व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ७

बायबलमध्ये आपल्या दिवसांबद्दल काय सांगण्यात आले आहे?

बायबलमध्ये आपल्या दिवसांबद्दल काय सांगण्यात आले आहे?

“राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल . . . ह्‍या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत.”

मत्तय २४:७, ८

“पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.”

मत्तय २४:११, १२

“तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्‍या गोष्टी होणे आवश्‍यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही.”

मार्क १३:७

“मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मऱ्‍या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होईल व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.”

लूक २१:११

“शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.”

२ तीमथ्य ३:१-५