अध्याय ८
देव शुद्ध लोकांवर प्रेम करतो
“शुद्धाशी तू शुद्ध भावनने वागतोस.”—स्तोत्र १८:२६.
१-३. (क) आपला मुलगा नीटनेटका दिसावा याची काळजी एक आई का घेते? (ख) आपल्या उपासकांनी शुद्ध असावे, अशी अपेक्षा यहोवा का करतो व कोणत्या गोष्टीने प्रवृत्त होऊन आपण शुद्ध राहण्याचा प्रयत्न करतो?
एक आई आपल्या मुलाला आवरत आहे. ते कोठेतरी बाहेर चालले आहेत. ती आपल्या मुलाला आंघोळ घालून स्वच्छ व नीटनेटके कपडे घालते. मुलाला स्वच्छ ठेवल्याने त्याचे आरोग्य चांगले राहते हे तिला माहीत आहे. शिवाय, आपल्या मुलाने टापटीप कपडे घातले तर त्याच्या आईवडिलांना कोणी नाव ठेवणार नाहीत, उलट त्यांची प्रशंसा करतील, हेही तिला माहीत आहे.
२ आपल्या सेवकांनी स्वच्छ राहावे, अशी आपला स्वर्गीय पिता यहोवा याची इच्छा आहे. त्याच्या वचनात असे म्हटले आहे: “शुद्धाशी तू शुद्ध * (स्तोत्र १८:२६) यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे. आपण स्वच्छ राहलो तर आपलेच भले होईल हेही त्याला माहीत आहे. स्वच्छ व शुद्ध राहून आपण त्याचे नाव काढावे, अशी तो आपल्याकडून म्हणजे त्याच्या साक्षीदारांकडून अपेक्षा करतो. होय, आपला स्वच्छ व नीटनेटका पेहराव आणि उत्तम वर्तन यांमुळे यहोवा आणि त्याचे पवित्र नाव यांवर कलंक येणार नाही तर गौरव होईल.—यहेज्केल ३६:२२; १ पेत्र २:१२.
भावनने वागतोस.”३ देव शुद्ध लोकांवर प्रेम करतो, हे माहीत झाल्यामुळे आपण शुद्ध राहण्यास प्रवृत्त होतो. आपलेही देवावर प्रेम असल्यामुळे आणि त्याच्या प्रीतीत राहण्याची आपली इच्छा असल्यामुळे आपण आपल्या कार्यांद्वारे त्याचे गौरव करतो. तेव्हा, आपण शुद्ध का राहिले पाहिजे, शुद्ध राहण्यात काय काय गोवलेले आहे आणि आपण स्वतःला शुद्ध कसे ठेवू शकतो, यांचे परीक्षण करू या. हे परीक्षण केल्यावर आपल्याला, आपण कोणकोणत्या बाबतीत सुधारणा केली पाहिजे ते दिसून येईल.
आपण शुद्ध का राहिले पाहिजे?
४, ५. (क) शुद्ध राहण्याचे प्रमुख कारण काय आहे? (ख) यहोवाची स्वच्छता त्याच्या निर्मितीतून कशी दिसून येते?
४ स्वतःचे उदाहरण मांडून यहोवा आपले मार्गदर्शन करतो. बायबलमध्ये आपल्याला, “त्याचे अनुकरण करणारे व्हा,” असे आर्जवण्यात आले आहे. (इफिसकर ५:१) आपण शुद्ध का राहिले पाहिजे त्याचे प्रमुख कारण या वचनात सांगितले आहे. आपण ज्याची उपासना करतो तो यहोवा देव स्वतःच सर्व बाबतीत शुद्ध, निर्मळ व पवित्र आहे.—लेवीय ११:४४, ४५.
५ यहोवाचे गुण व त्याचे मार्ग जसे त्याने बनवलेल्या गोष्टींतून दिसून येतात तसेच त्याची स्वच्छताही आपल्याला निर्मितीतून दिसून येते. (रोमकर १:२०) देवाने पृथ्वीला मानवांसाठी एक स्वच्छ घर बनवले. म्हणूनच त्याने परिस्थितीकी चक्र बनवले आहे ज्यामुळे हवा आणि पाणी स्वच्छ होत राहते. आपल्या पृथ्वीमध्ये स्वतःला स्वच्छ करण्याची अद्भुत क्षमता आहे. यावरून स्पष्टपणे समजते, की ‘आपल्या सामर्थ्याने पृथ्वी उत्पन्न’ करणाऱ्या देवाच्या दृष्टीत स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. (यिर्मया १०:१२) आपल्यालाही स्वच्छतेचे महत्त्व वाटले पाहिजे.
६, ७. यहोवाची उपासना करणाऱ्यांकडून स्वच्छतेची अपेक्षा केली जाते यावर मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात कशा प्रकारे जोर देण्यात आला होता?
६ आपण शुद्ध का राहिले पाहिजे त्याचे आणखी एक कारण हे आहे, की विश्वाचा सार्वभौम शासक असलेला यहोवा आपल्या उपासकांकडून स्वच्छतेची अपेक्षा करतो. प्राचीन इस्राएल राष्ट्राला त्याने दिलेल्या नियमशास्त्रात, स्वच्छता आणि उपासना यांचा उल्लेख नेहमीच जोडून येतो. प्रायश्चित्ताच्या दिवशी तर महायाजकाला एकदा नव्हे दोनदा आंघोळ करायची होती, असे नियमशास्त्रात स्पष्टपणे सांगण्यात आले होते. (लेवीय १६:४, २३, २४) मंदिरात सेवा करणाऱ्या याजकांनी यहोवासाठी बलिदाने चढवण्याआधी आपले हात व पाय स्वच्छ धुवायचे होते. (निर्गम ३०:१७-२१; २ इतिहास ४:६) नियमशास्त्रात शारीरिक अशुद्धतेचे व उपासनेत भाग न घेण्याचे ७० प्रकार सांगितले होते. अशुद्धावस्थेत असलेला इस्राएली उपासनेत कोणताही भाग घेऊ शकत नव्हता. काही प्रकारच्या अशुद्धावस्थेत असताना त्याने जर भाग घेतला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. (लेवीय १५:३१) आवश्यक असलेले शुद्धतेचे विधी, ज्यांत स्नान करणे व आपले कपडे धुणे यांचाही समावेश होता ते करण्यास नकार देणाऱ्याचा “मंडळीतून . . . उच्छेद” केला जाई.—गणना १९:१७-२०.
७ आज आपण मोशेचे नियमशास्त्र पाळत नसलो तरी, स्वच्छतेच्या बाबतीत देवाचा काय दृष्टिकोन आहे हे या नियमशास्त्रातून समजू शकतो. देवाची उपासना करणाऱ्यांकडून स्वच्छतेची अपेक्षा केली जात होती, यावर नियमशास्त्रात जोर देण्यात आला होता. आजही यहोवा बदललेला नाही. (मलाखी ३:६) आपली उपासना जोपर्यंत “शुद्ध व निर्मळ” नाही तोपर्यंत यहोवा ती स्वीकारत नाही. (याकोब १:२७) त्यामुळे, याबाबतीत तो आपल्याकडून नेमके काय अपेक्षितो हे आपण माहीत करून घेणे अगत्याचे आहे.
देवाच्या नजरेत शुद्ध राहण्यात काय काय गोवलेले आहे?
८. यहोवा आपल्याकडून कोणकोणत्या बाबतीत शुद्ध राहण्याची अपेक्षा करतो?
८ बायबलमध्ये जेव्हा शुद्धतेचा उल्लेख केला जातो तेव्हा तो फक्त शारीरिक स्वच्छतेलाच लागू होत नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण देवाच्या नजरेत शुद्ध राहिले पाहिजे. यहोवा आपल्याकडून चार मुख्य गोष्टी—आपली उपासना, नैतिकता, आपले विचार आणि शारीरिकबाबतीत शुद्ध राहण्याची अपेक्षा करतो. यात काय काय गोवलेले आहे हे आपण पाहूया.
९, १०. उपासना शुद्ध ठेवण्याचा काय अर्थ होतो व खरे ख्रिस्ती काय टाळतात?
९ शुद्ध उपासना. स्पष्टपणे सांगायचे तर, आपण खऱ्या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ करू नये. इस्राएल लोक बॅबिलोन सोडून जेरुसलेमला परतले तेव्हा त्यांना, “तेथून निघून जा; अशुद्ध वस्तुला शिवू नका; . . . आपणास शुद्ध करा,” या देवाने दिलेल्या सूचनेचे पालन करायचे होते. (यशया ५२:११) इस्राएल लोकांना खरे तर जेरुसलेमला जाऊन पुन्हा एकदा यहोवाची शुद्ध उपासना सुरू करायची होती. ही उपासना शुद्ध असणे आवश्यक होते. देवाचा अनादर करणाऱ्या बॅबिलोनमधील धर्मांतील शिकवणी, प्रथा व रीतीरिवाज यांचे आचरण करून त्यांनी शुद्ध उपासना दूषित करायची नव्हती.
१० आज खरे ख्रिस्ती यानात्याने आपण शुद्ध उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ न करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. (१ करिंथकर १०:२१) याबाबतीत आपण सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे, कारण आपल्या चहूबाजूला खोट्या धर्माचा प्रभाव आहे. अनेक देशांत, विविध परंपरा, कार्ये व रीतीरिवाज यांचा खोट्या धर्माच्या शिकवणुकींशी संबंध आहे. जसे की मृत्यूनंतर आपल्या शरीरातले काहीतरी जिवंत राहते, ही शिकवण. (उपदेशक ९:५, ६, १०) खरे ख्रिस्ती, खोटे धार्मिक विश्वास असलेल्या प्रथा टाळतात. * ते इतरांकडून येणाऱ्या दबावांमुळे, शुद्ध उपासनेच्या बाबतीत असलेल्या बायबलमधील दर्जांशी समझोता करत नाहीत.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
११. नैतिकरीत्या शुद्ध राहण्याचा काय अर्थ होतो व याबाबतीत आपण स्वतःला शुद्ध ठेवणे का महत्त्वाचे आहे?
इफिसकर ५:५) यासाठी आपण नैतिकरीत्या शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. देवाच्या प्रेमात स्वतःला टिकवून ठेवण्याकरता आपण “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ” काढला पाहिजे, हे आपण या पुस्तकाच्या पुढील अध्यायात पाहणार आहोत. पश्चात्ताप न करणाऱ्या जारकर्मींना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०, १८) असे लोक देवाच्या नजरेत “अमंगळ” असलेल्यांपैकी आहेत. व या लोकांनी स्वतःला नैतिकरीत्या शुद्ध केले नाही तर त्यांच्या “वाट्यास . . . दुसरे मरण आहे.”—प्रकटीकरण २१:८.
११ नैतिक शुद्धता. नैतिकरीत्या शुद्ध राहण्यात सर्व प्रकारची लैंगिक अनैतिकता टाळणे समाविष्ट आहे. (१२, १३. विचार आणि कार्ये यांत काय संबंध आहे व आपण आपले विचार शुद्ध कसे ठेवू शकतो?
१२ शुद्ध विचार. आपल्या मनात जे विचार येतात त्यानुसार आपण कार्य करतो. आपल्या मनात व हृदयात आपण चुकीच्या विचारांना थारा दिला तर आज ना उद्या आपल्या हातून वाईट कृत्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (मत्तय ५:२८; १५:१८-२०) पण तेच आपण आपल्या मनात शुद्ध, स्वच्छ विचार भरले तर आपण शुद्ध आचरण ठेवण्यास प्रवृत्त होऊ. (फिलिप्पैकर ४:८) आपण आपले विचार शुद्ध कसे ठेवू शकतो? आपले विचार मलीन होऊ शकतील असे सर्व प्रकारचे मनोरंजन आपण टाळले पाहिजे. * तसेच देवाच्या वचनाचा दररोज अभ्यास करण्याद्वारे आपण आपले मन शुद्ध विचारांनी भरू शकतो.—स्तोत्र १९:८, ९.
१३ देवाच्या प्रीतीत राहायची आपली इच्छा असल्यास आपण आपली उपासना, नैतिकता आणि आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजेत. शुद्धतेच्या या पैलूंची, या पुस्तकातील इतर अध्यायात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे. आता आपण, चवथ्या पैलूची अर्थात शारीरिक स्वच्छतेची चर्चा करूया.
आपण शारीरिक स्वच्छता कशी राखू शकतो?
१४. शारीरिक स्वच्छतेची गोष्ट वैयक्तिक बाब का नाही?
१४ शुद्धतेच्या या प्रकारात, शारीरिक स्वच्छता आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे समाविष्ट आहे. पण ही गोष्ट एक वैयक्तिक बाब आहे का, ज्याबद्दल इतरांनी काही बोलू नये? यहोवाच्या उपासकांनी असा विचार करू नये. अध्यायाच्या सुरुवातीला असा उल्लेख करण्यात आला होता, की आपण स्वच्छ राहलो तर आपले भले होईल हे यहोवाला माहीत आहे. पण फक्त याच कारणामुळे तो आपल्या उपासकांकडून शारीरिक स्वच्छतेची अपेक्षा करत नाही तर, त्यामुळे त्याच्या नावाचे गौरव होते म्हणून तो अशी अपेक्षा करतो. आधी उल्लेखलेल्या उदाहरणाचा पुन्हा एकदा विचार करा. नेहमी घाणेरडे व गबाळे मूल पाहिल्यावर तुम्ही लगेच असा विचार करू लागता, की हे मूलच इतके घाणेरडे आहे तर त्याचे आईवडील कसे असतील. आपल्या २ करिंथकर ६:३, ४) आपण शारीरिकरीत्या शुद्ध कसे राहू शकतो?
पेहराव्यामुळे किंवा जीवनशैलीमुळे आपल्या स्वर्गीय पित्यावर कलंक येईल किंवा आपण प्रचार करत असलेल्या संदेशापासून लोकांचे लक्ष विचलित होईल असे काहीही आपण करू इच्छित नाही. बायबलमध्ये म्हटले आहे: “आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.” (१५, १६. चांगल्या आरोग्याच्या सवयींमध्ये कशाचा समावेश होतो आणि आपले कपडे कसे असावेत?
१५ वैयक्तिक स्वच्छता आणि आपला पेहराव. प्रत्येक राष्ट्राच्या रीतीभाती व लोकांच्या राहण्याच्या पद्धती यांत फरक आहे. असे असले तरी, दररोज अंघोळ करण्याकरता सहसा सर्वांकडे साबण व पाणी असते. यामुळे आपण स्वतः स्वच्छ राहू शकतो, आपल्या मुलांनाही स्वच्छ ठेवू शकतो. चांगल्या आरोग्याच्या सवयींमध्ये, अन्नपदार्थ हाताळण्याआधी, शौचालयास जाऊन आल्यावर व बाळाची लंगोट (डायपर) बदलल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुणे समाविष्ट आहे. साबणाने हात स्वच्छ धुतल्यामुळे आजार टाळता येऊ शकतात, शिवाय यामुळे जीवनही वाचू शकते. असे केल्यामुळे जीवघेण्या रोगजंतुंचा प्रसार होण्याचे तसेच जुलाब व त्यासारखे इतर रोग टाळले जातील. ज्या देशांतील घरांमध्ये शौचालयांची सोय नाही तेथे प्राचीन इस्राएलमध्ये केले जात होते त्याप्रमाणे मलमूत्र मातीत पुरून त्याची विल्हेवाट लावता येऊ शकते.—अनुवाद २३:१२, १३.
१६ आपण आपले कपडे देखील वेळच्या वेळी धुवून इस्त्री करावेत. ख्रिश्चनांचे कपडे चांगले असावेत, याचा अर्थ ते सध्याच्या फॅशननुसार व महागडे असावेत असे नाही तर ते नीट, स्वच्छ व शालीन असावेत. (१ तीमथ्य २:९, १०) आपण जगात कोठेही राहत असलो तरी, आपल्या पेहराव्याद्वारे आपण, “आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी.”—तीत २:१०.
१७. आपले घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ व नीटनेटका का असला पाहिजे?
१७ आपले घर, सभोवतालचा परिसर आणि आपली मालमत्ता. आपले घर कदाचित खूपच सजवलेले किंवा आलिशान नसले तरी, ते स्वच्छ प्रकटीकरण ११:१८; लूक २३:४३, NW ) होय, आपले घर आणि आपल्या जवळ असलेल्या वस्तू स्वच्छ ठेवून आपण इतरांना दाखवू इच्छितो, की येणाऱ्या नवीन जगासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छ सवयी आपण स्वतःला आत्तापासूनच लावायला सुरुवात केली आहे.
आणि आपल्या ऐपतीनुसार नीटनेटके असावे. तसेच, सभांना व क्षेत्र सेवेला जाण्या-येण्याकरता आपण गाडी वापरत असू तर ती आपण आतून बाहेरून स्वच्छ ठेवण्याचा होता होईल तो प्रयत्न केला पाहिजे. आपले स्वच्छ घर आणि आजूबाजूचा स्वच्छ परिसर देखील, आपण उपासना करत असलेल्या देवाची मूक साक्ष देतो, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. कारण आपण लोकांना शिकवतो, की यहोवा देव स्वच्छतेची आवड बाळगणारा देव आहे, तो “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करणार आहे आणि त्याचे राज्य या पृथ्वीचे एका सुंदर नंदनवनात रुपांतर करणार आहे. (१८. आपण आपल्या राज्य सभागृहाबद्दल आदर कसा दाखवू शकतो?
१८ आपल्या उपासनेचे ठिकाण. यहोवावरील आपले प्रेम, आपल्या भागात खऱ्या उपासनेसाठी आपण वापरत असलेल्या राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवण्यास प्रवृत्त करते. आपले सभागृह पाहून नवीन लोकांनी प्रभावीत व्हावे, अशी आपली इच्छा असते. त्यामुळे आपले राज्य सभागृह टापटीप व आकर्षक दिसावे म्हणून आपण नियमितरीत्या त्याची स्वच्छता व देखभाल केली पाहिजे. प्रत्येक जण आपल्या परीने राज्य सभागृह स्वच्छ ठेवून त्याच्याप्रती आदर दाखवतो. राज्य सभागृहाची स्वच्छता व ते “दुरुस्त” करण्यासाठी आपण काढत असलेला वेळ एक बहुमान आहे. (२ इतिहास ३४:१०) हीच गोष्ट, आपण संमेलनांसाठी किंवा अधिवेशनांसाठी एकत्र येतो त्या ठिकाणाच्याबाबतीतही लागू होते.
दूषित करणाऱ्या सवयींपासून व व्यसनांपासून स्वतःला शुद्ध ठेवणे
१९. स्वतःला शारीरिकरीत्या स्वच्छ ठेवण्याकरता आपण काय टाळले पाहिजे व याबाबतीत बायबल आपली कशी मदत करते?
१९ स्वतःला शारीरिकरीत्या स्वच्छ ठेवण्याकरता आपण, आपले शरीर दूषित करणाऱ्या सवयी व व्यसनेही टाळली पाहिजेत. जसे की, धूम्रपान,
दारूबाजी, गुंगी आणणारे किंवा मूड बदलण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आपण टाळणे आवश्यक आहे. आज सर्वत्र असलेल्या अशुद्ध व किळसवाण्या सवयींचा व व्यसनांचा उल्लेख बायबलमध्ये करण्यात आलेला नसला, तरीसुद्धा त्यात काही तत्त्वे सांगितली आहेत ज्यावरून आपल्याला, यांविषयी यहोवाला कसे वाटते ते समजण्यास मदत होते. या गोष्टींविषयी यहोवाचा दृष्टिकोन आपल्याला माहीत असल्यामुळे आणि त्याच्यावरील आपल्या प्रेमामुळे आपण, तो आनंदित होईल असा मार्ग निवडतो. यासंबंधी असलेल्या बायबलमधील पाच तत्त्वांचा आता आपण विचार करूया.२०, २१. आपण कोणकोणत्या सवयी सोडून द्याव्यात अशी यहोवाची इच्छा आहे व असे करण्याकरता कोणते जोरदार कारण आपल्याजवळ आहे?
२० “प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) आपले शरीर दूषित करणाऱ्या व आपल्या विचारसरणीवर वाईट प्रभाव पाडणाऱ्या सर्व सवयी व व्यसने आपण सोडून द्यावेत, अशी यहोवाची इच्छा आहे. यास्तव शारीरिक व मानसिक आरोग्यास हानीकारक ठरणाऱ्या सवयी आपण सोडून दिल्या पाहिजेत.
२१ ‘सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून’ स्वतःला शुद्ध ठेवण्याकरता बायबल आपल्याला एक जोरदार कारण देते. २ करिंथकर ७:१ या वचनाची सुरुवात, “आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून,” या शब्दांनी होते. कोणती अभिवचने? आधीच्या वचनांत यहोवा असे वचन देतो: “मी तुम्हाला स्वीकारीन; . . . आणि मी तुम्हाला पिता असा होईन.” (२ करिंथकर ६:१७, १८) कल्पना करा: यहोवा आपल्याला त्याच्या छत्रछायेखाली घेण्याचे व एक पिता जसा आपल्या लेकरांवर प्रेम करतो तसे प्रेम करण्याचे वचन देतो. आपण जर “देहाच्या व आत्म्याच्या” सर्व अशुद्धता टाळल्या तरच तो हे अभिवचन पूर्ण करेल. एखाद्या किळसवाण्या सवयीसाठी किंवा व्यसनासाठी आपण यहोवाबरोबरचा मौल्यवान व घनिष्ठ नातेसंबंध गमावत असू तर हा नक्कीच मूर्खपणा ठरेल.
२२-२५. अशुद्ध सवयी व व्यसने टाळण्याकरता बायबलमधील कोणती तत्त्वे आपल्याला साहाय्य करू शकतात?
२२ “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने’ व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७) ही आज्ञा सर्व आज्ञांत मोठी आहे, असे येशूने सांगितले. (मत्तय २२:३८) आपले हे प्रेम मिळण्यास यहोवा खरोखरच पात्र आहे. आपण जर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने त्याच्यावर प्रेम करू इच्छितो, तर आपले जीवन कमी करणाऱ्या किंवा देवाने दिलेली विचारशक्ती कमकुवत करणाऱ्या सवयी आपण टाळल्या पाहिजेत.
२३ “जीवन, प्राण व सर्व काही [यहोवा] स्वतः सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२४, २५) जीवन आपल्याला यहोवाकडून मिळालेली देणगी आहे. आपण त्याच्यावर प्रेम करतो म्हणून त्याने दिलेल्या देणगीचा आपण आदर करतो. आपल्या आरोग्यास घातक असलेल्या सर्व सवयी व व्यसने आपण टाळतो; या सवयी आपल्याला असतील तर आपण जीवनाच्या देणगीबद्दल घोर अनादर दाखवतो असे होईल.—स्तोत्र ३६:९.
२४ “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९) वाईट सवयी व व्यसनांचा दुष्परिणाम फक्त त्या व्यक्तीवरच होत नाही तर त्याच्या आसपासच्या लोकांवरही होतो. उदाहरणार्थ, जे लोक सिगारेट ओढतात त्याचा धूर आजूबाजूच्या लोकांच्या नाकातोंडात जातो व यामुळे त्यांच्याही आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होतात. अशा रीतीने आजूबाजूच्या लोकांना इजा पोहचवणारी व्यक्ती आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर ही देवाने दिलेले आज्ञा मोडत असते. शिवाय, देवावर प्रेम करत असल्याचा तिचा दावा देखील खोटा असतो.—१ योहान ४:२०, २१.
२५ “सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या.” (तीत ३:१) अनेक देशांमध्ये मादक पदार्थ स्वतःजवळ बाळगणे किंवा त्यांचा वापर करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. आपण खरे ख्रिस्ती असल्यामुळे मादक पदार्थ स्वतःजवळ बाळगत नाही किंवा त्यांचा वापरही करत नाही.—रोमकर १३:१.
२६. (क) देवाच्या प्रीतीत टिकून राहण्याकरता आपण काय केले पाहिजे? (ख) देवाच्या नजरेत शुद्ध राहण्यासारखा दुसरा उत्तम मार्ग का नाही?
२६ देवाच्या प्रेमात टिकून राहण्याकरता आपण फक्त काही बाबतीतच नव्हे तर सर्वबाबतीत शुद्ध असले पाहिजे. मन व शरीर दूषित करणाऱ्या सवयी व व्यसने सोडून देणे व त्यांच्यापासून दूर राहणे कदाचित सोपे नसेल. परंतु असे करणे शक्य आहे. * आणि यासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही, कारण यहोवा नेहमी जे हितकारक आहे तेच आपल्याला शिकवतो. (यशया ४८:१७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शुद्ध राहून आपण यहोवा देवाचे नाव काढतो आणि असे केल्याने त्याच्या प्रीतीत टिकून राहिल्याचे समाधान आपल्याला मिळते.
^ परि. 2 “शुद्ध” असे भाषांतर करण्यात आलेला हिब्रू शब्द फक्त शारीरिक स्वच्छतेलाच नव्हे तर नैतिक अथवा शुद्ध उपासनेलाही लागू होतो.
^ परि. 10 खरे ख्रिस्ती विशिष्ट सणवार व प्रथा का टाळतात यांची चर्चा या पुस्तकाच्या १३ व्या अध्यायात करण्यात आली आहे, ती पाहा.
^ परि. 12 हितकारक मनोरंजन कसे निवडायचे याबद्दलची चर्चा या पुस्तकाच्या ६ व्या अध्यायात करण्यात आली आहे.
^ परि. 26 “ जे उचित आहे ते करण्यास मी झटतो का?” आणि “ देवाला तर सर्व शक्य आहे” असे शीर्षक असलेले चौकोन पाहा.
^ परि. 67 नाव बदलण्यात आले आहे.