व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव व येशू यांच्याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते?

देव व येशू यांच्याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते?

देव व येशू यांच्याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते?

लोकांनी त्रैक्याविषयी आधीच कोणतेही मत न ठरविता पवित्र शास्त्राचे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत वाचन केले तर अशा या तत्वाचा त्यांना स्वतः निर्णय घेता येईल का? मुळीच नाही.

निःपक्षपातीपणे वाचन करणाऱ्‍या वाचकाच्या ध्यानात ही गोष्ट स्पष्ट येते की, देव हा सर्वसमर्थ, निर्माणकर्ता असून तो इतरांपेक्षा वेगळाच आहे, आणि येशूच्या बाबतीत बघता तो सुद्धा आपल्या मनुष्यप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात वेगळा व विशिष्ट असा निर्माण झालेला असून देवापेक्षा खालच्या दर्जावर आहे.

देव एक आहे, तीन नव्हे

देव एक आहे असे जे पवित्र शास्त्राचे शिक्षण आहे त्याला एकेश्‍वरवाद म्हणतात. चर्च इतिहासाचे प्राध्यापक एल. एल. पेन म्हणतात की, एकेश्‍वरवाद म्हटला तर त्यात त्रैक्य मुळीच येत नाहीः “जुना करार हा कटाक्षाने एकेश्‍वरवादाची शिकवण देतो. देव हा एकटाच व वेगळी व्यक्‍ती आहे. यात त्रैक्याचा अध्याहृत अर्थ सामावलेला आहे अशी कल्पना . . . मुळात निराधार आहे.”

पण जेव्हा येशू पृथ्वीवर आला तेव्हा या एकेश्‍वरवादी कल्पनेत बदल झाला का? पेन म्हणतातः “या मतावर जुना व नवीन करार यात फरक दिसत नाही. एकेश्‍वरवादी सांप्रदाय पुढे चालू राहिला. येशू यहुदी होता व त्याला त्याच्या यहुदी पालकांकडून जुन्या कराराचे शिक्षण मिळाले. त्याने दिलेल्या शिक्षणाचा गाभा यहुदी होता; ते नवे शुभवर्तमान खरेच होते, पण ते नवे शिक्षण नव्हते. . . . त्याने आपल्या स्वतःच्या विश्‍वासात या यहुदी एकेश्‍वरवादी शिक्षणाचा पुरस्कार केलाः ‘हे इस्राएला, श्रवण कर. आपला प्रभु देव हा एकच देव आहे.’”

हे शब्द अनुवाद ६:४ मध्ये आढळतात. कॅथोलिकांचे न्यू जेरुसलेम बायबल (न्यू.जे.बा.) यात हेच वचन असे वाचण्यात येतेः “हे इस्राएल ऐकः ‘याहवे आमचा देव हा एक, एकच याहवे आहे.” * या वचनाचे व्याकरण तपासून पाहिल्यास “एक” या शब्दासाठी अनेकवचनी भावार्थ दिसत नाही व यामुळे एका विशिष्टाशिवाय दुसरा कोणीतरी त्यात आहे असे सूचित होत नाही.

याचप्रमाणे, येशू पृथ्वीवर येऊन गेला तरी देवाच्या रचनेत कसलाही बदल झालेला नाही हे प्रेषित पौलाने देखील सूचित केले. त्याने लिहिलेः “देव तर एक आहे.”—गलतीकर ३:२०; तसेच १ करिंथकर ८:४-६ सुद्धा पहा.

पवित्र शास्त्रात हजारोपेक्षा अधिक वेळा, देव हा एकच व्यक्‍ती आहे असे सांगण्यात आले आहे. तो बोलतो तेव्हा तो एकटाच विशिष्ट बोलत असतो. यापेक्षा अधिक स्पष्टता ते देत नाही. देव म्हणतोः “मी यहोवा आहे. हेच माझे नाव आहे; मी आपले गौरव दुसऱ्‍यास देऊ देणार नाही.” (यशया ४२:८) “मी याहवे तुझा देव आहे. . . . माझ्याशिवाय तुला दुसरे देव नसावेत.” (तिरप्या अक्षरवळणाचा प्रकार आमचा.)—निर्गम २०:२, ३, जे.बा.

देव वस्तुतः तीन व्यक्‍तींचा मिळून बनलेला आहे तर मग देवाकडील प्रेरणा लाभलेल्या सर्व पवित्र शास्त्र लेखकांनी देव हा एकटाच व्यक्‍ती आहे असे का बोलावे बरे? यामुळे लोकांची दिशाभूल करण्याशिवाय इतर काही उद्देश साध्य होण्याजोगा आहे का? खरेच देव तीन व्यक्‍तींचा मिळून बनलेला असता तर त्याने आपल्या पवित्र शास्त्र लेखकांना याची पुष्कळ वेळा सुस्पष्टता करायला लावली असती आणि यामुळे देवाविषयी कोणतीही शंका राहिली नसती. निदान, देवाच्या स्वतःच्या पुत्रासोबत ज्यांचा प्रत्यक्ष संपर्क आला त्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लेखकांनी तरी तसे केले असते. पण तसे काही दिसत नाही.

उलटपक्षी, पवित्र शास्त्र लेखकांनी ज्याविषयीची अधिक स्पष्टता केली ती ही आहे की, देव हा एक व्यक्‍ती आहे—अद्वितीय, विभाजन न होणारा आणि ज्याच्या बरोबरीचा इतर कोणीही नाही असाः “मीच यहोवा, अन्य कोणी नव्हे, मजवेगळा देव नाही.” (यशया ४५:५) “तू, केवळ तूच यहोवा या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस.”—स्तोत्रसंहिता ८३:१८.

एकापेक्षा अधिक देव नव्हे

येशूने देवाला “एकच खरा देव” असे संबोधिले. (योहान १७:३) देव हा अनेकांचा मिळून बनलेला आहे असे त्याने कधीही म्हटले नाही. आणि यामुळेच पवित्र शास्त्रात यहोवाशिवाय इतर कोणालाही सर्वसमर्थ असे म्हणण्यात आले नाही. तसे असते तर “सर्वसमर्थ” या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ झाला असता. येशू किंवा पवित्र आत्म्याच्या बाबतीत असे संबोधिण्यात आले नाही, कारण यहोवा हाच सर्वोच्च आहे. उत्पत्ती १७:१ मध्ये तो घोषित करतोः “मी सर्वसमर्थ देव आहे.” तसेच निर्गम १८:११ म्हणतेः “सर्व देवांहून यहोवा श्रेष्ठ आहे.”

इब्री शास्त्रवचनात ʼएलोहʹआह्‌ या शब्दाचा दोन प्रकाराने अनेकवचनी अर्थ आहे, म्हणजे, ʼएलो․हीमʹ (अनेक देव) आणि ʼएलो․हेहʹ (देवांचे). हे अनेकवचनी शब्द साधारणपणे यहोवाला अनुलक्षून असतात तेव्हा ते “देव” असे एकवचनी पद्धतीने अनुवादित होतात. मग, ते अनेकवचनी शब्द त्रैक्य असल्याचे सांगतात का? नाही, ते सांगत नाही. ए डिक्शनरी ऑफ द बायबल या प्रकाशनात विल्यम स्मिथ म्हणतातः “[ʼएलो․हीमʹ] या शब्दप्रयोगामुळे देवत्वामध्ये तीन व्यक्‍तींच्या त्रैक्याचा आभास होतो ही विलक्षण कल्पना आता प्रामाण्यांमध्ये आढळत नाही. व्याकरणकार या शब्दाचा अर्थ उत्तुंगपणाची श्रेष्ठता, किंवा ईश्‍वरी बळाची पूर्णता आणि देव दाखविणारी शक्‍ती याला अनुलक्षून घेतात.”

ʼएलो․हीमʹ या शब्दाविषयी द अमेरिकन जर्नल ऑफ सेमिटीक लँग्वेजेस ॲण्ड लिटरेचर म्हणतेः “याचा सहसा एकवचनी क्रियापदाचे विशेषण असा अर्थ घेतला जातो व ते एकवचनी विशेषण बनते.” याचे उदाहरण पहावयाचे झाल्यास ʼएलो․हीमʹ ही पदवी निर्मितीच्या अहवालात ३५ वेळा दिसते आणि प्रत्येक वेळी ते क्रियापद देवाने जे म्हटले वा केले ते एकवचनी रुपात सादर करते. (उत्पत्ती १:१–२:४) अशाप्रकारे, ते प्रकाशन असा समारोप करतेः “या कारणास्तव, [ʼएलो․हीमʹ] याचा अर्थ थोरवीवैभव याचे वक्‍तव्य करणारे आधिक्यदर्शक अनेकवचन असा केला गेला पाहिजे.”

ʼएलो․हीमʹ याचा अर्थ “अनेक व्यक्‍ती” नव्हे तर “अनेक देव” असा आहे. त्यामुळे हा शब्द त्रैक्याला सूचित करतो असे प्रतिपादन करणारे स्वतःला अनेकेश्‍वरवादी बनवतात. ते का बरे? कारण याचा हा अर्थ होतो की त्रैक्यात तीन देव आहेत. पण त्रैक्याचे बहुतेक सर्वच पाठीराखे त्रैक्य हे तीन वेगवेगळ्या देवांचे मिळून बनलेले आहे ही कल्पना नाकारतात.

पवित्र शास्त्र देखील विविध खोट्या मूर्तिदैवतांना उल्लेखिताना ʼएलो․हीमʹʼएलो․हेहʹ अशा शब्दांचा प्रयोग करते. (निर्गम १२:१२; २०:२३) पण तेच दुसऱ्‍या प्रसंगी ते एकाच खोट्या दैवतास अनुलक्षून असते. याचे उदाहरण म्हणजे पलिष्ट्यांनी “आपल्या दागोन नामक देवाचा [ʼएलो․हेहʹ]” उल्लेख केला. (शास्ते १६:२३, २४) बाल याला “देव [ʼएलो․हीमʹ]” असे संबोधण्यात आले. (१ राजे १८:२७) याशिवाय ही संज्ञा मानवांना देखील लागू केलेली आहे. (स्तोत्रसंहिता ८२:१, ६) मोशे हा अहरोन व फारो यांना “देव” [ʼएलो․हीमʹ] असा होईल असे त्याला सांगण्यात आले.—निर्गम ४:१६; ७:१.

आता ʼएलो․हीमʹʼएलो․हेहʹ या पदव्या खोट्या देवांना तसेच मानवांना लागू करण्यात आल्या याचा अर्थ प्रत्येक दैवत हे अनेक देवांचे मिळून बनले होते असा त्याचा अर्थ नाही. तेव्हा ʼएलो․हीमʹ किंवा ʼएलो․हेहʹ ही संज्ञा यहोवा देवास लागू करण्यात आली याचा अर्थ तो एकापेक्षा अधिक व्यक्‍ती आहे असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. याला या विषयासंबंधाने पवित्र शास्त्राची जी इतर साक्ष आम्ही पडताळली आहे ती अधिक पुष्टी देते.

येशू—एक वेगळी निर्मिती

येशू पृथ्वीवर मानव होता तेव्हा तो परिपूर्ण होता तरीही येशूची जीवनी-शक्‍ती मरीयेच्या उदरी देवानेच स्थलांतरीत केली. (मत्तय १:१८-२५) पण हा त्याचा मूळारंभ नाही. त्यानेच स्वतः असे घोषित केले की, तो “स्वर्गातून उतरलेला” आहे. (योहान ३:१३) या कारणामुळेच तो नंतर आपल्या शिष्यांना हे स्वाभाविकपणे म्हणू शकलाः “मनुष्याचा पुत्र [येशू] पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर?”—योहान ६:६२.

अशाप्रकारे येशूला या पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गात अस्तित्व होते हे दिसते. पण तो सर्वसमर्थ, चिरकालिक त्रिदेव मस्तकातील एकजण होता का? नाही. कारण पवित्र शास्त्र अगदी साध्या रितीने सांगते की, येशू मनुष्यप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात असताना तो निर्माण करण्यात आलेला आत्मा होता. हे जसे देवाने दिव्यदूतांना आत्मिक प्राणी असे निर्मिले त्यासारखेच होते. दिव्यदूत व येशू आपल्या निर्मितीआधी अस्तित्वात नव्हते.

येशू मानवीप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात असताना “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” होता. (कलस्सैकर १:१५) तो “देवाच्या निर्मितीत आरंभाचा” होता. (प्रकटीकरण ३:१४, रि.स्टॅ. कॅथोलिक आवृत्ती) “आरंभाचा” [ग्रीक, आ․रखेʹ] या शब्दाचा अर्थ येशू हा देवाच्या निर्मितीचा ‘आरंभ करणारा’ होता असा होऊ शकत नाही. पवित्र शास्त्र लिखाणात योहानाने आ․रखेʹ या ग्रीक शब्दाची विविध रुपे २० पेक्षा अधिक वेळा उपयोगात आणली आणि या सर्वांचा एकच सर्वसाधारण अर्थ “आरंभ” असा आहे. होय, देवाच्या अदृश्‍य निर्मितीमध्ये देवाने येशूला पहिले असे निर्माण केले.

येशूच्या आरंभाविषयी असलेले हे संदर्भ पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे या पुस्तकातील लाक्षणिक “ज्ञान” याने जे वक्‍तव्य केले त्याच्याशी किती जुळणारे आहेत ते बघाः “याहवे याने मला आपल्या हस्तकृतीमध्ये, आपल्या प्राचीन कृत्यांमध्ये पहिले असे निर्माण केले. पर्वत निर्माण होण्यापूर्वी, डोंगरांआधी मी जन्मास आले; त्याने पृथ्वी केली, गावे आणि जगातील वातावरण निर्माण करण्याआधी मला घडविले.” (नीतीसूत्रे ८:१२, २२, २५, २६, न्यू.जे.बा.) “ज्ञान” ही संज्ञा देवाने ज्याला निर्माण केले त्याचे व्यक्‍तिमत्व चितारण्यासाठी वापरण्यात आली असली तरी पुष्कळ प्रामाण्यांचे याविषयी सहमत आहे की, ती परिभाषा येशूविषयी, तो आपल्या मानवीप्रकृतीपूर्वी आत्मिक प्राणी असताना त्याला अलंकारिकपणे लागू केलेली आहे.

आपल्या मानवी प्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वामध्ये असताना येशू म्हणतो की, तो “त्याच्या [देवा] पाशी कुशल कारागीर” होता. (नीतीसूत्रे ८:३०, जे.बी.) त्याच्या या कुशल कारागिरीच्या भूमिकेस अनुलक्षून कलस्सैकर १:१६ येशूविषयी सांगते की, “त्याच्याद्वारे देवाने आकाश व पृथ्वीवर सर्व काही निर्माण केले.”—टुडेज इंग्लिश व्हर्शन (टु.इ.व्ह.).

अशाप्रकारे आपल्या कुशल कारागिराच्या, जणू धाकट्या भागीदारामार्फत सर्वसमर्थ देवाने सर्व गोष्टी निर्मिल्या. पवित्र शास्त्र या गोष्टीचा समारोप या पद्धतीने मांडतेः “आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले . . . आणि आपला एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले.” (तिरप्या अक्षरवळणांचा प्रकार आमचा.)—१ करिंथकर ८:६, रि.स्टँ, कॅथोलिक आवृत्ती.

तर मग हे निसंशये खरे की, याच कुशल कारागीरास देव म्हणालाः “आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश्‍य असा मनुष्य आपण करु.” (उत्पत्ती १:२६) काहींचे असे म्हणणे आहे की, येथे “आपल्या” व “आपण” या शब्दांकरवी त्रैक्याचा अर्थ सूचित होतो. पण समजा तुम्ही असे म्हणाला की, “आपण आपल्यासाठी काहीतरी करु या” तेव्हा तुमच्या शरीरामध्ये अनेक व्यक्‍ती संग्रहीत आहेत असा कोणीही अर्थ काढणार नाही. तर याचा, तुम्ही दोघे किंवा तिघे एकत्र काम कराल असा साधा अर्थ निघतो. याचप्रमाणे देवाने “आपण” व “आपल्या” असे जे शब्द उद्‌गारले त्याकरवी तो दुसऱ्‍या एकाशी, आपल्या पहिल्या आत्मिक प्राण्यासोबत, कुशल कारागीराबरोबर, मानवीप्रकृतीपूर्वीच्या येशूसोबत बोलत होता हे स्पष्ट होते.

देवाला मोह घालता येतो का?

मत्तय ४:१ मध्ये “सैतानाकडून येशूची परिक्षा” झाली असे वर्णन आहे. येशूला “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव” दाखविल्यावर सैतानाने म्हटलेः “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन.” (मत्तय ४:८, ९) येथे येशूने देवाशी बेईमानी करावी असा सैतानाचा प्रयत्न होता.

पण येशू हा देव होता तर त्याच्या निष्ठावंतपणाची परिक्षा कशी घेतली जाणार? देव स्वतःविरुद्धच बंडखोर होणार? नाही. केवळ दिव्यदूत व मानव देवाविरुद्ध बंड करु शकतात व तसे झालेही. येशूच्या झालेल्या परिक्षेला तेव्हा अर्थ येतो जेव्हा येशू देव नव्हे तर आपली स्वेच्छा असणारी वेगळी व्यक्‍ती आहे. त्याने इतर दिव्यदूत व मानव यांनी चोखाळला तसा मार्ग धरला असता तर तो देखील बंडखोर बनला असता.

पण तेच दुसऱ्‍या बाजूला पाहता देव पाप करील आणि स्वतःलाच बेईमान होईल असा विचार करणे अशक्य कोटीतले वाटते. “त्याची कृति परिपूर्ण आहे, . . . तो विश्‍वसनीय देव आहे . . . तो न्यायी व सरळ देव आहे.” (अनुवाद ३२:४) तद्वत, येशू जर देव होता तर त्याची परिक्षाच झाली नसती.—याकोब १:१३.

देव नव्हता म्हणूनच येशू बेईमान होऊ शकत होता, पण तो विश्‍वासू राहिला आणि त्याने म्हटलेः “अरे सैताना, चालता हो! कारण असा शास्त्रलेख आहेः ‘यहोवा तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.’”—मत्तय ४:१०.

खंडणीची किंमत केवढी होती?

येशू ज्या कारणांसाठी या पृथ्वीवर आला त्यापैकीचे एक त्रैक्याच्या विषयावर थेट परिणाम करते. पवित्र शास्त्र म्हणतेः “एकच देव आहे, आणि देव व मानव ह्‍यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी जुळणारी खंडणी दिली.”—१ तीमथ्य २:५, ६, न्यू.व.

येशू परिपूर्ण मानवापेक्षा श्रेष्ठ किंवा उणा नसल्यामुळे आदामाने जे गमाविले त्या पृथ्वीवरील परिपूर्ण मानवी जीवनाचा हक्क यासाठी जुळणारी खंडणी ठरला. यासाठीच प्रेषित पौलाने त्याला “शेवटला आदाम” असे म्हणणे उचित आहे कारण याच संदर्भात बोलताना त्याने पुढे म्हटलेः “जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.” (१ करिंथकर १५:२२, ४५) येशूचे परिपूर्ण मानवी जीवन हे ईश्‍वरी न्याय ज्याची मागणी करीत होते ते “जुळणारी खंडणी” होते—जे अधिकही नव्हते आणि कमीही नव्हते. मानवी न्यायात देखील हे मूलभूत तत्त्व सापडते की, जे वाईट कर्म घडले आहे त्याच्याशी तुल्य असणारी किंमत वा भरपाई दिली जाण्यास हवी.

पण तेच, येशू जर त्रिमस्तकीय देवापैकीचा एक असता तर खंडणीची किंमत ही, देवाने नियमशास्त्रात ज्याची अपेक्षा धरली त्यापेक्षा कितीतरी अधिक ठरली असती. (निर्गम २१:२३-२५; लेवीय २४:१९-२१) एदेनात देवाने नव्हे तर आदाम या परिपूर्ण माणसाने पाप केले होते. तेव्हा देवाच्या न्यायास अनुलक्षून असणारी खंडणी ही त्याच्याशी जुळणारी, परिपूर्ण मानवाची, “शेवटला आदाम” याची असावयास हवी होती. तद्वत, देवाने येशूला पृथ्वीवर खंडणी या अर्थी पाठविले तेव्हा त्याने येशूला न्यायाची परिपूर्ति घडू शकेल अशा दर्जावर आणले; कोणी अवतार म्हणून अथवा देव-मनुष्य म्हणून नव्हे तर एक परिपूर्ण मानव, “देवदूतांपेक्षा कमी झालेला” असे पाठविले. (इब्रीयांस २:९; पडताळा स्तोत्रसंहिता ८:५, ६.) पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या सर्वसमर्थ देवपदापैकीचा कोणीही देवदूतांपेक्षा कसा खाली होऊ शकेल बरे?

“एकुलता एक पुत्र” कसा?

पवित्र शास्त्र येशूला देवाचा “एकुलता एक पुत्र” असल्याचे संबोधिते. (योहान १:१४; ३:१६, १८; १ योहान ४:९) त्रैक्यत्ववादी म्हणतात की, जसा देव सनातन आहे तसा पुत्रही सनातन आहे. पण एखादा माणूस पुत्र असताना त्याचवेळी त्याच्या पित्याच्या वयाचा कसा असू शकेल बरे?

त्रैक्यत्ववाद्यांचा असा दावा आहे की, येशूच्या बाबतीत “एकुलता एक जन्मलेला” असे जे म्हणण्यात आले आहे ते “जन्मणे” याविषयी शब्दकोष जो अर्थ देऊन आहे की, “पिता या नात्याने जन्म देणे” या परिभाषेत बसणारे नाही. (वेबस्टर यांचा नववा नवा महाविद्यालयीन शब्दकोष) ते म्हणतात की येशूच्या बाबतीत त्याचा अर्थ “आरंभ नसलेला नातेसंबंध” निव्वळ पुत्राचा नातेसंबंध ज्याला कधी सुरवात झालेली नाही, असा आहे. (वाइन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वर्डस्‌) हे तुम्हाला वास्तववादी वाटते का? कोणी माणूस आपल्या मुलाला जन्म न देता त्याचे पितृत्व मिळवू शकतो का?

आता मुद्दा हा आहे की, पवित्र शास्त्र अब्राहाम व इसहाक यांच्या नातेसंबंधाचे वर्णन करताना “एकुलता एक” या शब्दप्रयोगाकरता असणारा तोच ग्रीक शब्द का वापरते बरे? (याविषयी वाइन देखील आपली मान्यता देतात पण स्पष्टीकरण मात्र पुरवीत नाहीत) इब्रीयांस पत्र ११:१७ इसहाक हा अब्राहामाचा “एकुलता एक” असल्याचे सांगते. तर इसहाकाच्या बाबतीत तो एकुलता एक असा जन्मला होता ते साधारण अर्थाने आहे हे स्पष्ट आहे; यात, तो त्याच्या पित्याच्या वयाइतका किंवा दर्जाइतका असल्याचे कसलेही समर्थन नाही.

येशू व इसहाक यांच्याबाबतीत “एकुलता एक” याच्या संदर्भाने वापरण्यात आलेला ग्रीक शब्द मो․नो․ग․नेसʹ हा आहे; मोʹनोस म्हणजे “एकुलता” आणि गिʹनो․माइ याचा मूळ अर्थ “उद्‌भव,” “बनणे (अस्तित्वात आणणे),” असा आहे असे स्ट्राँग यांचा एक्झॉस्टिव्ह काँकॉर्डन्स सांगतो. यास्तव मो․नो․ग․नेसʹ चा अर्थ “एकटाच जन्मलेला, एकुलता एक, म्हणजे एकच मूल” असा होईल.—ए ग्रीक ॲण्ड इंग्लिश लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टमेंट, लेखक, ई. रॉबिनसन.

गेर्हार्ड कित्तेल यांनी संपादित केलेला थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट म्हणतोः “[मो․नो․ग․नेसʹ] याचा अर्थ ‘एकटाच वारस,’ म्हणजे दुसरे भाऊ वा बहीण नसलेला.” हे पुस्तक आणखी सांगते की, योहान १:१८; ३:१६, १८; व १ योहान ४:९ मध्ये “येशूचा दाखविण्यात आलेला नातेसंबंध कोणा मुलाचा आपल्या पित्यासोबत असतो तेवढ्यापुरताच नसून तो पित्यास जन्मलेल्या एकुलत्या एका पुत्राचा नातेसंबंध आहे.”

अशाप्रकारे, येशूला, एकुलत्या एका पुत्राला, जीवनाचा आरंभ आहे. तेव्हा सर्वसमर्थ देवाला जनक, पिता या अर्थाने अगदी उचितपणे संबोधता येते. अब्राहामाने आपल्या मुलाला जन्म दिला त्या अर्थाने देवाला पिता म्हणता येईल. (इब्रीयांस ११:१७) तद्वत, पवित्र शास्त्र देवाला “पिता” असे म्हणते तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट आहे—ते दोघेही वेगवेगळ्या व्यक्‍ती आहेत. देव ज्येष्ठ आहे तर पुत्र हा धाकटा आहे—वेळेत, दर्जात, सामर्थ्यात आणि ज्ञानात.

स्वर्गात निर्मिती झालेला येशू हाच केवळ देवाचा आत्मिक पुत्र नाही हे जेव्हा एखादा आपल्या ध्यानात घेतो तेव्हा येशूच्या बाबतीत “एकुलता एक पुत्र” अशी संज्ञा का वापरण्यात आली याचा त्याला अर्थबोध होतो. इतर आत्मिक प्राणी, दिव्यदूत यांनाही “देवपुत्र” म्हटले आहे; शिवाय आदाम देखील त्याच अर्थाने देवपुत्र होता, कारण या सर्वांच्या जीवनाचा आरंभ यहोवा देव, जीवनाचा उगम आणि झरा याच्याकरवी झाला होता. (इयोब ३८:७; स्तोत्रसंहिता ३६:९; लूक ३:३८) पण या सर्वांची निर्मिती “एकुलत्या एका पुत्रा”च्या द्वारे झालेली आहे. पण त्या “एकुलत्या एका”चा जन्म मात्र देवाकरवी थेटपणे घडला.—कलस्सैकर १:१५-१७.

येशूला देव म्हणून समजले जात होते का?

येशूला पवित्र शास्त्रात देवाचा पुत्र असे वारंवार म्हटले गेले असले तरी पहिल्या शतकातील कोणीही तो देव जो पुत्र आहे असे मानले नव्हते. “एक देव आहे” असे मानणाऱ्‍या दुरात्म्यांनाही त्यांच्या आत्मिक क्षेत्रातल्या अनुभवाद्वारे हे माहीत आहे की, येशू हा देव नव्हता. त्यामुळेच त्यांनी येशूला अगदी उचितपणे वेगळा असा “देवाचा पुत्र” असल्याचे म्हटले. (याकोब २:१९; मत्तय ८:२९) शिवाय येशू मरण पावला तेव्हा जवळ उभे राहिलेल्या विदेशी रोमी अधिकाऱ्‍यांनी, जे काही त्यांनी त्याच्या अनुयायांकडून ऐकले होते ते बरोबर ऐकले होते, कारण ते म्हणाले की, येशू देव नव्हे तर “खरोखर हा देवाचा पुत्र होता.”—मत्तय २७:५४.

अशाप्रकारे “देवाचा पुत्र” या संज्ञेमुळे येशू हा त्रैक्याचा भाग असणारा नव्हे तर वेगळा निर्मित झालेली व्यक्‍ती असा अर्थ मिळतो. देवाचा पुत्र असल्यामुळे तो स्वतः देव असूच शकत नाही; कारण योहान १:१८ म्हणते की, “देवाला कोणी कधीही पाहिले नाही.”—रि.स्टँ., कॅथोलिक आवृत्ती.

शिष्यांनी येशूविषयी देव या अर्थी नव्हे तर “देव व मनुष्य यांजमधील एकच मध्यस्थ” असा दृष्टीकोन बाळगला. (१ तीमथ्य २:५) याची व्याख्या लक्षात आणली तर मध्यस्थी करणारा ज्यांच्यामध्ये मध्यस्थी केली जाते त्यांच्यापेक्षा वेगळा असतो हे स्पष्ट आहे. पण येशू हा मध्यस्थी होऊ घातलेल्या दोन गटापैकीचा एक भाग आहे असे म्हणणे म्हणजे परस्पर विरोधी मत मांडणे होय. ते, कोणी नसता कोणी आहोत असा ढोंगीपणा करण्यासारखे आहे.

पवित्र शास्त्र हे देवाचे येशूसोबत असणाऱ्‍या नातेसंबंधाविषयी भाष्य करण्यात सुसंगत आहे. यहोवा देव हा एकटाच सर्वसमर्थ आहे. त्याने मानवीप्रकृतीपूर्वीच्या येशूची थेटपणे निर्मिती केली. त्यामुळे येशूला आरंभ आहे आणि म्हणूनच तो देवाबरोबर त्याच्या सामर्थ्याच्या आणि सनातनाच्या बाबतीत बरोबरीचा कधीच होऊ शकत नाही.

[तळटीपा]

^ देवाचे नाव काही भाषांतरात “याहवे” असे, तर इतर भाषांतरात ते “यहोवा” किंवा “जेहोवा” असे अनुवादित करण्यात आले आहे.

[१४ पानांवरील चौकट]

देवाकडून निर्मित झालेला असल्यामुळे येशू हा काळ, सामर्थ्य आणि ज्ञान यांच्याबाबतीत दुय्यम दर्जावर आहे

[१५ पानांवरील चित्रं]

येशूने म्हटले की त्याला मानवीप्रकृतीपूर्वीचे अस्तित्व आहे, आणि देवाच्या अदृश्‍य निर्मितीत पहिला अशी त्याची देवाकडून निर्मिती झालेली आहे