व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे शांतीचे सरकार

देवाचे शांतीचे सरकार

प्रकरण १३

देवाचे शांतीचे सरकार

१. मानवी शासने कोणत्या गोष्टी करण्यात अपयशी ठरली आहेत?

 मानवी सरकार—अगदी सद्‌हेतूपूर्ण असलेलीही—लोकांच्या खऱ्‍या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत हे तुमच्या ध्यानात आले आहे का? गुन्हे व वर्णद्वेषाचे प्रश्‍न सोडवण्यात वा सर्व लोकांना अन्‍न व घरे देण्यात एकही सरकार यशस्वी झालेले नाही. आपल्या सर्व प्रजेला त्यांनी पूर्णपणे रोगमुक्‍त केलेले नाही. तसेच कोणत्याही सरकारला वार्धक्य व मृत्यु यांना अडवता आलेले नाही. तसेच मृतांना पुन्हा जिवंत करता आलेले नाही. आपल्या नागरिकांना शाश्‍वत शांती व सुरक्षितता एकाही सरकारला देता आलेली नाही. लोकांना भेडसावणाऱ्‍या भयानक समस्या सोडवणे मानवी सरकारांना केवळ अशक्य आहे.

२. पवित्र शास्त्राचा प्रमुख संदेश कोणता?

सर्व लोकांना सुखी जीवनाचा आनंद आकंठ लुटता यावा अशी व्यवस्था करु शकेल अशा नीतीमान सरकारची आपल्याला किती गरज आहे ते आपल्या निर्मात्याला माहीत आहे. याकरताच, देवाच्या मार्गदर्शनाखालील एका सरकारबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला माहिती देते. वास्तविक देवाचे वचनयुक्‍त सरकार हाच पवित्र शास्त्राचा प्रमुख संदेश आहे.

३. देवाच्या सरकारबद्दल यशया ९:६, ७ मध्ये काय म्हटले आहे?

पण तुम्ही कदाचित विचारालः ‘देवाच्या सरकारचा उल्लेख पवित्र शास्त्रात आहेच कोठे?’ पण तो आहे. उदाहरणादाखल यशया ९:६, ७ येथील उल्लेख पहा. तेथे म्हटले आहेः “आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्‌भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”

४. देवाच्या सरकारचा राजा होणारे बालक कोण?

पवित्र शास्त्र येथे बालकाच्या—अधिपतीच्या—जन्माबद्दल सांगत आहे. कालांतराने तो मोठा राजा, “शांतीचा अधिपति” होईल. खरोखर एका अद्‌भुत सरकारची सूत्रे त्याच्या हाती असतील. हे शासन संपूर्ण पृथ्वीवर शांती आणील व ती शांती चिरकाल टिकेल. ज्या बालकाच्या जन्माबद्दल यशया ९:६, ७ मध्ये उल्लेख केलेला आहे, तो येशू होता. येशूच्या जन्माबद्दल कुमारी मरिया हिला सांगताना गब्रीएल देवदूत म्हणालाः “तो . . . युगानुयुग राज्य करील. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”—लूक १:३०-३३.

राज्याचे महत्त्व जोरदारपणे सांगणे

५. (अ) पवित्र शास्त्रात त्या राज्याचे महत्व कसे दर्शविले आहे? (ब) देवाचे राज्य म्हणजे काय व ते काय करील?

पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्त व त्याच्या शिष्यांचे प्रमुख कार्य लवकरच येणाऱ्‍या देवाच्या राज्याबद्दल प्रचार करणे व शिकवणे हे होते. (लूक ४:४३; ८:१) पवित्र शास्त्रात त्यांनी या राज्याबद्दल जवळजवळ १४० वेळा उल्लेख केला आहे. देवाला प्रार्थना कशी करावी हे शिकवतानाही येशूने आपल्या शिष्यांना सांगितलेः “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) ख्रिस्ती लोक ज्या राज्याबद्दल प्रार्थना करतात ते खरोखरचे सरकार आहे का? तुम्हाला वाटत नसेल पण ते खरेच आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त हा त्या राज्याचा राजा आहे. सर्व पृथ्वी त्याच्या अमलाखाली येईल. माणसे, परस्पर विरोधी देशात विभागली न जाता, देवराज्याच्या शासनाखाली ती सर्व शांतीमध्ये ऐक्याने राहतील. हे भविष्य किती आनंददायक आहे!

६. येशू भूतलावर असताना राज्य “जवळ” व “तुमच्यामध्ये” आहे असे का म्हटले गेले?

“पश्‍चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” असे सांगून बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने या सरकारचा प्रचार सुरु केला. (मत्तय ३:१, २) योहान असे का म्हणू शकला? कारण देवाच्या स्वर्गीय राज्याचा शास्ता बनणाऱ्‍या येशूला तो लवकरच बाप्तिस्मा देणार होता. तसेच पवित्र आत्म्यानेही त्याला अभिषेक होणार होता. तेव्हा, “पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे,” असे येशू परुश्‍यांना का म्हणाला ते तुमच्या ध्यानात येईल. (लूक १७:२१) कारण देवाने ज्याला राजा म्हणून नियुक्‍त केले होते, तो त्यांच्यामध्ये उपस्थित होता. प्रचार व शिकवणीच्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत, मरेपर्यंत देवाशी एकनिष्ठ राहून, येशूने राजा बनण्याचा आपला हक्क सिद्ध केला.

७. येशू भूतलावर असताना देवाचे राज्य हा महत्त्वाचा वादविषय होता असे कशावरुन दिसून येते?

येशूच्या उपाध्यपणाच्या वेळी देवाचे राज्य हाच महत्त्वाचा वादविषय होता, हे दर्शवण्यासाठी, येशूच्या मृत्युच्या आदल्या दिवशीच्या घटना आपण पाहू. “हा आमच्या राष्ट्राला फितविताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हाला आढळला,” असा आरोप लोकांनी येशूवर केला असे पवित्र शास्त्र सांगते. हे सर्व ऐकून रोमी राज्यपाल पंतय पिलात याने येशूला विचारलेः “तू यहुद्यांचा राजा आहेस काय?”—लूक २३:१-३.

८. (अ) येशूने, तो राजा आहे का, असे विचारल्यावर कसे उत्तर दिले? (ब) त्याचे राज्य “येथले नाही” असे येशू म्हणाला त्याचा अर्थ काय?

येशूने पिलाताच्या प्रश्‍नाला सरळ उत्तर दिले नाही. तो म्हणालाः “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य येथले नाही.” येशूने अशा प्रकारे उत्तर दिले कारण त्याचे राज्य पृथ्वीवरचे नव्हते. तो पृथ्वीवरील सिंहासनावरुन, मानव म्हणून नव्हे तर स्वर्गातून राज्य करणार होता. राजा या नात्याने सत्ता चालविण्याचा येशूला अधिकार होता की नाही असा वाद असल्याने पिलाताने येशूला पुन्हा विचारलेः “तर तू राजा आहेस का?”

९. (अ) येशूने कोणते अद्‌भुत सत्य सांगितले? (ब) आज कोणत्या प्रश्‍नांना महत्त्व आहे?

एका नव्या सरकारचा प्रचार करतो व शिक्षण देतो यासाठी येशूची चौकशी होत होती. न्यायालयामध्ये त्याचे जीवन पणाला लागले होते हे उघड आहे. या कारणास्तव येशूने पिलाताला उत्तर दिलेः “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्‍यासाठी जन्मलो व ह्‍यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३६, ३७) होय, देव-राज्याच्या सरकारबद्दलची अद्‌भुत सत्ये लोकांना सांगण्यात येशूने आपले भूतलावरील जीवन घालवले. तो त्याचा प्रमुख संदेश होता, आणि आजही ते राज्य, हाच सर्वात महत्त्वाचा वादविषय आहे. तरी अजूनही काही प्रश्‍नांची उत्तरे राहतातचः कोणा व्यक्‍तीच्या जीवनात कोणत्या सरकारला सर्वात जास्त महत्त्व आहे? एखादे मानवी शासन की ख्रिस्त ज्याचा राजा आहे ते देवाचे राज्य?

पृथ्वीच्या नव्या सरकारची योजना

१०. (अ) एका नव्या सरकारची गरज देवाला कधी जाणवली? (ब) पवित्र शास्त्रात या सरकारबद्दल पहिला उल्लेख कोठे आहे? (क) सर्प कोणाचे प्रतिक आहे?

१० आदाम व हव्वेला सैतानाने आपल्या बंडात सामील करुन घेतले तेव्हा मानवजातीकरता एका नव्या शासनाची निकड आहे हे यहोवाच्या ध्यानात आले. असे एक सरकार स्थापन करण्याचा आपला मनोदय देवाने तत्काळ सांगितला. “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील,” असा शाप देवाने सर्पाला, म्हणजे वास्तविक सैतानाला दिला. त्यामध्येच त्याने या सरकारचा उल्लेख केला.—उत्पत्ती ३:१४, १५.

११. कोणामध्ये परस्पर वैर होणार होते?

११ ‘पण यात सरकारचा कोठे उल्लेख आहे?’ असे कदाचित तुम्ही विचाराल. त्या विधानाकडे जरा बारकाईने पाहू, म्हणजे आपणास ते कळेल. शास्त्रवचन म्हणते की, सैतान व “स्त्री” यांमध्ये वैरभाव अथवा द्वेष असेल. तसेच सैतानाची “संतती’ वा “मुले” आणि स्त्रीची “संतती” अथवा “मुले” यामध्येही वैर असेल. तर प्रथम, ही “स्त्री” कोण हे आपण शोधले पाहिजे.

१२. प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात “स्त्री” बद्दल काय म्हटले आहे?

१२ ही कोणी भूतलावरील स्त्री नव्हे. कोणाही मानवी स्त्रीशी सैतानाचे खास वैर नाही. तर ही स्त्री लाक्षणिक आहे; म्हणजे ती कोणा दुसऱ्‍याच गोष्टीचे प्रतिक आहे. हे, पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकात, प्रकटीकरणामध्ये, दाखवले आहे. तेथे तिच्याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. “ती सूर्यतेज पांघरलेली होती, आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्‍यांचा मुकुट होता.” असे त्या “स्त्री” चे वर्णन आहे. प्रकटीकरणात तिच्या मुलाबद्दल जे लिहिले आहे त्याकडे लक्ष दिल्यास ही “स्त्री” कशाचे प्रतिक आहे ते कळण्यास मदत होईल. “सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.”—प्रकटीकरण १२:१-५.

१३. “पुसंतान” व “स्त्री” कोणाचे वा कशाचे प्रतिक आहेत?

१३ हे “पुसंतान” कोण अथवा काय आहे ते समजल्यास, “स्त्री” कोणाचे वा कशाचे प्रतिक आहे ते कळेल. जशी ती स्त्री म्हणजे खरी मानवी स्त्री नव्हे तसेच ते मूलही कोणी व्यक्‍ती नव्हे. पवित्र शास्त्र दाखवते की, हे पुसंतान सर्व “राष्ट्रांवर राज्य करील.” म्हणून ते मूल म्हणजे, येशू ख्रिस्त ज्याचा राजा असेल त्या देवाच्या सरकारचे प्रतिक आहे; व ती “स्त्री”, अर्थातच, देवाच्या निष्ठावंत स्वर्गीय व्यक्‍तींच्या संस्थेचे प्रतिक आहे. “स्त्री”पासून “पुसंतान” जसे उत्पन्‍न झाले तसाच राजा येशू ख्रिस्त, स्वर्गीय संस्थेपासून म्हणजे देवाचा हेतू सिद्धीस नेण्यासाठी एकजुटीने कार्य करणाऱ्‍या, स्वर्गातील निष्ठावंत आत्मिक व्यक्‍तींच्या मडळीतून आला. गलतीकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये ४:२६ येथे त्या संस्थेला “वरील यरुशलेम” असे म्हटले आहे. तेव्हा, आदाम व हव्वेने देवाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध बंड केल्याबरोबर, नीतीमत्वावर प्रीती करणाऱ्‍यांना आशा देण्यासाठी यहोवाने राज्य सरकारची योजना केली.

यहोवा आपल्या वचनाची आठवण ठेवतो

१४. (अ) सैतानाचे डोके फोडणाऱ्‍या “संतती” विषयी दिलेले वचन आपल्या लक्षात असल्याचे यहोवाने कसे दाखवले? (ब) ते वचनयुक्‍त “संतान” कोण आहे?

१४ देवाच्या सरकारचा राजा बनणारी “संतती” पाठवण्याचे आपले वचन यहोवा विसरला नाही. हा राजा सैतानाचे डोके फोडून त्याचा नाश करील. (रोमकर १६:२०; इब्रीकर २:१४) कालांतराने विश्‍वासू अब्राहामाच्या वंशातून ते संतान येईल असे यहोवाने सांगितले. यहोवा अब्राहामाला म्हणालाः “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ती २२:१८) तर मग, अब्राहामाच्या वंशातून येईल असे अभिवचन ज्याच्याबद्दल दिले ते “संतान” कोण? याचे उत्तर देताना पवित्र शास्त्र पुढे म्हणतेः “अब्राहामाला आणि त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती; संतानांना असे पुष्कळ जणांबद्दल तो म्हणत नाही, तर ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी तो म्हणत आहे. आणि तो एक ख्रिस्त आहे.” (गलतीकर ३:१६) अब्राहामाचा मुलगा इसहाक व नातू याकोब यांनाही, देवाच्या “स्त्री”चे संतान त्यांच्या वंशातून येईल असे यहोवाने सांगितले होते.—उत्पत्ती २६:१-५; २८:१०-१४.

१५, १६. ते “संतान” राजा होईल असे कशावरुन सिद्ध होते?

१५ हे “संतान” राजा होईल असे स्पष्ट करताना याकोबाने आपला पुत्र यहुदा याला सांगितलेः “यहूदाचे राजवेत्र शिलो येईपर्यंत त्याजकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून हालणार नाही. राष्ट्रे त्याच्या अंकित होतील.” (उत्पत्ती ४९:१०) येशू ख्रिस्त यहुदा वंशात जन्मला. “सर्व राष्ट्रे” ज्याच्या “अंकित होतील” तो “शिलो” स्वतःच असल्याचे त्याने सिद्ध केले.—इब्रीयांस ७:१४.

१६ यहुदास केलेल्या या विधानानंतर ७०० वर्षांनी यहुदा वंशातील दावीदाबद्दल यहोवाने म्हटलेः “माझा सेवक दावीद मला मिळाला आहे. . . . त्याची संतती सर्वकाळ राहील व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे मी करीन.” (स्तोत्रसंहिता ८९:२०, २९) दावीदाची “संतती” “सर्वकाळ” राहील व त्याचे “राजासन” “स्वर्गाच्या दिवसां”इतके राहील असे देवाने म्हटले त्याचा अर्थ काय? त्याने नियुक्‍त केलेल्या राजाच्या—येशू ख्रिस्ताच्या—हाती राजशासन अनंतकाळ राहील याचा उल्लेख येथे यहोवा देवाने केला आहे. हे कसे कळते?

१७. तो वचनयुक्‍त राजा, येशू ख्रिस्तच असल्याचे आपल्याला कसे कळते?

१७ मरीयेला होणाऱ्‍या मुलाबद्दल, गब्रीएल या यहोवाच्या दूताने सांगितलेल्या गोष्टी आठवा. तो म्हणालाः “त्याचे नाव येशू ठेव.” परंतु येशू नुसते लहान बालक अथवा एक सामान्य मानव म्हणून भूतलावर राहणार नव्हता. गब्रीएल पुढे म्हणालाः “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. यहोवा देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील. आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३१-३३) यहोवाने आपणावर प्रेम करणाऱ्‍या व विश्‍वास ठेवणाऱ्‍यांच्या सार्वकालिक लाभासाठी एक नीतीमान सरकार स्थापण्याची व्यवस्था केलेली आहे, ही खरोखरीच आनंददायक गोष्ट नव्हे का?

१८. (अ) पृथ्वीवरील शासनांच्या अंताचे वर्णन पवित्र शास्त्रात कसे केले आहे? (ब) लोकांसाठी देवाचे सरकार काय करील?

१८ देवाच्या राज्य सरकारने जगातील सर्व शासनांचा नाश करण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यावेळी येशू ख्रिस्त विजयी राजा या अर्थाने आपली हालचाल करील. त्या युद्धाचे वर्णन करताना पवित्र शास्त्र म्हणतेः “त्या राजांच्या आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करुन त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४; प्रकटीकरण १९:११-१६) इतर शासनांचा अडसर वाटेतून दूर झाल्यामुळे देवाचे राज्य लोकांच्या खऱ्‍या गरजा भागवील. त्याचा कोणताही विश्‍वासू नागरीक आजारी वा वृद्ध होणार नाही व मरणारही नाही याकडे राजा येशू ख्रिस्त लक्ष देईल. गुन्हे, घरांची व अन्‍नाची टंचाई व अशाच इतर समस्या सोडवल्या जातील. तेव्हा खरी शांती व सुरक्षितता संपूर्ण भूतलावर नांदतील. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३-५) परंतु देवाच्या या राज्यात जे कोणी राज्यकर्ते बनणार आहेत त्यांच्याविषयी अधिक माहिती करुन घेण्याची गरज आहे.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११३ पानांवरील चित्रं]

देवाच्या राज्याचा प्रचार करण्याच्या महत्त्वपूर्ण कामासाठी येशूने आपल्या शिष्यांना पाठविले

[११४ पानांवरील चित्रं]

येशूची न्यायालयीन चौकशी होत असता त्याने देवाच्या राज्याचा प्रचार केला

[११९ पानांवरील चित्रं]

तुम्ही येशूकडे कोणत्या दृष्टीने पाहता—विजयशाली राजा की एक असहाय्य बालक?