता आहे जिच्याकडे गरजेच्या कोणाही प्रसंगी तुम्ही वळू शकता, आणि ती तुमच्या कुटुंबास अनंतकालिक सौख्यानंदाकडे दिग्दर्शित करू शकते.
[अभ्यासाचे प्रश्न]
[४ पानांवरील पानभरुन चित्र]