व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे

तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे

अध्याय २

तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे

१-३. मत्तय ७:२४-२७ नुसार जीवनाचे खरे यश कशावर अवलंबून असते?

 घर, जीवन किंवा विवाह ही ज्याच्यावर आधारित असतात तो पाया जसा घालाल, त्यावर त्याचे यश अवलंबून असते. येशूने दाखले देण्यात एके प्रसंगी दोन व्यर्क्‍तिचा उल्लेख केला. एक शहाणा, ज्याने आपले घर खडकावर बांधले, आणि दुसरा मूर्ख ज्याने त्याचे घर वाळूवर बांधले. जेव्हा वादळ उठले तेव्हा पुराचे पाणी आणि वारा त्या घरांना लागले; जे खडकावर बांधले होते ते टिकले, पण जे वाळूवर होते ते अगदी कोसळून पडले.

घरे कशी बांधावीत याचे शिक्षण येशू लोकांना देत नव्हता. तर उत्तम पायावर त्यांच्या जीवनाची उभारणी करणे केवढे अत्यावश्‍यक आहे यावर तो जोर देत होता. देवाकडील संदेश वाहक या नात्याने तो म्हणाला: “जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका मनुष्यासारखा” आहे, जो आपले घर खडकावर बांधतो. पण “जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही” तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, ज्याने आपले घर वाळूवर बांधले.—मत्तय ७:२४-२७.

हे लक्षात घ्या की, दोन्ही प्रकरणात येशूने हे स्पष्ट केले की सुज्ञ उपदेश ऐकणे व काय करावयाचे याची जाणीव राखणे एवढेच त्यात नाही तर, यश आणि अपयश यात जी गोष्ट फरक दर्शविते, ती म्हणजे जे काही सुज्ञ उपदेश सांगतो त्यानुसार करणे. “जर ह्‍या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.”—योहान १३:१७.

४. पहिल्या मानवी जोडप्यांच्या विवाहाकडून आम्ही कोणत्या गोष्टी शिकू शकतो? (उत्पत्ती २:२२–३:१९)

हे विवाहाच्या बाबतीत निश्‍चितच खरे आहे. जर आम्ही आमच्या विवाहाची उभारणी खडकासमान पायावर केली, तर तो जीवनातील दबावात टिकून राहील. पण हा उत्तम पाया कोठून प्राप्त होतो? तो विवाहाचा उत्पादक यहोवा देव याच्याकडून प्राप्त होतो. पहिल्या मानवी जोडप्याला पती आणि पत्नी या नात्याने एकमेकांच्या जवळ आणून त्याने विवाह रचनेची सुरवात केली. मग त्यांच्याच हिताच्या सुज्ञ सूचना त्याने त्यांना दिल्या. त्यांनी या सुज्ञ सूचना पाळण्यावर हे निश्‍चित ठरणार होते की, त्यांचा भविष्यकाळ अनंतकालिक गौरवाचा असेल किंवा काहीच नसेल. त्या दोघांनाही देवाकडील सूचनांची समज होती, पण, दुःखाने म्हणावे लागते, त्यांनी या मार्गदर्शिकांच्या आज्ञापालनापासून दुरावण्यात स्वार्थाला सहभागी होऊ दिले. त्यांनी उपदेशाकडे दुर्लक्ष करण्याचे पसंद केले, आणि याच्या परिणामात, वाळूवर बांधलेल्या घराचे वादळात जे काही झाले तसे त्यांचा विवाह आणि त्यांचे जीवन अगदी कोसळून पडले.

५, ६. विवाहितांस आणि जे विवाह करू इच्छितात अशांना देव कोणती मदत पुरवितो?

त्या पहिल्या जोडप्याला यहोवा देवाने विवाहबद्ध केले, पण आजच्या काळात विवाहेच्छुकरिता तो स्वतः विवाहाची तयारी करीत नाही. तथापि, आनंदी विवाहित जीवनाकरिता त्याच्याकडील सुज्ञ उपदेश आजही उपलब्ध आहे. आज, हा उपदेश पाळून चालणार की नाही, हा निर्णय घेणे विवाह करू इच्छिणाऱ्‍या प्रत्येक वैयक्‍तिकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. देवाचे वचन हेही स्पष्ट करते की भावी सोबत्याची निवड करण्यात सुज्ञ निर्णय घेता येण्यास साहाय्याकरता आम्ही त्याजकडे मदतीची याचना करू शकतो.—याकोब १:५, ६.

अर्थात, जगातील वेगवेगळ्या भागातील परिस्थिती बरीच भिन्‍न असते. अनेक भागात आज पुरूष आणि स्त्रिया विवाहसोबत्यांची निवड स्वतः करीतात. तरी जगातील बऱ्‍याच मोठ्या लोकसंख्येत अद्यापही विवाह योजना पालकांकरवी, किंवा “जुळविणारे,” यांच्या मध्यस्तीने पार पडतात. काही भागात, मुलीच्या पालकांना “हुंडा” दिला तरच, पुरुषाला बायको मिळते व काही वेळा ही किंमत एखाद्या पुरुषाकरता विवाहास त्याच्या आटोक्याबाहेरचा बनविते. तथापि, कसलीही परिस्थिती असो, पवित्र शास्त्र असा उपदेश पुरविते जो विवाहाच्या टिकाऊ यशास साहाय्यक ठरू शकतो.

प्रथम स्वतःस ओळखा

७-१० (अ) विवाह करण्याच्या विचारात असता, त्या व्यक्‍तिला स्वतःबद्दल काय ओळखून असण्याची गरज आहे? ते त्याला कसे शोधता येईल? (ब) विवाह करण्यामागील कारणांच्या खरेपणाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

विवाहाकडून तुम्ही काय अपेक्षिता? तुमच्या—शारीरिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक—गरजा कोणकोणत्या आहेत? तुमच्या इष्टता, तुमची उद्दिष्टे कोणती आहेत, आणि त्यांना साध्य करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास तुम्हास स्वतःची ओळख असलीच पाहिजे. वाटते तेवढे हे सोपे नाही. तर स्वतःची पारख करण्यास भावनात्मक प्रौढतेची गरज आहे, आणि तितके असूनही आम्ही कसे आहोत, हे प्रत्यक्षात पाहणे सोईचे होत नाही. हेच प्रेषित पौलाने १ ले करिंथकर ४:४ मध्ये सूचित केलेले आहे: “जरी माझे मन माझ्याविरूद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही, माझा न्यायनिवाडा करणारा यहोवा आहे.”

एके प्रसंगी ईयोब नामे गृहस्थास, न समजलेल्या गोष्टींची जाणीव करून द्यावी असे उत्पन्‍नकर्त्याला वाटले म्हणून देव त्याला म्हणाला, “मी तुला हे विचारतो, मला सांग.” (ईयोब ३८:३) प्रश्‍न विचारणे आम्हाला स्वतःला ओळखण्यात साहाय्य करील आणि आमच्या उद्दिष्टांचा शोध घेईल. याकरिता विवाहात वाटणाऱ्‍या तुमच्या रसिकतेविषयी स्वतःस प्रश्‍न विचारा.

अन्‍न, वस्त्र आणि निवारा या सारख्या भौतिक गरजांच्या समाधानार्थ तुम्ही विवाहबद्ध होऊ इच्छिता का? आम्हा सर्वांच्या या मूलभूत गरजा आहेत, कारण पवित्र शास्त्रही म्हणते: “आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” आणि लैंगिक भावनांची गरज? तीही स्वाभाविक इच्छा आहे. “वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे!” (१ तीमथ्य ६:८; १ करिंथकर ७:९) ते तुम्ही केवळ संगतीकरता करू इच्छिता का? देवाने ही जी विवाह योजना आखली त्यामागील मुख्य कारण तेच होते. दुसरे म्हणजे, दोन व्यर्क्‍तिनी हर कामात सहकारी असावे. (उत्पत्ती २:१८; १:२६-२८) कोणाही चांगल्या कामास पुरे करणे हे समाधानाचे असते व त्याचे प्रतिफळ मिळालेच पाहिजे: “प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१३.

१० एकमेकांसोबत प्रेमात असलेल्या व्यक्‍ती आधीपासूनच हा दृष्टिकोन ठेवून असतात की, हृदय हे भावनांचे द्योतक आहे. पण या हृदयाबद्दल पवित्र शास्त्र एक चलबिचल करणारा प्रश्‍न विचारते: “त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९) तुमच्या हृदयात काय आहे याची तुम्हास खात्री आहे का?

११. वैवाहिक जीवनात कोणत्या मूळ भावनात्मक गरजांची समाधानकारक पुरवणूक झाली पाहिजे?

११ काही वेळा शारीरिक आकर्षण आम्हास भावनांच्या इतर गरजांकडे दुर्लक्ष करण्यास लावते. विवाह सोबती धुंडाळताना त्याच्याकडूनही समजुतदारपणा चांगुलपणा आणि कळवळा ही मिळविण्याची गरज पुरी होऊ शकेल का, यावर तुम्ही पुरेसा जोर देता का? आम्हा सर्वांच्या मूलभूत गरजा या आहेत: आम्ही ज्याच्या जवळ असू शकू असे कोणी, भरवशाचे कोणीतरी, न दुखविता ज्याला आमचे अंतःकरण खुले करू शकतो असे असावे; असा कोणी जो त्याच्या ‘कळवळ्याची कवाडे आम्हाकरता बंद’ करणार नाही. (१ योहान ३:१७) तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या सोबत्याला देऊ शकता का, आणि त्याच्या बदल्यात तो किंवा ती तेच तुम्हास देईल का?

१२. आनंदी विवाहित जीवनाकरिता केवळ शारीरिक आणि मानसिक भावनांचीच तृप्ती पुरेशी नाही ते का?

१२ येशूने म्हटले होते: “आध्यात्मिक गोष्टींबद्दल जाणीव असणारे ते धन्य” (मत्तय ५:३, NW) तुमची आध्यात्मिक क्षुधा काय आहे? ती तुम्हाला चांगले मोठे काम मिळावे, श्रीमंत व्हावे, खूप मालमत्ता मिळवावी असे कथित करते का? तसे जरी असले तरी या खटाटोपी अंतर्गत शांती व समाधान मिळवून देतात का? सहसा त्याकडून काहीच प्राप्त होत नाही. मग आम्हाठायी ही आवड असण्यास हवी की आमच्या सर्व शारीरिक गरजा शमल्यानंतरही, आत्मिक क्षुधा सर्व व्यर्क्‍तिठायी तशीच राहते. आमचा आत्मा—आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत, आम्ही येथे का आहोत आणि येथून आम्ही कोठे जाणार हे जाणण्यास—ओळखण्यास नेहमी आतुर असतो. या आध्यात्मिक गरजांची आणि त्या पुऱ्‍या करण्याच्या मार्गाची जाणीव राखणारी सद्‌सद्‌विवेक बुद्धी तुम्हाठायी आहे का?

अनुरुपता

१३. आनंदी वैवाहिक जीवनात तुमच्या स्वतःच्या गरजांच्या सोबतीत तुम्ही कोणते तारतम्य जाणून असावे?

१३ शरीर, मन आणि आत्मा यांच्या या सर्व गरजांची तुम्हास जर समज आहे, तर तुमच्या भावी विवाह सोबत्यालाही त्यांच्याबद्दलची तेवढीच समज आहे हे तुम्ही जाणता का? विवाहातील सौख्यानंदासाठीच्या तुमच्या स्वतःच्या काही विशिष्ट गरजांचीच तुम्हाला जाणीव असावी एवढेच सर्व नसून, तुमच्या सोबत्याच्या गरजांचेही तारतम्य जाणून असले पाहिजे. तुमचा सोबती देखील आनंदी असावा असे तुम्ही इच्छिता. एक जर असंतोषित असला तर दोघेही दुःखी बनतात.

१४. अनेक विवाहात, आम्ही विसंगत आहोत असे विवाहित सोबत्यांना का वाटत असते?

१४ विसंगतता या आधारावर आज अनेक विवाहांचा असंतोषितपणा किंवा घटस्फोटात शेवट होत आहे. विसंगतता हा शब्द तर फार मोठा आहे, पण विवाहात त्याचे महत्त्व त्याहूनही मोठे आहे. दोन व्यर्क्‍तिची जोडी जर बरोबर जमली नाही तर जीवन खडतर बनते. अशा परिस्थितीत आम्हास मोशेद्वारेच्या नियम शास्त्रात दोन भिन्‍न जातीच्या जनावरांना नांगरास जुंपण्यावर जी दयाशील बंदी होती व तिजमुळे जी कष्टमय अवस्था उद्‌भवते त्याची आठवण होते. (अनुवाद २२:१०) ज्यांची जोडी बरोबर जमविलेली नसते, तरीही त्यांना विवाहात जखडले जाते त्यांचे तसेच होते. जेव्हा विवाह सोबत्यांच्या आवडी निवडीत फरक असतो आणि थोडक्याच गोष्टीत समविचारी असतात, अशा अवस्थेत विवाहबंधन मोठ्या तणावाखाली येते.

१५, १६. भावी विवाह सोबत्यासोबत कोणत्या गोष्टींची चर्चा व कशाप्रकारे केलेली बरे?

१५ “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात,” असे पवित्र शास्त्र म्हणते. (नीतीसूत्रे १५:२२) विवाहाबद्दलचा विचार करताना व्यावहारिक गोष्टींना विचारात घेतले का? पुरुष जे काम करतो ते त्याच्या विवाहात कसे जमेल? कारण तेच हे ठरवील की, तुम्ही कोठे राहता व व्यावहारिक गरजा पुऱ्‍या करण्यास हातात केवढा पैसा असेल. जमाखर्च कोण हाताळील? पत्नीने काम करण्याची गरज भासेल का व ते पसंतीचे असेल का? नातेवाईकांसोबत, खास तर दोन्ही घरच्या नातेवाईकांसोबत कसा संबंध असला पाहिजे? प्रत्येकास लैंगिकतेबद्दल, मुलांबद्दल आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल काय वाटते? एकास दुसऱ्‍यावर अधिकार चालवावासा वाटतो का, किंवा समजूतदारपणा नातेसंबंधावर वर्चस्व राखील?

१६ हे सर्व व यासारखेच इतरही प्रश्‍न शांततेने व व्यावहारिकतेत विचारात घेतले जाऊन, तुम्ही आनंदात राहू शकाल अशाप्रकारे सोडविले जाऊ शकतात का? समस्या उद्‌भवल्यास त्यांना तोंड देणे व सोडविणे होऊ शकते का, व दळणवळणाचा मार्ग नेहमीच खुला राहील का? कोणाही यशस्वी विवाहाची फलश्रुती यावरच अवलंबून आहे.

१७-१९. विवाहातील अनुरूपतेवर कुटुंबाच्या पार्श्‍वभूमीचा का परिणाम असतो?

१७ दोन्ही व्यक्‍ती जर सारख्याच पार्श्‍वभूमीच्या असल्या तर त्यांच्यामध्ये अधिक अनुरुपता असते. एड टू बायबल अन्डरस्टँडिंग पुस्तक, पान १११४ वर, पवित्र शास्त्र काळातील विवाहाबद्दल वाच्यता करते:

“हेच दिसते की कोणा पुरुषाने जर वधू शोधणे आहे तर सर्वसाधारण पद्धत ही होती की त्याच्या आप्ताच्या किंवा वंशाच्याच वर्तुळातील शोधावी. हे तत्त्व जे काही लाबानाने याकोबास म्हटले त्यावरून सूचित होते की, ‘[माझी मुलगी] दुसऱ्‍याला द्यावी त्यापेक्षा तुला द्यावी हे बरे!’ (उत्प. २९:१९) हे खासकरून, यहोवाच्या भक्‍तात बारकाईने पाळले जाई, ज्याचे उदाहरण अब्राहामात दिसते की त्याने दासास त्याच्या मुलाकरता, इसहाकाकरता, वधू पाहण्यास तो ज्यांच्यामध्ये राहत होता त्या कनान्यांऐवजी, स्वदेशी, स्वतःच्या आप्ताकडे पाठविले. (उत्प. २४:३, ४)”

१८ अर्थात, याचा अर्थ असा होत नाही की कोणाही व्यक्‍तिने आज त्याच्याच आप्तात विवाह करावा हे बरे, कारण तसे केल्यास वंशावळीच्या समस्या उद्‌भवतील आणि परिणामात दोषी संतती उदयास येईल. परंतु कौटुंबिक वर्तुळाची पार्श्‍वभूमी, लोक ज्या मोलाने त्या व्यक्‍तिकडे पाहतात त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. बाळपणात आणि युवक वयात कोणाही व्यक्‍तिच्या वागणूकीवर आणि भावनांवर कौटुंबिक वातावरणाचा प्रभाव होत असतो हे स्वाभाविक आहे. जेव्हा दोन्ही पक्षाकडील पार्श्‍वभूमी सारखीच असते तेव्हा त्यांना ‘त्याच भूमीत आणि त्याच वातावरणात बहरण्यास’ सोपे जाते. तथापि, भिन्‍न पार्श्‍वभूमीचे आणि वंशाचे व्यक्‍ती जरी असले तरी, ते वैवाहिक जीवनात चांगली जुळणी करून घेऊ शकतात. विशेषकरून, दोघेही जर भावनात्मकरित्या प्रौढ असले तर ते अधिक सोपे होते.

१९ यावरून हे स्पष्ट आहे की, तुमच्या भावी सोबत्याच्या कुटुंबाविषयी माहिती मिळविल्यास ती फायदेकारक ठरेल. त्यात हेही पाहा की, तो किंवा ती कुटुंबाशी पालकांशी, आणि भाऊ बहिणींशी कसा नातेसंबंध राखून आहे. तो किंवा ती, वयस्करांना कसे वागवतो किंवा वागवते, किंवा तरुण आणि लेकरे यांच्याबरोबर कसे जुळते घेतो किंवा घेते?

२०, २१. सोबत्याच्या निवडीत कोणा एखाद्याच्या कमतरतेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?

२० एवढी सर्व दक्षता करूनही तुम्ही हे अद्याप आठवणीत ठेवलेच पाहिजे की, दोन व्यर्क्‍तिमधील अनुरुपता कधीच पूर्णत्वातील नसेल. दोघातही काही ना काही कमतरता असेल. काही विवाहाआधी दिसून येतील तर काही नंतर लक्षात येतील. मग काय करावयाचे?

२१ या कमतरता स्वतः विवाहास अपयशी बनवीत नाही तर, सोबत्यास त्यांच्याबद्दल कसे वाटते यावर ते अवलंबून आहे. जे चांगले ते दोषांना झाकते हे तुमच्या प्रत्ययास आले का, किंवा दोषावरच बोट ठेवून तुणतुणे वाजविता? जशी तुम्हास गरज भासते व तुम्हालाही सूट मिळणे व्यवहार्य आहे असे वाटते तसे तुम्हीही सूट देण्यात लवचीक आहात का? प्रेषित पेत्राने म्हटले: “प्रीती पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) मग, ज्याच्याशी तुम्ही विवाहबद्ध होण्याचा निश्‍चय केला आहे त्याजबद्दल याप्रकारचे प्रेम तुम्हाठायी आहे का? जर नाही, तर त्या व्यक्‍तिशी तुम्ही विवाह करू नये हे बरे!

‘मी त्याला बदलू शकते’

२२-२४. जो नंतर त्याचे मार्ग सुधारण्याचे वचन देतो किंवा मी त्या व्यक्‍तिला बदलीन असा मनोदय बाळगतो अशा कोणासोबत विवाह करणे मूर्खपणाचे आहे ते का?

२२ जशी परिस्थिती असेल तिजनुसार ‘मी त्याला किंवा तिला बदलू शकेन’ असे उद्‌गार तुमच्या तोंडून निघाले का? पण तुमचे प्रेम कोणावर आहे? तो किंवा ती जसे आहेत त्या व्यक्‍तिवर, का तुमचे स्थित्यंतराचे सर्व प्रयत्न सफल झाल्यानंतरच्या व्यक्‍तिवर? स्वतःमध्ये बदल करणे बरेच अवघड असते मग इतरात बदल घडवून आणणे अधिक अवघड असणार. तथापि, देववचनांतील शक्‍तिशाली सत्य कोणाही वैयक्‍तिकास स्वतःमध्ये बदल करण्यास भाग पाडू शकते. एखादी व्यक्‍ती: “जो जुना मनुष्य त्याचा आपल्या मनोवृत्तीत जे नवे” ते अनुसरुन त्या बळाने “त्याग” करू शकते. (इफिसकर ४:२२, २३) पण तुम्हासाठी अकस्मात बदल घडवून आणण्याचे वचन जो भावी सोबती देतो, त्याजबद्दल अती शंकित असा. जरी वाईट सवया सुटू शकतात व सुधारणा होऊ शकते, तरी त्याला वेळ लागतो. काही प्रकरणी तर कैक वर्षे लागतात. याशिवाय आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही की, वारशाने असलेले गुण आणि कौटुंबिक परिस्थिती यांनी आम्हास विशिष्ट स्वभाव पुरविलेला असतो आणि विशिष्ट प्रकारची व्यक्‍ती बनण्यात कोणा विशिष्ट मार्गी वळविलेले असते. खरे प्रेम एकमेकांची सुधारणा करण्यात आमची मदत करण्यासाठी आणि कमतरतांकडे दुर्लक्ष करण्यासाठी प्रवृत्त करू शकते, पण ज्यामुळे त्याच्या किंवा तिच्या व्यक्‍तित्वाचा चुराडा होईल, असे एखादे नवे आणि अस्वाभाविक वळण देण्याची जबरदस्ती करण्यास ते आम्हास प्रवृत्त करणार नाही.

२३ काहींच्या विचारात त्यांच्या कल्पनाचे मूर्तस्वरूप घोळत असते, व ते त्या मूर्तीत कल्पनातरंगातील हर मोहास समाविष्ट करण्याच्या प्रयत्नात असतात. अर्थात, अशक्य कोटीतील स्वप्नासमान तर कोणीच असू शकणार नाही, तरी मानवांच्या विचाराधीन असलेली व्यक्‍ती, निग्रहांत अडून त्याची पूर्णता करण्याची दुसऱ्‍या व्यक्‍तिवर जबरदस्ती करीत असते. यात जर अपयश आले तर तो किंवा ती भ्रमात पडतात, आणि त्यांच्या कल्पक भावनांची पूर्तता इतरत्र शोधू लागतात. पण अशांची ध्येय पूर्ती होत नाही. ते अशा स्वप्न सृष्टीतील व्यक्‍तिच्या शोधात असतात जी त्यांच्या कल्पना शक्‍तीपुरतीच मर्यादित राहते; वास्तवतेत येत नाही. ज्या व्यक्‍ती अशा विचाराधीन असतात त्या विवाहाच्या पात्रतेच्या नसतात.

२४ कदाचित, तुम्ही अशी स्वप्ने पाहात असाल. आम्हापैकीही अनेकांनी आमच्या जीवनात तशी कोणा वेळी पाहिली असतील; तरूण तर पाहातातच. पण भावनांची प्रौढता जसजशी वाढत गेली, तसतसे आम्हाला हे कळू लागले की या अव्यावहारिक कल्पनातरंगाना बाजूला केलेच पाहिजे. विवाहात कल्पना नव्हे तर वास्तवतेस मोल असते.

२५. खरे प्रेम आणि मोह यातील फरक काय आहे?

२५ अनेकांना वाटते तितकेसे खरे प्रेम अंधळे नसते. ते चुकांच्या राशीवर पांघरूण घालील हे खरे, तरी खरे प्रेम त्याच्याबाबतीत तितके अजाण नाही. प्रेम नव्हे तर मोह अंधळा असतो. तो, इतर जसे समस्यांकडे दुरुन पाहातात तशी दृष्टी ठेविण्यास नकार देतो. तो स्वतःस सताविणाऱ्‍या संशयांनाही कल्पनातरंगात बुडवून टाकतो, पण ते परत वर डोके काढतील याची खात्री असू द्या. प्रणयाराधनेच्या काळात काही अप्रिय गोष्टींकडे डोळेझाक केली असेल, तर त्यांना तुम्हाला विवाहानंतरच्या जीवनात तोंड द्यावे लागणार हे निश्‍चित! आम्हाठायीची स्वाभाविक प्रवृत्ती अशी आहे की, ज्या कोणास आम्ही आनंदित किंवा आकर्षित करण्याची आशा बाळगून असतो त्या व्यक्‍तिसमोर उत्तम स्वरूपात स्वतःस सादर करू इच्छितो, पण थोडक्याच अवधीत संपूर्ण व खरे चित्र दिसू लागते. दुसरी व्यक्‍ती तो किंवा ती मूर्त स्वरूपात कशी आहे हे चांगले पाहण्यास स्वतःस काही वेळ द्या, आणि स्वतः प्रत्यक्षात कसे आहात हे सादर करण्यात तितकेच प्रामाणिक असा. प्रेषिताने १ ले करिंथकर १४:२० मध्ये जो सल्ला दिला आहे तो सोबत्याचा शोध करण्यातही लागू करू शकता की, “बालबुद्धीचे होऊ नका . . . समजूतदारपणाबाबत प्रौढासारखे व्हा.”

विवाह प्रसंगी दिलेली वचने

२६. शास्त्रवचनांनुसार, विवाह बंधन केवढे भक्कम असते? (रोमकर ७:२, ३)

२६ विवाहप्रसंगी दिलेल्या वचनाचा एखाद्याने गंभीरतेने विचार करावा. कोणाही व्यक्‍तिने दिलेली वचने जर स्थिर आणि भक्कम नसली तर, तो विवाह डोलत्या पायावर आधारित असेल. आज, जगातील अनेक भागात विवाह जितक्या लवकर होत आहेत तितक्याच लवकर मोडतही आहेत. याचे कारण वेळोवेळी हेच दिसले की विवाहात प्रवेश करणाऱ्‍या व्यक्‍तिने दिलेल्या वचनाकडे, नैतिकतेचे बंधन आहे, या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी अशी भूमिका धारण केली की, ‘जर पटले आणि टिकले तर बरे नाहीतर अर्धचंद्र देऊन मोकळे!’ असा दृष्टिकोन ज्यात असेल तो विवाह सुरवातीलाच मोडकळलेला असतो, व यामुळे त्यात आनंद उद्‌भवण्याऐवजी दुःखे अधिक निर्माण होतात. गुणवैधर्म्यात पवित्र शास्त्र स्पष्ट करते की, विवाह आयुष्यभराचा नातेसंबंध असायला हवा. पहिल्या जोडप्याला देवाने म्हटले होते की; “ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ती २:१८, २३, २४) पुरुषाकरता दुसरी कोणतीही स्त्री असू शकत नाही, आणि स्त्री करता दुसरा कोणताही पुरुष असू शकत नाही. देवाच्या पुत्राने या गोष्टीवर जोर देऊन म्हटले, “ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. ह्‍यास्तव देवाने जे काही जोडिले आहे ते माणसाने तोडू नये.” विवाह बंधन मोडण्यास केवळ एकच ग्राह्‍य कारण आहे ते म्हणजे लैंगिक अनैतिकता!—मत्तय १९:३-९.

२७-२९. (अ) भावी विवाह सोबत्यात काय पाहण्यात कोणी स्त्री बरे करते? (ब) भावी विवाह सोबतीत काय पाहाणे पुरूषाकरिता सुज्ञतेचे ठरेल?

२७ विवाहातील गंभीरतेस सामोरे ठेवून, जी स्त्री त्यात यश मिळवू इच्छिते तिने केवळ त्याच पुरुषाशी विवाहबद्ध व्हावे ज्याला ती आदर देईल, जो स्थिर आणि समतोल असेल, जो काळजीपूर्वक न्याय करणारा, जबाबदाऱ्‍या पार पाडण्यास समर्थ व हितकारक टीका स्वीकारण्याची क्षमता राखलेला तेवढा प्रौढ असेल. स्वतःस विचारा: तो पुरुष चांगली देखरेख करणारा, तसेच या विवाहासंबंधावर आशीर्वाद येऊन मुले झाली तर त्यांचा एक चांगला पिता असू शकेल का? ज्याच्या आधारे तुम्ही दोघे मिळून हा ठराव निश्‍चयाने करु शकाल की विवाहित अंथरूण आदरणीय आणि निर्दोष राखू, तेवढ्या नैतिक पातळीच्या उच्चदर्जावर तो आहे का? तो खरी नम्रता आणि विनयशीलता प्रदर्शित करीत आहे का, किंवा तेवढाच गर्विष्ठ आणि स्वमताभिमानी आहे, जो त्याच्या मस्तकपदाचा दिमाख मिरवू इच्छितो व माझे तेच खरे असे समजतो आणि कोणाही विषयावर समंजसपणाने विचारविनिमय करण्यास आपखुषीने तयार नसतो? विवाह होण्याआधी भावी पुरुषासोबत पुरेशा वेळेसाठी संगती ठेवल्याने, खास करून पवित्र शास्त्रातील तत्त्वांना परीक्षणार्थ धरून राहिल्याने, या गोष्टींचे तारतम्य जाणले जाऊ शकते.

२८ याचप्रमाणे जो पुरुष त्याच्या विवाहाच्या यशाकडे गंभीरतेने पाहात असतो तोही, अशा पत्नीच्या शोधात असेल जिच्यावर तो एकदेह समान प्रेम करील. घरची स्थापना करण्यात साथीदार या नात्याने तिने एक मान्यवर सहकारी असावे. (उत्पत्ती २:१८) उत्तम गृहिणी असण्यास विविध जबाबदाऱ्‍या पार पाडण्याची तिला सतत हाक असते. उत्तम स्वयंपाकीण, सजावट करणारी, काटकसरी माता आणि शिक्षिका आणि आणखीन कितीतरी असण्यास कुशल गुणांना प्रदर्शित करण्याची हाक असते. तिची भूमिका सृजनशील व आव्हान देणारी असेल; ज्या आधारे वैयक्‍तिक वाढ आणि पूर्तता यांचे अनेक योग पुरविले जातील. चांगली पत्नी, कोणा एका लायक पती प्रमाणे कामकरी असेल: “ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्‍न खात नाही.”—नीतीसूत्रे ३१:२७.

२९ होय, दोघेही जे काही न्याहाळतात त्यावर त्यांनी विचार केला तर बरे असेल—जसे की वैयक्‍तिक स्वच्छता आणि टापटीपपणा आहे की बेपर्वाई; परिश्रमीपणा आहे का त्याऐवजी आळशीपणा आहे, हट्टीपणा आणि अहंमन्यता यांच्याऐवजी समजूतदारपणा आणि विचारी आहे का, उधळ्या आहे का काटकसरी; बोलण्यात ज्या संभाषणाकडून मनास आनंद वाटतो आणि आध्यात्मिक वृद्धी होते अशा विचारसरणीचा आहे का मानसिक मंदपणाचा कि ज्यायोगे दैनिक शारीरिक गरजांची काळजी घेतल्याने आणि थोडेसे इकडचे तिकडचे काम केल्याने दररोजचे जीवनही वैतागविणारे बनते.

३०, ३१. प्रणयाराधनेच्या काळातील अनैतिक वागणूक चांगल्या विवाहाच्या उपभोगण्यासाठी वंचित करू शकते, ते का?

३० एकमेकांबद्दलचा खरा आदर यशस्वी विवाहाची गुरूकिल्ली आहे. आणि हेच प्रणयाराधनेतील भावनात्मक उद्‌गारांनाही लागू पडते. अयोग्य सलगी किंवा अनियंत्रित मनोविकारांचा उद्रेक विवाहाच्या नातेसंबंधास सुरवातीपासूनच कवडीमोल बनवितात. लैंगिक अनैतिकता, विवाहाच्या इमारतीस उभारण्याकरीता भक्कम पाया कधीच ठरणार नाही. ती दुसऱ्‍या व्यक्‍तिच्या भावी सौख्यानंदाचा आपस्वार्थी बेपर्वाईद्वारा विश्‍वासघात करीत असते. त्या वेळेपुरतीच, अतुट बंधन असल्याचे भासणारी मनोविकारांची तृप्त क्षुधा लगेचच क्षमू शकते आणि काही आठवड्यांतच किंवा दिवसांतच विवाह बेचिराख होऊ शकतो.—२ रे शमुवेल १३:१-१९ मध्ये तामार करता अम्मोनच्या मनोविकाराचा उद्रेक-अहवाल तपासून पाहा.

३१ प्रणयाराधनेच्या काळातील मनोविकारांचा अतिरेक संशयांच्या अशा बियाणांचे रोपण करू शकतो, ज्याला नंतरच्या जीवनात विवाहाच्या खऱ्‍या उद्देशाबाबतच्या अनिश्‍चिततेचे अंकुर फुटू लागतात. विवाह केवळ भावना शमविण्याकरताच की, व्यक्‍ती म्हणून खरोखरीच आवडणाऱ्‍या किंवा प्रेम करणाऱ्‍यासोबत जीवनाची सहभागिता करण्यासाठी केला होता? विवाहापूर्वी संयम न राखला असल्यास नंतरच्या जीवनातील त्याच्या कमतरतेची प्रतिछाया वेळोवेळी दिसते, ज्याचा परिणाम असंतोष व दुःखात अनुभवतो. (गलतीकर ५:२२, २३) विवाहाआधीच्या अनैतिकतेच्या दुखद आठवणी, विवाहाच्या सुरवातीच्या काळात मनोवेदनांची जी सावरासावर होत असते तिला अडथळा आणू शकतात.

३२. कशाप्रकारे, प्रणयाराधनेच्या काळातील अनैतिक वागणूक देवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर परिणाम करेल?

३२ याहीपेक्षा अधिक गंभीर, याप्रकारची अनैतिकता निर्माणकर्त्या बरोबरील त्याच्या नातेसंबंधास हानी पोहचविते; व त्याजकडील मदत तर हवीच असते. “कारण देवाची इच्छा ही आहे, की, तुमचे, पवित्रीकरण व्हावे म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःस अलिप्त ठेवावे . . . कोणी ह्‍या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधुचा (किंवा खासकरून भगिनीचा) गैरफायदा घेऊ नये . . . जो कोणी अव्हेर करितो तो माणसाचा नव्हे तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्‍याचा अव्हेर करतो.”—१ थेस्सलनीकाकर ४:३-८.

खडकावरील पाया

३३, ३४. जेव्हा कोणी विवाह सोबत्याची निवड करीत असतो त्यावेळी शारीरिक आकर्षणापेक्षा कोणते गुण असण्यावर महत्त्व आहे असे पवित्र शास्त्र स्पष्ट करते?

३३ तुमचे घरकुल, तुमचे कुटुंब हे खडकावरील का वाळूतील पायावर उभे आहे? यातील काहीसा भाग, विवाहाकरता सोबती निवडण्यात जी बुद्धीमता उपयोगात आणतात त्याच्या तारतम्यावर अवलंबून असतो. सौंदर्य आणि लैंगिक आकर्षण एवढेच पुरे नाही. ते मानसिक आणि आध्यात्मिक विसंगतेस खोडून टाकीत नाही. देववचनातील उपदेश विवाहात खडकाचा पाया पुरवीत असतो.

३४ पवित्र शास्त्र स्पष्ट करते की, बाहेरील दिखाव्यापेक्षा अंतर्गत मनुष्यपण अधिक महत्त्वाचे असते. “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे,” असे प्रेरित नीतीसूत्रे म्हणते, पण “यहोवाचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रिची प्रसंशा होते.” (नीतीसूत्रे ३१:३०) प्रेषित पेत्र जो स्वतः विवाहित होता, ‘अंतकरणातील गुप्त मनुष्यपणा’बद्दल तसेच ‘सौम्य व शांत आत्मा’ याबद्दल, उल्लेख करून म्हणतो की ते, “देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे.” (१ पेत्र ३:४) देव ‘मनुष्याचे बाहेरचे स्वरुप’ पाहात नसतो आणि त्याच्या या उदाहरणाचा आम्हास, भावी विवाह सोबत्याच्या बाहेरच्या रूपावर भाळण्याच्या अयोग्य दबावाखाली न येण्यापासून बचाव होण्यात उपयोग होऊ शकतो.—१ शमुवेल १६:७.

३५, ३६. (अ) ज्याचा देवावर आणि त्याच्या वचनावर विश्‍वास आहे अशाच व्यक्‍तिसोबत विवाह करण्यात महत्त्व आहे ते का? (ब) तो विश्‍वास कितपत त्या भावी सोबत्याने प्रदर्शित करावा असे तुम्ही अपेक्षिता?

३५ शहाणा राजा शलमोनाने जीवनाचा विचार केला व तो या निर्णयास पोहोचला: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उपदेशक १२:१३) देवाकडील नियमशास्त्राधीन असलेल्या इस्राएलांना ही निश्‍चितपणे आज्ञा दिलेली होती की जे कोणी यहोवाचे भक्‍त नाहीत अशा कोणाही सोबत यांनी सोयरीक करू नये, केल्यास ते त्यांना खऱ्‍या देवापासून बहकवितील. “त्यांच्याशी सोयरीक करू नको; आपली कन्या त्यांच्या मुलास देऊ नकोस व त्यांची कन्या आपल्या मुलास करू नको. कारण ते लोक तुझ्या पुत्रास मजपासून बहकवितील आणि अन्य देवांची उपासना करावयास लावितील.”—अनुवाद ७:३, ४.

३६ ह्‍याच कारणास्तव जे देवाबरोबर “नवीन करारात” ख्रिश्‍चन मंडळीत आहेत, त्यांनाही “केवळ प्रभूमध्ये लग्न” करावे अशी सक्‍त ताकीद दिलेली आहे. (यिर्मया ३१:३१-३३; १ करिंथकर ७:३९) हट्टवाद प्रदर्शित करण्याऐवजी ही सूचना ज्ञानाने व प्रेमाने दिलेली आहे. विवाहबंधनास, दोघांनी मिळून, उत्पन्‍नकर्त्यास प्रदर्शित केलेल्या निष्ठावंतपणा शिवाय इतर कोणाही गोष्टींनी मजबुती येणार नाही. ज्याचा विश्‍वास देवावर व त्याच्या वचनावर आहे, व ज्याची तुम्हासारखीच समज आहे अशा व्यक्‍तिसोबत विवाह केल्यास उपदेश, मार्गदर्शनाकरिता तुम्हापाशी एकच आधारभूत ग्रंथ असेल. हे तितक्या महत्त्वाचे नाही असे कदाचित तुम्हास वाटेल, पण “फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) तथापि, ख्रिस्ती मंडळीतही असलो तरी कोणीही ही खात्री करून घेतलेली बरी की, भावी विवाहसोबती ख्रिस्ती धर्माच्या केवळ फायद्यांवर जगणारा व त्या सोबतच जगीक पद्धती आणि चित्तवृत्तींकडे अधिक झुकलेला नसून, प्रत्यक्षात मनोभावे देवाची सेवा करणारा सेवक आहे. देवाच्या समागमे चालत असता जगासोबत तुम्हाला धावता येणार नाही.—याकोब ४:४.

३७, ३८. (अ) विवाह किंवा प्रणयाराधना करण्यात कोणीही घाईघाईने प्रवेश करण्याचे टाळावे ते का? (ब) जे विवाह करू इच्छितात त्यांनी कोणाच्या उपदेशाकडे कान लाविल्यास बरे होईल?

३७ “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधावयाची इच्छा” आहे, असे येशूने विचारले, की “तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहात नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला [तो] पुरा करिता [येणार] नाही.” (लूक १४:२८, २९) हेच तत्त्व विवाहालाही लागू पडते. विवाह हा आयुष्यभराचे बंधन असल्याचे देव समजत असल्याने, सोबत्यांची निवड कधीच घाईत होता कामा नये. शिवाय जे काही तुम्ही आरंभले आहे ते शेवटास नेण्याची तुम्हाठायी तयारी असल्याची तुम्हास खात्री असू द्या. एवढेच नव्हे तर प्रणयाराधनेच्या समयीही कोणा खेळाप्रमाणे, अगदीच बिनमहत्त्वाचे समजू नये. इतर व्यक्‍तिच्या मनोविकारांशी खेळणे हा एक क्रूर खेळ आहे आणि त्याच्याकरवीच्या भावनांचे हृदयावरील ओरखडे आणि मनोव्यथा मिटण्यास बराचसा काळ लागतो.—नीतीसूत्रे १०:२३; १३:१२.

३८ विवाहबद्ध होऊ इच्छिणाऱ्‍या धोरणी तरुणांनी वयस्करांचे, खास करून ज्यांनी तुम्हाबद्दल नेहमी सहानुभूती प्रदर्शित केली आहे अशांचा उपदेश ऐकणे बरे. ईयोब १२:१२ असा प्रश्‍न विचारून तसे करण्याच्या महत्त्वाबद्दल आठवण करून देते: “वृद्धाच्या ठायी ज्ञान असते ना, तसेच दीर्घायु मनुष्याच्याठायी समज असते?” या अनुभवी वाणीकडे लक्ष द्या. सर्वात अधिक “तू आपल्या संपूर्ण हृदयाने परमेश्‍वरावर [यहोवा, NW] भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतीसूत्रे ३:५, ६.

३९. जे आधीच विवाहित आहेत त्यांच्याकरिता पवित्र शास्त्र कशाप्रकारे मदतगार ठरू शकते?

३९ ही वचने वाचणाऱ्‍यांपैकी अनेक आधीच विवाहित असतील. मग जरी काही अंशी आधीच तुमचा पाया घातलेला असला तरी जेथे गरज भासते तेथे अधिक चांगल्या फायद्याकरिता जरूर ते फेरबदल करण्यास पवित्र शास्त्र तुमची मदत करू शकते. विवाहाची सद्य स्थिती कशीही असो उत्पन्‍नकर्त्याकडील सल्ल्याकडे अधिक कल ठेवल्यास त्यात सुधारणा होऊ शकते आणि कौटुंबिक सौख्यतेची वाढ होऊ शकते.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्रं]

वादळी समयात तुमचा विवाह तग धरून राहील का?