अध्याय ४
अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन का असावे?
“सर्वांस मान द्या.”—१ पेत्र २:१७.
१, २. (क) अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहणे आपल्याला इतके कठीण का वाटते? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?
एका लहान मुलाला त्याची खेळणी आवरायला सांगितली जाते आणि त्याला ते करायचे नसते तेव्हा तुम्ही त्याचा चेहरा कसा होतो हे पाहिले आहे का? त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याच्या मनात चलबिचल चालली आहे हे तुम्हाला लगेच समजेल. आईने जे सांगितले ते आपण ऐकले पाहिजे हे त्याला माहीत आहे पण त्याला स्वतःला मात्र ते करायची इच्छा नाही. या मुलाप्रमाणेच काही वेळा आपलीही अशीच द्विधा मनःस्थिती होते.
२ अधिकार पदावर असलेल्यांच्या आज्ञेत राहणे आपल्यासाठी नेहमीच सोपे नसते. तुम्हाला कधीकधी त्यांच्या आज्ञेत राहणे कठीण वाटते का? असे असल्यास, असे वाटणारे तुम्ही एकटेच नाही. आपण अशा काळात राहत आहोत जिथे अधिकाऱ्यांच्या अधीन राहणे ही एक अप्रिय गोष्ट बनली आहे. तरीपण बायबलमध्ये म्हटले आहे, की आपण अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहून त्यांचा आदर केला पाहिजे. (नीतिसूत्रे २४:२१) खरे तर, आपण जर देवाच्या प्रेमात टिकून राहू इच्छितो तर आपण अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन असणे महत्त्वाचे आहे. साहजिकच मग याबद्दल काही प्रश्न उभे राहतात. जसे की, अधिकाऱ्यांच्या अधीन राहणे आपल्याला कठीण का वाटते? आपण त्यांच्या अधीन असावे अशी यहोवा का अपेक्षा करतो व आपल्याला अधीन राहण्यास कोणती गोष्ट मदत करू शकेल? आणि आपण कोणकोणत्या मार्गांनी त्यांना अधीनता दाखवू शकतो?
अधीन राहणे कठीण का आहे?
३, ४. पाप आणि अपरिपूर्णतेची सुरुवात कशी झाली व आपल्या पापी प्रवृत्तीमुळे आपल्याला अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहणे कठीण का वाटते?
३ अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहणे कठीण का आहे त्याची दोन कारणे आहेत. या दोन कारणांचा आपण थोडक्यात विचार करू या. पहिले कारण, आपण अपरिपूर्ण आहोत. आणि दुसरे कारण, आपल्यावर देखरेख करणारेसुद्धा आपल्यासारखेच अपरिपूर्ण आहेत. अपरिपूर्णतेची सुरुवात एदेन बागेत झाली. आदाम व हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडल्यानंतर ते पापी व अपरिपूर्ण बनले. म्हणजे, देवाविरुद्ध त्यांनी केलेल्या बंडाळीसोबतच पापाची देखील सुरुवात झाली. तेव्हापासून, आपल्या सर्वांमध्ये बंड करण्याची प्रवृत्ती जन्मतःच आली आहे.—उत्पत्ति २:१५-१७; ३:१-७; स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२.
४ या पापी प्रवृत्तीमुळे बहुतेकजण अगदी सहजपणे घमेंडी व मगरूर बनतात. पण तेच, नम्रता हा गुण आपण फार क्वचितच दाखवतो. म्हणून, नम्रता जोपासण्यासाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी आपण खरोखरच खूप मेहनत घेतली पाहिजे. कधीकधी देवाची अनेक वर्षे विश्वासू सेवा केल्यानंतरही आपण हट्टी व घमेंडी बनू. मोशेच्या दिवसांत राहणाऱ्या कोरहचे उदाहरण घ्या. यहोवाच्या लोकांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले तेव्हा तोही त्यांच्याबरोबर विश्वासू होता. पण काही वर्षांनंतर मात्र त्याच्या मनात, अधिकाराची हाव निर्माण झाली आणि मग त्याने त्या काळी हयात असलेला सर्वात नम्र मनुष्य मोशे याच्याविरुद्ध निर्लज्जपणे बंड केले. (गणना १२:३; १६:१-३) दुसरे उदाहरण राजा उज्जीया याचे आहे. त्याच्या घमेंडीमुळे त्याने यहोवाच्या मंदिरात प्रवेश केला आणि जी पवित्र सेवा करण्याचा अधिकार केवळ याजकांनाच होता तो अधिकार त्याने आपल्या हाती घेतला. (२ इतिहास २६:१६-२१) कोरह आणि राजा उज्जीया या दोघांनाही खूप मोठी किंमत मोजावी लागली. ही वाईट उदाहरणे असली तरी, त्यांच्यापासून आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकतो. अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहण्यास मज्जाव करणाऱ्या आपल्या घमेंडी प्रवृत्तीला आपण आळा घातला पाहिजे.
५. अपरिपूर्ण मानवांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर कसा केला आहे?
उपदेशक ८:९) जसे की राजा शौल. यहोवाने त्याला राजा म्हणून निवडले तेव्हा तो चांगला व नम्र होता. पण नंतर त्याच्या मनात घमेंड व ईर्षा निर्माण झाली व त्याने विश्वासू दावीदाला छळायला सुरुवात केली. (१ शमुवेल ९:२०, २१; १०:२०-२२; १८:७-११) शौलानंतर दावीद राजा बनला. तो इस्राएली राजांपैकी सर्वात उत्तम राजा बनला. पण एकदा त्याने, उरीया हित्ती याच्या बायकोला हिरावून घेण्याद्वारे आणि मग निष्पाप उरीयाला लढाईत सर्वात पुढे ठेवून ठार मारण्याचा कट रचण्याद्वारे आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. (२ शमुवेल ११:१-१७) होय, अपरिपूर्णतेमुळे मानवाला, आपल्या हातात असलेल्या सत्तेचा योग्य वापर करणे जरा कठीणच जाते. आणि अधिकार पदावर असलेले हे मानव यहोवा देवाला मानणारे नसतील तर ते आपल्या अधिकाराचा अधिकच गैरवापर करतात. एका ब्रिटिश इतिहासकाराने, काही कॅथलिक पोपनी सुरु केलेल्या छळाचे वर्णन केल्यानंतर असे लिहिले: “सत्ता हाती आली की नीती भ्रष्ट होते, आणि संपूर्ण सत्ता हाती आली की नीती संपूर्णपणे भ्रष्ट होते.” लोक आपल्या अधिकाराचा गैरवापर कसा करतात याची चर्चा केल्यानंतर आपल्या मनात प्रश्न येतो, की आपण अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन का राहावे? पाहूया या प्रश्नाचे उत्तर काय आहे ते.
५ दुसरीकडे पाहता, अधिकार पदावर असलेल्या अपरिपूर्ण मानवांनी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्यांमुळे लोकांच्या मनातून अधिकाऱ्यांबद्दलचा आदर नाहीसा झाला आहे. अनेक शासक क्रूर, शोषण करणारे किंवा जुलूमी होते. मानवाने त्याला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर कसा केला ते इतिहासातून स्पष्ट दिसून येते. (आपण अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन का राहावे?
६, ७. (क) यहोवाबद्दलचे प्रेम आपल्याला काय करण्यास प्रेरित करते व का? (ख) देवाच्या आज्ञेत राहण्यात कशाचा समावेश होतो?
६ यहोवाबद्दल, इतर लोकांबद्दल आणि आपल्याला स्वतः बद्दल वाटत असणारे प्रेम, ही अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहण्याची सर्वोत्तम कारणे आहेत. इतर कोणाहीपेक्षा आपण यहोवावर प्रेम नीतिसूत्रे २७:११; मार्क १२:२९, ३०) एदेन बागेत बंड झाले तेव्हा यहोवाच्या सार्वभौमत्वावर आणि विश्वावर शासन करण्याच्या त्याच्या हक्काला आव्हान करण्यात आले व मानवजातीपैकी बहुतेकांनी यहोवाचे शासन धुडकावून सैतानाची बाजू घेतली आहे. परंतु आपण यहोवाच्या बाजूने आहोत म्हणून आपण आनंदी आहोत. आपली प्रतिक्रिया प्रकटीकरण ४:११ मध्ये सांगितल्या प्रमाणेच आहे. यहोवाच या विश्वाचा योग्य शासक आहे, ही गोष्ट आपण किती स्पष्टपणे समजू शकतो. म्हणून आपण यहोवाचे सार्वभौमत्व स्वीकारतो आणि आपल्या दैनंदिन जीवनावर राज्य करण्याचा त्याला अधिकार आहे हे कबूल करतो.
करत असल्यामुळे त्याला आनंदित करण्याची आपली इच्छा आहे. (७ यहोवाच्या सर्व आज्ञांचे पालन आपण का केले पाहिजे याचे कारण आपल्याला कळते तेव्हा आपण आनंदाने त्यांचे पालन करतो. आणि त्याच्या काही आज्ञा कठीण वाटत असल्या तरी त्याच्यावरील प्रेमापोटी आपण त्या पाळतो. पण काही वेळा आपल्याला खरोखरच आज्ञेत राहणे कठीण वाटते. अशा वेळी आपल्याला, लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या मुलाप्रमाणे आज्ञेत राहायला शिकावे लागेल. येशूला आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करणे कठीण होते तरी देखील तो त्याच्या आज्ञेत राहिला. त्याने त्याला म्हटले: “हे पित्या, . . . माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”—लूक २२:४२.
८. (क) यहोवाच्या अधिकाराच्या अधीन राहण्यात आज कशाचा समावेश होतो व याबाबतीत यहोवाला काय वाटते? (ख) सुबोध ऐकण्यास व शिक्षण स्वीकारण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (“ सुबोध ऐक आणि शिक्षण स्वीकार” हा चौकोन पाहा.)
८ आज मात्र यहोवा आपल्याशी प्रत्यक्ष बोलत नाही. तो आपले वचन आणि पृथ्वीवर त्याच्या मानवी प्रतिनिधींमार्फत बोलतो. यास्तव, अधिकार पदावर त्याने ज्यांना नियुक्त केले आहे किंवा आपल्यावर देखरेख करण्यासाठी ज्यांना राहू दिले आहे त्यांचा आदर करून आपण यहोवाच्या अधिकाराला अधीनता दाखवतो. पण या वडिलांविरुद्ध आपण बंड केले म्हणजे, ते देत असलेला बायबल आधारित सल्ला किंवा सुधारणूक नाकारली तर आपण यहोवाचे मन दुःखी करू. इस्राएल लोकांनी मोशेविरुद्ध गणना १४:२६, २७.
कुरकुर केली व बंड केले तेव्हा यहोवाला त्यांची ही कृती जणू त्याच्याविरुद्ध होती, असे वाटले.—९. आपल्या भाऊबहिणींबद्दल असलेले प्रेम कशा प्रकारे आपल्याला अधिकाराच्या अधीन राहण्यास मदत करेल? उदाहरण द्या.
९ सहमानवांवर आपले प्रेम असल्याकारणाने देखील आपण वडिलांना आदर दाखवतो. तो कसा? समजा तुम्ही एक सैनिक आहात. सैन्याचे एकंदर यश व बचाव प्रत्येक सैनिक त्याच्या वरिष्ठांना दाखवत असलेले सहकार्य, आज्ञाधारकता व आदर यावर अवलंबून आहे. या व्यवस्थेविरुद्ध बंड करून तुम्ही तिला कमकुवत केले तर तुमच्यासोबत असलेल्या सर्व सैनिकांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. आज, मानवी सैनिकांनी जगात बराच विध्वंस चालवला आहे, हे मान्य आहे. परंतु यहोवा देवाचे देखील एक सैन्य आहे जे लोकांचे फक्त भलेच करते. बायबलमध्ये देवाला शेकडो वेळा “सैन्यांचा देव” असे संबोधले आहे. (१ शमुवेल १:३) तो एका प्रचंड शक्तिशाली आत्मिक प्राण्यांच्या सैन्यांचा प्रमुख अधिकारी आहे. कधीकधी यहोवाने पृथ्वीवरील आपल्या सेवकांची तुलना देखील एका सैन्याशी केली आहे. (स्तोत्र ६८:११; यहेज्केल ३७:१-१०) आपल्यावर देखरेख करण्यासाठी यहोवाने नियुक्त केलेल्या मानवांविरुद्ध आपण बंड केले तर यामुळे आपल्या सोबतच्या आध्यात्मिक सैनिकांचा जीव धोक्यात येणार नाही का? जसे की, एखादे मूल आईवडिलांविरुद्ध बंड करत असेल तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे, एखादी ख्रिस्ती व्यक्ती नियुक्त वडिलांविरुद्ध बंड करत असेल तर मंडळीतल्या इतरांनाही कदाचित त्रास सहन करावा लागेल. (१ करिंथकर १२:१४, २५, २६) यास्तव, आज्ञाधारकतेची व सहकार्याची मनोवृत्ती दाखवून आपण सहमानवांवर असलेले प्रेम व्यक्त करतो.
१०, ११. अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहणे आपल्याच फायद्याचे कसे आहे ते समजावून सांगा.
१० आपण अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन राहतो कारण असे करणे आपल्याच फायद्याचे आहे. अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन असा, असे यहोवा आपल्याला जेव्हा जेव्हा सांगतो तेव्हा तेव्हा तो, अनुवाद ५:१६; इफिसकर ६:२, ३) तो आपल्याला मंडळीतील वडिलांच्या आज्ञेत राहायला सांगतो, कारण असे केल्याने आपला त्याच्याबरोबरचा नातेसंबंध टिकून राहू शकतो. (इब्री लोकांस १३:७, १७) शिवाय, तो आपल्याला सरकारी अधिकाऱ्यांच्या अधीन राहा असेही सांगतो जेणेकरून आपले संरक्षण होऊ शकेल.—रोमकर १३:४.
यामुळे मिळणारे फायदेही सांगतो. उदाहरणार्थ, तो मुलांना सांगतो, की जर त्यांना उत्तम जीवन व दीर्घायुष्य हवे तर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. (११ आपण अधिकार पदावर असलेल्यांच्या आज्ञेत राहिले पाहिजे, असे यहोवाला का वाटते त्याचे कारण समजल्यावर अधिकार पदावर असलेल्यांबद्दल आपल्या मनात आदर वाढेल, या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात, नाही का? तेव्हा आपण, अधिकार पदावर असलेल्यांच्या आज्ञेत राहिले पाहिजे अशा आपल्या जीवनातील तीन प्रमुख क्षेत्रांबद्दल आता पाहूया.
कुटुंबात अधीनता दाखवा
१२. कुटुंबात एका पतीला यहोवाने कोणती भूमिका नेमून दिली आहे व ती भूमिका तो कशी पार पाडू शकतो?
१२ यहोवाने स्वतः कुटुंबाची रचना केली आहे. आणि तो व्यवस्थेचा देव असल्यामुळेच कुटुंबात सर्व काही सुरळीत चालण्याकरता त्याने व्यवस्था घालून दिली आहे. (१ करिंथकर १४:३३) कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्याने पतीला नेमले आहे. येशू मंडळीवर आपले मस्तकपद जसे चालवतो तसे पतीही त्याचा मस्तक येशू ख्रिस्त याचे अनुकरण करून त्याच्या अधीन राहतो. (इफिसकर ५:२३) त्यामुळे, पतीने आपली जबाबदारी पूर्ण करण्यात कमी पडू नये तर अगदी धैर्याने ती पूर्ण करावी. शिवाय त्याने आपल्या पत्नीशी व मुलांशी, एखाद्या हुकूमशाहाप्रमाणे किंवा कठोरतेने नव्हे तर प्रेमळपणे, समंजसपणे व दयाळुपणे वागावे. त्याला मिळालेला अधिकार यहोवाच्या अधिकाराच्या तुलनेत दुय्यम आहे, ही गोष्ट त्याने लक्षात ठेवली पाहिजे.
एक ख्रिस्ती पिता ख्रिस्ताप्रमाणेच मस्तकपद चालवतो
१३. यहोवा आनंदित होईल अशा रीतीने पत्नी कुटुंबात आपली भूमिका कशी पार पाडू शकते?
१३ पत्नीने आपल्या पतीची साहाय्यक किंवा मदतनीस असले पाहिजे. बायबल मुलांना असे सांगते, की त्यांनी “आपल्या आईचा नियम” टाकू नये. याचा अर्थ, कुटुंबात पत्नीलाही अधिकार देण्यात आला आहे. (नीतिसूत्रे १:८, पं.र.भा.) परंतु हा अधिकार तिच्या पतीच्या तुलनेत दुय्यम आहे. ख्रिस्ती पत्नी आपल्या पतीला कुटुंब प्रमुख म्हणून त्याची जबाबदारी पार पाडण्यास मदत करण्याद्वारे त्याच्या अधिकाराच्या अधीन राहते. ती आपल्या पतीला कमी लेखत नाही, चलाखीने त्याला आपल्या मुठीत ठेवत नाही किंवा त्याचा अधिकार बळकावण्याचा प्रयत्न करत नाही. तर त्याच्या पाठीशी उभी राहून त्याला सहकार्य देते. त्याने घेतलेले निर्णय तिला पटले नाहीत तर ती आपले विचार आदराने व्यक्त करते. असे करण्याद्वारेही ती अधीनता दाखवते. तिचा पती सत्यात नसेल तर कदाचित तिला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. पण तिची आज्ञाधारक मनोवृत्ती पाहून तिचा पती कदाचित यहोवाविषयी शिकून घेण्यास प्रवृत्त होईल.—१ पेत्र ३:१.
१४. मुले यहोवा व आईवडील यांना आनंदित कसे करू शकतात?
१४ आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहणाऱ्या मुलांना पाहून यहोवाला आनंद होतो. शिवाय ही त्यांच्या आईवडिलांसाठी देखील सन्मानाची व आनंदाची गोष्ट आहे. (नीतिसूत्रे १०:१) एकेरी पालक कुटुंबात असलेली मुले देखील अशीच आज्ञाधारकता दाखवतात. आपल्या आईला अथवा वडिलांना आपल्या पाठिंब्याची व सहकार्याची गरज आहे याची त्यांना जाणीव असते. ज्या कुटुंबातील सर्व सदस्य देवाने त्यांना नेमून दिलेल्या भूमिका पार पाडतात तेथील वातावरण आनंदी असते, तेथे शांती नांदते. यामुळे, सर्व कुटुंबांचा जनक असलेल्या यहोवा देवाचा सन्मान होतो.—इफिसकर ३:१४, १५.
मंडळीत अधीनता दाखवा
१५. (क) मंडळीत आपण यहोवाच्या अधीन आहोत हे कसे दाखवू शकतो? (ख) पुढाकार घेणाऱ्यांच्या अधीन राहण्यास कोणती तत्वे आपल्याला मदत करू शकतात? (“ आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा” हा चौकोन पाहा.)
१५ यहोवाने आपल्या पुत्राला ख्रिस्ती मंडळीचा राजा म्हणून नियुक्त केले आहे. (कलस्सैकर १:१३) आणि येशूने, पृथ्वीवरील यहोवाच्या लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याकरता आपल्या “विश्वासू व बुद्धिमान दासाला” नेमले आहे. (मत्तय २४:४५-४७) यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ हे, ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ म्हणून सेवा करते. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यांप्रमाणेच आजही वडिलांना नियमन मंडळाकडून पत्रांमार्फत अथवा त्यांचे प्रतिनिधी असलेले प्रवासी पर्यवेक्षक यांच्या मार्फत मार्गदर्शन व सल्ला मिळतो. आपण ख्रिस्ती वडिलांच्या अधीन राहण्याद्वारे यहोवाच्या आज्ञा मानतो.—१ थेस्सलनीकाकर ५:१२; इब्री लोकांस १३:१७.
१६. कोणत्या अर्थाने वडिलांना पवित्र आत्म्याने नियुक्त केले जाते?
१६ वडील आणि सेवा सेवक हे परिपूर्ण नाहीत. आपल्या प्रमाणेच त्यांच्यातही काही उणिवा आहेत. तरीपण, वडील जन हे “मानवरूपी देणग्या” आहेत जे मंडळीला आध्यात्मिकरीत्या मजबूत करतात. (इफिसकर ४:८, NW ) पवित्र आत्म्याने वडिलांची नियुक्त केली जाते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) ती कशी? देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या त्याच्या वचनात दिलेल्या अपेक्षा या वडिलांना आधी पूर्ण कराव्या लागतात. (१ तीमथ्य ३:१-७, १२; तीत १:५-९) नंतर मग, एखादा बांधव या अपेक्षा पूर्ण करत आहे त्याची पारख करण्यास मार्गदर्शन मिळावे म्हणून मंडळीतले इतर वडील यहोवाच्या पवित्र आत्म्यासाठी कळकळीने प्रार्थना करतात.
१७. ख्रिस्ती स्त्रिया मंडळीतले कोणते काम करताना डोक्यावर पदर घेतात?
१७ कधीकधी असे होऊ शकते की एखाद्या मंडळीत, सहसा वडिलांनी किंवा सेवा सेवकांनी केले पाहिजे असे काम करण्यास जसे की, क्षेत्र सेवेची * (१ करिंथकर ११:३-१०) असे करण्याद्वारे या बहिणी कुटुंबात आणि मंडळीत यहोवाने केलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेच्या अधीन राहू शकतात.
सभा चालवण्याकरता त्यांच्यापैकी कोणीच नसेल. अशा वेळी, बाप्तिस्मा घेतलेले इतर बांधव ही सभा घेऊ शकतात. आणि असे कोणी बांधव नसतील तर अनुभवी ख्रिस्ती बहिणी ती सभा घेऊ शकतात. पण जेव्हा कोणतेही काम जे सहसा बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवाने करायचे असते ते बहीण करते तेव्हा ती आपल्या डोक्यावर पदर घेते.सरकारी अधिकाऱ्यांना अधीनता दाखवा
१८ खरे ख्रिस्ती, रोमकर १३:१-७ मधील तत्त्वांचे जाणीवपूर्वक पालन करतात. रोमकर पुस्तकातील हा उतारा वाचताना ‘वरिष्ठ अधिकारी’ हे शब्द सरकारी अधिकाऱ्यांना सूचित करतात, हे तुमच्या ध्यानात आले असेल. या मानवी शासकांना यहोवाने राज्य करण्याची परवानगी दिली आहे. हे मानवी शासक, महत्त्वपूर्ण कार्ये करतात व आपल्याला आवश्यक सेवा पुरवतात. या शासकांमुळेच काही अंशी समाजात सुव्यवस्था टिकून राहते. कायद्याचे पालन करण्याद्वारे आपण या अधिकाऱ्यांना अधीनता दाखवतो. जसे की, आपल्याला द्यावे लागणारे कर आपण देतो, सरकारी फॉर्म किंवा दस्ताऐवज व्यवस्थीत भरतो आणि आपले कुटुंब, आपला व्यवसाय किंवा आपली मालमत्ता यांसंबंधाने असलेल्या नियमांचे पालन करतो. परंतु हे अधिकारी आपल्याला देवाच्या आज्ञा मोडण्यास सांगतात तेव्हा आपण त्यांचे ऐकत नाही. तर, आपलेही उत्तर प्राचीन काळातील प्रेषितांप्रमाणेच असते: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९; “ मी कोणाच्या अधिकाराच्या अधीन राहावे?” हा चौकोन पाहा.
१८, १९. (क) रोमकर १३:१-७ मधील तत्त्वे तुम्ही कशी समजावून सांगाल? (ख) आपण सरकारी अधिकाऱ्यांप्रती आदर कसा दाखवू शकतो?
१९ इतरांबरोबरील आपल्या वागणुकीद्वारे देखील आपण सरकारी अधिकाऱ्यांना अधीनता दाखवतो. कधीकधी, आपला संपर्क थेट सरकारी प्रेषितांची कृत्ये २६:२, २५) आपणही पौलाचे अनुकरण करतो. आपण ज्या अधिकाऱ्याशी बोलतो तो राष्ट्राध्यक्ष असो अथवा एक साधा पोलीस असो, आपण त्यांच्याशी आदरानेच बोलतो. शाळेला जाणारे तरुण ख्रिस्ती अशाच प्रकारे आपले शिक्षक, शालेय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आदराने वागतात. आपले धार्मिक विश्वास ज्यांना पटतात केवळ त्यांनाच आपण आदर दाखवत नाही तर यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करणाऱ्यांशी देखील आपण आदराने वागतो. यावरून, साक्षीदार नसलेल्यांना आपली आदरणीय मनोवृत्ती दिसून येते.—रोमकर १२:१७, १८; १ पेत्र ३:१५.
अधिकाऱ्यांशी येतो. प्रेषित पौलाचा सुद्धा, राजा हेरोद अग्रीप्पा व प्रांताधिकारी फेस्त यांच्याशी संपर्क आला होता. या शासकांमध्ये गंभीर स्वरूपाच्या उणिवा होत्या तरीपण पौलाने त्यांना आदराने महाराज किंवा राजे असे संबोधले. (२०, २१. अधिकाराप्रती योग्य आदर दाखवल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात?
२० प्रेषित पेत्राने असे लिहिले: “सर्वांस मान द्या.” (१ पेत्र २:१७) यास्तव, आपण इतरांचा आदर केला पाहिजे. आपण लोकांचा मनापासून आदर करत आहोत हे जेव्हा त्यांना जाणवते तेव्हा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडू शकतो. आदर दाखवण्याची मनोवृत्ती आज नाहीशी होत चालली आहे. पण आपण मात्र अधिकाऱ्यांबद्दल आदर दाखवून व त्यांच्या अधीन राहून येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करतो. त्याने म्हटले: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.”—मत्तय ५:१६.
२१ आध्यात्मिक अंधकार असलेल्या या जगात प्रांजळ मनाचे लोक आध्यात्मिक प्रकाशाकडे आकर्षित होतात. आपण जेव्हा कुटुंबात, मंडळीत व इतर प्रसंगी अधीनता दाखवतो तेव्हा काही लोक आपल्याला पाहून प्रभावीत होऊन आपल्याबरोबर प्रकाशात चालण्यास प्रवृत्त होतील. किती ही अद्भुत आशा! आणि असे झाले नाही तरी एक गोष्ट मात्र नक्की. लोकांना आपण आदर दाखवतो तेव्हा यहोवाला आनंद होतो व आपल्याला त्याच्या प्रेमात टिकून राहण्यास मदत होते. यापेक्षा मोठा बहुमान आणखी कोणता असू शकतो?
^ परि. 17 डोक्यावर पदर केव्हा व का घेतला पाहिजे? या लेखात, या तत्त्वाचे पालन करण्याकरता काही व्यावहारिक मार्ग दिले आहेत.