व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ५

बायबलमध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे?

बायबलमध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे?

“तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्‍यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडेल, व तू तिची टाच फोडशील.”

उत्पत्ति ३:१५

“तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.”

उत्पत्ति २२:१८

“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”

मत्तय ६:१०

“शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवेल.”

रोमकर १६:२०

“त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.”

१ करिंथकर १५:२८

“अब्राहामाला व त्याच्या संतानाला [जो ख्रिस्त आहे त्याला] ती अभिवचने सांगितली होती. . . . आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान . . . आहात.”

गलतीकर ३:१६, २९

“जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करेल.”

प्रकटीकरण ११:१५

“तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.”

प्रकटीकरण १२:९

“त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्‍याला धरले, आणि एक हजार वर्षांपर्यंत त्याला बांधून ठेवले.”

प्रकटीकरण २०:२