व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १८

तुम्ही देवाबरोबर मैत्री कशी करू शकता?

तुम्ही देवाबरोबर मैत्री कशी करू शकता?

“तू [यहोवा] जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते.”

स्तोत्र ६५:२

“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”

नीतिसूत्रे ३:५, ६

“सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”

योहान १७:३

“तो [देव] आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.”

प्रेषितांची कृत्ये १७:२७

“माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.”

फिलिप्पैकर १:९

“जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो . . . सर्वांना उदारपणे देणग्या देतो.”

याकोब १:५

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.”

याकोब ४:८

“देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”

१ योहान ५:३