व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनाची प्रस्तावना

देवाच्या वचनाची प्रस्तावना

बायबल हे देवाचे वचन आहे. त्यात आपल्यासाठी त्याचा संदेश आहे. जीवनात यशस्वी कसे होता येईल आणि देवाची संमती कशी मिळवता येईल ते या माहितीपत्रकात सांगण्यात आले आहे. पुढील प्रश्‍नांची उत्तरेदेखील त्यात देण्यात आली आहेत:

  1. देव कोण आहे?

  2. तुम्ही देवाबद्दलची माहिती कशी मिळवू शकता?

  3. बायबल कोणी लिहिले?

  4. बायबलमध्ये पृथ्वीबद्दल जे सांगितले आहे ते अचूक आहे का?

  5. बायबलमध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे?

  6. बायबलमध्ये मशीहाबद्दल कोणत्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या?

  7. बायबलमध्ये आपल्या दिवसांबद्दल काय सांगण्यात आले आहे?

  8. मानवांना सहन करावे लागत असलेले दुःख देवामुळे आहे का?

  9. मानवांना दुःख का सहन करावे लागते?

  10. १० बायबलमध्ये भविष्याबद्दल काय सांगण्यात आले आहे?

  11. ११ एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा काय होते?

  12. १२ मृत लोकांबद्दल आपण कोणती आशा बाळगू शकतो?

  13. १३ काम करण्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे?

  14. १४ पैशाचा योग्य वापर कसा करावा?

  15. १५ तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?

  16. १६ तुम्ही चिंतांवर मात कशी करू शकता?

  17. १७ बायबलमधील सल्ल्याचा तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो?

  18. १८ तुम्ही देवाबरोबर मैत्री कशी करू शकता?

  19. १९ बायबलमधील पुस्तकांत कोणती माहिती दिली आहे?

  20. २० बायबल वाचनाचा तुम्ही पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता?

बायबलमधील वचने शोधण्याचा सोपा मार्ग

बायबल हे ६६ लहान-लहान पुस्तकांचे मिळून बनले आहे. त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत: हिब्रू-अरेमिक शास्त्रवचने (“जुना करार”) आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने (“नवा करार”). प्रत्येक पुस्तकाचे अध्याय आणि वचने असे विभाजन करण्यात आले आहे. बायबलमधील वचनांचा उल्लेख केला जातो तेव्हा, पुस्तकाच्या नावानंतरचा पहिला आकडा म्हणजे त्या पुस्तकाचा अध्याय, दुसरा आकडा किंवा आकडे म्हणजे वचन अथवा वचने. जसे की, उत्पत्ति १:१ म्हणजे उत्पत्ति अध्याय १ आणि वचन १.