व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनंतकाल जगण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे

अनंतकाल जगण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे

प्रकरण ३०

अनंतकाल जगण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे

१. (अ) तुमच्यापुढे कोणते दोन मार्ग खुले आहेत? (ब) तुम्ही योग्य मार्ग कसा निवडाल?

 यहोवा देव तुम्हाला एक अद्‌भूत गोष्ट देऊ करीत आहे, व ती म्हणजे त्याच्या नीतीमान नवीन व्यवस्थेमधील अनंतकालचे जीवन. (२ पेत्र ३:१३) पण तुमचे तेव्हाचे जगणे हे तुम्ही आज देवाच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यावर अवलंबून आहे. आजचे जग, त्यात सहभागी होणाऱ्‍या सर्वांसह लवकरच नाहीसे होणार आहे, “पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) यासाठी तुम्हाला दोहोंपैकी एक मार्ग निवडावा लागेल. एक मृत्युकडे नेतो तर दुसरा अनंतकाल जीवनाकडे. (अनुवाद ३०:१९, २०) तुम्ही कोणता मार्ग निवडाल?

२. (अ) तुमचा विश्‍वास खरा असल्यास तुम्हाला कशाची खात्री पटेल? (ब) बालक आपल्या प्रेमळ बापावर भाव ठेवते तसा देवावर ठेवल्याने त्याची सेवा करण्यास तुम्हाला कशी मदत होते?

तुम्ही जीवनाची निवड करीत आहात हे कसे प्रदर्शित कराल? सर्वप्रथम तुम्ही यहोवावर व त्याच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. देव आहे व “त्याचा झटून शोध करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे” यावर तुमचा दृढ विश्‍वास आहे का? (इब्रीयांस ११:६) एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या प्रेमळ व दयाळू वडीलांवर विश्‍वास ठेवतात तसा विश्‍वास तुम्ही देवावर ठेवला पाहिजे. (स्तोत्रसंहिता १०३:१३, १४; नीतीसूत्रे ३:११, १२) असा विश्‍वास असल्यास तुम्हाला एखाद्या वेळी काही गोष्टी पूर्ण रुपाने समजल्या नाहीत तरी देवाचा सल्ला सूज्ञ आहे व त्याचे मार्ग योग्य आहेत याविषयीची शंका तुम्ही घेणार नाही.

३. (अ) विश्‍वासाशिवाय आणखी कशाची गरज आहे? (ब) तुम्ही जीवनाची निवड केली आहे हे दर्शविण्यासाठी कोणत्या कार्याची गरज आहे?

परंतु विश्‍वासापेक्षा अधिक कशाची तरी जरुरी आहे. यहोवाविषयी तुमच्या खऱ्‍या भावना सिद्ध करण्यासाठी क्रियाही असल्या पाहिजेत. (याकोब २:२०, २६) गतकाळी योग्य ते करण्यात उणे पडल्याबद्दल तुम्हाला दुःख वाटत आहे असे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काही कार्य केले आहे का? त्यासाठी तुम्हाला पश्‍चाताप झाला आहे का किंवा त्यामुळे यहोवाच्या इच्छेला अनुसरुन तुम्ही आपला जीवन मार्ग बदलला आहे का? तुम्ही मागे वळला आहात का, म्हणजेच, आतापर्यंत अनुसरत असलेला चुकीचा मार्ग टाकून देवाच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी करण्यास सुरवात केली आहे का? (प्रे. कृत्ये ३:१९; १७:३०) अशी कृत्ये सिद्ध करतील की तुम्ही जीवनाचा मार्ग निवडला आहे.

समर्पण व बाप्तिस्मा

४. (अ) देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी तुम्हाला कशाची चालना मिळाली पाहिजे? (ब) देवाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे तुम्ही ठरवल्यावर काय करणे उचित आहे?

देवाच्या इच्छेप्रमाणे वागून जीवनाची निवड करण्यास तुम्हाला कशामुळे चालना मिळाली पाहिजे? रसिकतेमुळे. जरा विचार कराः यहोवाने तुम्हाला सर्व आजार, दुःख व मृत्युपासूनही सुटका मिळण्याची शक्यता निर्माण केली आहे! आपल्या पुत्राची अमोल देणगी देऊन नंदनवन झालेल्या भूतलावर अनंतकाल जीवनाचा मार्ग त्याने खुला केला आहे. (१ करिंथकर ६:१९, २०; ७:२३; योहान ३:१६) यहोवाच्या प्रेमामुळे त्याच्यावर प्रेम करण्यास तुमच्याठायी चालना उद्‌भवते तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? (१ योहान ४:९, १०; ५:२, ३) तुम्ही प्रार्थनेकरवी देवाकडे येशूच्या नावाने येऊन तुम्ही त्याचे सेवक होऊ इच्छिता, त्याचे होऊ इच्छिता हे त्याला सांगा. अशारितीने तुम्ही देवाला स्वतःचे समर्पण करता. ही व्यक्‍तीगत व खाजगी गोष्ट आहे. इतर कोणीही ती तुमच्यासाठी करु शकणार नाही.

५. (अ) देवाला तुम्ही आपले समर्पण केल्यावर तो तुम्हाकडून कशाची अपेक्षा करील? (ब) आपल्या समर्पणाला जागण्यासाठी तुम्हाला कोणती मदत उपलब्ध आहे?

तुम्ही देवाला स्वतःचे समर्पण केल्यावर त्या समर्पणानुरुप तुम्ही रहावे अशी अपेक्षा देव करील. यास्तव या निर्णयाला वा समर्पणाला तहहयात जागून आपण आपल्या वचनाचे पक्के आहोत असे सिद्ध करुन दाखवा. (स्तोत्रसंहिता ५०:१४) देवाच्या दृश्‍य संघटनेच्या दृढ सहवासात राहिल्याने, तुम्हाला प्रेमळ प्रोत्साहन व पाठिंबा देणाऱ्‍या ख्रिस्ती सहकाऱ्‍यांकडून मदत मिळेल.—१ थेस्सलनीकाकर ५:११.

६. (अ) तुम्ही देवाला आपले समर्पण केल्यावर कोणते पाऊल उचलले पाहिजे? (ब) बाप्तिस्मा याचा काय अर्थ आहे?

तरीपण, आपण देवाचे होऊ इच्छितो असे खासगीरित्या त्याला सांगण्याशिवाय तुम्ही अधिक काही केले पाहिजे. तुम्ही देवाला समर्पण केले असल्याचे इतरांसमोर प्रदर्शित केले पाहिजे. ते कसे? पाण्यात बाप्तिस्मा घेऊन. पाण्याचा हा बाप्तिस्मा, एखाद्या व्यक्‍तीने आपले जीवन यहोवाला समर्पित केले असून त्याची इच्छा करण्यास स्वतःला सादर करीत असल्याचे ते जाहीर प्रात्यक्षिक होय.

७. (अ) येशूने ख्रिश्‍चनांसाठी कोणते उदाहरण घालून दिले? (ब) येशूच्या आज्ञेनुरुप पाहिल्यास बाप्तिस्मा हा बालकांसाठी का नाही?

पाण्याचा बाप्तिस्मा ही महत्त्वाची बाब आहे हे येशू ख्रिस्ताच्या उदाहरणावरुन दिसून येते. येशूने आपल्या पित्याला ‘मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे’ असे नुसते सांगितले नाही. (इब्रीयांस १०:७) देवाच्या राज्याचा प्रसारक या नात्याने आपली सेवा सुरु करताना येशू यहोवासमोर सादर झाला व त्याने पाण्यात बाप्तिस्मा घेतला. (मत्तय ३:१३-१७) येशूने हा कित्ता घालून दिल्यामुळे आज देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास जे स्वतःचे यहोवाला समर्पण करतात त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (१ पेत्र २:२१; ३:२१) खरे म्हणजे येशूने त्याच्या अनुयायांना सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करण्याची व मग या नव्या शिष्यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली. हा बालकांचा बाप्तिस्मा नव्हे. यहोवाची सेवा करण्याचा निश्‍चय करुन विश्‍वास ठेवलेल्या लोकांचा हा बाप्तिस्मा आहे.—मत्तय २८:१९; प्रे. कृत्ये ८:१२.

८. तुम्हाला बाप्तिस्मा घ्यावयाचा असल्यास मंडळीतील कोणाला तुम्ही ते सांगितले पाहिजे व का?

देवाची सेवा करण्याचा निश्‍चय तुम्ही केला असेल व बाप्तिस्मा घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही काय करावे? तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या ज्या मंडळीच्या सहवासात आहात तेथील अध्यक्षीय देखरेख्याला आपला हा मनोदय प्रगट केला पाहिजे. ते तुमच्या बरोबर, मंडळीतील इतर वडिलांसह, देवाला मनपसंतरित्या सेवा करण्यासाठी आवश्‍यक त्या माहितीची उजळणी करतील. यानंतर तुम्हाला बाप्तिस्मा देण्याची व्यवस्था करणे शक्य होईल.

आज तुम्हासाठी असलेली देवाची इच्छा

९. जलप्रलयाआधी नोहाने कोणती गोष्ट केली की जी आज तुम्ही करावी अशी देवाची इच्छा आहे?

प्रलयापूर्वी येणाऱ्‍या नाशाचा इशारा देण्यासाठी व एकमेव सुरक्षित स्थळ, तारवाविषयी माहिती देण्यासाठी देवाने “नीतीमत्वाचा उपदेशक” नोहा याचा उपयोग केला. (मत्तय २४:३७-३९; २ पेत्र २:५; इब्रीयांस ११:७) तुम्हीही असेच प्रचाराचे काम करावे अशी देवाची तुमच्याविषयीची इच्छा आहे. येशूने आपल्या काळाबद्दल भाकित करताना म्हटलेः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) तुम्ही देवाच्या इच्छेसंबंधाने जे काही शिकून घेतले आहे ते, इतरांना, त्यांचा बचाव होण्यासाठी कळविणे अत्यंत जरुरीचे आहे. (योहान १७:३) या जीवनादायी माहितीची सहभागिता इतरांमध्ये करावी यासाठी तुमचे अंतःकरण उचंबळून येते का?

१०. (अ) लोकांवरील प्रेमामुळे येशूचे कोणते उदाहरण अनुसरण्यास आपण प्रवृत्त होऊ? (ब) प्रचाराचे कार्य साधारणपणे कसे केले जाते?

१० याकरता, ख्रिस्ताचे उदाहरण अनुसरा. लोक आपल्याकडे यावेत यासाठी तो थांबून राहिला नाही. तर राज्याचा संदेश ऐकतील अशा लोकांच्या शोधासाठी तो त्यांच्यामध्ये फिरला. आणि त्याने आपल्या अनुयायांना—सर्वांनाच—तसेच करण्याची सूचना दिली. (मत्तय २८:१९; प्रे. कृत्ये ४:१३; रोमकर १०:१०-१५) ख्रिस्ताच्या सूचना वा उदाहरणाला अनुसरुन आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी लोकांना घरोघरी भेटी दिल्या. ते राज्याचा संदेश घेऊन “घरोघरी” गेले. (लूक १०:१-६; प्रे. कृत्ये २०:२०) आज, आमच्या काळात सुद्धा खरे ख्रिश्‍चन विशेषतः याच पद्धतीने आपले उपाध्यपण पार पाडतात.

११. (अ) देवाच्या राज्याबद्दल प्रचार करण्यासाठी साहसाची गरज का आहे, परंतु आपल्याला घाबरण्याची का गरज नाही? (ब) आपल्या कार्याकडे यहोवा कोणत्या दृष्टीने पाहतो?

११ हे कार्य करण्यास साहसाची गरज आहे. सैतान व त्याच्या जगाने ख्रिस्ताच्या आरंभीच्या अनुयायांचे प्रचारकार्य थांबविण्याचा प्रयत्न केला तसाच तुमचेही प्रचाराचे काम थांबवावे म्हणून ते प्रयत्न करतील. (प्रे. कृत्ये ४:१७-२१; ५:२७-२९; ४०-४२) पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. यहोवाने जसे त्या आरंभीच्या ख्रिश्‍चनांना पाठिंबा व बळ दिले तसेच तो आज तुम्हालाही देईल. (२ तीमथ्य ४:१७) यास्तव, धैर्य धरा! या जीवनरक्षक प्रचार व शिक्षणाच्या कार्यात पूर्णपणे सहभागी होऊन यहोवा व मानवावरील आपले प्रेम सिद्ध करा. (१ करिंथकर ९:१६; १ तीमथ्य ४:१६) यहोवा तुमचे कार्य विसरणार नाही, तर त्याबद्दल भरपूर प्रतिफळ देईल.—इब्रीयांस ६:१०-१२; तीत १:२.

१२. लोटाच्या बायकोच्या उदाहरणावरुन आपण काय शिकू शकतो?

१२ हे जग तुम्हाला खऱ्‍या अर्थाने मोलवान असे काहीच देऊ शकत नाही. यासाठी, त्याकडे पाठ फिरवल्यास कशाची उणीव राहिली असे मनात आणू नका. येशू म्हणालाः “लोटाच्या बायकोची आठवण करा.” (लूक १७:३२) ती व तिच्या कुटुंबाने सदोमातून निघाल्यावर तिने पाठीमागे सोडलेल्या गोष्टींसाठी मोठ्या आशाळभूतपणे मागे पाहिले. तिचे हृदय कोठे आहे ते देवाने पाहिले व ती मिठाचा खांब झाली. (उत्पत्ती १९:२६) लोटाच्या बायकोसारखे होऊ नका! आपली नजर पुढे, देवाच्या नीतीमान नव्या व्यवस्थेमधील जे “खरे जीवन” त्याकडे लावा.—१ तीमथ्य ६:१९.

नंदनवनमय पृथ्वीवरील अनंतकाल जीवन निवडा

१३. आपल्याला करावी लागणारी निवड येशूने कशी मांडली?

१३ निवड करण्यास फक्‍त दोनच गोष्टी आहेत. याची तुलना, येशूने दोन रस्त्यांपैकी एक निवडण्यासोबत केली. त्याने म्हटले की, एक मार्ग “रुंद व पसरट” आहे. त्यावरुन चालणाऱ्‍यांना कसेही चालण्याचे स्वातंत्र्य आहे. दुसरा मार्ग मात्र “संकोचित” आहे. येथे चालणाऱ्‍यांना देवाचे नियम व सूचना पाळाव्या लागतात. येशूने दाखवले की, बहुतेक लोक रुंद रस्ता घेतात व फारच थोडे लोक अरुंद रस्ता घेतात. तुम्ही कोणत्या रस्त्याची निवड कराल? निवड करताना हे लक्षात ठेवाः रुंद रस्ता एकाएकी संपेल—विनाशामध्ये! उलटपक्षी, अरुंद रस्ता तुम्हाला थेट देवाच्या नव्या व्यवस्थेत घेऊन जाईल. तेथे या पृथ्वीचे गौरवी नंदनवनात रुपांतर करण्यात तुम्ही सहभाग घेऊ शकाल व शिवाय येथेच तुम्ही आनंदात अनंतकाल जगू शकाल.—मत्तय ७:१३, १४.

१४. देवाच्या नव्या व्यवस्थीकरणात बचावून जाण्यासाठी तुम्ही कशाचे सभासद असण्यास हवे?

१४ देवाच्या नवीन व्यवस्थेतील जीवन मिळविण्यासाठी अनेक रस्ते वा मार्ग आहेत असे समजू नका. मार्ग फक्‍त एकच आहे. जलप्रलयातून केवळ एकच तारु वाचले, अनेक बोटी नव्हे. याचप्रमाणे, वेगाने जवळ येत असलेल्या “मोठ्या सकंटा”तून केवळ एकच संघटना—देवाची दृश्‍य संघटना—वाचेल. सर्व धर्म एकाच ध्येयाकडे नेतात ही गोष्ट खरी नाही. (मत्तय ७:२१-२३; २४:२१) देवाचा अनंतकाल जीवनाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे, यहोवाच्या संस्थेचे सभासद असले पाहिजे.—स्तोत्रसंहिता १३३:१-३.

१५. (अ) आपण दररोज काय करण्याची गरज आहे? (ब) कोणती आशा स्वप्न नसून वास्तवता आहे?

१५ यास्तव, देवाच्या वचनयुक्‍त नव्या व्यवस्थीकरणाची प्रतिमा आपल्या मनात व अंतःकरणात प्रज्वलित ठेवा. देवाने तुम्हाला दिलेल्या भूतलावरील नंदनवनात अनंतकाल जगण्याच्या अभिवचनाचा दररोज विचार करा. हे काही स्वप्न नव्हे. ते खरे आहे! “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील. . . . दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.” हे पवित्र शास्त्रातील वचन नक्की पूर्ण होईल.—स्तोत्रसंहिता ३७:२९, ३४.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५१ पानांवरील चित्रं]

यहोवाला आपले समर्पण करा . . . आणि बाप्तिस्मा घ्या

[२५३ पानांवरील चित्रं]

“लोटाच्या बायकोची आठवण करा”

[२५४ पानांवरील चित्रं]

देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाचे चित्र आपल्या मनात व अंतःकरणात प्रज्वलित ठेवा