व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कौटुंबिक जीवन यशस्वी करणे

कौटुंबिक जीवन यशस्वी करणे

प्रकरण २९

कौटुंबिक जीवन यशस्वी करणे

१. (अ) कुटुंबसंस्था कशी सुरु झाली? (ब) कुटुंबाविषयी देवाचा उद्देश काय होता?

 यहोवा देवाने पहिला पुरुष व स्त्री यांना निर्माण केले तेव्हा कुटुंब बनविण्यासाठी यांना त्याने परस्परांशी जोडले. (उत्पत्ती २:२१-२४; मत्तय १९:४-६) मुले उत्पन्‍न करुन वृद्धींगत व्हावे असा या विवाहीत जोडप्यांसाठी यहोवाचा हेतू होता. मग, मुले मोठी झाल्यावर त्यांनी लग्न करुन आपापली कुटुंबे बनवावयाची होती. कालांतराने पृथ्वीच्या सर्व भागात आनंदी कुटुंबे वसावी असा देवाचा हेतू होता. ते पृथ्वीला सर्वत्र नंदनवनात परिवर्तित करणार होते.—उत्पत्ती १:२८.

२, ३. (अ) कौटुंबिक अपयशासाठी देवाला दोष का देता येत नाही? (ब) यशस्वी कौटुंबिक जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी कशाची गरज आहे?

तरीही आज कुटुंबाचे विभाजन होत आहे आणि एकत्र राहणारी पुष्कळ कुटुंबे आनंदी नाहीत. यामुळे एखादा विचारीलः ‘देवानेच कुटुंब निर्माण केले आहे तर मग आपण यापेक्षा चांगल्या परिणामाची अपेक्षा करु नये का?’ तथापि, कुटुंबाच्या ऱ्‍हासासाठी आपल्याला देवाला जबाबदार धरता येणार नाही. एखाद्या वस्तुचा उत्पादक ती वापरण्यासंबंधीच्या सूचनांसह तिची निर्मिती करतो. पण ग्राहकाने या सूचना पाळल्या नाहीत आणि ती वस्तू निकामी झाली तर तो उत्पादकाचा दोष आहे का? मुळीच नाही. उत्पादन हे कितीही अव्वल दर्जाचे असले तरी त्याचा योग्य वापर न केल्यामुळे निकामी होते. कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा हेच खरे आहे.

यहोवा देवाने पवित्र शास्त्रामध्ये कौटुंबिक जीवनाबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. पण या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास काय घडणार? कौटुंबिक व्यवस्था कितीही उत्तम असली तरी ती मोडकळीस येणार. यामुळे कुटुंबाचे सदस्य आनंदी राहणार नाहीत. उलटपक्षी पवित्र शास्त्रातील मार्गदर्शक तत्त्वे पाळल्यास कुटुंब यशस्वी व आनंदी बनण्यास मदत होईल. याकरताच, देवाने कुटुंबाच्या वेगवेगळ्या घटकांना कसे घडवले व त्यांनी कोणती भूमिका पार पाडावी असा त्याचा हेतू होता हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

देवाने पुरुष व स्त्री यांना कसे घडवले

४. (अ) पुरुष व स्त्रियांमध्ये काय फरक आहे? (ब) देवाने असे भेद का निर्माण केले?

यहोवा देवाने पुरुष व स्त्रियांना एकाच प्रकारचे बनवले नाही हे कोणालाही दिसेल. तरीपण बऱ्‍याच बाबतीत ते सारखे आहेत हे खरे. तथापि, त्यांच्या शारीरिक व लैंगिक घडणीत लक्षात येण्यासारखा फरक आहे. तसेच त्यांच्यामध्ये भावनात्मक फरक आहेत. हे असे का? यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडण्यात सुलभता व्हावी या हेतूने देवाने त्यांची तशी निर्मिती केली. पुरुषाची निर्मिती केल्यावर देवाने म्हटलेः “मनुष्य एकटाच असावा हे बरे नाही. तर त्याच्यासाठी अनुरुप सहकारी मी करीन.”—उत्पत्ती २:१८.

५. (अ) स्त्री ही पुरुषाला “अनुरुप” कशी बनविण्यात आली? (ब) पहिला विवाह कोठे झाला? (क) विवाह योजना सुखावह का होऊ शकते?

अनुरुप याचा अर्थ दुसऱ्‍या एखाद्या गोष्टीस सुयोग्य, किंवा ज्यामुळे दुसऱ्‍या एखाद्या वस्तुला पूर्णता येते ते. देवाची सूचना होती की, मानवाने बहुगुणित व्हावे व पृथ्वीची मशागत करावी, आणि यात त्याची मदत व्हावी या हेतूने त्याने स्त्रीला त्याचा संतोषदायी सोबती असे निर्माण केले. पुरुषाच्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केल्यावर देवाने ‘तिला आदामाकडे आणले’ व तेव्हाच त्याने एदेन बागेत त्यांचा विवाह संपन्‍न केला. (उत्पत्ती २:२२; १ करिंथकर ११:८, ९) वस्तुतः पुरुष व स्त्रीची देवाने अशी रचना केलेली आहे की ज्यामध्ये एकाची गरज दुसरा पूर्ण करु शकतो, त्यामुळे विवाह हा आनंददायी होऊ शकतो. पुरुष व स्त्री यांच्यामधील वेगवेगळे गुण एकमेकांस पूरक व समतोल आहेत. पति व त्याची पत्नी एकमेकांना जाणून घेतात, परस्परांची कदर करतात व आपल्याला दिलेल्या भूमिकेनुसार सहकार्य करतात तेव्हा आनंदी कुटुंबाच्या उभारणीमध्ये ते आपापल्या परीने हातभार लावतात.

पतीची भूमिका

६. (अ) कुटुंबाचा मस्तक कोणास करण्यात आले आहे? (ब) ही योजना योग्य व व्यवहार्य का आहे?

विवाह किंवा कुटुंबाला नेतृत्वाची गरज असते. असे नेतृत्व देण्यासाठी लागणारे गुण व शक्‍ती अधिक प्रमाणात देऊन पुरुषाची घडण करण्यात आली. या कारणामुळे पवित्र शास्त्र म्हणतेः “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे.” (इफिसकर ५:२३) हे व्यवहार्य आहे, कारण नेतृत्व नसल्यास त्रास व गोंधळ होत असतो. कुटुंबाला प्रमुख नसल्यास त्याची दशा मोटार ही स्टिअरिंग व्हीलशिवाय चालवणे अशी होईल. तसेच, बायकोने मस्तकपद मिळवण्याकरता चढाओढ राखली तर ती स्थिती मोटारीत दोन चालक, प्रत्येकजण मोटारीच्या पुढील प्रत्येक चाकावर नियंत्रण ठेवीत आहे असे दिसेल.

७. (अ) पुरुषाने मस्तकपद भूषवावे ही कल्पना काही स्त्रियांना का आवडत नाही? (ब) प्रत्येकाला मस्तक वा वरिष्ठ असतो का, आणि देवाने मस्तकपदाची जी योजना लावून दिली आहे ती सूज्ञपणाची का आहे?

परंतु, कुटुंबाचे मस्तक पुरुषाने भूषवावे हे अनेक स्त्रियांना आवडत नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे पुष्कळ पतींनी, देवाने योग्य मस्तकपद कसे आचरावे याविषयी दिलेल्या सूचना पाळलेल्या नाहीत. असे असले तरीही कोणतीही संस्था नीट चालण्यासाठी कोणी तरी मार्गदर्शन करण्याची व अंतिम निर्णय घेण्याची गरज असते हे सर्वमान्य आहे. या कारणासाठीच पवित्र शास्त्र म्हणतेः “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” (१ करिंथकर ११:३) देवाच्या योजनेमध्ये मस्तक नसलेला किंवा कोणाच्या अधीन नसणारा हा केवळ देवच आहे. बाकीच्या सर्वांनी म्हणजे येशू ख्रिस्त, पती व पत्नी व इतरांनी मार्गदर्शन स्विकारण्याची व इतरांनी केलेल्या निर्णयांच्या अधीन राहण्याची गरज आहे.

८. (अ) पतींनी मस्तकपद हाताळताना कोणते उदाहरण अनुसरले पाहिजे? (ब) या उदाहरणावरुन पतींनी कोणता धडा घेतला पाहिजे?

याचा अर्थ हा होतो की, पतींनी आपली भूमिका पार पाडण्यासाठी खिस्ताचे मस्तकपद स्विकारले पाहिजे. तसेच त्यांनी आपल्या बायकोवर मस्तकपद गाजविताना, ख्रिस्ताने जसे आपल्या अनुयायांच्या मंडळीवर मस्तकपद गाजविले त्याचे अनुकरण करावयास हवे. ख्रिस्ताने पृथ्वीवरील आपल्या अनुयायांसोबत कसे दळणवळण राखले? ते नेहमीच दयाळू व विचारशील दळणवळण होते. शिष्यांनी जरी काही वेळेस त्याचे मार्गदर्शन अनुकरण स्विकारण्यात धिमेपणा दाखवला तरी तो कठोरपणे वा संतापी वृत्तीने वागला नाही. (मार्क ९:३३-३७; १०:३५-४५; लूक २२:२४-२७; योहान १३:४-१५) खरे म्हणजे, त्याने त्यांच्यासाठी स्वेच्छेने आपला जीव दिला. (१ योहान ३:१६) तेव्हा, ख्रिस्ती पतीने ख्रिस्ताच्या उदाहरणाचा सखोल अभ्यास करावा आणि आपल्या कुटुंबासोबत वागताना होता होईल तितक्या अधिकपणे ते आचरावे. असे केल्यास तो जुलमी, स्वार्थी वा अविचारी कुटुंबप्रमुख बनणार नाही.

९. (अ) अनेक विवाहीत स्त्रियांची काय तक्रार असते? (ब) मस्तकपद आचरताना पतींनी सूज्ञपणे काय लक्षात ठेवले पाहिजे?

दुसरीकडे पाहता, पतींनी याचा विचार करावाः कुटुंबाचे प्रमुख असल्यासारखे वागत नाही अशी तुमच्या पत्नीची तक्रार आहे का? तुम्ही घरात नेतृत्व घेत नाहीत, कौटुंबिक हालचालींच्या योजना आखीत नाहीत आणि अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी घेत नाहीत असे तिचे म्हणणे आहे का? खरे म्हणजे, पती या नात्याने तुम्ही या जबाबदाऱ्‍या घेतल्या पाहिजे असे देवही अपेक्षितो. अर्थात, कुटुंबातील प्रमुखपद गाजविताना तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या सूचना व आवडीनिवडी ऐकण्यास मोकळे मन ठेवणे व त्या विचारात घेणे हे सूज्ञतेचे ठरेल. पती या नात्याने कुटुंबातील तुमची भूमिका अधिक कठीण स्वरुपाची आहे. पण ती पार पाडण्याचा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केला तर तुम्हाला मदत करावी व पाठिंबा द्यावा असे तुमच्या पत्नीला अधिकपणे वाटू लागेल.—नीतीसूत्रे १३:१०; १५:२२.

पत्नीची भूमिका पार पाडणे

१०. (अ) कोणता मार्ग अनुसरण्यास पवित्र शास्त्र पत्नीला उत्तेजन देते? (ब) जेव्हा पत्नी पवित्र शास्त्राच्या सल्ल्याकडे लक्ष देत नाही तेव्हा काय घडते?

१० पवित्र शास्त्रात म्हटले आहे की पतीचे सहकारी व्हावे या दृष्टीने स्त्रीला घडवण्यात आले आहे. (उत्पत्ती २:१८) या भूमिकेला अनुसरुन पवित्र शास्त्र उत्तेजन देते की, “स्त्रियांनो, . . . आपापल्या पतीच्या अधीन असा.” (इफिसकर ५:२२) आजकाल स्त्रियांमध्ये आक्रमकपणा व पुरुषांशी चढाओढ करण्याची वृत्ती सर्रास झाली आहे. जेव्हा पत्नी वरचढपणा करते, मस्तकपद आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा बरीच गडबड होते. अनेक पतीही मग म्हणतातः ‘जर तिला घर चालवण्याची हौसच आहे तर चालवू दे.’

११. (अ) पतीने नेतृत्व घ्यावे यासाठी पत्नी त्याला कशा रितीने सहाय्य करु शकते? (ब) पत्नीने, तिला देवाकडून नेमण्यात आलेली भूमिका पार पाडली तर याचा तिच्या पतीवर कसा परिणाम होण्याची शक्यता आहे?

११ तथापि, तुम्हाला तुमचे पति नेतृत्व करीत नाही असे दिसते आहे तेव्हा ते स्वतःला करणे भाग आहे असे वाटत असेल. पण कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडाव्या म्हणून तुम्ही त्यांची मदत करु शकाल का? तुम्ही नेतृत्वाच्या बाबतीत त्यांच्यावर अवलंबून आहात हे दाखविता का? तुम्ही त्यांचे प्रस्ताव व मार्गदर्शन विचारता का? ते जे काही करतात त्याविषयी त्यांची टिंगल करण्याचे तुम्ही टाळता का? कुटुंबात देवाने तुम्हाला नेमून दिलेली आपली भूमिका पार पाडण्यासाठी झटाल तर तुमच्या पतींनाही आपली भूमिका करण्याची चालना मिळेल.—कलस्सैकर ३:१८, १९.

१२. पतीशी मतभेद असले तरीही पत्नीने आपले विचार मांडणे योग्य आहे हे कशावरुन दिसून येते?

१२ याचा अर्थ, पत्नीने, आपली मते पतीच्या मतापेक्षा वेगळी असल्यास ती सांगूच नये असा नाही. कदाचित तिचा दृष्टीकोन बरोबरही असू शकेल व पतीने तिचे ऐकल्यास कुटुंबाचा फायदाच होईल. खिस्ती पत्नीला, अब्राहामाची बायको सारा हिचे उदाहरण अनुकरणार्थ देण्यात आले, कारण ती आपल्या पतीच्या अधीन होती. (१ पेत्र ३:१, ५, ६) तरीही तिने कुटुंबातील समस्येवर एक तोडगा सुचविला आणि अब्राहाम तिच्याशी सहमत झाला नाही तेव्हा देवाने त्याला सांगितलेः “सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक.” (उत्पत्ती २१:९-१२) अर्थात, पतीने एखाद्या गोष्टीवर अंतिम निर्णय दिला व तो देवाच्या नियमाचा भंग करीत नाही तर पत्नीने त्याला पाठिंबा दिला पाहिजे.—प्रे. कृत्ये ५:२९.

१३. चांगली पत्नी काय करीत राहील व याचा तिच्या कुटुंबावर काय परिणाम होईल?

१३ आपली भूमिका योग्य रितीने पार पाडीत असताना पत्नीला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात बरेच काही करता येईल. उदाहरणार्थ, ती सकस जेवण बनवू शकते, घर स्वच्छ व नीटनेटके ठेवू शकते आणि मुलांना शिक्षण देण्यात सहभागी होऊ शकते. विवाहीत स्त्रियांना पवित्र शास्त्र उत्तेजन देतेः “त्यांनी आपल्या नवऱ्‍यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्‍या, मायाळू, आपापल्या नवऱ्‍याच्या अधीन असणाऱ्‍या असे असावे. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.” (तीतास पत्र २:४, ५) या जबाबदाऱ्‍या पार पाडणाऱ्‍या पत्नीला व मातेला तिच्या कुटुंबाचे अतूट प्रेम व आदर मिळेल.—नीतीसूत्रे ३१:१०, ११, २६-२८.

कुटुंबातील मुलांचे स्थान

१४. (अ) कुटुंबामध्ये मुलांचे योग्य स्थान कोणते? (ब) येशूच्या उदाहरणावरुन मुले काय शिकू शकतात?

१४ यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला म्हटले होतेः “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा.” (उत्पत्ती १:२८) होय, देवाने त्यांना मुले व्हावी असे सांगितले. मुले ही कुटुंबाला आशीर्वाद अशी होणार होती. (स्तोत्रसंहिता १२७:३-५) मुले ही आईबापाचे नियम व आज्ञा यांच्या अधीन असल्यामुळे पवित्र शास्त्र मुलाच्या स्थानाची तुलना दासाच्या स्थानाशी करते. (नीतीसूत्रे १:८; ६:२०-२३; गलतीकर ४:१) येशू देखील लहान असताना आपल्या आई-वडीलांच्या आज्ञेत होता. (लूक २:५१) याचा अर्थ त्याने त्यांची आज्ञा पाळली, तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होता असा आहे. सर्व मुलांनी असेच केल्यास कुटुंबाच्या सुखात आणखी भर पडेल.

१५. मुले अनेकदा आपल्या पालकांच्या दुःखाला कारणीभूत का होतात?

१५ परंतु कुटुंबाला आशीर्वाद होण्याऐवजी मुले आज आईवडीलांच्या दुःखाला कारणीभूत होऊ बसली आहेत. असे का? त्याचे कारण हे की, मुले तसेच आईवडील यांनी आपल्या जीवनात पवित्र शास्त्राची शिकवण लागू करण्यात उणेपणा दाखविला. देवाचे हे नियम व तत्त्वे कोणती? पुढील पानांवर यातील काहींचे आपण परिक्षण करुन बघू. तसे करताना ते नियम व ती तत्त्वे लागू केल्याने तुम्ही कुटुंबाच्या सुखाला हातभार लावू शकाल याच्याशी तुम्हाला सहमत होता येईल की नाही तेही बघा.

तुमच्या पत्नीला प्रेम व आदर द्या

१६. पतीला काय आज्ञा देण्यात आल्या आहेत व त्या योग्य रितीने कशा पार पाडल्या जाऊ शकतात?

१६ ईश्‍वरी ज्ञानाने पवित्र शास्त्र म्हणतेः “पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी.” (इफिसकर ५:२८-३०) अनुभवाने अनेकदा हे सिद्ध केले आहे की, तिला प्रेम मिळते आहे असे जाणवल्यास पत्नी सुखी असते. याचा अर्थ, पतीने आपल्या पत्नीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यात तिच्याविषयी कोमलता, समजुतदारपणा व दिलासा यांचाही समावेश होतो. पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे त्याने तिच्याबरोबर “सूज्ञतेने सहवास” ठेवला पाहिजे. आपल्या सर्व कामांमध्ये या गोष्टीची जाणीव ठेवल्याने त्याला तसे करता येईल. याद्वारे तो तिच्याकडून आदर मिळवील.—१ पेत्र ३:७.

आपल्या पतीचा आदर करा

१७. पत्नीला काय आज्ञा देण्यात आल्या आहेत व ती त्या कशा पाळू शकते?

१७ पण पत्नीबद्दल काय म्हणता येईल? पवित्र शास्त्र म्हणतेः “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३) हा सल्ला मानण्याचे मनावर न घेतल्यामुळे काही स्त्रिया त्यांच्या पतींच्या क्रोधास पात्र ठरल्या आहेत. पतीच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यामुळे तसेच कौटुंबिक ध्येयाच्या पूर्ततेसाठी त्याच्याशी पूर्ण सहकार्य केल्यामुळे पत्नी आपला आदर प्रकट करते. पवित्र शास्त्रात विषद करण्यात आलेली, पतीचा ‘अनुरुप सहकारी’ ही भूमिका पार पाडून तिला आपल्या पतीचे प्रेम संपादण्यात मदत मिळते.—उत्पत्ती २:१८.

एकमेकांसोबत विश्‍वासू असा

१८. वैवाहिक सोबत्यांनी परस्परांशी प्रामाणिक का असावयास हवे?

१८ पवित्र शास्त्र म्हणतेः “पती व पत्नी यांनी एकमेकांसोबत विश्‍वासू असले पाहिजे.” पतीला ते म्हणतेः “तुझ्या झऱ्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो. तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. . . . परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?” (इब्रीयांस १३:४; नीतीसूत्रे ५:१८-२०, टुडेज इंग्लिश व्हर्शन.) होय, व्यभिचार हा देवाच्या नियमांविरुद्ध आहे. त्यामुळे विवाहात गोंधळ निर्माण होतो. विवाहावर संशोधन करणाऱ्‍या एका महिला व्यक्‍तीने सांगितलेः “अनेकांचा असा समज आहे की, विवाहबाह्‍य संबंधामुळे विवाहसंबंध चटकदार होतो.” परंतु ती पुढे म्हणते की, अशा संबंधामुळेच प्रत्येक वेळी “खऱ्‍या अडचणी” उद्‌भवतात.—नीतीसूत्रे ६:२७-२९, ३२.

आपल्या सोबत्याच्या सुखासाठी झटा

१९. विवाहीत जोडप्याला लैंगिक संबंधापासून अधिकाधिक सुख कसे मिळू शकेल?

१९ केवळ स्वतःपुरतेच लैंगिक सुख मिळवण्याकडे लक्ष दिल्यास सौख्य मिळत नाही. उलट आपल्या सोबत्याच्या सुखाकडे लक्ष दिल्यास ते मिळते. पवित्र शास्त्र म्हणतेः “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा.” (१ करिंथकर ७:३) येथे देण्यावर भर देण्यात आलेला आहे. देण्यामुळे देणाऱ्‍यालाही खरा आनंद मिळतो. येशू ख्रिस्ताने देखील असे म्हटले होतेः “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात अधिक आनंद आहे.”—प्रे. कृत्ये २०:३५.

मुलांसाठी स्वतःस देऊ करा

२०. मुलांसोबत एकत्र मिळून काम करणे इतके महत्त्वाचे का आहे?

२० साधारण आठ वर्षांच्या मुलाने म्हटलेः “माझे वडील सदैव काम करतात. ते कधीही घरी नसतात. ते मला पैसे व खूप खेळणी देतात, पण ते मला क्वचितच दिसतात. ते मला खूप आवडतात. मला वाटते की, त्यांनी सर्व वेळ काम करु नये, म्हणजे मला त्यांचा सहवास अधिक काळ घडेल.” पालकांनी ‘घरी असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता’ आपल्या मुलांना शिकवावे ही पवित्र शास्त्राची आज्ञा पाळल्यास घरातील वातावरण किती चांगले होईल बरे! मुलांसाठी स्वतःस देऊ करण्यामुळे म्हणजेच त्यांच्या सहवासात योग्य वेळी राहिल्याने कौटुंबिक सुखाला नक्कीच हातभार लागेल.—अनुवाद ११:१९; नीतीसूत्रे २२:६.

जरुर ती शिस्त लावा

२१. मुलांना शिस्त लावण्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

२१ आपला स्वर्गीय पिता त्याच्या लोकांना सद्‌बोध देऊ वा शिस्त लावून पालकांसाठी योग्य कित्ता घालून देतो. (इब्रीयांस १२:६; प्रे. कृत्ये २९:१५) हे ओळखूनच पवित्र शास्त्र पालकांना उत्तेजन देते की, “बापांनो, . . .  [आपल्या मुलांना] प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.” शिस्त लावण्याने—मग त्यात मार देणे वा सवलती काढून घेणे याचा समावेश झाला तरी—पालकांचे आपल्या मुलांवर प्रेम असल्याचे दिसून येते. पवित्र शास्त्र म्हणतेः “जो वेळीच शिक्षा करतो तो [आपल्या मुलांवर] प्रीती करणारा होय.”—इफिसकर ६:४; नीतीसूत्रे १३:२४; २३:१३, १४.

युवकांनो, जगाच्या मार्गांचा प्रतिकार करा

२२. युवकांचे कर्तव्य काय व ते पार पाडण्यात काय गोवलेले आहे?

२२ युवकांनी देवाचे नियम मोडावे म्हणून जग प्रयत्न करीत असते. तसेच पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे “बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते.” (नीतीसूत्रे २२:१५) त्यामुळे योग्य ते करण्यासाठी झगडावे लागते. तरीही पवित्र शास्त्र सांगतेः “मुलांनो, तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञा मानाव्या हे तुमचे ख्रिस्ती कर्तव्य आहे. कारण असे करणे योग्य आहे.” यामुळे मोठा फायदा होईल. यास्तव, मुलांनो शहाणे व्हा. “आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा” या उपदेशाकडे लक्ष द्या. अमली पदार्थ घेण्याच्या, दारुच्या अतिसेवनाचा, व्यभिचार करण्याच्या व देवाच्या नियमाविरुद्ध असणाऱ्‍या गोष्टी करण्याच्या मोहाला विरोध करा.—इफिसकर ६:१-४; उपदेशक १२:१; नीतीसूत्रे १:१०-१९, टुडेज इंग्लिश व्हर्शन.

पवित्र शास्त्राचा एकत्र मिळून अभ्यास करा

२३. पवित्र शास्त्राचा सर्व कुटुंबाने मिळून अभ्यास केल्यास कोणते फायदे होतील?

२३ कुटुंबातील एका सभासदाने पवित्र शास्त्राच्या शिकवणींचा अभ्यास करुन त्या आचरणात आणल्या तर त्यामुळे कौटुंबिक सुखाला हातभार लागतो. पण हीच गोष्ट, पती, पत्नी व मुलांनी केली तर ते कुटुंब किती आशीर्वादित होईल बरे! कुटुंबातील प्रत्येक सभासद यहोवाची सेवा करण्यास इतरांना मदत करील तर त्यांचे नाते उबदार व दृढ होईल आणि त्यांच्यामध्ये मनमोकळेपणा असेल!—अनुवाद ६:४-९; योहान १७:३.

कौटुंबिक समस्या यशस्वीपणे सोडविणे

२४. विवाहीत जोडप्यांनी आपसामध्ये होणाऱ्‍या चुकांना का वागवून घ्यावे?

२४ सर्वसाधारणपणे आनंदी कुटुंबातही वेळोवेळी समस्या येतातच. याचे कारण म्हणजे आपण सर्व अपूर्ण असून चुका करतो व यामुळेच ते घडते. पवित्र शास्त्र म्हणतेः “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो.” (याकोब ३:२) यासाठीच विवाहितांनी आपापल्या सोबत्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करु नये. याऐवजी, प्रत्येकाने दुसऱ्‍याच्या चुका होणारच याची जाणीव ठेवली पाहिजे आणि तशी सूट दिली पाहिजे. अपूर्ण लोकांना पूर्णपणे सुखी कुटुंब बनवणे अशक्य असल्याने अशी अपेक्षा विवाहीत जोडप्यांनी करु नये.

२५. वैवाहिक समस्या प्रेमाने कशा सोडवल्या जाव्या?

२५ आपल्या वैवाहिक सोबत्याला चिडीस आणणाऱ्‍या गोष्टी टाळण्याची पती पत्नीची इच्छा नक्कीच असते. तरी अनेक प्रयत्नानंतरही दुसऱ्‍या बेचैन करणाऱ्‍या गोष्टी त्यांच्या हातून होतील. तर मग, अशा वेळी या समस्या कशा हाताळाव्या? पवित्र शास्त्राचा सल्ला आहेः “प्रीती पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) याचा अर्थ, जे विवाहीत जोडपे आपसात प्रेम व्यक्‍त करते ते आपसामध्ये परस्परांच्या चुकांची उजळणी करीत राहणार नाहीत. प्रेम, जणू असे काही म्हणेलः ‘होय, तुझ्या हातून चूक झाली, तशीच कधी कधी माझीही होते. त्यामुळे मी तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष करतो व तूही माझ्या चुकांकडे दुर्लक्ष कर.’—नीतीसूत्रे १०:१२; १९:११.

२६. काही समस्या उद्‌भवल्यास ती सोडवण्यास कशामुळे मदत मिळेल?

२६ विवाहीत जोडपी आपल्या चुकांचा अंगीकार करुन त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अनेक वादविवाद व मनस्ताप टाळता येतात. पतीपत्नींचा कल वादविवाद जिंकण्याकडे नव्हे, तर समस्या सोडविण्याकडे असावा. चूक तुमच्या वैवाहिक सोबत्याची असली तरी दयाळूपणा दाखवून समस्या सोडविण्यास हातभार लावा. चूक स्वतःची असल्यास नम्रतेने क्षमा मागा. चाल-ढकल करु नका. विलंब न लावता समस्या हातावेगळी करा. “तुम्ही रागात असता सूर्य मावळू नये.”—इफिसकर ४:२६.

२७. पवित्र शास्त्रातील कोणता सल्ला अनुसरल्याने विवाहित जोडप्याला त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल?

२७ तुम्ही विवाहीत व्यक्‍ती आहात तर “तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्‍यांचेही पहावे.” हा नियम तुम्ही पाळणे अगत्याचे आहे. (फिलिप्पैकर २:४) तुम्ही ही पवित्र शास्त्राची आज्ञा पाळण्यास हवीः “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा. यहोवाने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१२-१४.

२८. (अ) वैवाहिक समस्या सोडवण्याचा घटस्फोट हा मार्ग आहे का? (ब) घटस्फोट घेऊन पुनर्विवाहाला मोकळीक मिळू शकेल असे कोणते एकमेव कारण पवित्र शास्त्र दाखविते?

२८ आजकाल विवाहीत जोडपी आपल्या समस्या सोडविण्यासाठी देवाच्या वचनातील सल्ल्याची मदत घेत नाहीत, आणि पर्याय म्हणून घटस्फोटाकडे वळतात. पण समस्या सोडविण्याचा मार्ग या दृष्टीने घटस्फोटाला देवाची मान्यता आहे का? मुळीच नाही. (मलाखी २:१५, १६) विवाह ही तहहयात योजना असावी अशी त्याची इच्छा होती. (रोमकर ७:२) पवित्र शास्त्र केवळ एकाच कारणास्तव घटस्फोट घेण्यास व पुनर्विवाह करण्यास मान्यता देते व ते म्हणजे, व्यभिचार (ग्रीक, पोर्निआ, भयंकर स्वरुपाची लैंगिक अनैतिकता). व्यभिचार घडला आहे तर जोडप्यापैकी निष्पाप व्यक्‍तीला घटस्फोट घ्यावा की नाही हे ठरवता येते.—मत्तय ५:३२.

२९. (अ) तुमचा वैवाहिक सोबती ख्रिस्ती भक्‍तीमध्ये तुमच्यासह सहभागी होत नसल्यास तुम्ही काय करावे? (ब) याचा कोणता परिणाम होण्याची शक्यता आहे?

२९ तुमच्या वैवाहिक सोबत्याने तुमच्या बरोबर देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याचे नाकारले व तुम्ही करीत असलेल्या ख्रिस्ती कार्याला विरोध केला तर काय? अशा परिस्थितीत देखील तुम्ही आपल्या वैवाहिक सोबत्यासह रहावे व आपल्या समस्यातून सुटण्यासाठी विभक्‍ततेची पळवाट बरी असे समजू नये असा सल्ला पवित्र शास्त्र देते. आपल्या स्वतःच्या वागणूकीविषयी पवित्र शास्त्र देत असलेला सल्ला मानून घरातील परिस्थिती सुधारण्याचा होता होईल तितका व्यक्‍तीगत प्रयत्न करा. कालांतराने तुम्ही आपल्या ख्रिस्ती वागणुकीने आपल्या वैवाहिक सोबत्याला जिंकू शकाल. (१ करिंथकर ७:१०-१६; १ पेत्र ३:१, २) तुमच्या प्रेमळ धीराला असे प्रतिफळ मिळाल्यास तुम्ही किती धन्य व्हाल बरे!

३०. पालकांनी आपल्या मुलांना चांगले उदाहरण घालून देण्याची अतिशय गरज का आहे?

३० आजकाल अनेक कौटुंबिक समस्यांमध्ये मुले गोवलेली असतात. अशी स्थिती तुमच्या कुटुंबात असल्यास काय करता येईल? सर्वप्रथम पालक या नात्याने तुम्ही चांगले उदाहरण घालून दिले पाहिजे. याचे कारण हे की, तुम्ही जे सांगता त्यापेक्षा तुम्ही जे करता ते अनुसरण्याकडे तुमच्या मुलांचा कल अधिक असतो. तुमची उक्‍ती व कृती यात फरक असल्यास तो मुलांच्या चटकन ध्यानात येतो. या कारणासाठी, आपल्या मुलांनी उत्तम ख्रिस्ती जीवन जगावे अशी तुमची इच्छा आहे तर तुम्ही स्वतः तसे उदाहरण घालून दिले पाहिजे.—रोमकर २:२१, २२.

३१. (अ) मुलांनी आपल्या पालकांचे आज्ञापालन करावे यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण कारणाची गरज आहे? (ब) व्यभिचाराची मनाई करणारा देवाचा नियम पाळण्यातील शहाणपणा तुम्ही आपल्या मुलाला कसा दाखवाल?

३१ याबरोबर तुम्ही मुलांसोबत कारणमीमांसा चर्चिली पाहिजे. आपल्या मुलांना नुसते हे सांगणे पुरेसे नाही की, ‘व्यभिचार अयोग्य असल्याने तू तो आचरु नये अशी माझी इच्छा आहे.’ मुलांना हेही दाखवून देण्याची गरज आहे की, त्यांचा निर्माणकर्ता, यहोवा देव असे म्हणतो की, व्यभिचार चुकीचा आहे. (इफिसकर ५:३-५; १ थेस्सलनीकाकर ४:३-७) पण हेही पुरेसे नाही. देवाचे नियम मुलांनी का पाळावे व त्यामुळे त्यांचा कसा फायदा होईल हे समजण्यासही त्यांची मदत केली पाहिजे. उदाहरणार्थ, पुरुषाचे बीज आणि स्त्रीमधील अंडकोश यांच्या संयुक्‍त मिलनाने अद्‌भूतरित्या मानवी बालक कसे घडते याकडे आपल्या मुलाचे लक्ष वेधून तुम्ही विचारु शकताः ‘ज्याने जननाच्या या चमत्काराची रचना केली त्यालाच, त्याने दिलेल्या जननशक्‍तीचा कसा उपयोग मानवांनी करावा, हे अधिक चांगले कळत नसावे का?’ (स्तोत्रसंहिता १३९:१३-१७) किंवा तुम्ही विचारु शकताः ‘आपला थोर सृष्टीकर्ता आपल्याला जीवनातील आनंदापासून वंचित ठेवणारा नियम करील असे तुला वाटते का? उलट, त्याचे नियम पाळल्याने आपण अधिक आनंदी होणार नाही का?’

३२. (अ) तुमच्या मुलाचा दृष्टीकोण देवाच्या दृष्टीकोनाशी सहमत नसल्यास तुमची प्रतिक्रिया कशी असावी? (ब) पवित्र शास्त्र वचनांमागील सूज्ञपणा समजण्यास आपल्या मुलाला कशी मदत करता येईल?

३२ अशा प्रश्‍नांमुळे, आपल्या जननेंद्रियांच्या उपयोगाचे नियंत्रण करणाऱ्‍या, देवाच्या नियमांविषयी मूल विचार करु लागेल. त्याचे विचार समजून घ्या. ते तुमच्या अपेक्षप्रमाणे नसल्यास चिडू नका. तुमच्या मुलाची पिढी ही पवित्र शास्त्राच्या शिकवणींपासून फार दूर गेलेली आहे हे लक्षात घ्या व मग, त्याच्या पिढीचे अनैतिक मार्ग सूज्ञपणाचे कसे नाहीत हे त्याला दाखवा. लैंगिक अनीतीमुळे झालेल्या अनौरस संतानाकडे, गुप्तरोग वा इतर समस्यांच्या विशिष्ट उदाहरणांकडे तुम्ही आपल्या मुलांचे लक्ष वेधू शकता. अशा रितीने पवित्र शास्त्राचे म्हणणे सूज्ञतेचे व योग्य असल्याचे त्याच्या लक्षात येण्यास मदत होईल.

३३. पृथ्वीवरील नंदनवनामध्ये अनंतकाल जीवन मिळविण्याची पवित्र शास्त्राधारित आशा कौटुंबिक जीवन यशस्वी बनण्यात मदत का देऊ शकते?

३३ विशेषतः पृथ्वीवरील नंदनवनामध्ये अनंतकाल जीवन मिळण्याची, पवित्र शास्त्रावर आधारलेली आशा कौटुंबिक जीवन यशस्वी करण्यासाठी आपली मदत करते. असे का? कारण देवाच्या नव्या व्यवस्थेमध्ये राहण्याची आपली खरोखर इच्छा असल्यास तेव्हा जसे रहावे लागेल तसे आता राहण्याचा अटोकाट प्रयत्न करु. याचाच अर्थ, यहोवा देवाच्या सूचना व मार्गदर्शन आपण अधिकाधिक प्रमाणात अनुसरु. परिणामी आपल्या आताच्या आनंदावर देव अनंतकाल जीवन व भावी अनंतकाळातील अमर्याद सुखाच्या आस्वादाचा मुकुट चढवील.—नीतीसूत्रे ३:११-१८.

[अभ्यासाचे प्रश्‍न]