प्रश्न २
तुम्ही देवाबद्दलची माहिती कशी मिळवू शकता?
“नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.”
“त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला; वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.”
“जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; . . . तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. . . . जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”
“फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला [कुशी षंढाला] यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले; त्यावर तो म्हणाला, ‘आपण जे वाचत आहा ते आपल्याला समजते काय?’ त्याने म्हटले, ‘कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?’”
“सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या [देवाच्या] अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना [देवाला न मानणाऱ्यांना] कसलीही सबब राहू नये.”
“तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यांत गढून जा.”
“प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. . . [आणि] एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध” करू.
“तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो.”