तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार का?
तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार का?
तुम्ही त्र्यैक्याला मानता का? ख्रिस्ती धर्मराज्यातील बहुतेक मानतात. खरे म्हणजे कित्येक शतकांपासून चर्चेसचे हे प्रमुख तत्त्व राहिले आहे.
या दृष्टीने पाहिले तर मग त्याविषयी कसलाच संशय राहात नाही असे तुम्हाला वाटेल. पण तो आहे, आणि अलिकडेच या तत्त्वाच्या काही पाठीराख्यांनीच त्याविषयीच्या मतभेदाच्या आगीत जणू अधिक तेल ओतले आहे.
अशा या विषयाकडे निव्वळ आस्थेपेक्षा अधिक दृष्टीने का बघितले पाहिजे बरे? कारण येशूने स्वतः म्हटले होतेः “चिरकालिक जीवन हेच आहेः [लोकांनी] तुला, एकच खऱ्या देवाला ओळखावे, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.” या कारणास्तव आमचे भवितव्य देवाच्या वास्तवतेची ओळख असण्यावर अवलंबून आहे. याचाच अर्थ, त्रैक्याच्या मतभेदाच्या मूळाशी जाणे हा होतो. तर मग, स्वतःच त्याचे परिक्षण का करुन पाहू नये?—योहान १७:३, कॅथोलिक जेरुसलेम बायबल. (जे.बी.)
त्रैक्याबद्दल विविध विचारधारा अस्तित्वात आहेत. पण, साधारणपणे त्रैक्याची परिभाषा ही आहे की, देवाच्या मस्तकपणात तीन व्यक्तींचा समावेश आहे, पिता, पुत्र व पवित्र आत्मा; तरीपण ते तिघे एकत्र असता एकच देव आहेत. ते तत्त्व म्हणते की, देवपणात हे तिघेही समान दर्जावर, सर्वशक्तीमान, कोणाकरवी निर्माण न झालेले, आणि युगानुयुगीचे आहेत.
तथापि, काहींचे म्हणणे आहे की, त्रैक्याचे तत्त्व खोटे आहे, यात सर्वसमर्थ देव हा एकटाच वेगळा, युगानुयुगीचा व सर्वशक्तीमान आहे. येशूविषयी त्यांचे म्हणणे आहे की तो मानवी प्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात दिव्यदूताप्रमाणे होता आणि याची देवाने स्वतंत्र आत्मिक व्यक्ती म्हणून निर्मिती केली होती. या कारणास्तव, याला प्रारंभ आहे. याशिवाय ते म्हणतात की, येशू कोणत्याही बाबतीत सर्वसमर्थ देवाच्या समान पदावर केव्हाही नव्हता; तो तर देवास नेहमी अधीन होता व आताही आहे. पवित्र आत्मा, त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्ती नव्हे तर देवाचा आत्मा, त्याची क्रियाशील शक्ती आहे.
त्रैक्याचे पुरस्कर्ते म्हणतात की, हे तत्त्व केवळ धार्मिक सांप्रदायावर नव्हे तर पवित्र शास्त्रावर सुद्धा आधारलेले आहे. पण टीकाकार म्हणतात, हे शिक्षण पवित्र शास्त्रापासून नाही. एक ऐतिहासिक उगम असे सुद्धा म्हणतोः “या [त्रैक्य] तत्त्वाचा मूळारंभ सर्वस्वी मूर्तिपूजक आहे.”—द पॅगानिझम इन आवर ख्रिश्चानिटी.
जर त्रैक्य खरे आहे तर, देवपणात मी देवाच्या समान कधीच नव्हतो हे येशूने म्हणणे त्याला मोठे अपमानास्पद आहे. पण त्रैक्य खोटे आहे तर, कोणी माझ्या बरोबरीचा आहे हे सर्वसमर्थ देवाने म्हणणे तसेच मरीया ही “देवाची माता” आहे असे सांगणे त्याचा मोठा अपमान करणारे आहे. कॅथोलिकिझम या पुस्तकात पुढे जे म्हणण्यात आले आहे ते लक्षात घ्याः “हा विश्वास [लोकांनी] संपूर्णपणे व निष्कलंकपणे मान्य केल्याविना [त्यांना] निःसंशयपणे सार्वकालिक विनाश पत्करावा लागेल. कॅथोलिक विश्वास हा आहेः आम्ही एका देवाची त्रैक्यात भक्ती करतो.” त्रैक्य खोटे आहे तर हे विधान देवाचा अपमान करणारेच ठरेल.
मग, त्रैक्याविषयीचे सत्य तुम्ही का जाणले पाहिजे यासाठी योग्य कारणे आहेत. तरीपण, त्याचा मूळारंभ आणि सत्यतेविषयीचा त्याचा दावा यांचे परिक्षण करण्याआधी या तत्त्वाच्या परिभाषेचे सविस्तर स्पष्टीकरण देणे अधिक बरे वाटते. मग, हे त्रैक्य खरेपणाने आहे तरी काय? त्याचे पुरस्कर्ते त्याचे स्पष्टीकरण कसे करतात?