व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ११

एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा काय होते?

एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा काय होते?

“त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.”

स्तोत्र १४६:४

“आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; . . . जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे [कबरेकडे] तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ती-प्रयुक्‍ती, बुद्धी व ज्ञान ह्‍यांचे नाव नाही.”

उपदेशक ९:५, १०

“[येशू] त्यांना म्हणाला, ‘आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.’ येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणाऱ्‍या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, ‘लाजर मेला आहे.’”

योहान ११:११, १३, १४