व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव येशूपेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहे का?

देव येशूपेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहे का?

देव येशूपेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहे का?

येशूने स्वतः देव असल्याचा कधीच दावा केला नव्हता. त्याने स्वतःबद्दल जे जे वक्‍तव्य केले त्यावरुन त्याने स्वतःला सामर्थ्यात, ज्ञानात, आणि काळ यांच्या बाबतीत देवाच्या बरोबरीचा असल्याचे कधीच मानले नव्हते असे दिसून येते.

तो स्वर्गात होता तेव्हा आणि पृथ्वीवर होता तेव्हाही त्याने केलेले भाष्य आणि त्याची वागणूक तो देवाला अधीन असल्याचे प्रवर्तित करीत होती. देव नेहमीच श्रेष्ठ आहे; येशू हा देवाकडून निर्मिलेला असल्यामुळे दुय्यम असा आहे.

येशू देवापेक्षा वेगळा

वेळोवेळी येशूने हे दाखविले की, तो म्हणजे येशू देवापासून स्वतंत्र असून त्याच्यावर देव आहे व हा असा देव आहे की ज्याची येशूने भक्‍ती केली आणि त्याला “पिता” अशी हाक मारली. देवास म्हणजे पित्याला केलेल्या प्रार्थनेत येशू म्हणालाः “तू, जो एकच खरा देव.” (योहान १७:३) योहान २०:१७ मध्ये येशू मरीया मग्दालिया हिला म्हणालाः “जो माझा पिता व तुमचा पिता, जो माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” (रि.स्टँ. कॅथोलिक आवृत्ती) करिंथकरांस दुसरे पत्र १:३ मध्ये पौल या नात्याविषयी अधिक पुष्टी देतो व म्हणतोः “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता . . . धन्यवादित असो.” वस्तुतः येशूला देव, त्याचा पिता होता तर त्याचवेळी तो स्वतः तोच देव असू शकत नाही.

येशू हा देवापेक्षा अगदीच वेगळा आहे याविषयी पौलाला कोठलीही शंका नव्हती. कारण तो म्हणतोः “आपला एकच देव म्हणजे पिता आहे . . . आणि आपला एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे.” (१ करिंथकर ८:६, जे.बा.) हा फरक आणखी एकदा दाखविताना तो प्रेषित म्हणतोः “देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत.” (१ तीमथ्य ५:२१, रि.स्टँ. कॉमन बायबल) पौलाने येथे दर्शविलेच आहे की, स्वर्गात येशू व देवदूत वेगळे आहेत त्याचप्रमाणे येशू व देव हेही वेगळेच आहे हे देखील त्याने स्पष्ट केले.

योहान ८:१७, १८ मधील येशूचे शब्दही मोठे अर्थभरीत आहेत. तेथे तो म्हणतोः “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे.’ मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठविले तोही माझ्याविषयी साक्ष देतो.” येथे पहा की, येशू, तो व पिता म्हणजे सर्वसमर्थ देव या दोन भिन्‍न व्यक्‍ती आहेत हे स्पष्ट करुन दाखवितो, कारण जर नाहीत तर येथे दोघांच्या साक्षी आहेत हे खरेपणाने कसे बरे म्हणता येईल?

आपण देवापेक्षा वेगळी व्यक्‍ती आहोत हे येशूने आणखी एका प्रकाराने दाखवून दिले. तो म्हणालाः “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही.” (मार्क १०:१८, जे.बा.) अशाप्रकारे येशू येथे हे स्पष्ट करीत होता की, देवासारखा कोणीही उत्तम नाही; तो स्वतःसुद्धा नाही. अशाप्रकारे देवाचा चांगुलपणाचा गुण तो येशूपासून वेगळी व्यक्‍ती आहे हे स्पष्ट करतो.

देवाचा आज्ञाकारी सेवक

येशूने वेळोवेळी अशी विधाने केलीः “पुत्राला आपल्या मनाला येईल तसे काही करता येत नाही. तो आपल्या पित्याला जे करताना पाहतो तेच करतो.” (योहान ५:१९, द होली बायबल, फ्रेंच पदवीधर आर. ए. नॉक्स द्वारा.) “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” (योहान ६:३८) “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. (योहान ७:१६) तर मग, पाठविणारा हा ज्याला पाठविण्यात आले आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही का?

हा नातेसंबंध येशूने दिलेल्या द्राक्षमळ्याच्या दाखल्यात स्पष्टरित्या दिसून येतो. येथे तो देवाला, आपल्या पित्याला द्राक्षमळ्याचा धनी अशी उपमा देतो. हा धनी दूर देशी जातो आणि आपले शेत कामकऱ्‍यांच्या हाती सोपवून देतो, जे येथे यहुदी धर्मपुढारी आहेत. द्राक्षमळ्याचा उपज मिळावा म्हणून धनी आपल्या दासाला यांच्याकडे पाठवितो तेव्हा हे कामकरी त्या दासाला बडवतात आणि त्याला रिक्‍तहस्ते परत पाठवितात. धनी पुन्हा दुसऱ्‍या दासाला आणि नंतर आणखी तिसऱ्‍या दासाला त्यांच्याकडे पाठवून बघतो. पण या दोघांनाही तीच वागणूक मिळते. शेवटी धनी म्हणतोः “मी आपल्या प्रिय पुत्राला [येशूला] पाठवितो, कदाचित ते त्याचा मान राखतील.” पण ते भ्रष्ट मळेकरी म्हणालेः “‘हा तर वारीस आहे; ह्‍याला आपण जिवे मारु म्हणजे वतन आपलेच होईल.’ मग त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जिवे मारले.” (लूक २०:९-१६) अशाप्रकारे येशूने हे स्पष्ट दाखविले की, जसा कोणी बाप आपल्या आज्ञेत राहणाऱ्‍या पुत्राला कोठे पाठवितो त्याचप्रमाणे त्याला देवाने पाठविलेले आहे व तो देवाच्या इच्छेप्रमाणे करावयास या पृथ्वीवर आला होता.

येशूच्या अनुयायांनी त्याला देवाच्या बरोबरीचा नव्हे तर देवाचा आज्ञाकारी सेवक या दृष्टीकोणातून पाहिले. त्यांनी देवाला प्रार्थना करताना येशूविषयी असे म्हटलेः “ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू, . . . तुझा पवित्र सेवक येशू ह्‍याच्या नावाने चिन्हे व अद्‌भुते घडावी असे कर.”—प्रे. कृत्ये ४:२३, २७, ३०, रि.स्टँ., कॅथोलिक आवृत्ती.

देव सदासर्वदा श्रेष्ठ

येशूच्या उपाध्यपणाच्या अगदी आरंभालाच, तो जेव्हा बाप्तिस्मा घेतलेल्या पाण्यातून वर आला तेव्हा स्वर्गातून देवाची अशी वाणी ऐकावयाला आलीः “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१६, १७) देव येथे असे म्हणत होता का की तोच पुत्र आहे, तोच स्वतःच्या बाबतीत संतुष्ट आहे आणि त्यानेच स्वतः स्वतःला पाठविले? नाही. निर्माणकर्ता देव असे म्हणत होता की, तो श्रेष्ठी या अर्थाने त्याच्यापेक्षा कमी दर्जावर असलेला आपला पुत्र येशूच्या भावी कामाविषयी आपली संमती दर्शवीत होता.

येशूने आपल्या पित्याचे श्रेष्ठत्व मान्य केले होते. तो म्हणालाः “यहोवाचा आत्मा मजवर आला आहे कारण त्याने मला दीनांस शुभवृत्त सांगावे . . . म्हणून अभिषेक केला आहे.” (लूक ४:१८) अभिषेक करणे याचा अर्थ, ज्याला अद्याप अधिकार मिळाला नाही त्याला श्रेष्ठींकरवी अधिकार वा नेमणूक बहाल करणे होय. येथे देव श्रेष्ठ आहे हे उघडच आहे कारण त्याने येशूचा अभिषेक करुन त्याला असा अधिकार दिला जो त्याच्यापाशी पूर्वी नव्हता.

एकदा दोन शिष्यांची आई त्यांना घेऊन येशूकडे आली व तिने येशूला त्याच्या राज्यात एकाला उजवीकडे व दुसऱ्‍याला डावीकडे बसवावे अशी विनंति केली. याप्रसंगी देखील येशूने देवाचे श्रेष्ठपण जाहीर केले. तो म्हणालाः “माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे आसनावर बसविण्याचा अधिकार माझ्यापाशी नाही; तर तेथे कोणाला बसवावे हे ज्याने ठरविले आहे त्याचा, म्हणजे माझ्या पित्याचा [अर्थात, देवाचा] तो अधिकार आहे.” (मत्तय २०:२३, जे.बा.) येशू जर सर्वसमर्थ देव असता तर या जागा देणे त्याच्या अधिकारात असते. पण तो तसे करु शकत नव्हता कारण तो अधिकार देवाचा होता, आणि येशू देव नव्हता.

येशूने केलेल्या प्रार्थना त्याच्या कनिष्ठ दर्जाविषयीची भरपूर उदाहरणे आहेत. त्याची मरण्याची वेळ आली तेव्हा त्याने आपणापेक्षा कोण श्रेष्ठ आहे ते प्रार्थनेकरवी दाखवून दिले. तो म्हणालाः “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) तो कोणाला प्रार्थना करीत होता? आतमध्ये असलेल्या स्वतःच्या भागाला? नाही, तर तो अगदीच वेगळ्या व भिन्‍न व्यक्‍तीला म्हणजे त्याच्या पित्याला, देवाला प्रार्थना करीत होता. देवाची इच्छा त्याच्या इच्छेपक्षा वेगळी होती. देवच तो ‘प्याला त्याच्यापासून दूर करु’ शकत होता.

जेव्हा मरणाची घटका आली तेव्हा येशू मोठ्याने ओरडून म्हणालाः “माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडलेस?” (मार्क १५:३४, जे.बा.) येशू कोणाला मोठ्याने ओरडून ते म्हणाला? त्याला स्वतःला की त्याच्या आतमध्ये वसणाऱ्‍या कोणाला? “माझ्या देवा” अशी केलेली ओरड हे स्पष्ट दाखविते की, ती, ज्याने स्वतःला देव मानले होते त्याच्याकडून निश्‍चितच नव्हती. समजा, येशूच देव आहे तर मग त्याला कोणी सोडले? त्याने स्वतःच स्वतःला? याला काही अर्थ राहात नाही. येशूने असेही म्हटलेः “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६) येशूच जर देव आहे तर मग त्याने आपला आत्मा पित्याला का सोपवून द्यावा बरे?

येशू निर्वतल्यानंतर तो साधारण तीन दिवस कबरेमध्ये होता. जर तो देव होता तर मग हबक्कुक १:१२ वचन चुकीचे ठरते कारण ते म्हणतेः “माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? तुला मरण नाही.” पण पवित्र शास्त्र म्हणते की, येशू मरण पावला आणि तो कबरेत बेशुद्धावस्थेत होता. मग, कोणी येशूचे पुनरुत्थान केले? जर तो खरोखरीच मेलेला होता तर त्याला स्वतःचे पुनरुत्थान करणे शक्य झाले नसते. दुसऱ्‍या बाजूने पाहिल्यास तो खराच मेला नसता तर त्याच्या मरणाच्या सोंगामुळे आदामाच्या पापाची खंडणी भरुन काढता आली नसती. पण येशूने आपल्या खऱ्‍या मरणामुळे ती किंमत पूर्णपणे भरली. तेव्हा “देवाने त्याला [येशूला] मरणाच्या वेदनांपासून उठविले.” (प्रे. कृत्ये २:२४) सर्वश्रेष्ठ, सर्वसमर्थ देवाने आपल्या दुय्यम सेवकाला, येशूला मृतातून परत उठविले.

येशूनेही लोकांचे पुनरुत्थान करण्याचे चमत्कार करुन दाखविले. ते, तो देव असल्याचे सूचित करतात का? तसे पाहता, प्रेषित आणि एलीया व अलिशा संदेष्ट्यांनाही ते सामर्थ्य होते, पण यामुळे ते माणसांपेक्षा अधिक श्रेष्ठ होऊ शकले नाहीत. वस्तुतः देवाने संदेष्टे, येशू आणि प्रेषित यांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य यासाठी बहाल केले होते की, त्याकरवी त्याचा त्यांना पाठिंबा आहे हे लोकांना दिसावे. पण यामुळे ते बहुसंख्य मस्तकीय देवाचे भाग बनले नाहीत.

येशूठायी मर्यादित ज्ञान होते

युगाच्या समाप्तीविषयीचे भविष्यकथन करताना येशूने सांगितलेः “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.” (मार्क १३:३२, रि.स्टँ., कॅथोलिक आवृत्ती) येशू जर त्रिमस्तकीय देवामध्ये बरोबरीचा पुत्र असता तर त्याला पित्याप्रमाणे हेही ठाऊक असावयास हवे होते. पण येशूला ते माहीत नव्हते, याचाच अर्थ तो देवाच्या बरोबरीचा नव्हता.

याचप्रमाणे आपण इब्रीयांस ५:८ मध्ये वाचतो की येशूने “जे दुःख सोसले तेणेकरुन तो आज्ञाधारकपणा शिकला.” देवाला आज्ञाधारकपणा शिकावा लागतो याची आपल्याला कल्पना करवेल का? नाही. पण येशू तो शिकला कारण देवाला माहीत आहे ते सर्व येशूला माहीत नव्हते. शिवाय जे शिकण्याची देवाला मुळीच गरज नाही तेच म्हणजे आज्ञाधारकपणा येशूला शिकावा लागला. देवाने कधी कोणाची आज्ञा मानण्याची गरज नाही.

देवाला माहीत असणाऱ्‍या गोष्टी आणि येशूला ज्ञात असणाऱ्‍या गोष्टीतला फरक येशूला देवासोबत स्वर्गात राहण्यासाठी त्याचे पुनरुत्थान करण्यात आले तेव्हाही होता. पवित्र शास्त्रातील शेवटल्या पुस्तकातील पहिले वाक्य लक्षात घ्याः “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरणः हे त्याला देवापासून प्राप्त झाले.” (प्रकटीकरण १:१, रि.स्टँ. कॅथोलिक आवृत्ती) येशू जर प्रत्यक्षात मस्तकीय देवाचा भाग असता तर त्याला दुसऱ्‍या मस्तकीय देवाकडून—देवाकडून—प्रकटीकरण मिळण्याची काही गरज होती का? त्याला ते आधीच माहीत असायला हवे होते, कारण ते देवाला माहीत आहे. पण येशूला ते माहीत नव्हते तर येशू हा देव नव्हता हे उघड दिसते.

येशू दुय्यम पदावर राहतो

येशू मानवीप्रकृतीपूर्वी स्वर्गात अस्तित्वात असताना आणि पृथ्वीवर हयात असताना देवाला दुय्यम होता. त्याचे पुनरुत्थान झाल्यावर देखील तो दुय्यम पदावरच राहिला आहे.

येशूच्या पुनरुत्थानविषयी बोलताना प्रेषित पेत्र आणि त्याच्या सोबतच्या लोकांनी यहुदी न्यायसभेला सांगितलेः “देवाने त्याला [येशूला] आपल्या उजव्या हाती . . . उच्च केले.” (प्रे. कृत्ये ५:३१) पौल म्हणालाः “देवाने त्याला अत्युच्च केले.” (फिलिपैकर २:९) येशू जर देवच असता तर मग ज्या पदाचा अनुभव त्याने आधीपासूनच घेतला आहे त्यापेक्षा अधिक उच्च पदावर त्याचे उंचावणे कसे होऊ शकते बरे? त्रैक्याचा भाग म्हणून तो आधीच उच्च पदावर असणार. येशूचे उच्च होण्याआधी तो देवाच्या बरोबरीचा होता तर आता त्याच्या उंचावण्यामुळे तो देवापेक्षा अधिक श्रेष्ठ होणार व देव कनिष्ठ होणार.

पौलाने आणखी असे म्हटले की ख्रिस्त “आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” (इब्रीयांस ९:२४, जे.बा.) तुम्ही कोणासमोर जाऊन उभे राहिल्यास तुम्ही त्याच व्यक्‍ती कशा बनू शकाल? तुम्हास ते जमणार नाही. तुम्हाला वेगळे व भिन्‍न असलेच पाहिजे.

स्तेफनला दगडमार होत होता तेव्हा मरण्याआधी “त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.” (प्रे. कृत्ये ७:५५) त्याने येथे तर दोन वेगवेगळ्या व्यक्‍ती पाहिल्या—पण पवित्र आत्मा, त्रैक्य, तीन देवांची डोकी पाहिली नाही.

प्रकटीकरण ४:८ ते ५:७ पर्यंत देवाला त्याच्या स्वर्गीय सिंहासनावर बसलेले दाखविण्यात आले आहे. पण या सिंहासनावर येशू नाही. उलट त्याला सामोरा येऊन देवाच्या उजव्या हातातून गुंडाळी घ्यावी लागत आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, येशू हा देव नाही तर त्याच्यापासून वेगळा आहे.

वर दिलेल्या गोष्टींच्या सहमतात इंग्लंडमधील मँचेस्टर येथील द बुलेटीन ऑफ द जॉन रायलँड्‌स लायब्ररी म्हणतेः “पुनरुत्थानानंतरच्या स्वर्गीय जीवनात येशूला तो पृथ्वीवरील स्थलचर जीवनात जसा होता तसा वेगळा व्यक्‍ती, देवापेक्षा भिन्‍न असलेला असे चितारण्यात आले आहे. देवाच्या बाजूला असणारा देवाच्या तुलनेत तो देवदूतांप्रमाणे अगदीच वेगळा असा देवाच्या स्वर्गीय न्यायालयात दिसतो. तो देवाचा पुत्र आहे आणि देवदूतांपेक्षा तो वेगळ्याच घडणीत व श्रेणीत आहे.”—पडताळा फिलिप्पैकरास २:११.

तेच बुलेटीन आणखी म्हणतेः “तथापि, उच्चस्तरीय ख्रिस्त या नात्याने त्याचे जीवन व कार्यवहन याविषयी जे सांगण्यात आले आहे त्याचा अर्थ तो ईश्‍वरी दर्जात देवाच्या बरोबरीचा किंवा स्वतः पूर्ण देव आहे असा मुळीच होत नाही. उलटपक्षी, त्याच्या स्वर्गीय व्यक्‍तीत्वाविषयी आणि त्याच्या कार्याविषयी आपल्याला नव्या कराराच्या लिखाणात जे वाचायला मिळते त्यावरुन तो एक वेगळीच व्यक्‍ती आहे आणि देवापेक्षा दुय्यम दर्जावर आहे असे दिसून येते.”

पुढे अनंत काळी स्वर्गामध्ये येशू वेगळी व्यक्‍ती आणि देवाचा दुय्यम दर्जावरील सेवक असा राहणार. याविषयीची माहिती देताना पवित्र शास्त्र म्हणतेः “यानंतर शेवट होईल, आणि जेव्हा तो [स्वर्गातील येशू] देवपित्याला राज्य सोपून देईल . . . तेव्हा पुत्र देखील, ज्याने सर्वकाही त्याच्या अंकित केले आहे त्याच्या अंकित राहील, हे यासाठी की, देव सर्वात आणि सर्वावर असावा.”—१ करिंथकर १५:२४, २८, न्यू.ज.बा.

देव असण्याविषयी येशूने कधीच दावा केला नाही

पवित्र शास्त्राची भूमिका स्पष्ट आहे. सर्वसमर्थ देव यहोवा हा येशूपेक्षा वेगळा आहे इतकेच नाही तर तो सर्वदा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. येशूला नेहमी वेगळी, दुय्यम व्यक्‍ती, आणि देवाचा नम्र सेवक असे दाखविण्यात आले आहे. यासाठीच पवित्र शास्त्र साधेपणात सांगते की, जसा “पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे” त्याप्रमाणेच “ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” (१ करिंथकर ११:३) याच कारणास्वत येशू स्वतः म्हणाला होताः “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.”—१ योहान १४:२८, रि.स्टँ., कॅथोलिक आवृत्ती.

वस्तुस्थिती अशी आहे की, येशू हा देव नाही आणि असा त्याने कधीच दावा केला नाही. याविषयी अधिकाधिक प्रामाण्य आपली मान्यता दाखवीत आहेत. रायलँड यांचे बुलेटीन म्हणतेः “गेल्या तीस चाळीस वर्षांच्या संशोधनानंतर नव्या कराराच्या प्रसिद्ध प्रामाण्यांचे असे मत बनले आहे की, येशूने . . . स्वतःस देव असल्याचे कधीच मानले नव्हते. या वस्तुस्थितीला सामोरे गेले पाहिजे.”

तेच बुलेटीन पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या बाबतीत असे म्हणतेः “यांनी [येशूला] ख्रिस्त, मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र आणि प्रभु अशा संज्ञांनी विभूषित केले याचा अर्थ तो देव होता हे ते म्हणत नव्हते तर त्याने देवाचे काम केले असा त्यांचा अर्थ होता.”

अशाप्रकारे, येशू हा देव आहे ही कल्पना पवित्र शास्त्राच्या सबंध साक्षीला विरोध दर्शविणारी आहे असे काही धार्मिक प्रामाण्यांनी मान्य केले आहे. पवित्र शास्त्रात देव हा नेहमीच श्रेष्ठ आहे आणि येशू हा त्याचा दुय्यम दर्जाचा सेवक आहे असे सांगण्यात आले आहे.

[१७ पानांवरील चित्रं]

येशूने यहुद्यांना म्हटलेः “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.”—योहान ६:३८.

[१८ पानांवरील चित्रं]

जेव्हा येशू, “माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडले?” असे माठ्याने ओरडला तेव्हा आपणच स्वतः देव आहोत असे त्याने खचितच मानले नव्हते

[१९ पानांवरील चौकट]

‘नव्या करारावरील संशोधनाने अधिकाधिक प्रामाण्यांना, येशूने स्वतःला कधीच देव निश्‍चितपणे मानले नव्हते या निर्वाळ्याकडे निरविले आहे.’—बुलेटीन ऑफ द जॉन रायलँड्‌स लायब्ररी