व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चिरकालिक भवितव्यासाठी कौटुंबिक उभारणी

चिरकालिक भवितव्यासाठी कौटुंबिक उभारणी

अध्याय १४

चिरकालिक भवितव्यासाठी कौटुंबिक उभारणी

१. कौटुंबिक सुखाचा विचार करताना भविष्याचा विचार करणे हिताचे का असते?

 काळ सतत पुढे जात आहे. आपल्या मनात भूतकाळातील अनेक सुखद स्मृती असल्या तरी आपण भूतकाळात जगू शकत नाही. भूतकाळापासून व झालेल्या चुकांपासून आपण खूपच शिकू शकतो, परंतु आपल्याला केवळ वर्तमानकाळात जगता येते. जरी एखादे कुटुंब आता सुखात असले तरी वर्तमान काळ क्षणिक असतो. आजचा लवकरच काल होतो आणि वर्तमानाचा भूतकाळ व्हायला वेळ लागत नाही हे अटळ सत्य आहे. त्यामुळे कौटुंबिक सौख्याच्या हितासाठी भविष्याची जाणीव ठेवणे अगत्याचे आहे, त्याच्यासाठी आपण सज्जता ठेवली पाहिजे. आपण आज जे निर्णय घेऊ त्यावर आपले व आपल्या आप्तांचे भवितव्य अवलंबून आहे.

२. (अ) अनेकांना भविष्याचा विचार करावासा का वाटत नाही? (ब) आपल्याला सुखी भविष्याची इच्छा असल्यास आपण कोणाचा सल्ला घ्यावा?

भविष्यात काय आहे? बहुतकांचे भविष्याबद्दलचे विचार थोड्याशा वर्षांपुरते मर्यादित असतात. मृत्यूच्या तडाख्यात सापडून कुटुंबाची वाताहातच त्यांना भविष्यात दिसत असल्याने, बहुतेकांना फार पुढचा विचारही नकोसा वाटतो. अनेकांच्या सुखद क्षणांवर जीवनातील चिंतेचे सावट पडते, परंतु “स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते” त्याचा उपदेश ऐकल्यास जीवनाला अधिक अर्थ प्राप्त होतो.—इफिसकर ३:१४, १५.

३. (अ) पहिल्या मानवी जोडप्यापुढे देवाने कोणते भवितव्य ठेवले होते? (ब) तथापि एकंदरीत गोष्टी वेगळ्या का घडत गेल्या?

पहिल्या मानवी जोडप्याची निर्मिती झाली तेव्हा त्यांनी, किंवा त्यांच्या वंशजांनी काही वर्षे हालअपेष्टात काढून मग मरावे असा देवाचा हेतू नव्हता. त्याने त्यांना राहण्यासाठी नंदनवन दिले व अनंत आयुष्याचे भवितव्य त्यांच्या पुढे ठेवले. (उत्पत्ती २:७-९, १५-१७) परंतु ज्याच्यावर त्यांचे जीवन अवलंबून होते त्या देवाचा जाणून बुजून आज्ञाभंग करुन त्यांनी ते भवितव्य स्वतःच्या व वंशजांच्या हातून घालवले. पवित्र शास्त्र त्याचे स्पष्टीकरण देताना म्हणते: “एका माणसाच्या द्वारे [आदाम] पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

४. मानवजातीबद्दलचा आपला मूळ उद्देश सफल व्हावा म्हणून यहोवा देवाने काय व्यवस्था केली आहे?

परंतु देवाने प्रेमळपणे मानवी कुटुंबाच्या मुक्‍तीची तरतूद केली. त्याच्या स्वपुत्राने—येशू ख्रिस्ताने—आदामाच्या वंशजांच्या वतीने आपले अव्यंग मानवी जीवन अर्पण केले. (१ तीमथ्य २:५, ६) अशा रितीने आदामाने जे घालवले होते ते येशूने परत घेतले किंवा त्याची खंडणी दिली. त्यामुळे, या तरतूदीवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांसाठी अनंत जीवनाचा मार्ग खुला झाला, की ज्याद्वारे पहिल्या जोडप्या सारखी संधी प्राप्त व्हावी. आज गंभीर आजार वा अपघातात सुरवातीस न सापडल्यास माणूस ७० ते ८० वर्षे जगतो—काही मोजकीच आणखी थोडी वर्षे. “पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोमकर ६:२३.

५-७. (अ) आपण आताच देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्यास भविष्यात आपण कशाची आशा करू शकतो? (ब) आपल्या कुटुंबाला मदत करण्याविषयी तुम्हाला कोणता प्रश्‍न पडेल?

या सर्वाचा तुमच्या कुटुंबाकरता काय अर्थ होईल? ज्या व्यक्‍ती देवाच्या आदेशाला कान देऊन त्याचे आज्ञापालन करतील त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. (योहान ३:३६) कधीही अपयशी न ठरणाऱ्‍या आपल्या वचनात देव सध्याची दुःसह परिस्थिती निवारून त्याने स्थापलेल्या नीतीमान सरकारामार्फत सर्व मानवी व्यवहार योग्य रितीने हाताळले जातील असे वचन देतो. (दानीएल २:४४) हे दर्शवताना त्याचे वचन म्हणते की “स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे” अशी त्याची इच्छा आहे. (इफिसकर १:१०) मग सर्वत्र विश्‍वव्यापी ऐक्यता राहील. मानवजातही वंशिक वैर, राजकीय मतभेद, अविवेकी गुन्हे व लढाया यापासून मुक्‍त होऊन त्यांच्यात एकी होईल. कुटुंबे आपापल्या घरात निर्धास्त राहतील आणि “कोणी त्यास घाबरविणार नाही.” (स्तोत्रसंहिता ३७:२९, ३४; मीखा ४:३, ४) या सर्वाचे कारण म्हणजे तेव्हा रहाणारे लोक “देवाची प्रिय मुले या नात्याने . . . त्याचे अनुकरण करणारे” असतील, आणि ते ‘प्रीतीने चालतील.’—इफिसकर ५:१, २.

देवाच्या राजाच्या अधिपत्याखाली सबंध पृथ्वीचे नंदनवन करण्याच्या हर्षदायक योजनेसाठी सर्व मानवजात एकीने कामास लागेल. सर्वांना पुरुन उरेल इतक्या अन्‍नाची उपज करणारे उपवनासारखे ते वसतीस्थान होईल; कारण तशीच देवाची इच्छा आहे. देवाने वचन दिल्याप्रमाणे पृथ्वीवरील हरतऱ्‍हेचे प्राणी, पक्षी व जलचर मानवाच्या अंकित होतील व सुखास कारणीभूत होतील. (उत्पत्ती २:९; १:२६-२८) रोगराई, वृद्धापकाळाचे दुष्परिणाम आणि मरणाच्या भयाचे मानवाच्या जीवनानंदात विरजण लागणार नाही. एवढेच नव्हे तर जीवनाचा भव्य आस्वाद घेण्यासाठी “कबरेतील सर्व माणसे” सुद्धा परत येतील.—योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:१-५.

या भवितव्याच्या पूर्ततेचा फायदा तुमच्या कुटुंबियांना मिळण्यासाठी तुम्ही काय करु शकाल?

आपण काय करावे?

८. देवाची मान्यता मिळविण्यास आपण काय केले पाहिजे?

आपापल्या दृष्टीने “चांगले वागले” म्हणजे देवाच्या नवीन व्यवस्थेत आपला समावेश होईल असा चुकीचा ग्रह आम्हापैकी कोणीही करून घेऊ नये. त्यासाठी कोणत्या गरजा आहेत ते ठरवणे आपल्या हाती नाही, तो देवाचा हक्क आहे. येशू यहुदा प्रांतात शिकवीत असताना एके दिवशी एका माणसाने त्याला विचारले: “गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” त्याचे उत्तर होते: “तू आपला देव यहोवा याच्या वर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्‍तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर.” आणि “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर.” (लूक १०:२५-२८) आपली देवावर श्रद्धा आहे असे म्हणणे किंवा मधून मधून पवित्र-शास्त्र अभ्यासाच्या सभांना उपस्थित राहणे किंवा काही ठराविक लोकांसाठी कधीकधी चांगल्या गोष्टी करण्यापेक्षा त्यात बरेच काही गोवलेले आहे हे अगदी उघड आहे. त्यापेक्षा आपल्या विश्‍वासाचा आपल्या प्रत्येक विचारावर व कृतीवर सखोल परिणाम झाला पाहिजे व तो हरघडी प्रत्ययास आला पाहिजे.

९. जीवनाच्या दैनंदिन व्यवहाराबाबत योग्य दृष्टिकोन ठेवण्यास पवित्र शास्त्रातील कोणत्या तत्त्वांची मदत होते?

आपल्या व देवाच्या नात्याची सतत आठवण ठेवल्याने व त्याला जपण्याने आपल्याला शहाणपणाने वागता येईल व त्यामुळे देवाची मान्यता व मदतही प्राप्त होईल. (नीतीसूत्रे ४:१०) आपल्या जीवनातील व्यवहाराकडे देवाच्या व त्याच्या हेतूच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या जीवनातील समतोलपणा राखता येईल. आमच्या शारीरिक गरजांच्या तृप्तीसाठी आम्ही देवाचा पुत्र आम्हास आठवण करून देतो त्याप्रमाणे काम केलेच पाहिजे. तथापि, ऐहिक गोष्टींविषयी अनावश्‍यक काळजी करुन व त्या मिळवण्यासाठी धडपड करून आपले आयुष्य थोडेसुद्धा वाढू शकणार नाही. पण देवाचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळवण्यासाठी झटल्यास अनंत जीवन प्राप्त होते. (मत्तय ६:२५-३३; १ तीमथ्य ६:७-१२; इब्रीयांस १३:५) आपण कौटुंबिक जीवनाचा मनसोक्‍त उपभोग घ्यावा असेच देवालाही वाटते. परंतु कुटुंबाबाहेरील इतरांचा विसर पडण्याइतके त्यात मशगुल होणे हानीकारकच होय. त्यामुळे आपल्या कुटुंबाची वृत्ती सकुंचित होईल व देवाचे आशीर्वाद गमवावे लागतील. कौटुंबिक खेळीमेळीला योग्य स्थान दिल्यास त्यापासून सर्वोत्तम आनंद प्राप्त होतो. पण त्याच्यामुळे देवावरील आपल्या प्रेमाला दुय्यम स्थान मिळता कामा नये. (१ करिंथकर ७:२९-३१; २ तीमथ्य ३:४, ५) कौटुंबिक वा व्यक्‍तिगत कामे देवाच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरुन केल्यास आपले जीवन समाधानी होते—त्यात धन्यता वाटते; आणि त्याचबरोबर सार्वकालिक जीवनाचा पायाही घातला जाईल. यासाठीच “जे काही तुम्ही करता ते . . . यहोवासाठी म्हणून जिवेभावे करा. यहोवापासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे.”—कलस्सैकर ३:१८-२४.

कौटुंबिक नात्याने केलेली उभारणी

१०. पवित्र शास्त्राचा घरी अभ्यास करण्याचे महत्त्व केवढे आहे?

१० कुटुंबातील सर्व घटक एकाच ध्येयासाठी झटत असतील तर देवाच्या वचनाचा अभ्यास सर्व कुटुंबाने एकत्रितपणे करणे हिताचे, नव्हे, अत्यंत आवश्‍यक आहे. प्रत्येक व्यक्‍तिला देवाच्या हेतूच्या दृष्टिकोनातून पाहता येणाऱ्‍या व केलेल्या गोष्टी दर दिवशी विदित करता येतील. (अनुवाद ६:४-९) सर्वांनी मिळून पवित्र शास्त्राचे वाचन व अभ्यास करण्यासाठी ठराविक वेळ राखून ठेवणे चांगले. त्यासाठी इतर संबंधित वाङ्‌मयाचाही उपयोग करता येईल. यामुळे कुटुंबामध्ये एकी निर्माण होते. मग उद्‌भवणाऱ्‍या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कुटुंबातील व्यक्‍ती देववचनाच्या आधाराने एकमेकांना मदत करु शकतील. पवित्र शास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी इतर गोष्टी न करण्याचा आदर्श पालकांनी घालून दिल्यास देववचनाबद्दल मुलांच्या मनात नितांत आदर व आवड उत्पन्‍न होते. देवाचा पुत्र म्हणाला: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर यहोवाच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.”—मत्तय ४:४.

११. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुटुंबात कोणत्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे?

११ “शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.” (१ करिंथकर १२:२५) हे कुटुंबाच्या बाबतीत खरे असले पाहिजे. विवाहित जोडप्यापैकी एकाने आपल्याच आध्यात्मिक ज्ञानार्जनात अतिशय गढून जाऊन आपल्या सहचऱ्‍याच्या हिताबाबत निष्काळजी होऊ नये. उदाहरणार्थ, एखादा माणूस आपल्या पत्नीच्या आध्यात्मिक गरजेकडे दुर्लक्ष करु लागला तर कालांतराने त्या दोघांची ध्येये एक राहणार नाहीत. देव-वचनाचा दैनंदिन जीवनातील उपयोग व त्यामुळे मिळणारा आनंद मुलांसमोर ठेवण्याची काळजी पालकांनी घेतली नाही तर पुढे असे दिसून येईल की मुलांची मने भोवतालच्या ऐहिक वृत्तीकडे वळलेली आहेत. संपूर्ण कुटुंबाच्या सार्वकालिक हितासाठी देव-वचनांचे ज्ञान नियमितपणे घेणे अत्यंत अगत्याचे आहे.

१२. कोणाची संगत आपण टाळू नये?

१२ ‘प्रीतीची सुरुवात घरी होते’ तरी ती येथेच संपत नाही. देववचनात भाकीत केल्याप्रमाणे, या कठीण दिवसांतही सर्व पृथ्वीवरील त्याचे खरे उपासक बहीण-भावांप्रमाणे एकत्रित राहतील. “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः एका घरचे झालेल्यांचे” म्हणजेच ‘जगातील [आमच्या] बंधुवर्गाचे’, “बरे करावे.” (गलतीकर ६:१०; १ पेत्र ५:९) ह्‍या “घरच्यां” बरोबर सर्व कुटुंबासह एकत्र येण्याचा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक आनंद झाला पाहिजे.—इब्रीयांस १०:२३-२५; लूक २१:३४-३६.

१३. ख्रिस्ती मंडळी बाहेरील लोकांबाबत आपणावर कोणती जबाबदारी आहे?

१३ परंतु “देवाच्या घरात” असलेल्यांपुरते—त्याच्या मंडळीपुरते—आपले प्रेम संकुचित नसावे. (१ तीमथ्य ३:१५) देवाच्या पुत्राने म्हटल्याप्रमाणे आपल्यावर प्रीती करणाऱ्‍यांवर आपण प्रीती केली तर “त्यात विशेष ते काय करिता?” आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे व्हावयास आपण मनापासून सर्वांना दया व मदत केली पाहिजे—त्यांना सुवार्ता सांगण्यात पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या संपूर्ण कुटुंबाने अशी ईश्‍वरी प्रीती व्यक्‍त केल्यास आपल्या जीवनाला अर्थ व वळण प्राप्त होते. देवाने दाखवून दिल्याप्रमाणे आपण—मुले व पालक—सर्व प्रीती व्यक्‍त करण्याचा अनुभव घेऊ शकतो. (मत्तय ५:४३-४८; २४:१४) अशा मनःपूर्वक केलेल्या प्रीती-दानामुळे मिळणाऱ्‍या आनंदात आपण सहभागी होऊ शकतो.—प्रे. कृत्ये २०:३५.

१४. कोणता सल्ला आचरल्यास कौटुंबिक सुखाची वृद्धी होते?

१४ अशी प्रीती व्यक्‍त करणाऱ्‍या कुटुंबापुढे किती उज्ज्वल भवितव्य आहे! देवाचे वचन आपल्या जीवनात कसे लागू करावे हे ते शिकलेले असतात; आणि त्याचा परिणाम म्हणजे सर्वाप्रमाणे त्यांना भेडसावणारे अनेक प्रश्‍न व समस्या असल्या तरी त्यांना आताही अनेक फायदे प्राप्त होतात. तथापि, त्यांची नजर वर्तमान काळाच्या पलिकडे जाते; ते मृत्यू येऊन सर्व काही नष्ट करण्याआधीच्या काही वर्षांचा विचार करीत नाहीत. देवाच्या अभिवचनावर त्यांचा विश्‍वास असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्‍ती अनंत भविष्यासाठी उभारणी करत राहील.

१५. या पुस्तकात दिलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनापासून होणाऱ्‍या फायद्याबाबत आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचाराल?

१५ पवित्र शास्त्रानुसार देवाने ही पृथ्वी मानवांनी वसती करावी, या हेतूने घडवली असल्याचे या पुस्तकात दाखवून देण्यात आले आहे. या उद्देशाच्या पूर्ततेसाठी त्याने कुटुंबाची स्थापना केली. यहोवा देवाने पित्यांना, मातांना, व मुलांना मार्गदर्शक तत्त्वेही दिली. त्याचे विवेचन येथे केले आहे यातील निदान काही तत्त्वे तुम्ही आपल्या कुटुंबात लागू करू शकला का? त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन अधिक आनंदी झाले काय? आम्हाला तशी आशा आहे. पण तुमचे व तुमच्या कुटुंबाचे भवितव्य काय?

१६-१८. या पृथ्वीबाबत यहोवा देवाने कोणत्या व्यवस्थेची योजना केलेली आहे?

१६ या पृथ्वीची देखभाल करण्यात, तिच्या शेतात भरपूर धनधान्य पिकवण्यात, तिच्या वाळवंटांत बहर आणण्यास हातभार लावण्यास तुम्हाला आवडेल का? कांटे व कुसळे जाऊन त्याऐवजी फळबागा, हिरवी गर्द वने आलेली पहावयास तुम्हाला आवडेल का? बंदुका, आंसुड व लोखंडी सळ्यांऐवजी प्रेमाने व परस्पर विश्‍वासाने प्राण्यांवर सत्ता गाजवण्यास तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील व्यर्क्‍तिना आवडेल का?

१७ जेव्हा तरवारींचे फाळ व भाल्यांचे कोयते केले जातील, युद्ध साहित्य उत्पादन करणारे व युद्धे भडकविणारे नसतील अशा समयाची तुम्ही चातकाप्रमाणे वाट पहात असाल तर यहोवाच्या नवीन व्यवस्थीकरणात तुम्ही अत्यंत आनंदाने राहाल. जुलमी राजकीय सत्ता, लोभी अर्थव्यवस्था व धार्मिक दांभिकपणा या सर्व गोष्टी भूतकाळात जमा झालेल्या असतील. प्रत्येक कुटुंब आपापल्या शेतात व बागेत भयमुक्‍त राहील. पुनरुत्थित मुलांच्या व पक्षांच्या चिवचिवाटाने ही पृथ्वी भरुन जाईल तसेच औद्योगिक प्रदूषणाऐवजी फुलांच्या सुगंधाने हवा सुगंधीत होईल.—मीखा ४:१-४.

१८ पंगू हरिणाप्रमाणे उड्या मारीत आहेत, मुके गात आहेत, आंधळ्यांचे डोळे उघडलेले आहेत, बहिरे ऐकू शकत आहेत, दुःख व सुस्काऱ्‍याऐवजी चेहऱ्‍यावर स्मित, अश्रूंऐवजी हसू, मृत्यू व वेदनांऐवजी सुदृढता व अनंत जीवन पहाण्याची तुमची मनापासून इच्छा असल्यास तुम्ही स्वतः आपल्या कुटुंबासह योग्य ती पाऊले आताच टाका. या सर्व उत्तम गोष्टी यहोवाच्या नवीन व्यवस्थीकरणात सदैव असतील. ती प्राप्त होण्यासाठी आताच झटा.—प्रकटीकरण २१:१-४.

१९. तुम्ही व तुमचे कुटुंब देवाच्या नवीन व्यवस्थीकरणाच्या आशीर्वादांचा आनंद उपभोगणाऱ्‍यांपैकी कसे असू शकाल?

१९ त्यावेळी पृथ्वीवरील आनंदी लोकांमध्ये तुमच्या कुटुंबाचा समावेश असेल का? ते तुमच्यावर अवलंबून आहे. आपल्या कौटुंबिक जीवनात यहोवाच्या शिकवणींचे आताच पालन करा. सर्व कुटुंब मिळून, नवीन व्यवस्थीकरणात राहण्याची योग्यता आताच सिद्ध करा. देव-वचनांचा अभ्यास करा, ती आचरणात आणा व भविष्यातील या आशेविषयी इतरांना सांगा. असे करण्याने तुम्ही देवासमोर कुटुंबाचे “चांगले नाव” कमवाल. “चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय. प्रेमयुक्‍त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.” असे नाव यहोवा विसरणार नाही: “धार्मिकाच्या स्मरणाने धन्यता वाटते.” (नीतीसूत्रे २२:१; १०:१७) यहोवाच्या कृपेने तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अत्यंत आनंदाचे अनंत भवितव्य प्राप्त होवो.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८९ पानांवरील पानभरुन चित्र]