व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १४

पैशाचा योग्य वापर कसा करावा?

पैशाचा योग्य वापर कसा करावा?

“ज्याला ख्यालीखुशाली आवडते तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षारसाचा व सुगंधी तेलाचा शोक आहे तो धनवान होत नाही.”

नीतिसूत्रे २१:१७

“उसने घेणारा उसने देणाऱ्‍यांचा सेवक आहे.”

नीतिसूत्रे २२:७, पं.र.भा.

“तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्‍याला तो पुरा करता आला नाही.’”

लूक १४:२८-३०

“ते तृप्त झाल्यावर त्याने [येशूने] आपल्या शिष्यांना सांगितले, ‘काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.’”

योहान ६:१२